या नंतरचे व्यक्तीमत्व हे सध्या पुण्यात स्थाईक असले तरी अस्सल बदलापुर येथील आहे.त्यांचे नाव जरी हूड असले तरी..
निटेश सांगळे: तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा.त्यांचे नाव सूड असे आहे काय सू$$$$$ड उगाच चुकीची नावे वाचता आणि मला कामाला लावता.
ध.स.: अस्का, नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून,
सूड साहेब तुम्हाला सांगतो ही पोरं फार चुकीचे लिहितात हो आणि मला त्याची बोलणी खावी लागतात. स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना म्हणून असा घोटाळा होतो.
तर असो असे अत्यंत चतुरस्त्र संचार असलेले व्यक्तीमत्व या ठिकाणी आपल्या कट्ट्याला लाभलेले आहे. कवीता म्हणू नका विडंबन म्हणू नका काथ्याकूट म्हणू नका धाग्याचा काश्मीरच काय अगदी वधू-वर धागा करायचे म्हणू नका हे साहेब सक्रीय सहभागी असतात.
बर एक विचारू का ? म्हणजे ऐकलेला किस्सा आहे म्हणून राग मानू नका. काय आहे आमचा अन्या सांगत होता (आमच्या सुन्याचा मित्र हो लई टांग मारण्यात पटाइत है ते बेनं तर असो.)की तुम्ही धग्यावर अवांतर करता करता प्रतीसाद कसे एकाखाली एक तिरके होत जात्यात ना ते कधी कधी उजव्या बाजूला इतके सरकतात की वाचता येत नाहीत नीट शेवटी अन्यानं काय केलं माहेती त्यांची कंपनीतली मैत्रीणीचा कांमुप्टर शेजारीच हाये. याच्या मानीटरवरून एकदम उजवीकडे गायब झालेल्या धागा-पताका तिच्या मानीटरवर वाचून काढल्या. (मानीटर जोडून ठिवले होते ना फक्त मानीटरच , माना लांबच होत्या उगा भलत्या शंका काढू नका)
तर असा त्रास होतो तुमच्या तिरक्या धागा-पताकांचा !!
बर तुमची काही तक्रार हाये का भिकबाळीबद्दल खंत भिकबाळीची असं आम्हाला समजलयं म्हनून विचारल हो.
पण तुम्ही जरा उशीरा आला म्हणून तुम्हाला माहीत नाही आपल्या सर्वांचे लाडके गिरिजा का$$का यांनीच जोरदार खुलासा केला त्यामुळे तुमच्या
भिकबाळीकडे मिपाकरांनी बारकाईने ल़क्ष दिले नाही.
मिपा कट्टेकर्यांची काहीच चूक नाही.
निटेश सांगळे: अहो हे चक्क बरोबर सांगताय तुम्ही,
बरकां सूड साहेब गिरिजा काकाच म्हणाले फक्त अत्यंत बुद्धीमान राजबिंडे व्यक्तींच भिकबाळी घालतात. आता इथके मोठे शास्त्री काय उगीच सांगतील काय?
(तुमच्या एव्हाना लक्षात आले असेल की प्रगो उर्फ गिरिजा काकांनीही भिकबाळी घातलेली आहे.)
आम्ही मोठ्या अपेक्षेने सिनेमाची व्ही.सी.डी. आणली पण आख्या सिनेमा मध्ये तुमच्या नावाच्या हाका होत्या पण तुम्ही दिसलाच नाहीत्.आमच्या पोरांचा मूड ऑफ झाला की वो.
निटेश सांगळे: अहो काही काय सांगताय ?
ध.स.: नाही तुम्हीच पहा तो महेश कोठारे साहेबांचा सिनेमा हुता ना पछाडलेला.
सूड
तुम्ही किमान त्यांच्याकडून काही खुलासा तरी घ्यायला पाहिजे होता असं तुम्हाला न सांगता नाव वापरलं म्हणून!
सूड साहेब : नाही खरच मला माहीत नव्हतं त्यांनी असं केलय म्हणून पुढच्या वेळेपासून काळजी घेईन.
निटेश सांगळे: अहो ते सूड वेगळे हे सूड वेगळे,सूड साहेब तुम्ही लक्ष देऊ नका.
ध.स.: स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना.बर तुम्ही चांगल्या कवीता वाचन+आणि रसग्रहण करता असे ऐकले आहे, त्याची एखादी झलक मिळू शकेल का आपल्या या कट्टेकर्यांना.
निटेश सांगळे: अहो त्यांना खूप कामे आहेत आणि आत्ताच ते प्रवासातून दमून आले आहेत जरा आराम करू द्या मग त्यांना वाटलं तर वाचतील ते "सायीचे दही".
