बॅचलरांच्या मेळ्यामध्ये

बिनडोक बनी's picture
बिनडोक बनी in जे न देखे रवी...
13 Aug 2008 - 5:53 pm

बॅचलरांच्या मेळ्यामध्ये
आम्ही वैवाही भाबडे.
तुम्हा रुचेल का हो हे
माझे मोडके तंगडे.

तुम्ही शाल मखमली,
आम्ही फाटके घोंगडे.
का हो बायको घरात
आम्हा म्हणते फावडे.

जन्म स्वैपाकात गेला,
अमुचे भांड्यांशी वाकडे.
जशी समजून चाले
ती आम्हांसी बोकडे.

जरा चालवूद्या हात,
जुळवितो माझे शब्द.
लव्हमॅरेज अमुची कथा
अगदिच नाही निर्बुद्ध.

- बिनडोक बनी

प्रेरणास्थान : अंकुश चव्हाण यांचा ज्ञानियांचा मेळ

विडंबनप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

13 Aug 2008 - 5:56 pm | आनंदयात्री

फाडली ओवी शेवटी !!

प्राजु's picture

13 Aug 2008 - 5:57 pm | प्राजु

;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Aug 2008 - 6:35 pm | बिपिन कार्यकर्ते

प्राजुताई, यु टू?

जमलंय हो चांगलं....

बिपिन.

शितल's picture

13 Aug 2008 - 6:40 pm | शितल

हा हा हा..
बने....
ओव्याचा निकाल लावलास हो :)

सखाराम बाइंडर's picture

13 Aug 2008 - 7:00 pm | सखाराम बाइंडर

मस्त

सर्किट (पुर्वीचा खरा डॉन)

संदीप चित्रे's picture

13 Aug 2008 - 8:18 pm | संदीप चित्रे

हसवून सोडलेस हां... चालू दे चालू दे :)

वा वा! ये स्वागत आहे!
छान आहे हो विडंबन!

(स्वगत - 'केशवा' काय काय चमत्कार दाखवणार आहेस रे बाबा? ;) आता फक्त तात्यांनीच केलेले विडंबन वाचायचे बाकी आहे झालं! :O :B )

चतुरंग