जीवनाची प्रभावी दशसूत्री !

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
18 Aug 2015 - 3:21 pm

आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!!
म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो.
खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल.
अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?

1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. जे मिळवायचे आहे त्याबद्दल दिवसभरात प्रयत्न करावेत. कर्म करत जावे. प्रत्येक दिवस हा चांगलाच दिवस असतो असे मनावर ठसवावे. कुठेतरी लिहून ठेवावे आणि मेंदूच्या एका कप्प्यात नेहेमीकरता जतन करून ठेवावे. मोबाईल च्या फ्रंट स्क्र्रीन वर लिहून ठेवावे की -
"Every day is a good day!"

2) रोज प्राणायाम आणि योगासने करावीत. जमल्यास सूर्यनमस्कार करा, विविध व्यायाम प्रकार करा किंवा सकारात्मक संगीत लावून तालबद्धतेने एकट्याने किंवा जमल्यास समुहात नाच करावा. तोही एक प्रकारचा व्यायामच होय.

3) रोज किमान अर्धा तास मौन बाळगावे आणि थोडे एकांतात चिंतन करावे. रोज एक वाईट सवय सोडण्याच्या दिशेने आणि एक तरी चांगली सवय अंगीकारण्याच्या दिशेने पाऊल टाकावे व थोडा तरी त्या दिशेने रोज प्रयत्न करावा. आणि स्वतःची कुणाशीच तुलना करू नये. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. आपल्या पूर्वीच्या आणि आजच्या सुधारणेत फक्त तुलना करावी.

4) रोज थोडे अंतर एकट्याने चालावे. शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यात थोडा तरी वेळ चालत चालत घालवावा.

5) रोज आपल्या वाट्याला आलेले काम (कर्म) मनापासून करावे. आशा, श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास आणि धैर्य कधीही गमावू नये. इतर काहीही गमावले तरी हरकत नाही, पण स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नये. आजच्या क्षणात पूर्ण जगावे मात्र भविष्याची जाणीव असू द्यावी.

6) रोज सकारात्मक सुविचार, पुस्तके, थोर पुरुषांची चरित्रे वाचावीत किंवा आॅडिओ टेप ऎकाव्यात.

7) रोज सकारात्मक संगीत ऎकावे.

8) रोज चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवावे. हास्यविनोद करावा त्यामुळे मन हलके होते.

9) रोज कुणाला तरी छोटीशी का होईना मदत करावी. कुणाला तरी रोज सकारात्मक प्रेरणा जरूर द्यावी.

10) प्रत्येक रात्री दिवसभराची उजळणी करावी. त्यामुळे विसरलेल्या गोष्टी किंवा धागे किंवा एखादा मुद्दा ल्क्षात येतो. आपल्या समस्या, अडचणी निसर्ग आणि दैवी शक्तींच्या हाती रात्रीपुरत्या सोपवून, दिवस कसाही गेला तरी जे दिवसभरात बरे वाईट घडले ते भविष्यातील चांगल्याची चाहूल होती असे समजून पुन्हा कृतज्ञतेने झोपून जावे.

वरच्या गोष्टींसाठे थोडा का होईना वेळ जरूर काढावा. मी सुद्धा या दहा गोष्टींत प्राविण्य मिळवले नाही किंवा सर्व गोष्टी अजून रोज करू शकत नाही पण प्रयत्न मात्र जरूर करत आहे. आपल्या मुलाना सुद्धा त्यांच्या कुमारावस्थेतच या गोष्टी शिकवा आणि शक्यतो सवय लावा.

समाजजीवनमानतंत्रविचार

प्रतिक्रिया

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 3:32 pm | द-बाहुबली

1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. जे मिळवायचे आहे त्याबद्दल दिवसभरात प्रयत्न करावेत. कर्म करत जावे. प्रत्येक दिवस हा चांगलाच दिवस असतो असे मनावर ठसवावे. कुठेतरी लिहून ठेवावे आणि मेंदूच्या एका कप्प्यात नेहेमीकरता जतन करून ठेवावे. मोबाईल च्या फ्रंट स्क्र्रीन वर लिहून ठेवावे की -
"Every day is a good day!"

