डीएसलार घेवून फिरणारया माकडांच्या गँग मध्ये नुकताच सामील झालो होतो तेव्हाची गोष्ट. मोठा कॅमेरा हातात आला की आपण लई भारी फोटोग्राफर होणार अस उगाचा वाटायला लागते. पण मॅन्युअल मोड वापरताना सुरवातीला जो घाम फुटतो तो सगळी हवा काढून टाकतो. आणि मग उगाच खुन्नस खावून सराव चालू होतो. मिळेल तिथे, जे हाताला लागेल त्याचे फोटो काढणे. मध्येच कुणी "वर्तमानपत्रात काम करता का?" असे विचारून उगाच कुरवाळून जातो.
असो. असाच एक सराव बेंगलोर मध्ये एका तळ्याकाठि चालला होता. तिथे एका वॉटर लिलीचे फोटो काढण्याचा प्रयत्न चालू होता. काहि केल्या मनासारखा फोटो येत नव्हता. बाजूलाच एक जोडपे त्यांच्या छोट्या मुलीसोबत आले होते. तळ्याकाठि उभारून एकमेकांचे फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू होता. त्यांच्याकडे पाँईट अँड शूट कॅमेरा होता.
मी सेटींग बदलन्यात गुंग असताना पाठीवर थाप पडली. "अंकल क्या कल रहे हो?" अस त्या छोट्या मुलीन विचारल. "फुल के फोटो ले रहा हू बेटा" अस उत्तर देवून मी परत आपल्या कामाला लागलो. "फुल के फोटो क्यो ले रहे हो?" परत चौकशी. काय उत्तर द्यावे ते सुचेना. तेव्हड्यात तिची आई मदतीला धावून आल-. "अंकल को डिस्टर्ब मत करो? पापा तुम्हारी फोटो खिचनेवाले है. चलो" अस म्हणून तिला ओढून घेवून गेली. सुटकेचा निश्वास.
पाच मिनिटात स्वारी परत- "अंकल फूल के फोटो मत खिचो". मी वैतागून - "क्यों?". ती "मेरी फोटो खीचो" अस म्हणून तिने छान पोझ दिलि सुद्धा. मी खुश होवून तिचे दोन तीन फोटो काढले आणि तिला दाखवले. खुश होवून म्हणाली- " अच्छे आये हे और खिचो". तोपर्यंत तिची आई परत म्हणाली- " खिचे है ना अब, अंकल को काम करने दो अब". ती "नही. मुझे अंकलसे और फोटो खिचवानी है." आई आता वैतागून म्हणाली -" तुम्हारे पापाके पास भी कॅमेरा है, वोह भी तो तुम्हारी फोटो खिच रहे है, तुम अंकल को डिस्टर्ब क्यो कर रही हो?" "इट्स ओके" अस उत्तर द्यावा अशा विचारात होतो. तितक्यात ती म्हणाली- " पापा का कॅमेरा छोटा है. अंकल के पास बडावाला अच्छा कॅमेरा है. हा अंकल खिचो फोटो." अस फर्मान तिने सोडले.
आईच्या कपाळावर भल्या मोठ्या आठ्या पड्लेल्या. तिचे वडील मात्र दिलखुलास हसत म्हणाले. "हमारी बेटी जिद्दी है. आप खिचो उसकी फोटो." तिचे दोन चार फोटो काढले. छान स्माईल देवून "थ्यॅंकू अंकल" अस म्हणून फ्लाईंग किस दिला. आणि निघून गेली.
आजही ही घटनी आठवली कि गंमत वाटते आणि तिचा बोलका चेहरा समोर येतो.
हीच ती चिमुकली.
प्रतिक्रिया
10 Mar 2015 - 10:57 am | Madhavi_Bhave
फारच सुंदर. खूप दिवसांनी असा सुंदर natural फोटो पहायला मिळाला. चिमुरडी नक्कीच बाबांच्या गळ्यातील ताईत असणार
10 Mar 2015 - 11:08 am | खंडेराव
अगदी नैसर्गिक..
10 Mar 2015 - 11:15 am | मार्मिक गोडसे
सुंदर फोटो. खुपच बोलका चेहरा.
10 Mar 2015 - 11:22 am | प्रभाकर पेठकर
सुंदर छायाचित्र. अगदी बोलके डोळे आणि निरागस चेहेरा. पण इथे छायाचित्र डकविण्याआधी तिच्या आई-वडिलांची परवानगी घेतली आहे का?
10 Mar 2015 - 4:58 pm | पिलीयन रायडर
हेच्च मनात आलं..
आई वडीलांची परवानगी हवी..
10 Mar 2015 - 5:25 pm | मितान
+१११
10 Mar 2015 - 10:03 pm | पॉइंट ब्लँक
हो ऑनलाइन वापरण्यासाठि घेतली होती.
10 Mar 2015 - 11:25 am | डॉ सुहास म्हात्रे
नक्कीच जिद्दी आणि बोलघेवडी चिमुकली आहे... डोळेच सर्व काही सांगून जातात !
10 Mar 2015 - 12:48 pm | प्रशांत हेबारे
निरागसता सुंदरच असते .
10 Mar 2015 - 6:52 pm | सौन्दर्य
मस्त लेख. मला ही डीएसएलआरचा हाच अनुभव आलाय. तुम्ही फुलाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केलात, मी पक्षाचा. मॅन्युअल मोडमध्ये अॅडजेस्टमेंट करता करता पक्षीच उडून जायचा. शेवटी ऑटोवर टाकून त्या पक्षाचे फोटो काढले. छोटुलीचा फोटो अप्रतिम.
10 Mar 2015 - 10:08 pm | पॉइंट ब्लँक
सुरुवातीला त्रास होतो खरा. पण नंतर जो कंट्रोल मिळतो त्याने मज्जा येते.