✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित पुरुषांसाठी कोकीळ व्रत

द
दमामि यांनी
Tue, 08/25/2015 - 20:16  ·  लेख
लेख
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. यावेळी समस्त विवाहित पुरुष वर्गासाठी कोकीळ व्रत सुचवले जाते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहे. हे व्रत विवाहित पुरुष करतात. (कारण त्यांनाच त्याची गरज असते ). हे व्रत केल्याने पुरुषांना दीर्घकाळ सौ माहेरी गेल्याचे भाग्य, म्हणून आपोआपच पौरुषवृद्धी, शेजारसौख्य व इतर प्रपंचात न अनुभवता येणारी सुखे प्राप्त होतात. हे व्रत ब्रह्मर्षी विश्वामित्रांना मेनकेने सांगितले. कोकीळ व्रताची कहाणी: शंकराची बायको पार्वती. तिला नेहमी आपल्या नवऱ्याचा आणि गंगाबाईचा संशय येई. त्यामुळे ती शंकरावर कायम लक्ष ठेऊन असे. कध्धी म्हणून माहेरी जात नसे. शंकराने बघितले तर सर्व देवांच्या बायका वर्षातून एकदा तरी चांगल्या महिनाभर माहेरी मुक्कामाला जातात पण पार्वती चुकून सुद्धा माहेरचे नाव घेत नाही . शंकराला आपल्या अविवाहित मुक्त जीवनाची (बॅचलर लाइफ़) ची फारच सय येऊ लागली. त्याचवेळी तिथे नारद मुनी प्रवेश करते झाले. शंकराच्या मुखकमलाकडे पाहून त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी शंकरास मदत करायचे ठरविले. नारदमुनी (कळलावे) तिथून कोकीळ पक्ष्याच्या रुपात थेट पार्वतीकडे आले व दक्षनगरीत चालू असलेल्या आभूषणे व वस्त्रे यांच्या अल्प किमतीतील विक्री आणि प्रदर्शनाचे आणि तिथे देवी लक्ष्मी, सरस्वती, इंद्राणी यांनी केलेल्या खरेदीचे रसभरीत वर्णन गाऊ लागले. ते ऐकून दाक्षायणीला फारच चुटपूट लागून राहिली. (इतर स्त्रियांनी फायद्याची खरेदी केली आपल्याला मात्र संधी मिळाली नाही याचा स्त्रियांना फार राग येतो हो!). तिने शंकराच्या मागे भुणभुण चालू केली," मला माहेरची खूप आठवण येते. गेल्या अठरा वर्षात तुमची आबाळ होऊ नये म्हणून मी एकदाही तिथे गेले नाही, एकदा जाऊन यावेसे वाटते." शंकराने "तुझ्यामागे माझी काळजी कोण घेणार? जेवणाचे काय?" इत्यादी कारणे सांगत तिला अडवायचा लटका प्रयत्न केला. वस्त्रभूषणांच्या आनंदापुढे सर्व गोष्टी दुय्यम वाटल्याने "गंगाबाईला मी माझ्या हाताखाली साऱ्यांमध्ये निपुण केले आहे, माझ्यामागे ती तुमची व्यवस्था पाहील" असे सांगून पार्वती त्वरीत माहेरी जाण्यास निघाली आणि चांगली दोन मासांनंतर परत आली. शंकराने कैलास पर्वतावर स्वर्गीय सुख भोगले ते वेगळे सांगायला नकोच. त्यावेळपासून शंकर कोकीळ पक्ष्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि जो कोणी विवाहित पुरुष तुझे व्रत करेल त्यावर मी प्रसन्न होऊन त्याच्या पत्नीस माहेरी पाठवेन असा वर दिला. व्रत: प्रथम कोकिळ पक्षी शोधायचा. तो मिळाला की मला व्यनि करायचा. मगच मी पूर्ण व्रताची कृती देईन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
21266 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

खी खी खी ;)

बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 12:31 नवीन
खी खी खी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

त्वं सन्तुलितव्यक्ती

पगला गजोधर
गुरुवार, 08/27/2015 - 13:10 नवीन
त्वं सन्तुलितव्यक्ती एतत् जानामि, तत्र कोपि सन्देहः नास्ति । अन्यथा अहम् इति प्रतिभाति मनशङ्के प्रकट न करोमिस्म । ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खी खी खी =))

प्रचेतस
Wed, 08/26/2015 - 14:06 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते अयि च्या ऐवजी भो:

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/27/2015 - 07:14 नवीन
ते अयि च्या ऐवजी भो: तुडतुडीबंधो असावं असा सौंशय आहे रे =)) बाकी बॉलरच्या हातावर बॅट हाणुन थेट ष्टेडियमच्या बाहेर षटकार. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

देवा असल्या विनोदबुद्धीहिन

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/27/2015 - 07:12 नवीन
देवा असल्या विनोदबुद्धीहिन लोकांना थोडसं विनोदबुद्धीचं वाटप कर रे बाबा. असं झालं तर मिपावर रोज एक विडंबन पाडिन हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

