प्रिय मिपाकरांनो,
पुणेकरांचे कशेळी कट्ट्याचे आयोजन झाले देखील.
पण अद्याप मुंबईकरांचे कुठलेच आयोजन नसल्याने, हा विषय मांडत आहे.
कालच माझे आणि कंजूस ह्यांचे बोलणे झाले.
शनिवारी १४-०२-२०१५ला, सकाळी ९-२०ची कर्जत लोकल ते डोंबिवलीहून पकडणार आहेत.
मी पण तीच लोकल पकडणार आहे.
माझ्या बायकोची जर्मनची परिक्षा त्याच सुमारास असल्याने, ती येणार नाही.
कळावे,
आपलाच मुवि.
प्रतिक्रिया
10 Feb 2015 - 10:06 am | सविता००१
पण १०:३० पर्यंत पोचायचय ना? ९:२० ने कर्जत १०.१० ल येइल ना? आणि पुढे १ तास लागणार आहे ना?
मी लवकरची लोकल शोधत होते. मेगा ब्लॉक असेल ना? रविवार आहे.
10 Feb 2015 - 10:07 am | सविता००१
कल्याण हून येणार आहोत
10 Feb 2015 - 10:14 am | सुबोध खरे
सविता ताई
ते शनिवारी जाणार आहेत.
10 Feb 2015 - 10:26 am | सविता००१
कट्ट्याला जायची घाई. वाचलं नाही नीट :(
10 Feb 2015 - 10:15 am | सुबोध खरे
रविवारी जमेल तितके लवकर निघा.
10 Feb 2015 - 10:26 am | सविता००१
नक्की
10 Feb 2015 - 12:31 pm | अजया
मेगा ब्लाॅकच्या शक्यतेमुळे दहाच्या आत कर्जत गाठा,सविता ताई!
पुढे मी घेऊन जाते!
10 Feb 2015 - 12:45 pm | सविता००१
अजयाताई. हे करणारच आहे
10 Feb 2015 - 3:12 pm | माम्लेदारचा पन्खा
एक फायनल लिस्ट टाकाल का कोणीतरी....
शंकराच्या देवळातल्या दुधाच्या अभिषेकासारखं व्हायचं नाहीतर ! दुसरा दूध टाकेल म्ह्णून आपण पाणी टाकायचं आणि नंतर गाभार्यात फक्त पाणीच पाणी....
10 Feb 2015 - 3:46 pm | अजया
आधीच्या धाग्यावर टाकलेली.नंतर बर्याच जणांचे अपडेट्स नाहीत.इथेच फायनल कळवले सर्वानी तर लिस्ट करता येईल.
10 Feb 2015 - 3:53 pm | टवाळ कार्टा
माझे १४ ला येणार की १५ ला हे अजून ठरलेले नाही...बहुतेक १५ ला असेन जास्त करून
१५ ला आलो तर "ग्यांग" बरोबर असणारै ;)
10 Feb 2015 - 4:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पाशवी शक्तींना गँगची भिती दाखवतोस होय रे? =))
10 Feb 2015 - 4:46 pm | टवाळ कार्टा
तसेपण त्यांच्याकडे कोण लक्ष देतो...आपण बरे....मुविंचा कट्टा बरा....म्याच बरी :)
10 Feb 2015 - 4:37 pm | सूड
मला जमलं तर शन्वारी सकाळी येऊन दुपारला निघून जाईन. सांच्याला नि दुसर्या दिवशी कामं हायेत.
10 Feb 2015 - 5:07 pm | सुहास झेले
मी रविवारी नक्की आहे...मी राहायला चारकोप (कांदिवली).. जमल्यास ठाणे-बोरीवली परिसरातील मिपाकर एकत्रपणे गाडी करून जाऊ शकतो...
10 Feb 2015 - 5:14 pm | भावना कल्लोळ
वसईवरून यायचे असेल तर कसे यावे आणि कुठे भेटावे कि डायरेक्ट यायचे आहे ? माझ्याबरोबर माझा लहान मुलगा हि असणार आहे.
10 Feb 2015 - 9:02 pm | अजया
वसईहुन ट्रेनने कोपर स्टेशनवर उतरावे लागेल.तिथे कर्जत ट्रेन मिळेल.तिथुन नेरळला उतरुन पुढचा प्रवास धाग्यावर दिला आहे.
10 Feb 2015 - 5:33 pm | उपास
पण मॅचच्या दिवशी कट्टा.... कसं जमवायचं.. व्हॅलेंटाईन कर्तव्यपण आहेतच.. तस्मात आमचा पास दिसतोय सद्ध्यातरी.. शुभेच्छा...!
10 Feb 2015 - 8:56 pm | विनोद१८
घरचेच कार्य न टाळता येण्याजोगे असल्याने व तेही गावातच.
(खंतावलेला) विनोद१८
11 Feb 2015 - 10:08 am | संदीप डांगे
नाशिकहून आमची राज्यराणी सकाळी ८.५० ला कल्याणला पोचते. मला तुमची कर्जत लोकल ९,२९ ला कल्याणहून गाठता येईल. जर थोडा उशीर झाला तर पुढची कर्जत लोकल आहेच अर्ध्या तासानी. मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर व्यनि करतो, तुम्ही पण तुमचा द्या…
11 Feb 2015 - 12:01 pm | किणकिनाट
मी येणार आहे. सौ. आणि मी दोघे. आम्ही छोट्या चार चाकीने पनवेलवरून सकाळी साधारणपणे ८.३० ते ९.०० वा. नीघूं. मागची सीट रिकामी आहे. अजून ३ (किंवा अॅड्जस्ट होत असेल तर ४) जण बरोबर येउ शकतिल. पनवेल एस. टी. स्टँड वा रेल्वे स्थानकावरून पीक अप (आणि संध्याकाळी ड्रॉपसुद्धा) करू शकू. कोणाला यायचे असेल तर येथे कळवा अथवा व्यनी करा. आम्ही येणार नक्की. जय मि.पा. जय महाकट्टेकरी.
