आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ? सगळे मार्क्स , अडम्स, टोल्स्टोय ." भारतासारख्या वैविध्यपूर्ण तेने नटलेल्या खंडप्राय देशात आपण बाहेरच्या देशातल्या कोणत्या तरी माणसाने तयार केलेला 'इझम ' जसा च्या तसा कॉपी पेस्ट करतो आणि कुठल्या तरी बाहेरच्या माणसाचे संदर्भ वापरतो यावर झालेली हि खास नेमाडीय कोटि .साहित्य संमेलनावर त्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा धुरळा उडाला . काहीही असो नेमाडे कायम बातम्यात असतात हे खर . ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात कायम मराठी लेखकांवर अन्याय होतो अशी ओरड चालू असताना नेमाडे याना हा पुरस्कार घोषित झाल्याने आपण खुश होण्यास हरकत नाही . आयुष्यातल्या निरर्थकतेचे पापुद्रे सोलत जगणारय पांडुरंग सांगवीकर याचे आधुनिक version असणारया एका चाहत्याचा नेमाड्यांना मानाचा मुजरा .
प्रतिक्रिया
6 Feb 2015 - 4:09 pm | अत्रन्गि पाउस
असं कसं असं कसं
अहिंसा / मनू / बुद्ध ...हे आपण आयात कुठे केलेत ...
असो ...नेमाडे वगैरे ..इतकी हाय लेव्हल आपली नाही ..
त्यामुळे मी पैला आणि पास !!!
6 Feb 2015 - 4:25 pm | होबासराव
सत्याग्रह, उपोषण आणि त्याचे नवे वर्जन अण्णा आणि केजरी वाले हे सुद्धा कुठे आयात केले आपण..
6 Feb 2015 - 4:54 pm | ज्ञानोबाचे पैजार
नेमाडेसरांचे मनःपूर्वक अभिनंदन
पैजारबुवा,
6 Feb 2015 - 5:07 pm | पैसा
नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन! मराठी लेखकाला ज्ञानपीठ मिळालंय ना!
6 Feb 2015 - 5:16 pm | विशाखा पाटील
छान बातमी आहे.
6 Feb 2015 - 5:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कोसलाकारांचं अभिनंदन...
6 Feb 2015 - 5:22 pm | आदूबाळ
फार आनंद झालेला आहे. नेमाडे यांचं अभिनंदन.
6 Feb 2015 - 5:29 pm | राजाभाउ
वा वा वा! मस्त बातमी. नेमाडे यांचं अभिनंदन.
6 Feb 2015 - 5:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अभिनंदन.
6 Feb 2015 - 6:43 pm | मित्रहो
श्री भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन
6 Feb 2015 - 7:09 pm | कापूसकोन्ड्या
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित
नेमाडे सर,
आज एका मराठी सारस्वता ची योग्य दखल घेतली गेली.
ज्ञानपिठ पारितोषिक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. टिका स्वयंवर,कोसला, बिढार आणि झुल घेउन जाणाया (उदाहरणार्थ पांडूरंग सांगवीकर) निरर्थकतेचे पापुद्रे सोलून समृद्ध अडगळ बनणार्या योद्ध्याला मानाचा मुजरा.
(एके काळी आम्ही तुमचे फ्यान होतो, ती तुमची ३० वर्षानी आलेली समृद्ध अडगळ बाहेर येइ पर्यंत)
6 Feb 2015 - 7:11 pm | कापूसकोन्ड्या
आयुष्यातल्या निरर्थकतेचे पापुद्रे सोलत जगणारय
6 Feb 2015 - 7:18 pm | जातवेद
नेमाडेंचे हार्दिक अभिनंदन!
6 Feb 2015 - 7:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
हार्दीक अभिनंदन !
6 Feb 2015 - 8:39 pm | अजया
कोसलाकार नेमाड्यांचे अभिनंदन!समृध्द अडगळकार नाही!!
7 Feb 2015 - 9:06 am | पिंपातला उंदीर
अरे वा! अस सलेक्टिव अभिनन्दन करता येत? ह. घ्या .
6 Feb 2015 - 10:26 pm | लाल टोपी
मराठी दिन काही दिवसांवर आलेला असतांनाच 'कोसला'कारांना मिळालेल्या ज्ञानपिठासाठी हार्दीक अभिनंदन
6 Feb 2015 - 11:35 pm | अर्धवटराव
मराठी साहित्यीकाला ज्ञानपीठ मिळाल्याचा विशेष आनंद आहे.
7 Feb 2015 - 12:03 am | श्रीरंग_जोशी
भालचंद नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याने आनंद झाला.
7 Feb 2015 - 9:18 am | प्रचेतस
नेमाड्यांचं लिखाण अगदी कोसलासकट फ़ारसं आवडलं नसलं तरीही त्यांचे ह्या पुरस्काराबद्दल अभिनंदन.
7 Feb 2015 - 4:21 pm | राही
असेच काहीसे, शिवाय त्यांचा तो देशीवाद आणि बेधडक-बेछूट बोलणे अगदी डोक्यात जाते.