तर असे हे अत्यंत म्रुदु आणि कोमल प्रतीसाद देणारे कुणाचेही मन दुखावू नये म्हणून काळजी घेणारे संवेदनशील्,दिलदार व्यक्तीमत्व आपल्या कट्ट्याला लाभले आहे.
व्यक्तीमत्वाचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो फील गुड तरी दुर्गे सूड संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.
यापुढील व्यक्तीमत्व म्हणजे मिपावर अत्यंत ज्वालाग्रही विषयाला वाचा आणि त्याच वेळी वाचकांना घाम फोडणारे..
निटेश सांगळे: तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा.
ध.स.: नाही तुमचा नेहमीसारखा गैरसमज होतोय,अहो त्यांनी लाय इन रिलेशनशिप वर काही धागा...
निटेश सांगळे: तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा.
ते लिव्ह इन रिलेशनशीप असं आहे जरा नीट वाचा.
ध.स.: अस्का नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून, यमगर्नीकर साहेब तुम्हाल सांगतो ही पोरं चुकीचे लिहितात हो .
स्वारी बरका आमच्या सारख्या अडाणी मानसांना फार माहीती नसतेना.बर तुम्ही तो एकच अनुभव लिहिला होता बाकीचे अनुभव असलेला भाग कधी येणार आहे ते सांगा
तशेबी तुम्ही आम्च्या गावात पोरा-पोरीं पेक्ष्या मोठ्या बाया-बाप्यांमध्येबी लै फेमस आहात.
बर एकं विचारू का म्हणजे राग नका मानू बरकां हे जे झेंगाट काय का ते रिलेशनशीप, हे लगीन झालेल्यांसाठी हाये का बिन-लग्नवाल्यांसाठी ???
यमगर्नीकर साहेब : हे पहा मी फक्त लग्नापूर्वीच्या लिईरी बद्दल सांगू शकतो, लग्नपश्च्चात लिईरीसाठी तुम्हाला पोपशास्त्रीच मार्गदर्शन करू शकतील.
तर असो गरजू मिपाकरांना
(गरीब बिचाऱ्या भोळ्या भाबड्या सालस निरागस गुणी आणि कर्तव्यदक्ष)*
आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे तेव्हा तुम्ही त्यावर एक लेख माला लिहाच तुम्ही "ट्रीपल ग्रॅजुएट" आहात म्हणून खास विनंती करीत आहे
.
तर अश्या अतिषय एकनिष्ठ आनि एका वेळी एकाच ठिकाणी एकाग्रता ठेवणार्या व्य्क्तीमत्वाचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो शिरा पुरी पुढच्या घरी संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.
यापुढील व्यक्तीमत्व म्हणजे मिपावर चतुरस्त्र संचार असलेले असे आहे. विडंबन म्हणू नका, चमचमीत पाकक्रुती म्हणू नका का एखादा फर्मास लेख म्हणू नका यांच्या पोतडीतून सगळ्या चीजा बाहेर येतातच.आणी सगळ्या अफलातून बरका अगदी जादूगार व्यक्तीमत्व आहे हे !!!
निटेश सांगळे: अहो काही काय सांगताय ?
ध.स.: मी कुठे काय म्हणालो ? तुम्हाला माझा मुद्दा कळला नाहीये आहो हे व्यक्तीमत्व म्हणजे एक मुक्त मुशाफिरी करणार कलंदर तितकेच संवेदन्शील व्य्क्तीमत्व आहे. तुम्हाला सांगतो स्नेहांकीता तै म्हणजे तुमची मिपाकरलक्षणे मिपाकरलक्षणेवाचून
आम्हा मिपाकरांना सारखा डौट येऊन र्हाईला की आमची माहीती तुम्हाला गपचिप कुणी पुरवतं का ते ? म्हणजे काय एक्दम एका डावात तुम्ही समद्यांना आईना का बाईना वाचल्याबिगर राहीना असं करून टाकलं ना !!
तुमचं अनाहिता अंकातबी लै सहभाग घेतला असं कळलयं.
तरीबी आमची एक तक्रार हाये तुमच्याबद्दल.
स्नेहांकीता तै: काय तक्रार आहे ??
नाही म्हणजे आता या कट्ट्यांमुळे तुम्हाला माहीती झालं असेल ही मुलं सालस निरागस गुणी आणि (यंदा) कर्तव्यदक्ष आहेत तेव्हा तुम्ही जरा लक्ष द्या त्यांच्याकडे. लागली तर लागतील मार्गी. आणि एक लहानशी मागणी आहे तुम्ही जरा विस्तार करा एस्वायजींच्या विनंतीचा मुद्दा २ क्रं २.) आणि मिपाकर लक्षणं भागाचीबी वाट बघतोय आम्ही.
