खुशबू (भाग ११)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
3 Mar 2015 - 6:17 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९| भाग १०

त्या दिवशी संध्याकाळी पांडुरंग साने, हेमंत कोकरे यांच्या सोबत पुणे विद्यापीठ परिसरातील 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप' च्या इमारतीतून बाहेर पडले, व बोलू लागले ….
'मला वाटतं, हेमंत तूला ज्या व्यक्तीवर संशय आहे, माझ्याही मते तोच मोल आहे सिस्टीममधला'

'ठीक आहे, साधारणपणे सिस्टीम किती व कुठे वल्नरेबल आहे, याचा तुला अंदाज आला आहे का ?'

'अंदाज आहे पण, तू मला १ अठवडा दिला पाहिजे, कारण मुलांची प्राक्टीकल्स एक्साम चालू आहेत २-३ दिवस मला हलता येणार नाही, पण त्यानंतर मी व ऐक माझा सहकारी येवून, तुझी सिस्टीम पूर्णपणे स्वीप करून देऊ'

'वेट अ मिनीट …वेट अ मिनीट … तुझा सहकारी ????'

'अरे काळजी करू नकोस …. माझा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे ऐक … मुळचा नागपूरचा …गौतम मेश्राम … पठ्ठ्या एक्स्पर्ट आहे … वेब टेक्नोलॉजी क्लाउड … ऐनक्रीपशन… यु नेम इट …. अंड ही डझ …'

' तुझा सहकारी ????' अजूनही हेमंत आपल्या कपाळावरील आठ्या कमी करत नव्हता .

'अरे मी बाणेरला राहत असलो म्हणून काय झालं, … माझ्या सदाशिव पेठी नजरेने मी त्याला कधीच पारखला आहे, विश्वास ठेव माझ्यावर … '

'आर यु शुअर ?'

'ट्रस्ट मी, गुगलू इज बेस्ट फीट हिअर … '

'नाऊ हु इज गुगलू ? '

'अरे तोच गौतम !… काय आहे ना… शेवटच त्याचं वर्ष पूर्ण होण्याआधीच गुगल ने त्याला ऑफर दिली, म्हणून मग त्याचे मित्र त्याला गुगलू म्हणतात'

'ओ के, त्याची मदत घे… तुला माहिती आहेच … कुठल्या प्रकारची माहिती असते सिस्टीम मधे …'

'डोंट वरी हेमंत, योर बेबी इज लाईक माय बेबी…'

प्रा सानेंना आपल्या कारने घरी ड्रांप केल्यावर… हेमंत कोकारेंनी मोबाईल नंबरवर कॉल लावला, "हलो प्रीतमसिंग, सिक्युअर कलप्रिट, आणि इनीशीएट 'प्रोटोकॉल अहिल्या'…

-------------------------------------------------------------
''प्रोटोकॉल अहिल्या' ??? …… हे काय असतं वाझसर ?'

'खुशबू बेटा, कधी लहानपणी विषअमृत खेळलीस का ?'

'हो खेळले ना. का ?'

' 'प्रोटोकॉल अहिल्या' इनीशीएट केला गेला म्हणजे…. आपल्या टीमलीडरने सर्व टीममेंबरनां एकाच वेळी सरसकट 'ब्लांकेट विष' दिल आहे या डावामधे, प्रिकॉशन म्हणून ……
, नाऊ टाइमबीइन्ग, वी ऑल आर स्टोन्स … टील … टीमलीडरने सर्व टीममेंबरनां एकाच वेळी सरसकट 'ब्लांकेट अमृत' दिल पाहिजे, म्हणजे 'प्रोटोकॉल अहिल्या' विड्राव केला पाहिजे'

'म्हणजे काय ? असं का करतात सर ?'

'जेव्हा कधीही एखादा सिक्युरिटी ब्रीच किंवा लूपहोल, एखाद्या सक्षम अधिकार्याच्या निदर्शनात येतो वा आणून दिला जातो, तेव्हा तो, ती सिस्टीम फ्रीज करून टाकतो, कुठलीही माहिती त्या सिस्टीमच्या आत वा बाहेर येत-जात नाही, एवढंच काय आता आपलं मोबाईल कम्युनिकेशन सुद्धा आपण थांबवावं लागेल, ब्याटरी काढून सीम सकट सर्वांनी मला त्यांचा मोबाईल द्यायचा आहे , तू सुद्धा'

खुशबूने तसं करून मोबाईल वाझ यांच्याकडे दिला …

'आज संध्याकाळी सर्वांचे सीम कात्रीने कापून ठेवणार आहे, ते व मोबाईल फोन्स माझ्या बेकरीच्या भट्टीत डीस्त्रोय करणार आहे, आपल्या सर्वांना टीमलीडकडून जो पर्यंत ऑलक्लियर येत नाही तोपर्यंत…… आपण काहीच करणार नाही आहोत …. नो सर्वेलन्स …. नो नथिंग …. कळल ?'