शिवाय, अन्य साहित्यिकांबद्दलची अगदी तुच्छ वृत्ती.
असो. तरी अभिनंदनच.
7 Feb 2015 - 5:30 pm | आदूबाळ
थोडासा pspo प्रश्न: हे देशीवाद काय प्रकरण आहे?
म्हणजे "भारतीय लोक/परिस्थिती/संस्कृती वेगलं आहे आणि त्याला परदेशी विद्वानांनी बनवलेले सिद्धांत लागू होत नाहीत" असं काहिसं का?
7 Feb 2015 - 5:47 pm | प्रचेतस
थोडंसं असंच काहीसं
नेमाड्यांचा देशीवाद म्हणजे ग्रामसंस्था टिकली पाहिजे, परंपरा टिकल्या पाहिजेत.
संत, समाजसुधारक, आंबेडकरादिक थोर विचारवंत ह्यांनी नव्या कल्पनांचा पुरस्कार केला त्यामुळे मूळची भारतीय संस्कृती बदलत गेली.
खेडी सोडून शहराकडे जाणे चुकीचे आहे. जातिव्यवस्था मोडणं अशक्य आहे.
जागतिकीकरणाच्या नादात आपण आपलं स्वत्वं गमावतो आहोत वगैरे वगैरे.
वास्तविक व्यक्तिगत जीवनात नेमाडे मात्र नेहमीच आपल्या ह्या भूमिकेशी विसंगत वागतांना दिसतात. उदा. अध्यापनाच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या शहरात जाणे, परदेशी जाउन विद्यार्थ्यांना शिकवणे इत्यादी इत्यादी.
7 Feb 2015 - 6:39 pm | आदूबाळ
ओक्के.
आपण विसंगत वागलो तरी व्हायचं ते होईलच - म्हणजे ग्रामसंस्था टिकेल वगैरे - असा विचार असावा. म्हणजे एकट्या माणसाच्या कृतीपेक्षा हा रेटा मोठा आहे वगैरे...
7 Feb 2015 - 4:39 pm | पिंपातला उंदीर
नेमाडे यान्चा माज- पॉप्युलर प्रकाशनचे भटकळ त्या काळी नेमाडे आणि गाडगीळ या दोघांची पुस्तके प्रकाशित करीत. नेमाडे भाषणात म्हणाले की सुरवातीला त्यांना गाडगीळ हे लेखक म्हणून आवडत नसत, पण नंतर ते त्यांना आवडायला लागले, याचं कारण म्हणजे आपल्यापेक्षा वाईट लिहिणारा लेखक असला की त्यामुळे आपलं महत्व वाढतं *biggrin*
7 Feb 2015 - 5:29 pm | चौकटराजा
कोणताही कलावंत किती मोठा आहे ते खरे तर लोकांच्या प्रतिसादाने ठरत असते. लोकांमधे अभ्यासक पण असतात व आस्वादक पण ! या दोन्ही दृष्टीकोनांचा गुणाकार होऊन जो लोकप्रिय होतो तो " खरा" ! पारितोषिके मिळाली तर एकाच पातळीवर एखाद्याचे श्रेष्टत्व ठरते सर्व पातळ्यांवर नाही. यात सारे आले. मी नेमाडेंंचे एकही पुस्तक वाचलेलेच नाही पण ज्ञानपीठ हे मोठे लक्षण आहे श्रेष्टपणाचे ! केवळ या निकषावर नेमाडे याना कुर्निसात !
7 Feb 2015 - 6:02 pm | hitesh
छान
7 Feb 2015 - 7:28 pm | विकास
नेमाड्यांचे अभिनंदन! मराठी ज्ञानपिठ विजेत्यांमधे मला वाटते कुसुमाग्रज आणि विंदाच असतील ज्यांच्या लेखनावर टिका झाली नसावी. नेमाड्यांप्रमाणेच खांडेकर देखील लोकप्रियतेप्रमाणेच टिकेचे धनी होते. पण मला वाटते ते महत्वाचे नाही. त्यांनी जे काही मराठी वाड्मयात भरीव योगदान केले आहे त्यासाठी जे योग्य पारीतोषिक आहे ते त्यांना मिळालेले आहे. आणि त्याचा नक्कीच आनंद आहे.
7 Feb 2015 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भालचंद्र नेमाडे यांचं अभिनंदन...!
-दिलीप बिरुटे
7 Feb 2015 - 8:52 pm | एस
असेच म्हणतो. वादविवाद, मतभेद इत्यादी बाजूला ठेऊन एका मराठी लेखकास हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनापासून आनंद झाला आहे. श्री नेमाडे यांचे हार्दिक अभिनंदन.
7 Feb 2015 - 9:35 pm | पिंपातला उंदीर
हे अजून एक महत्वाच . कोसला ही कादंबरी प्रकाशकाने--रा.ज. देशमुखांनी, काही वर्षं कुजवली. आमच्या (प्रस्थापित) लेखकांवर टीका करू नका असा दबाव आणण्यासाठी. नेमाडे त्या दडपणाला बधले नाहीत. पण ह्या काळातच त्यांनी मराठी लेखन-वाचन संस्कृतीचा सखोल विचार केला असावा. आपल्या विद्रोहाला भक्कम सामाजिक आधार निर्माण करण्याचा विचार ह्या काळातच पक्का झाला असावा. कोसला नंतरच्या कादंबर्यांमध्ये ही शिफ्ट स्वच्छपणे दिसते.
