लहानपणी थोरला भाऊ म्हणजे दादा हा नेहमीच आपल्या साठी एक आदर्श असतो .त्याच्या मध्ये आपण नेहमीच आपल्या वडीलांची प्रतिमा पहात असतो .त्याचे आदर्श हे देखील आपले आदर्श असतात .त्याच्या बद्दल कोणी वाईट बोललेले आपल्याला आवडत नाही .त्याच्या बऱ्या,वाईट प्रसंगात नेहमीच आपण त्याच्या बरोबर असतो ,बऱ्याच वेळेस आपण त्याचे अनुकरण करतो . निदान लहानपणी तरी हे विचार प्रत्येका जवळ असतात .
माझा दादा माझ्या पेक्ष्या चार पाच वर्षांनी मोठा असेल ,पण तो माझ्या साठी आदर्श होता . आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो, त्या ठिकाणी घराच्या बाजूला एक मोठा बोळ होता, त्या बोळात आंम्ही मुले क़धी गोट्या, तर कधी फुटबॉल, तर कधी क्रिकेट. कांहीना कांही खेळ खेळत होतो. या सर्व उपक्रमात माझा दादा मात्र हिरो असे.त्याने जिंकलेल्या गोट्यांचा खजानिस मी असे.त्यांने मारलेल्या सिक्सरस व फोरस हे मोजण्याचे काम मी करत असे व ते इतर मुलांना सांगताना त्याचा साक्षीदार ही मी असे. जी कांही आमच्या बरोबरीची पाच सहा मुले होती, त्यांच्या वर त्याचा चांगलाच वचक असे . अर्थात त्या मुळे माझेही त्यांच्या वर वजन होते हे कांही सांगायला नको..
त्या बोळाच्या बाजूस गोपाळ गिरी नावाचे कन्नड कुटुंब आपल्या परिवारासह रहात होते. घरा मध्ये ते बहुतेक कन्नड बोलत, मात्र एरवी बाहेरील लोकांशी हेल काढून मराठीत बोलत असत .गोपाळरावांना मात्र मराठी फारच कमी येत होते. बऱ्याच वेळेस ,आमच्या खेळा पेक्षा गोंगाटच जास्त असे . या गोंगाटा मुळे गिरी बुवा फारच त्रस्त होत , य़ाची प्रतिक्रिया म्हणून ते आम्हा मुलांना, खिडकीत उभे राहून कन्नड मधून शिव्या देत असत . त्या शिव्या कन्नड मध्ये असल्या मुळे, आम्हाला कळत नसत,तसेच अपरिचित शब्दामुळे ते आपल्याला फारच कांही तरी घाण बोलतात असे वाटत होते. त्यात त्यांच्या शेजारी उभी असणारी त्यांची काळी कन्या राणी , ही मात्र जोरजोरात कुचके पणाने हसत असे, तिला ह्या शिव्या कळत असत .त्यांच्या कन्नड बोलण्यावर,आमचा कांहीही आक्षेप नव्हता. ती त्यांची मातृभाषा होती.प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान आसलाच पाहीजे व सर्वांनीच प्रत्येक भाषेचा आदर हा ठेवलाच पाहिजे ,मात्र दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन,त्याला न समजणाऱ्या भाषेत बोलून डिवचणे, हे कांही योग्य नव्हते .ह्या न कळणाऱ्या कन्नड शिव्या व या काळ्या म्हशीचे हसणे याचा आम्हाला खूप संताप येत असे. बरे!! आमचे कडे मराठीतील शिव्यांचा मोठा शब्दकोश असून देखील, काय उपयोग ,त्या गोपाळरांवाना मराठी कुठे कळत होते? कांहीतरी करून, काट्याने काटा काढून त्यांची खोड मोडायला हवी, असे आम्ही सर्वांनी ठरवले .शेवटी आमच्या दादाला शिव्या देतोय म्हणजे काय ? आमच्या इभ्रतीचा प्रश्न होता .या साठी आम्ही मुलांनी एक योजना आखली .