दमामि भौ

बाबा योगिराज
Wed, 08/26/2015 - 13:22 नवीन
आमाले पन द्या महिती.........
  • Log in or register to post comments

आधी कोकीळ पकडून आणि, मग

दमामि
गुरुवार, 08/27/2015 - 08:27 नवीन
आधी कोकीळ पकडून आणि, मग सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

हाहाहा. अशक्य विडंबन आहे. का

मृत्युन्जय
Wed, 08/26/2015 - 13:41 नवीन
हाहाहा. अशक्य विडंबन आहे. का कुणास ठाऊक पण दमामिंच्या लेखनावर घासुगुर्जींच्या लेखनाची छाप आहे. ते देखील विडंबनविद्यापारंगत आहेत.
  • Log in or register to post comments

@का कुणास ठाऊक पण दमामिंच्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/26/2015 - 14:04 नवीन
@का कुणास ठाऊक पण दमामिंच्या लेखनावर घासुगुर्जींच्या लेखनाची छाप आहे. ते देखील विडंबनविद्यापारंगत आहेत.>> :-D अट्यंट सहमत आहे! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

यांच्याबद्दल खूप ऐकून आहे.

दमामि
Wed, 08/26/2015 - 14:25 नवीन
यांच्याबद्दल खूप ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

व्रतविधी....

नि३सोलपुरकर
Wed, 08/26/2015 - 14:02 नवीन
खूप छान, अतिशय उत्तम माहिती. तसेच व्रतविधी दिला असता तरी बरे झाले असते.
  • Log in or register to post comments

या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी

सूड
Wed, 08/26/2015 - 15:14 नवीन
ऐका कोकीळांनो, तुमची कहाणी. स्वर्गलोकीं इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पाडवसभा इत्यादि पांची सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजाताहेत, रंभा नाचताहेत, तों तुंबोर्‍याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या मेर्‍या फुटल्या. असें झाल्यावर सभेचा हुकूम झाला. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. गांवांत कोणी वाणवशावाचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोर्‍याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा.” असा हुकूम झाल्यावर किसनदेव आपल्या मनांत भ्याले. माझा मित्र अर्जुन ह्यानं कांहीं वाणवसा केला नसेल. रात्रीच्या पार्टीतच तो टल्ली झाला होता. तेव्हा ते उठले, त्याच्याकडे जाऊन चौकशी केली. त्यानं कांहीं वाणवसा केला नाहीं. नंतर कृष्णांनीं त्याला कोकीळाकरवी वसा सांगितला. ” अर्जुना अर्जुना, आखाड्या चतुर्दशीपासून रोज सकाळी; आय रिपीट रोज सकाळी आंघोळ करावी, अभक्ष्यभक्षण केल्यानंतर दात घासावे, अपेयपान केल्यानंतर फ्लॉस करावे . हा वसा श्रावण्या चतुर्दशीस संपूर्ण करावा. उद्यापनाचे वेळीं ब्याचलरास जेवायला बोलवावे आणि पाच घरचे सवाष्ण बाप्ये बोलवून पार्टी करावी." असं सांगून कोकीळ पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच अर्जुनानं सांगितल्याप्रमाणं केलं. पुढं सभेंत कळलं. अर्जुन वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पहातात, तों त्यानं वसा वसला आहे. पुढं येतां येतां सुभद्रा त्यांना दिसली. तिने मोलकरणीला उद्योगाला लावले होते आणि आपण दक्षिणेस पाय करून 'होणार सून मी ह्या घरची' बघत बसली होती. तेव्हां तिला महिन्याभरासाठी माहेरी पाठवले. नंतर तंबोर्‍याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेर्‍या वाजत्या केल्या. तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं ह्या व्रताच्या योगानं अर्जुनावरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण. तात्पर्य : ऊतू नये मातू नये, भरला ग्लास ओतू नये.
  • Log in or register to post comments

अग्गाग्गा... पार स्टेडीअमच्या

थॉर माणूस
Wed, 08/26/2015 - 15:28 नवीन
अग्गाग्गा... पार स्टेडीअमच्या बाहेरच मारलाय. एक नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))=))

अजया
Wed, 08/26/2015 - 17:48 नवीन
जबराट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

मस्तच हो सूडराजे.

मांत्रिक
Wed, 08/26/2015 - 15:40 नवीन
मस्तच हो सूडराजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बेष्ट!