11 Feb 2015 - 9:03 pm | पिंगू
कदाचित मी जमल्यास येईन. भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि करत आहे.
12 Feb 2015 - 4:23 pm | किणकिनाट
तुमचे स्वागत आहे पिंगू. व्यनि केला आहे.
11 Feb 2015 - 5:25 pm | कंजूस
@संदिप डांगे भाऊ ,तुमचा उत्साह पाहून आणखी मिपाकर येतील याची खात्री आहे.
तुम्ही शनिवारीच १४ फेब्रु ला येणार आहात ना ?आम्ही (मुवि आणि मी )platform नंबर 1 नेरळ स्टेशनवर -कल्याण टोकाशी तुमची वाट पाहतो. उशिर झाला तर तिथेच कट्टा करू पण तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही.
आणखी कोणी या गाडीस येणाऱ्यांनी शुक्रवार रात्री दहापर्यँत व्यनि करावा ही विनंती. (फोनवर विसंबून राहायला नको).
11 Feb 2015 - 6:13 pm | संदीप डांगे
:-) शनिवारी १४ लाच मी नेरळ स्टेशनवर भेटतो आपल्याला... आमची राणी कधी कधी जास्तीत जास्त अर्धा तास लेट होते. त्यामुळे अपेक्षा आहे तुम्हाला जास्त वाट पाहावी लागू नये.
12 Feb 2015 - 8:21 pm | भाते
पण, रविवारी काही घरगुती कारणामुळे शनिवारी रात्री आणि रविवारी थांबणे शक्य नसल्यामुळे मी फक्त शनिवारीच तिकडे असणार आहे.
शनिवारी रात्री ७-८ पर्यंत तिकडुन निघुन मला १०-११ पर्यंत घरी परत यावे लागेल. चालेल ना?
13 Feb 2015 - 8:27 am | कंजूस
भाते ,रात्री सहानंतर ऑटो असतात का ते शिवाजीला विचारून कदाचित लवकर निघावे लागेल.
13 Feb 2015 - 10:11 am | भाते
रिक्षाच्या वेळेनुसार तिकडुन थोडा लवकर निघुन मी परत येईन.
गेल्या वेळेसारखे, उद्या सकाळी मी साडेआठ पावणेनऊ पर्यंत तिकिट घराजवळ येईन.
14 Feb 2015 - 6:14 am | मुक्त विहारि
स्टेशनवर असेन.
14 Feb 2015 - 7:21 am | मुक्त विहारि
आमची अर्धांगिनी पण येत आहे...
14 Feb 2015 - 8:54 am | कंजूस
भाते आणि कंजूस निघाले
14 Feb 2015 - 10:23 am | मोनू
सर्वांना कट्ट्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ... पुढील कट्ट्यास येण्याचा नक्की प्रयत्न करेन .
14 Feb 2015 - 8:35 pm | भाते
मस्त कट्टा…
सकाळी कंजुसकाका, श्री. व सौ. मुवि आणि मी (भाते) आधी ठरवल्याप्रमाणे मध्यवर्ती डोंबिवली स्थानकातुन कर्जत गाडीने प्रस्थान केले.
नंतर… नेरळला गाडीतुन ऊतरल्यावर नेरळ ते कशेळी रिक्षा प्रवास. फक्त ११-१२ किमी (काटकर नाही हो, किलोमीटर)
मग, कशेळीचा तो मिसळपाव, वडापाव, ढोकळा आणि चहा… आहाहा… मस्तच!
मिपाकरांना जळवण्यासाठी फोटो काढण्याची तसदी आम्ही अजिबात घेतली नाही. :)
मग पुन्हा कशेळी ते आंबिवली रिक्षा प्रवास. इथे आम्हाला सुचना देऊन महाराजांनी मुक्कामासाठी गडावर प्रस्थान केले.
मग, श्री. व सौ. मुवि आणि मी वनविहार मध्ये दाखल झालो.
मी आणि श्री. मुवि झोपाळ्यावर बसुन रंगित पाण्याचा आस्वाद घेतला. फोटो नाहीत!
चुलीवर बनवलेले ते जेवण! आहाहा… जाऊदे, शब्द नाहित वर्णन करायला. पुन्हा, फोटो नाहीत!
नंतर, नाईलाजाने पुर्वसुचना दिल्याप्रमाणे मी श्री. व सौ. मुवि यांचा निरोप घेतला.
तर, महाराज, ऊद्या सकाळी गडावरून खाली ऊतरतील.
बाकीचे, कट्टा नियोजन अधिकारी बघतील. :)
आता, ऊद्याचा कट्टा हुकल्याचे मला अजिबात वाईट वाटणार नाही! :)
14 Feb 2015 - 10:03 pm | कंजूस
शनिवारी रात्री काही मिपाकर येतील आणि मला अगम्य अशा करमणूकीच्या गोष्टी होणार आहेत यातून गडावर पलायन हा मार्ग मी अगोदरच ठरवला होता.