आमच्या दादाच्या वर्गात असणाऱ्या, पण कन्नड व मराठी येणाऱ्या मित्राचा शोध आम्ही घेतला .तो आमच्या घरा पासून खूपच लांब राहत होता .त्याला भेटण्यासाठी आम्ही तीन सायकलीचा बंदोबस्त केला .प्रत्येकाने एक एक दोन दोन मुलांना डबल शिट घेतले . अर्थात दादाने मला डबल शीट घेतले होते हे कांही सांगायला नको . आम्ही सर्व सर्व मुले त्याच्या घरी दाखल झालो .त्याला खुश करण्या साठी बरोबर खिशातून चिक्की आणावयास आम्ही विसरलो नव्हतो. इतक्या सर्व मुलांना पाहून तो पण अचंबित झाला . त्याला आम्ही घरा बाहेर बोलवले .त्याचे पालक आजुबाजूस नाहीत, याची खात्री करून घेतली व आमच्या कामाचे प्रयोजन सांगितले ." हे बघ रमेश , आमच्या बाजूला एक कन्नड गृहस्थ राहतात . त्यांचे आमचे जोरात भांडण झाले आहे .तू आमचा जवळचा मित्र आहेस, तेंव्हा तू आम्हाला कन्नड मधुन अशी कांही फक्कड ,कडकडीत शिवी शिकव, कि ते गोपाळराव व त्याची मुलगी राणी, यांचे तोंड काळे व्हायला हवे . अर्थात ते दोघे मुळातच इतके काळे होते कि त्यांचे तोंड आणखी काय काळे होणार होते ,कुणास ठाऊक ? आमच्या दादाला शिव्या देतात म्हणजे काय ? सुरवातीला रमेशने आढे वेढे घेतले ,मात्र दादाच्या रुद्रावतारा पुढे तो ही नरमला. त्याने कन्नड मधील एक ट्रायल शिवी सांगितली . ती दादाला फारच मिळमिळीत वाटली , म्हणजे आगदी बिन साखरेचा चहा प्यायल्यासारखे वाटले .दादा म्हणाला देखील " तो इतक्या घाण घाण शिव्या देतो आहे आणि तू फक्त"कुंडीत तुमची हाडे मोडुन टाकीन" , एवढी मिळमिळीत शिवी सांगतोस ? शी शी ! शिवीत कसे ई कार, ओ कार असायला हवेत ,मुक्या, उपेक्षित प्राण्यांना त्यात प्रोचाहन असले पाहिजे.म्ह्णजे अगदी कोल्हापुरी झणझणीत रश्श्या सारखी असली पाहिजे,म्ह्णजे खाणार्या वर देखील पुढे त्याचे दोन तीन दिवस दूरगामी परिणाम दिसले पाहिजेत. त्यावर रमेश म्हणाला "अरे मराठीतली कुंडी आणि कन्नड मधील कुंडी ही वेगवेगळी आहे ,सध्या मी सांगितले तेवढे करा आणि हे ऐकून जर तो वरमला नाही तर नंतर या पेक्षा मी जालीम शिवी तुम्हाला सांगतो . नाहीतर आपण नाही का ,डॉक्टर कडे गेल्यावर हि गोळी घेऊन बघा ,बरे नाही वाटले तर दुसरी जालीम गोळी देतो .त्यांचे म्हणणे आपण ऐकतोच की!! . रमेश इतक्या आत्मविश्वासाने सांगतोय म्हणजे त्याचा देखील कांहीतरी या विषयावर अभ्यास असणारच की!! . त्याचे म्हणणे दादाला पटले .शिवाय कांही दगाफटका झाला तर आमच्याशी गाठ होती .दादाचा नाद नाही करायचा ss .
त्याने सांगितलेली कन्नड शिवी आम्ही देवनागरी लिपीत कागदावर लिहून घेतली .त्याला एकदा प्रात्याक्षिक करून दाखवले .एक दोन प्रयन्ता नंतर त्याने ओके म्हट्ल्या वर मग आमची सर्व फ़ौज घरी परतली . डबल शिट सायकल मारून मारून आम्ही सर्वच मुले घामाघूम झालो होतो ,खूप दमलोही होतो . आज आमचा विश्रांतीचा दिवस होता . आज बोळात खूपच शांतता होती. ग़ोपळ बुवा व त्याची कन्या देखील आज खूपच खूश असणार .