2) रोज प्राणायाम आणि योगासने करावीत. जमल्यास सूर्यनमस्कार करा, विविध व्यायाम प्रकार करा किंवा सकारात्मक संगीत लावून तालबद्धतेने एकट्याने किंवा जमल्यास समुहात नाच करावा. तोही एक प्रकारचा व्यायामच होय.

3) रोज किमान अर्धा तास मौन बाळगावे आणि थोडे एकांतात चिंतन करावे. रोज एक वाईट सवय सोडण्याच्या दिशेने आणि एक तरी चांगली सवय अंगीकारण्याच्या दिशेने पाऊल टाकावे व थोडा तरी त्या दिशेने रोज प्रयत्न करावा. आणि स्वतःची कुणाशीच तुलना करू नये. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. आपल्या पूर्वीच्या आणि आजच्या सुधारणेत फक्त तुलना करावी.

4) रोज थोडे अंतर एकट्याने चालावे. शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यात थोडा तरी वेळ चालत चालत घालवावा.

5) रोज आपल्या वाट्याला आलेले काम (कर्म) मनापासून करावे. आशा, श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास आणि धैर्य कधीही गमावू नये. इतर काहीही गमावले तरी हरकत नाही, पण स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नये. आजच्या क्षणात पूर्ण जगावे मात्र भविष्याची जाणीव असू द्यावी.

6) रोज सकारात्मक सुविचार, पुस्तके, थोर पुरुषांची चरित्रे वाचावीत किंवा आॅडिओ टेप ऎकाव्यात.

7) रोज सकारात्मक संगीत ऎकावे.

8) रोज चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवावे. हास्यविनोद करावा त्यामुळे मन हलके होते.

9) रोज कुणाला तरी छोटीशी का होईना मदत करावी. कुणाला तरी रोज सकारात्मक प्रेरणा जरूर द्यावी

सवयी क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७ व जमेल तसे ८ आणी ९ दररोज जपतो पण माझे बरेच नुकसान झाले आहे हो असे का बरे व्हावे ?

म्हणजे मलाही समजायला सोपे जाईल!

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 5:27 pm | द-बाहुबली

सवयी क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७ व जमेल तसे ८ आणी ९ दररोज जपतो पण माझे बरेच नुकसान झाले आहे हो असे का बरे व्हावे ?

निमिष सोनार's picture

18 Aug 2015 - 5:29 pm | निमिष सोनार

तुमचे नेमके काय नुकसान झाले आहे ते सांगता का जरा?

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 5:55 pm | द-बाहुबली

भरुन देणार आहात का ? की विषय संपला. तुमच्या सारखेच इतराना पण नुकसानच होईल असे कशावरून ? म्हणत हात झटकुन मोकळे होणार ते सांगा आधी... बोलणे सोपे करणे अवघड हे माहित आहे ना ?

हे उपाय केल्याने "व्यापारात" नुकसान होणार नाही, एखाद्या "व्यवहारात" फसवणूक होणार नाही (वगैरे) असे नाही म्हणत आहे मी!!!

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 4:58 pm | द-बाहुबली

मग तुम्ही काय म्हणत आहात बरे ?

निमिष सोनार's picture

18 Aug 2015 - 5:16 pm | निमिष सोनार

त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
म्हणजे असे की -
ही दशसुत्री वापरल्याने झालाच तर फायदाच होईल (अध्यात्मिक दृष्ट्या, व्यक्तिमत्व विकास दृष्ट्या, निरोगी राहण्यासाठी) नुकसान मात्र होणार नाही.
आता तुम्ही "नुकसान होणार नाही" याचा अर्थ काय घेतात ते समजणे महामुश्कील दिसत आहे!

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 5:28 pm | द-बाहुबली

आता तुम्ही "नुकसान होणार नाही" याचा अर्थ काय घेतात ते समजणे महामुश्कील दिसत आहे!

