चमचम करती ऐने

स्वांतसुखाय's picture
स्वांतसुखाय in जे न देखे रवी...
18 Aug 2008 - 3:02 pm

तुमच्या साठी नटून बसले
काळी चंद्रकळा नेसून
रातराणीचे गंध उडवले
चोळी ऐन्याची घालून

जरा टेकून घ्या, पान लावलेले खा
घाई साजणा, का बरे झाली?
हात हळूच लावा, जरा जपून राखा
माझी आंब्याची रसाळ डाली

चमचम करती दंडावर किती
ऐने नाजूक बिलोरी
उरावर कशी खुलून दिसते
छबी साजणाची प्यारी

नको नुसता मुका, स्वाद थोडा चाखा
खुणावते गुलाबाची लाली
हात हळूच लावा, जरा जपून राखा
माझी आंब्याची रसाळ डाली

उगा झोंबाझोंबी नको हो राया
जातील ऐने फुटून
बगा थरथरे रेशमी काया
अहो पाटील थोडे जपून

रात उरली बगा, जरा दमान वागा
साथ सोडून, मी कधी ना गेली
हात हळूच लावा, जरा जपून राखा
माझी आंब्याची रसाळ डाली

प्रेमकाव्यकविताविरंगुळा