स्नेहांकीता तै: नक्कीच होतकरू मिपाकरांसाठी बघू काही शॉक देण्यासारखे काही आहे का?
तर असो अश्या हरहुन्नरी व्यक्तीमत्वाचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रीत करतो जोरका झटका धिरेसे लगे संघटनेचे श्री धरून सत्कारपुरे.
यातील काही बाबी बिनबियांच्या गोष्टी असल्या तरी काही बियांच्या आहेत, त्या त्या बिया कोल्हापूर कट्टेकर्यांना माहीती आहेत
या बरोबरच सत्कार समारंभ संपला असे जाहीर करतो पुढचा सत्कार पुढच्या कट्ट्याला.
तेव्हा हजेरी लावायला विसरू नका.... आणि वाचत रहा खरडफळ्यावरील ताज्या घडा मोडी(??)!!!
ज्यांचा उल्लेख झाला त्यांनी हलके घेणे..
ज्यांचा उल्लेख माहीतीअभावी झाला नाही त्यांनी मनाला लाऊन घेऊ नै.(पुढचा कट्टा आहेच की)
ज्यांनी कट्ट्याला तोंड दाखवून टांग दिली त्यांच्या साठी सेपरेट धागा काढायची विनंती (अद्द्या आणि एसवायजीला)
प्रतिक्रिया
20 May 2015 - 7:12 pm | टवाळ कार्टा
खी खी खी....खत्रा आहे हा भाग
आरारारारा =))
20 May 2015 - 7:32 pm | आदूबाळ
लोल! हेच वाचून हसत होतो.
"शिरा पुरी पुढच्या घरी संघटना" ही आवडली =))
21 May 2015 - 1:29 am | अत्रुप्त आत्मा
@ फील गुड तरी दुर्गे सूड>> =))))))
20 May 2015 - 7:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
माना लांब होत्या ह्यास पुरावा काय? =))
20 May 2015 - 11:03 pm | gogglya
कोल्हापुरी इरसाल पणा __/\__
20 May 2015 - 11:31 pm | सस्नेह
पोचला बरं सत्-काराचा षटकार !
21 May 2015 - 5:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणी केला सत-कार? जेपी सन्यासला गेले आहेत ना? सत्कारपुरे म्हणजेचं जेपी. =))
21 May 2015 - 7:46 am | सस्नेह
पण 'धरून' कुणी आणलं त्यांना ?
21 May 2015 - 8:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नाखु'न्'काका!! ;)
21 May 2015 - 1:38 am | डॉ सुहास म्हात्रे
लै भारी !
21 May 2015 - 7:16 am | श्रीरंग_जोशी
हा ही भाग उत्तम जमलाय. लैच भारी आहेत काही फटके.
21 May 2015 - 10:11 am | झकासराव
भारी जमलय :)
21 May 2015 - 11:21 am | प्रचेतस
हा भागही एकदम नाद खुळाच.
21 May 2015 - 12:07 pm | यमगर्निकर
नेहमी प्रमाणे तुमचा हा लेखहि "नाद खुळा" आहे. आणि "शिरा पुरी पुढच्या घरी"...... एकच नं. पन ह्यचि गोम फक्त कट्टेकर्यानाच माहिति आहे.
"लिव्ह इन रिलेशन" बद्दल मिपा करांच्यात एव्हडि उत्सुकता असेल ह्याचि मला कल्पना नव्हति. पण मिपा करांचि उत्सुकता बघुन ह्याबद्दल काहि लिहावे का. ह्याबद्दल मि विचार करतो आहे.
बाकि तुमचा "लाय इन रिलेशनशिप" हा टॉन्ट पोहोचला बरं का.
21 May 2015 - 3:09 pm | असंका
फर्मास!! अगदी भयंकर गुदगुल्या होत होत्या वाचताना..!! काय ते पंचेस का काय हो!!
:-))
_/\_
22 May 2015 - 9:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पुण्यामधे कोणाला एखादी फर्मास खानावळ म्हैते का हो? एक तात्पुरता डबा लावायचाय.
22 May 2015 - 10:15 pm | सूड
कॉल जस्ट डायल.
22 May 2015 - 10:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खानावळ जस्ट डायल वर मिळेल असं वाटत नै!!
22 May 2015 - 11:32 pm | सूड
पुण्यातले अजुनपर्यंतचे घरपोच डबे जस्ट डायल ला कॉल करुनच मागवलेत.