आता तुम्ही सुध्दा "नुकसान होणार नाही" याचा अर्थ काय घेताय ते समजणे महामहामुश्कील दिसत आहे...! नुकसान झाले आहे :(

विषय संपला. तुमच्या सारखेच इतराना पण नुकसानच होईल असे कशावरून?

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 5:44 pm | द-बाहुबली

यातुन नुस्कान झाले आहे तर इतरांना तुम्ही का बळी चडायला लावालाय ?

मराठी_माणूस's picture

18 Aug 2015 - 3:54 pm | मराठी_माणूस

सकारात्मक संगीत म्हणजे काय ?

निमिष सोनार's picture

18 Aug 2015 - 5:12 pm | निमिष सोनार

"जीना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहां?"; दिल के आरमा आसुओ में बह गये; या प्रकारचे गीत किंवा त्या प्रकारचे खिन्न विषाद निर्माण करणारे संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे.
आणि "देवा श्रीगणेशा" (अग्निपथ); "हूड हूड द्बंग" (द्बंग); बैंग बैंग (टायटल सॉंग); "जर्राती जर्राती राफ्तारे है" (रा वन) अशा प्रकारची गाणी आणि संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून सकारात्मक आहेत.

नकारात्मक की सकारात्मक ? आणी श्री श्री श्री हनी सिंग यांच्या गीतगंगेबद्दल आपले काय मत आहे?

हान तिच्या **ला गाॅगल्याभाऊ!!!
मस्त जोक!!!

निमिष सोनार's picture

18 Aug 2015 - 8:44 pm | निमिष सोनार

.. एक सकारात्मक "उर्जा" निर्माण करणारे आहे. :-)

जडभरत's picture

18 Aug 2015 - 8:54 pm | जडभरत

सकारात्मक?
ती ऊर्जा नको तिकडे धावत जाते!!! ;)

निमिष सोनार's picture

18 Aug 2015 - 8:57 pm | निमिष सोनार

धावू द्या त्या उर्जेला, मग काय करता? तीच उर्जा या जगाची निर्मिती करते...

जडभरत's picture

18 Aug 2015 - 9:18 pm | जडभरत

चाबरट पोरगा कुठला!

एस's picture

18 Aug 2015 - 5:22 pm | एस

११. दिसामाजी मिपावरी काहींतरीं लिहित जावें!

प्रिशू's picture

18 Aug 2015 - 5:58 pm | प्रिशू

जीवनात समोर येणारी प्रत्येक गोष्ट सहजतेने स्वीकारणे शक्य होत नाही पण त्या गोष्टीची चांगली बाजू बघण्याचा प्रयत्न केला तर मार्ग सापडत जातात आणि समस्येला सामोरे जाणे सोपे होत जाते. हे लगेच साध्य होणार नाही पण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेच आहे नां.