दुसऱ्या दिवशी आम्हचा महत्वाचा कार्यभाग चालू झाला, आम्हचे शिवीचे पाठांतर जोर जोरात चालू झाले . अर्थात ही शिवी देण्याची पहिली जबाबदारी दादाची आसल्या मुळे सर्वांचे लक्ष्य त्याचेकडे लागुन राहिले होते.अपरीचीत शब्दा उच्चारताना तो निराश होणार नाही ना, याची पुरेपूर काळजी आम्ही घेत होतो व त्याला प्रोत्साईत करीत होतो. इतरांनी ते शब्द प्रतिध्वनी प्रमाणे जोर जोरात नंतर उच्चारायचे असल्या मुळे या सामुदाईक कामाचे टेन्शन आम्हाला नव्हते . एखाध्या नाटकात कसे नाटक मंडळी प्रवेश पाठ करतात त्या प्रमाणे प्रत्येक जण शिवीची घोकम पट्टी करीत होता . बऱ्याच वेळेस एखाध्याचा अभ्यास घेतल्या प्रमाणे , आपण बरोबर म्हणतो काय? हे पाहण्यासाठी शेजाऱ्याला प्रात्यक्षिक करून दाखवीत होता ,तर कोणी चुकीची दुरुस्ती करीत होता.तर कोणी गैर समजुतीने आपल्यालाच शिवी दिली, असे समजुन थोडी गरमा गरमी ही होत होती. मात्र या शिवीचा अर्थ कोणासही माहित नव्हता. अखेर तो दिवस उजाडला
सकाळचे दहा वाजले. लढाई साठी आम्ही सर्व मावळे तयार झालो .सुरुवातीला जोर जोरात गोंगाट करायचा व नंतर मग" गनिमी कावा" असे ठरले. ज़सा आमचा गोंगाट चालू झाला तसे गोपाळ बुवा व त्यांची सुवर्ण कन्या खिडकीत आली .त्यांनी नेहमी प्रमाणे कन्नड शिव्याचा भडीमार चालू केला .तसा माझा दादा पुढे झाला नि मग काय!!! हर हर महादेव .... ,त्याने जोरात गोपाळ रावास आशी बीनचुक शिवी दिली की कानाचे पारणे फिटले ,त्या शिवीचा प्रतिध्वनी म्हणून कि काय आम्ही चार पाच जणांनी ते शब्द वारंवार उच्चारले . अर्थाथ दादाचा मान हा पहिला होता हे कांही सांगायला नको. हा आम्हचा शंखध्वनी गोपाळरावाच्या कानात , एखाद्या तप्त लोखंडाच्या रसा प्रमाणे गेला व तो आयोss आयोss अम्मा ss करीत घरात पळाला तर त्याची सुवर्ण कन्या त्याच्या मागे य्दांकूss यादाकू ss करत त्याच्या मागे निघून गेली. य़ा नंतर मात्र गोपाळ रावांनी आम्हाला परत कधी त्रास दिला नाही . हे पाठ केलेले दोन शब्द अजूनही एखाद्या पासवर्ड प्रमाणे मी मंनात सांभाळून ठेवले आहेत .ते मी कधीच कुणाला सांगत नाही----संजय वाशीकर.
प्रतिक्रिया
29 Jun 2015 - 7:46 pm | चिगो
ई चॉलबे ना.. सांगा हो.. इथे मिपावरपण मराठी आणि कन्नड येणारे बरेच जण आहेत.. आम्हालापण कळेल अर्थ आणि मग आम्ही कन्नड मित्रांवर त्यांचा उपयोग करायला मोकळे..
29 Jun 2015 - 7:57 pm | एस
अनुमोदनास्मि!
29 Jun 2015 - 8:07 pm | मुक्त विहारि
शिवी सांगायला हरकत नाही.
29 Jun 2015 - 8:14 pm | बॅटमॅन
अगागागागागागागागागागाङागागागागागगागागागाङाङ्गागागागागाङागागाग =)) =)) =))
29 Jun 2015 - 8:19 pm | उगा काहितरीच
एक नंबर ! सही...मजा आली वाचताना .
29 Jun 2015 - 8:20 pm | कंजूस
मथितार्थ कळला,जशाह तसे उत्तर दिले.
शिवी कळली.
29 Jun 2015 - 8:52 pm | कानडाऊ योगेशु
आठवणीतुन उतरलेल्या ह्या लिहिलेल्या घटनेबद्दल लहान मुलाच्या मानसिकतेतुन पाहीले तर मनोरंजक आहे पण ह्यावर सध्याच्या मोठ्या संजयची काहीतरी टिप्पणी असायला हवी होती असे राहुन राहुन वाटले. म्हणजे गोपाळ बुवांबद्दल व त्यांच्या मुलींबद्दल सहानुभुती वाटली.
व असेही आतापावेतो तुम्ही दिलेल्या शिवीचा तुम्हाला अर्थही कळला असावा व ती शिवी एका बापाला त्याच्या मुलीसमोर देणे ह्यातले थ्रिल व कशी जिरवली ही भावना संपुन एक (अपराधीपणा नव्हे पण) लहान वयात उगाच कुणाला दुखावले ही भावना वा हा विचार मनात उमटणे ह्याबाबत एखादी ओळ असायला हवी होती असे वाटुन गेले.
29 Jun 2015 - 9:32 pm | बॅटमॅन
नोत नेचेस्सर्य. पोरे खेळताना आवाज हा होणारच, त्याला जर इतक्या शिव्या देत असेल तो बाप तर त्याने शिव्या खायची तयारीही ठेवलीच पाहिजे होती. वैसेभी आपल्या समाजातील थेरडेशाहीमुळे पोरांची चूक नसणे हे कुणाला मान्य होणे अवघड आहे, पण आहे हे असं आहे.
29 Jun 2015 - 10:07 pm | मार्मिक गोडसे
एका बापाला त्याच्या मुलीसमोर देणे ह्यातले थ्रिल व कशी जिरवली ही भावना संपुन एक (अपराधीपणा नव्हे पण) लहान वयात उगाच कुणाला दुखावले ही भावना वा हा विचार मनात उमटणे ह्याबाबत एखादी ओळ असायला हवी होती असे वाटुन गेले.
आपल्या मुलीसमोर शिव्या देताना त्या बापाला लाज वाटली का?
29 Jun 2015 - 10:31 pm | पैसा
मजेशीर किस्सा!
29 Jun 2015 - 10:33 pm | Sanjay Uwach
योगेश आपण दिलेली प्रतिक्रीया अतिशय योग्य आहे. माझे पण मन मला खिन्न करुन गेले.लहान पणी देखील वयस्कर व्यक्तिला शिवी देणे ही आपली संस्कृती नाही.मग त्या शिवीचा अर्थ माहीत असो अथवा नसो आती उत्साहात बर्याच चांगल्या गोष्टी आपण विसरतो.या कथेतील गोपाळ राव व त्यांची कन्या हि पात्रे जरी काल्पनीक आसली तरी मी त्यांची माफी मागतो.आयुष्यात परत असा उपमर्द होणार नाही याची मी कळजी घेईन.मी नतमस्तक आहे .हाच ह्या कथेचा शेवट समजू. मन मोकळे झाले...संजयआछ
29 Jun 2015 - 11:09 pm | कानडाऊ योगेशु
अहो संजयराव तुम्ही तर अगदी लोटांगणच घातलेत!
मला इतकेच म्हणाय्चे होते कि एका लहान मुलाच्या दृष्टीकोनातुन लिहिलेली ही कथा अगदी मनोरंजक आहे पण आता तो लहान मुलगा मोठा प्रगल्भ झाला आहे तर त्या प्रगल्भ मुलाचीही ह्या घटनेवर एखादी टिप्पणी हवी होती.
असा किस्सा माझ्याबाबतीत घडला होता.
एका आढ्यतेखोर दुकानदाराला त्याच्या दुकानातुन बाहेर पडताना जिभेवर नियंत्रण न राहील्याने एक कचकचीत शिवी तोंडातुन बाहेर पडली.एरवी ही घटना विसरलोही असतो व माझ्या वागणूकीचे समर्थनही केले असते पण बाहेर आल्यावर पाहीले तो तिथे १०-१२ वर्षाचा एक मुलगा दुकानाबाहेर ठेवलेल्या वस्तु व्यवस्थित ठेवत होता.एकदम स्ट्राईक झाले कि हा ह्या दुकानदाराचा मुलगा आहे आणि एकदम खजिल झालो. एका बापाचा त्याच्या अपत्यासमोर असा पाणउतारा करणे हे एक मोठे पाप केले असे वाटले.