उडत्या तबकड्या आणि कर्णमय

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
17 Aug 2015 - 10:08 am

भाग १ - (उडत्या तबकड्या - काल्पनिक कथा)

मुंबईला गेलेला करण अजून आला नाही, म्हणून त्याच्या घरचे सर्व जण काळजी करत अंगणात बसले होते. तेवढ्यात करणच्या येण्याची चाहूल लागली. सर्व जण उठून उभे राहिले. करण आल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. त्याचे बाबा सदानंद त्याला म्हणाले, "एवढा उशीर का बरं झाला?" तेव्हा करण म्हणाला, "बाबा, आमची बस वाटेत पंक्चर झाली होती, म्हणून यायला उशीर झाला." मग सर्व जण घरात आले. जेवण वगैरे आटोपून सर्व गप्पा मारीत बसले. तसे पाहता करणच्या घरात त्याचे आजोबा, बाबा, आई आणि एक लहान भाऊ दिनू. हळूहळू सर्व जण झोपायला निघून गेले.

करण मात्र एकटाच गच्चीवर झोपायचा, म्हणून तो त्याचा बिछाना घेऊन गच्चीवर झोपायला गेला. गच्चीवरुन त्याचे गाव खूपच सुंदर दिसत होते. करणचा बंगला तसा गावाच्या बाहेरच होता. शेती करण्याच्या उद्देशाने त्याच्या वडिलांनी आपला बंगला शेतातच बांधला होता.

करण तसाच अंथरुणावरून आकाशाकडे बघत होता. अचानक त्याला आकाशात दोन विमाने दिसली. ती एकमेकांचा पाठलाग करत असल्याचे करणने लगेच ओळखले. पण ... निरीक्षण केल्यावर त्याला समजले की ती विमाने नव्हती, ती वेगळ्याच प्रकारची यांत्रिक याने होती. तो क्षणभर हे सगळे बघून दचकला. बघता बघता ती याने त्याच्या गावाच्या शेजारील जंगलात उतरली व कुठेतरी अदृश्य झाली. हे सगळे बघून त्याला तिथे जाण्याचा मोह झाला. पण एवढ्या रात्री एकट्याने जाणे बरोबर नाही, म्हणून सकाळी जाऊ असा विचार करत तो झोपी गेला.

क्रमशः

कथालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

तुडतुडी's picture

17 Aug 2015 - 12:37 pm | तुडतुडी

छोटा झालाय भाग . पण तुमची ती मागची भयकथा अपुर्णच राहिली कि . तिचा ३ रा भाग कधी लिहिणार ?

दिनु गवळी's picture

18 Aug 2015 - 8:57 pm | दिनु गवळी

लवकरच येईल

द-बाहुबली's picture

17 Aug 2015 - 2:06 pm | द-बाहुबली

जरा लहान भाग करता आला तर शतशब्दकथा नक्किच बनवु शकाल.

दिनु गवळी's picture

17 Aug 2015 - 2:23 pm | दिनु गवळी

माझी कथा आधीच प्रकाशीत झाली आहे . शतशब्द

तुडतुडी's picture

19 Aug 2015 - 12:27 pm | तुडतुडी

ती हो , दोघंजण वाघ शोधायला जातात ती . ती कुठं पूर्ण झालीय ? असेल तर लिंक द्या प्लीज

दिनु गवळी's picture

22 Aug 2015 - 6:07 am | दिनु गवळी

ती हो , दोघंजण वाघ शोधायला जातात ती . ती कुठं पूर्ण झालीय ? होईल हो

मांत्रिक's picture

22 Aug 2015 - 10:07 am | मांत्रिक

छान वाटली. कथा फार छोटी केलीत मात्र.

तिमा's picture

23 Aug 2015 - 1:30 pm | तिमा

मोजींनी आपलं शुद्धलेखन सुधारलं वाटतं ?

वेल्लाभट's picture

24 Aug 2015 - 3:37 pm | वेल्लाभट

तसे पाहता करणच्या घरात त्याचे आजोबा, बाबा, आई आणि एक लहान भाऊ दिनू. हळूहळू सर्व जण झोपायला निघून गेले.

ही दोन वाक्य मागोमाग किमान दहा वेळा वाचली. पण लिंक लागत नाही दोन वाक्यांची.

अचानक त्याला आकाशात दोन विमाने दिसली. ती एकमेकांचा पाठलाग करत असल्याचे करणने लगेच ओळखले.

एवढ्या लांबवरून त्याला हे लगेच कळलं? सॉलिड आहे.

असो. प्रयत्न ठीक आहे. एक सल्ला देईन. हा इतकाच उतारा पुन्हा 'हा' न बघता लिहून बघा. आणि नंतर दोन्हींची तुलना करा. बघा.

थोडं पाणी ओतून वाढवा!!