23 May 2015 - 9:26 am | नाखु
उपसंहार अर्थात "आभाराचे भिजत घोंगडे"
त्यांचा सत्कार करण्यासाठी स्व-आरतीमंड्ळाला बोलावलं होतं पण सुपारीवरून बोलणी फिस्कटली आणि शॉर्टकट मध्ये बसवलं
ट्क्या अरे ही सारी गुर्जींची कृपा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे). तू आणी बॅट्या गोंधळ पूर्ण करायला घ्या लवकर्.(लग्नसराई संपत आली पण)
बर्याच कट्टेकर्याची उपयुक्त माहीती नसल्याने जाहीर आवाहन केले होते.व्यनीत आमचे कुठलेही साधुहित नाही.भाजीच्या भावातही घासाघीस न करणारा, मेषपात्र असा आमचा भला-थोरला इतिहास आहे.
बुवा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावला आहेच)तुम्हाला लागलेल्या ११११ उचक्यांपैकी फक्त १११ उचक्यांचा खारीचा अल्प वाटा माझा आहे हत्तीचा वाटा आणि @@@चा वाटा तुम्ही चाणाक्षपणे ओळखालच !!! तसेही त्यांचेवर स्वतंत्र लेख पाडावाच लागेल (खिद्रापूरच्या रोचक टिप्पण्णीसह). कप्तान, अन्याला पकडून आणायचा विडा तूच उचलणे. त्याचाही सत्-कार राहीला आहेच !!
सध्या संकटमोचक दुर्गास्तोस्त्र म्हणून "कोकणची माणसं साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळी" हे वाचायचा मानस आहे.आपला माकडमेवा आवडला ही नम्र नोंद.
कट्टा आयोजक महाशय आपल्याकरीता मानाचं पान राखून ठेवले आहे !!
तू मेल्या याच्यात कश्याला डोकावतोस त्यांच चाललय तर चालू दे (वाचनचं रे)!
धन्यवाद. याचा अन्वयार्थ यमगर्नीकर साहेबांच्या प्रतीवादात येईलच.
अपुर्या सिलॅबसवर पेपर दिला आणि आमचे गुरुवर्य (इ. आ.उ.हा.आ.उ.आ.डा.का.ला.आहे)अमंळ कार्यमग्न असलेने एकलव्यता अनुसरली.
धन्यवाद आपल्या खिलाडूपणाला दाद! पण आमची एक शंका विचारली तर चालेल ना? तुम्ही पहिली लिईरी ही नोकरी निमित्त परगावी जेवणाची आबाळ होत (जेवाणाचे वांधे हा शब्द सुचविला होता आमच्या हितचिंतकानी पण आम्ही साफ दुर्लक्ष केले आबाळमध्ये जो मवाळपणा आहे तो वांधे मध्ये नक्कीच नाही)होती म्हणून तुम्ही पहिली लिईरी अनुभवली. दुसर्या+तीसर्या लिईरी साठी नक्की कशाची आबाळ होती ते सांगून होतकरूंना मार्गदशन करावे.
तुम्ही स्वयंपाक शिकला का नाही त्यातील फायदे-तोटे विषद कारावेत ही विनंती.
सर्व श्री. बॅटमॅन,खेडूत,इस्पीकचा एक्का,संदीप डांगे,झकासराव,श्रीरंग_जोशी,आणि(यशोधरा,पैसा,सुरन्गी,अजया,प्रीत-मोहर,इशा१२३,स्रुजा,कविता१९७८,मधुरा देशपांडे,भिंगरी) तै आपल्याला वृत्तांत आवडला धन्यवाद.
23 May 2015 - 10:21 am | पैसा
हा भाग पण मस्तच! कांदेपोहे खायला गेलेल्या आयोजकांचा सत्कार कोणी आणि कसा केला याबद्दल लैच उत्सुकता लागून राहिली आहे.
24 May 2015 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा
@कांदेपोहे खायला गेलेल्या आयोजकांचा सत्कार कोणी![http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif](http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif)
आणि कसा केला याबद्दल लैच उत्सुकता लागून राहिली आहे.>>
25 May 2015 - 6:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यांना परवा समक्ष भेटुन सत्काराचा कार्यक्रम करणार होतो. पण ते साहेब हापिसामधे होते ;)..पुस्प्गुच्च आणुन ठेवलाय. तुमच्या हस्ते करु येत्या विकांताला सत्कार. काय बोलता?
25 May 2015 - 7:58 am | पैसा
मी पुण्यात येईन तेव्हा सत्कार करूच, पण सध्या अखिल पिं चिं धायरी शिंव्हगड़ रोड महासंघातर्फे उरकून घ्या!
23 May 2015 - 10:02 pm | नूतन सावंत
पैसताईशी सह्मत.नवीन असल्यामुळे बऱ्याच सभासदांशी ओळख झाली तुमच्या वृतान्तातून नाद्खुळा
25 May 2015 - 9:39 am | प्रसाद गोडबोले
सुन्दर वृत्तांत।