साईझ मॅटर्स
डीएसलार घेवून फिरणारया माकडांच्या गँग मध्ये नुकताच सामील झालो होतो तेव्हाची गोष्ट. मोठा कॅमेरा हातात आला की आपण लई भारी फोटोग्राफर होणार अस उगाचा वाटायला लागते. पण मॅन्युअल मोड वापरताना सुरवातीला जो घाम फुटतो तो सगळी हवा काढून टाकतो. आणि मग उगाच खुन्नस खावून सराव चालू होतो. मिळेल तिथे, जे हाताला लागेल त्याचे फोटो काढणे. मध्येच कुणी "वर्तमानपत्रात काम करता का?" असे विचारून उगाच कुरवाळून जातो.
असो. असाच एक सराव बेंगलोर मध्ये एका तळ्याकाठि चालला होता. तिथे एका वॉटर लिलीचे फोटो काढण्याचा प्रयत्न चालू होता. काहि केल्या मनासारखा फोटो येत नव्हता. बाजूलाच एक जोडपे त्यांच्या छोट्या मुलीसोबत आले होते. तळ्याकाठि उभारून एकमेकांचे फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू होता. त्यांच्याकडे पाँईट अँड शूट कॅमेरा होता.
मी सेटींग बदलन्यात गुंग असताना पाठीवर थाप पडली. "अंकल क्या कल रहे हो?" अस त्या छोट्या मुलीन विचारल. "फुल के फोटो ले रहा हू बेटा" अस उत्तर देवून मी परत आपल्या कामाला लागलो. "फुल के फोटो क्यो ले रहे हो?" परत चौकशी. काय उत्तर द्यावे ते सुचेना. तेव्हड्यात तिची आई मदतीला धावून आल-. "अंकल को डिस्टर्ब मत करो? पापा तुम्हारी फोटो खिचनेवाले है. चलो" अस म्हणून तिला ओढून घेवून गेली. सुटकेचा निश्वास.
पाच मिनिटात स्वारी परत- "अंकल फूल के फोटो मत खिचो". मी वैतागून - "क्यों?". ती "मेरी फोटो खीचो" अस म्हणून तिने छान पोझ दिलि सुद्धा. मी खुश होवून तिचे दोन तीन फोटो काढले आणि तिला दाखवले. खुश होवून म्हणाली- " अच्छे आये हे और खिचो". तोपर्यंत तिची आई परत म्हणाली- " खिचे है ना अब, अंकल को काम करने दो अब". ती "नही. मुझे अंकलसे और फोटो खिचवानी है." आई आता वैतागून म्हणाली -" तुम्हारे पापाके पास भी कॅमेरा है, वोह भी तो तुम्हारी फोटो खिच रहे है, तुम अंकल को डिस्टर्ब क्यो कर रही हो?" "इट्स ओके" अस उत्तर द्यावा अशा विचारात होतो. तितक्यात ती म्हणाली- " पापा का कॅमेरा छोटा है. अंकल के पास बडावाला अच्छा कॅमेरा है. हा अंकल खिचो फोटो." अस फर्मान तिने सोडले.
आईच्या कपाळावर भल्या मोठ्या आठ्या पड्लेल्या. तिचे वडील मात्र दिलखुलास हसत म्हणाले. "हमारी बेटी जिद्दी है. आप खिचो उसकी फोटो." तिचे दोन चार फोटो काढले. छान स्माईल देवून "थ्यॅंकू अंकल" अस म्हणून फ्लाईंग किस दिला. आणि निघून गेली.
आजही ही घटनी आठवली कि गंमत वाटते आणि तिचा बोलका चेहरा समोर येतो.
हीच ती चिमुकली.


वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
फारच सुंदर.
मस्त फोटो!
सुंदर फोटो.
छान...
हेच्च मनात आलं..
+१११
हो ऑनलाइन वापरण्यासाठि घेतली
नक्कीच जिद्दी आणि बोलघेवडी
सुंदर आणि निरागस
मस्त लेख. मला ही डीएसएलआरचा
सुरुवातीला त्रास होतो खरा. पण