निमीष जी

तुमचा क्रमांक ४ चा सल्ला निर्सगाच्या सानिध्यात थोडा काळ तरी व्यतीत करावा अतिशय आवडला व पटला हे नक्की करुन आवर्जुन करुन बघायचय मला. कारण मला खरोखर माझा निसर्गाशी संबंध च पुर्णपणे तुटलाय हे खुप तीव्रतेने वाटतय. हि पोकळी भरायलाच हवी मी गार्डनींग चा प्रयत्न करतोय पण तो हि पुरेसा वाटत नाहि म्हणजे समाधान होत नाही मी काळ्या मुंग्या हि पाळलेल्या आहेत त्यांची सर्व काळजी वगैरे घेत असतो या दोन निमीत्ताने थोडा थोडा निसर्गाच्या सानिध्यात येतो पण पुरेस नाही
सकारात्मकता किंवा नकारात्मक ता कुठलाहि एक द्र्ष्टीकोण थोडा एकांगी वाटतो. त्यापेक्षा ऑब्जेक्टीव्हली एखाद्या व्यक्ती घटना वा विषय याकडे बघितल्यास मला प्रामाणिकपणे वाटत की आपल्याला त्या गोष्टीचे बहुआयामी आकलन होउ शकते.
तुमच्या एकंदर लेखात दर्शवलेला पॉझीटीव्ह अ‍ॅप्रोच थोडा मला एका अर्थाने मर्यादित वाटतो अर्थात हे माझ व्यक्तीगत मत शेअर करतोय कारण आफ्टर ऑल आपण इथे शेअरींग साठी च येतो नाहि का ?
सर्वसाधारण एकांगी अशा आशावादा पेक्षा फ्लेक्झीबल ऑप्टीमिझीम हा अधिक परीणाम कारक असतो. गंमत म्हणजे पॉझिटीव्ह सायकॉलॉजीचा प्रणेता माइक सेलीगमन स्वतः फ्लेक्जीबल ऑप्टीमिझम चा पुरस्कार करतो. तो स्वतः त्याच्या अनेक असामान्य प्रयोगांतुन या निष्कर्षाप्रंत येतो. तो त्याच्या लर्न्ड ऑप्टीमीझम या सुंदर पुस्तकातुन हेही दाखवुन देतो की पुर्ण सकारात्मक व्यक्तीचे वास्तवाचे आकलन कच्चे असते. यथार्थ समजण्यास व जगण्यास केवळ सकारात्मक विचार दुर्‍ष्टी थिटी पडते.
त्याने उंदरांवर केलेले अनेक प्रयोग मोठ्या जायंट इन्स्युरंस कंपनीच्या सेल्समन बरोबर केलेले सर्व्हे प्रयोग हे अत्यंत रोचक आहेत
आपण एकदा जरुर वाचुन पहावे असे सुचवतो. पेले च्या पॉवर ऑफ पॉझीटीव्ह थिंकींग च्या पासुन सुरुवात झालेली हि शाखा कालानुक्रमे अत्यंत उत्क्रांत झालेली आहे तिचा जमल्यास अभ्यास करुन बघा कदाचित तुम्हाला वेगळ मौलिक काहि तिथे सापडेल अशी खात्री वाटते.
सुंदर लेखासाठी आभार मानतो

द-बाहुबली's picture

18 Aug 2015 - 7:59 pm | द-बाहुबली

मी काळ्या मुंग्या हि पाळलेल्या आहेत त्यांची सर्व काळजी वगैरे घेत असतो

हे जरा खरोखर स्पश्ट करता काय ? माझ्या शारीरीक बालवयात यांना पाळायचा मी प्रचंड प्रयत्न केला होता, पन जमले नाही. मुंग्याना रहायसाठी टाकावु पासुन टीकावु पध्दतीचा वापर करुन एकदम मस्त सेटप तयार केला होता पण मुंग्या काय त्यात रहायच्याच नाहीत बगा.

बाकी प्रतिसाद वाचनीय.

निमिष सोनार's picture

18 Aug 2015 - 8:59 pm | निमिष सोनार

आपले प्रतीक्रीयेतले विचार अभ्यासपूर्ण आहेत.

होबासराव's picture

24 Aug 2015 - 8:33 pm | होबासराव

णिसो रॉक्स :)

बास काय सर..आता जर प्रत्येक रात्री दिवसभराची उजळणी करावी तर मग....
अहो झोप कधि घ्यायची असे म्हणणार होतो :)

सहित्यसूर्य णिसो ह्यांच्या अचाट, अफाट आणि अतर्क्य साहित्य संपदेचा फॅन
होबासराव (काळे मुंगळे पाळलेला)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2015 - 7:47 am | अत्रुप्त आत्मा

@सहित्यसूर्य णिसो http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif ह्यांच्या अचाट, अफाट आणि अतर्क्य साहित्य संपदेचा फॅन
होबासराव (काळे मुंगळे पाळलेला) http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif

नाखु's picture

25 Aug 2015 - 12:21 pm | नाखु

वरील दोन्ही प्रीतीसादांसक्टमुंगळेपाळवादीनिसोमोजीअकुपंखा महासंघ.

कारण रात्री करण्याच्या गोष्टी सांगितल्या आहे ही नाही त्यांनी?