प्यारे१
Wed, 08/26/2015 - 15:43 नवीन
बेष्ट! लगेच सुरु केल्या जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुरवणी:

पगला गजोधर
Wed, 08/26/2015 - 16:02 नवीन
एका मिपाकर पुरुषाने, हे कोकीळ व्रत केलं, आणि त्यामुळे त्याचं खूप भलं झालं, त्याच्या पत्नीला माहेरचा उमाळा येवु लागला, प्रत्येक महिन्यात ती माहेरी २-३ दिवसांसाठी जावू लागली. पण नंतर दुसऱ्या वर्षी तो व्रत रीन्यु करायचं विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला. सगळे सासरची मंडळीना उमाळा येवून ते वरचेवर मुक्कामी यायला लागले, मेहुण्याला इंजिनीअरिंगला त्याच्याच शहरातील संस्थेत प्रवेश मिळाला आणि तो मुक्कामी आला, नंतर पुन्हा पुरुषाने लेट फी भरून कोकीळ व्रत रीन्यु केल्यावर, त्याच्या सासरच्या मंडळीचा उमळा कमी होऊन, ते सर्व येइनाशे झाले, मेव्हण्याच कॉलेजात ग्याटम्याट जुळले, त्यामुळे मेव्हण्याने, त्याच्याघरी स्टडी होत नाही असे वाटायला लागण्यामुळे, व अभ्यासाला प्रेरणा मिळावी या हेतूने कॉलेज वसतीगृहावर मुक्काम हलवला, त्या पुरुषाचं सुखकाळ परत मिळाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आधी ---- नन्तर

पगला गजोधर
Wed, 08/26/2015 - 17:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

शिलिंडर उचलेपरेंत मागे आलेली

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/26/2015 - 23:30 नवीन
शिलिंडर उचलेपरेंत मागे आलेली ख्रांन्ती फाऊन याला बाहुं(चा दिला)बली का म्हणू णये? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अगागागागागागागागागा =)) =)) =

बॅटमॅन
Wed, 08/26/2015 - 16:12 नवीन
अगागागागागागागागागा =)) =)) =)) =)) =)) बाकी ते "भरला ग्लास ओतू नये" हे झ्याकच पटलं. भरला ग्लास, मग तो वारुणीचा असो वा ताकाचा, ओतू नये उगा कधीच साचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))

पैसा
Wed, 08/26/2015 - 17:59 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अफाट ....!!! काय प्रतिभा!!!

असंका
Wed, 08/26/2015 - 18:44 नवीन
अफाट ....!!! काय प्रतिभा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सही!!!!

दमामि
Wed, 08/26/2015 - 18:47 नवीन
सही!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

:):):):)

दमामि
Wed, 08/26/2015 - 18:50 नवीन
:):):):) आता तुम्ही सुद्धा माझ्या पापात सहभागी झालात तर!!! रच्याकने वाणवश म्हणजे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आधी सगळं पाप घ्यावं लागेल, मग

सूड
Wed, 08/26/2015 - 18:53 नवीन
आधी सगळं पाप घ्यावं लागेल, मग सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

=))

जुइ
गुरुवार, 08/27/2015 - 02:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

उत्तर धृवावरच्या ष्टेडियममधुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/27/2015 - 07:11 नवीन
उत्तर धृवावरच्या ष्टेडियममधुन थेट दक्षिण धृवावरच्या ष्टेडियम मधे मारलेला षटकार (का शतकार? ६ का १०० तेचं कळलं नै)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सूडा

भिंगरी
गुरुवार, 08/27/2015 - 12:23 नवीन
सूडा अरे मला दवाखान्यात पाठवतोस काय आता? हसून हसून पोटाची अन जबड्याची पार वाट लागली. असे लेखन करू नये बाळा उगाच हसून हसून म्हातारी मेल्याचे पातक लागेल तुला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आता आमाला नाय म्हैत, लागलंच

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/26/2015 - 15:25 नवीन
आता आमाला नाय म्हैत, लागलंच नक्की पाप तुला भो, ग्यारंटीने... (संदर्भसाठी खालील दुव्यावर क्लिकावे) http://www.misalpav.com/comment/734549#comment-734549"
  • Log in or register to post comments

Vrat awadale. Navaryala

यशश्री-हर्श
Wed, 08/26/2015 - 18:37 नवीन
Vrat awadale. Navaryala sangitala tar lagech tayar hoil karayala.. Kahani mastach..
  • Log in or register to post comments

टवाळ कार्टा ह्यांचे प्रतिसाद

वगिश
Wed, 08/26/2015 - 19:29 नवीन
टवाळ कार्टा ह्यांचे प्रतिसाद आजकाल दिसत नाही. कुठे आहेत ते?
  • Log in or register to post comments

जावू द्या हो.......

मुक्त विहारि
Wed, 08/26/2015 - 22:46 नवीन
सध्या ते जरा बिझी दिसतात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश

हाहाहा.

अविनाश पांढरकर
Wed, 08/26/2015 - 22:55 नवीन
अशक्य विडंबन आहे.
  • Log in or register to post comments

विडंबन आवडले!

जुइ
गुरुवार, 08/27/2015 - 02:21 नवीन
विडंबन आवडले!
  • Log in or register to post comments

टू मच आहे हे!

रातराणी
Sat, 08/29/2015 - 23:51 नवीन
टू मच आहे हे! सूडचा प्रतिसाद भारी!
  • Log in or register to post comments

अगगागा हसून हसून ठार :)

सुजल
Sun, 08/30/2015 - 05:07 नवीन
अगगागा हसून हसून ठार :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा