राती आभाळ रडलं

अनिल भारतियन's picture
अनिल भारतियन in जे न देखे रवी...
21 Aug 2008 - 9:45 pm

राती आभाळ रडलं
अंधारी नाही दिसलं
जीर्ण न शीर्ण वसन
काजळले माझे सदन

वटवॄक्ष मायेचा वठला
झरा वाळवंटी आटला
या नीरव रेतीमधले
टोचतात निवडूंगी भाले

मन छिन्न न खिन्नही
आभाळी नक्षत्रही नाही
या सांजसयीच्या प्रहरा
शोधिते तो सायंतारा ..!!

अनिल

मुक्तकप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

22 Aug 2008 - 12:14 am | प्राजु

मन छिन्न न खिन्नही
आभाळी नक्षत्रही नाही
या सांजसयीच्या प्रहरा
शोधिते तो सायंतारा ..!!

हे आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अरुण मनोहर's picture

22 Aug 2008 - 8:05 am | अरुण मनोहर

सुरवातीला......
राती आभाळ रडलं
अंधारी नाही दिसलं

नंतर पुढे......
या सांजसयीच्या प्रहरा
शोधिते तो सायंतारा ..!!

टायमींग प्रॉब्लेम वाटला.

आनंदयात्री's picture

22 Aug 2008 - 4:16 pm | आनंदयात्री

कविता आवडली.
अजुन येउद्द्या अनिल भारनियमन राव.

सुमीत भातखंडे's picture

22 Aug 2008 - 7:03 pm | सुमीत भातखंडे

कविता.
अजून येउद्यात.