'कळल सर… जेव्हा जेव्हा टीमलीडला कामाचा खूप कंटाळा येतो …. तेव्हा तेव्हा 'प्रोटोकॉल अहिल्या' इनीशीएट केला जातो'…. खुशबू गमतीने म्हणाली.

'हा हा हा, गुड वन खुशबू, नाऊ गुडबाय '

'गुडबाय सर'
-------------------------------------------------------------
सकाळपासूनच सौदी अरेबियाच्या दम्माम शहराच्या २० कि मी पश्चीमोत्तर दिशेला असलेल्या किंग फहाद इंटरन्याशनल एयरपोर्टवर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. अनेक वेगवेगळी विमानं तीथे येऊन पोहोचत होती. अनेक विमानं वेगवेगळ्या दिशांना उड्डाण करत होती. वेगवेगळ्या विमानांतून आलेले प्रवासी इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांसमोर तपासणीसाठी रांगा लावत होते. पासपोर्ट आणि व्हिसा तपासणी केल्याविना अर्थातच कोणालाही प्रवेश मिळू शकत नव्हता! कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसणारं हे नेहमीचंच दृष्यं होतं. दुपारच्या सुमाराला पाकिस्तानमधून येणारं पीआयऐ च एक विमान रनवेवर उतरुन नुकतंच थांबलं होतं. विमानातील प्रवासी आपापले पासपोर्ट आणि व्हिसा याच्यासह इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांसमोर रांगा लावत होते. एकेका प्रवाशाची तपासणी करुन अधिकारी त्याला प्रवेश देत होते. एक माणूस असाच एका इमिग्रेशन अधिकार्यासमोर जाऊन उभा राहीला. आपला पासपोर्ट त्याने तपासणीसाठी त्या अधिकार्याच्या हवाली केला. अधिकार्याने तो पासपोर्ट पाहीला आणि तो पासपोर्ट पाकिस्तानचा होता...

तो माणूस सुमारे साडेपाच फूट उंच आणि मध्यम बांधा होता. त्याने दाढी राखलेली होती. साधा पठाणी पोशाख त्याने घातलेला होता. वयाने तो साधारण तिशीत असावा!

सौदी अधिकार्यांनी इमिग्रेशन काऊंटरवरुन त्याच्याकडे चौकशीस प्रारंभ केला. "तुझं नाव काय?"

'लियाक़त अली'

"तू कुठून आलास?"

"मी मूळचा पाकिस्तानचा रहिवासी आहे!" तो म्हणाला, अधिकार्यांनी त्याचा पासपोर्ट नीट तपासला. पासपोर्ट नवा कोरा होता, नुकताच इस्लामाबाद इथून तो जारी करण्यात आलेला होता, इस्लामाबादेतून कालच्या तारखेची एक्झीट शिक्का शिवाय पासपोर्टवरील कुठल्याही शिक्क्यांची नोंद नव्हती, सौदीचा व्हिसा अर्थात त्याला देण्यात आला होता.

'पर्पज ऑफ योर विसिट ?'

'फळांचा एक्स्पोर्टचा बिसिनेस आहे माझा, त्या संधर्भात सौदीत बिसिनेस वाढवण्याच्या दृष्टीकोनातून काम करणार आहे'

'ठीक आहे, सर्वशक्तिमान अल्ला तुझ भलं करो'… असं म्हणून सौदी इमिग्रेशन अधिकार्याने त्याचा पासपोर्ट वर सौदी एंट्री शिक्का उमटवला…….

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

3 Mar 2015 - 7:53 pm | मास्टरमाईन्ड

आवडला पण मागच्या बहुतेक सगळ्या भागांपेक्षा हा छोटा आहे!

संदीप डांगे's picture

3 Mar 2015 - 11:57 pm | संदीप डांगे

लेख वर आणन्याची गरज आहे.