नफिसा यादव
राजसच्या शाळेला दिवाळीची सुट्टि.. आणि त्यात शनीवार असल्यामुळे नवरोबाही घरात्..तसा दर शनीवारी मला त्याचा फार हेवा वाटतो पण आज जरा जास्तच वाटत होता. त्यात त्याची शेषशाही मुद्रा.. आणि चिरंजीवांची मस्ती.. त्यांच्या भोवती घुटमळणार्या मला टुकटुक करुन वाकुल्या दाखवत होती. ऑफिसल दांडि मारावी अस मनात शंभरदा येताना आवरा-आवर करणारी मी.. घरात सगळेच सैलावलेले.. माझी ही जरा अळम-टळमच चाललेली.. तस फारस काम नव्हत थांबाव का घरी.. म्हणता म्हणता माझी तयारी झालिही..चला आता थांबून चालणार नाही माझ मलाच सांगत समजावत बेटूचा पापा घेऊन निघाले.. तोवर बहाद्दुर दारात हजर झाला.. राजसच्या शाळेला सुट्टी सुरु झाल्यापासुन आमची गाडी माझ्या दिमतीला होती.. बसची वाट नबघता, रीक्षावाल्यांचे नखरे नऐकता ..रोजच्या प्रवासाला सुरुवात झाली ..
रत्यावर रोजचीच तुफान गर्दी.. हळुहळु कासवाच्या चालीन सरकणारा ट्राफिक .. खर तर एव्हड्या वेळात चालतही पोहचता येईल पण्..पण चालण्या पुरता रस्ता/फुटपाथ तरी हवा नाही!दुकानदार ठेलेवाले यांनी तो केव्हाच बळकावला त्यामुळे निमुट बसून रहाणे भाग होते तशी काही गडबडही नव्हतीच .. आजच्या दिवसातल सर्वात महत्वाच काम कोणत असेल तर ते म्हणजे मस्टर वरची सही .. हे काय हे ! कसले विचार!! म्हणत मरगळ झटकत घरापासुन स्टेशन पर्यंतचा एक टप्पा पार पडला.
मी स्टेशनवर पोहचले तो पर्यंत ९:३६ झाले ..९:३६ ची लोकल अगदि गच्च भरून येते.. जाऊ देत! त्या नंतर ९:४० आज ती नेमकी बारा डब्बा लावली. आणि अनाऊंसमेंट चालू होती फास्ट लोकलची सगळाच सावळा गोंधळ्..बारा डब्बा ट्रेन असली की मिडल लेडीज कंपार्टमेंट तीन डबे सोडून येतो..आणि त्यात अशा चुकीच्या अनाऊंसमेंट आता ही अनाऊंसमेंट होती आहे ती गाडी मी ब्रिज वर असताना येऊन गेलीही.. थांबाव की नाही च्या आभिर्भावात समोरुन येणार्या गाडी कडे आवासून बघणारे प्लाटफॉर्म वरचे प्रवासी.. बाराडब्बा लोकल समजून धावाधाव करणार्या बायका आणि गाडी येउन गेल्यावर होणारी सावधतेची सुचना त्या नंतर येणारी गाडी किती दब्यांची असेल हे कोडे केली गेलेली अर्धवट अनाऊंसमेंट ...सगळाच भोंगळ कारभार ! आता थांबल तर ही ही गाडी जायची..सो भागो... तेवढच वॉर्मअप..
या रोजच्या गोंधळामुळे का असेना थोड धावल जात नाहीतर मग आहेच दिवस भर गुळाचा गणपति बसला की बसला. हे जरी खर असल तरी निदान गच्च भरल्या फलाटावरुन बायकांना ऐन वेळी पळापळ करावि लागु नये असे काहीच का करता येत नाही रेल्वे प्रशासनाला..अनाऊंसमेंट पुर्ण स्पष्ट वेळच्या वेळी आणि अचूक झाल्या तर.. भारतात असल्या सारखे वाटणार नाही असे वाटले की काय यांना? की आमच्या तब्येतींची काळजी म्हणून ही पळापळ ते मुदाऊन घडवून आणतात ते तेच जाणोत लेडीज डब्बा असा इकडचा तिकडे हलवून नक्की काय साध्य करतात हे लोक.. तो डब्बा जागच्या जागीच आला तर ! ऐव्हडे तरी नक्की करता येईल ना रेल्वे प्रशासनाला मग इतकी साधी गोष्ट न करण्याच काय कारण असेल की या न केलेल्या छोट्याश्या गोष्टी मुळे बायकांची रोजच्यारोज उडणारी तारांबळ यांना माहीतच नाही .. प्रत्येक गोष्टित गोंधळ असलाच पाहीजे का? फास्ट ट्रेनच्या अनाऊंसमेंटचा गोंधळ तर कित्येकांच्या जिवावर बेतू शकतो!.. रेल्वेलाईन क्रॉस करण अगदी कधीही क्रॉस करण चुकिचच पण तरी आपल्या कडचे बरेच अतिउत्साही किंवा आळशी लोक तो गाढवपणा करतात.. त्यांतुन अपघात होऊ नयेत म्हणुन केली जाणारी अनाऊंमेंट तरी वेळेवर व्हावी.. तरच काही उपयोग होईल ना?