लेखक आणि वाचक ह्या दोन टोकांमध्ये प्रकाशक, वाचनालयं, समीक्षक, विविध संस्था, पुरस्कार असे अनेक दुवे वाचन संस्कृतीत महत्वाचं कार्य पार पाडतात. त्याची बांधणी नेमाडेंनी केली. हे कार्य त्यांनी अतिशय निष्ठेने, तडफेने आणि हिशेबीपणे केलं. हातकणंगलेकर, महानोर, श्याम मनोहर ते अरुण कांबळे ते यू. आर. अनंतमूर्ती अशी एक मोठी रेंज त्यांनी ह्या कार्यात निर्माण केली. विद्वत्ता, पांडित्य ह्या जोरावर साहित्य अकादमी सारख्या संस्थेमध्ये दबदबा निर्माण केला. साहित्य अकादमीची नजर पश्चिमेकडे लागलेली होती ती त्यांनी पूर्वेकडे वळवली. नेमाडे ज्या काळात साहित्य अकादमीमध्ये सक्रिय होते त्या काळातील अकादमीची प्रकाशन पाह्यली तरिही हे सहजपणे ध्यानी येईल. विविध प्रादेशिक भाषांना मान्यता देण्याचं काम केंद्र सरकारने साहित्य अकादमीकडे सोपवलं. ह्या कार्यात नेमाडेंनी कळीची आणि मोलाची भूमिका बजावली. अर्थात त्यांच्या वाट्याला जो काही मर्यादीत अवकाश आला त्यामध्येच हे पाह्यला हवं.
वाचकांची अभिरुची बदलल्याशिवाय उच्चवर्णीयांची मिरासदारी मोडून काढता येणार नाही हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. त्यासाठी विरोधकांचा पाणउतारा करणं, त्यांना हास्यास्पद ठरवणं आणि नवी समीक्षा जन्माला घालणं अशा दोन्ही पातळींवर कार्य केलं. हे केवळ साहित्यिक कार्य नव्हतं. तर सामाजिक-राजकीय कार्य होतं. संपन्न भाषा, साहित्यिक मूल्य ह्यासोबतच नेमाडेंच्या नेतृत्व गुणांचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. सामाजिक-राजकीय कार्य म्हटलं की काही दुय्यम तत्वांना मुरड घालावी लागते. उदाहरणार्थ पुरस्कार न स्वीकारणं वगैरे. त्यामुळे मध्यमवर्गीयांतील काही विद्रोहींनी त्यांच्यावर टीकाही केली. पण तोपावेतो नेमाडेंचा सामाजिक आधार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात निर्माण झालेला होता. आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या देशीवादाच्या मांडणीला आधार मिळालेला होता. त्यामुळे ह्या इन्यागिन्या वर्तमानपत्री टीकाकारांची डाळ शिजली नाही. काही अपवाद अर्थातच होते पण लेखकाची नैतिकता ह्या नव्या निकषाच्या आधारे नेमाडेंनी त्यांचा बंदोबस्त केला. साठोत्तरी साहित्याने निर्माण केलेली नवी अभिरुची महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रुजवण्याचं आणि वाचकांची अभिरुची बदलण्याचं मोठं कार्य नेमाडेंच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलं.
हिंदू-एक समृद्ध अडगळ, ह्या कादंबरीच्या पहिल्या खंडात नेमाडेंच्या वैचारिक निष्ठा, इतिहासाचं आकलन, भाषा, राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण समर्थपणे प्रतिबिंबित झालं आहे. देशातील नव्या वाचन संस्कृतीला मिळालेली मान्यता म्हणूनही त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराकडे पाह्यला हवं.- फेबु वरून साभार सुनील तांबे
8 Feb 2015 - 3:45 pm | प्रदीप
इथे एक वेगळा विचार मांडलेला दिसतो.
8 Feb 2015 - 10:24 pm | विकास
दुव्या बद्दल धन्यवाद!
या बद्दल कोणास अधिक माहिती आहे का?
9 Feb 2015 - 9:31 am | पिंपातला उंदीर
खर तर कोसलाचि विक्री वाढण्यामागे कोसला च्या नंतरच्या आवृत्तीत पु ल देशपांडे यांनी दिलेली सुंदर प्रतिक्रिया हे एक महत्वाचे कारण होते . पण नेमाडे सतत पु ल वर टीका करत . तशी ती तेंडूलकर यांनी पण केली होती 'लेखकराव ' हि नेमाडे यांनी प्रसिद्ध केलेली संकल्पना त्याना पु ल यांच्यावरूनच सुचली होती असे म्हणतात . पण वैक्तिक मला अस वाटत कि कुसुमाग्रज असो वा पुल नेमाडे यांची टीका वैयक्तिक नव्हती . जरी तशी ती सकृतदर्शनी दिसत असली तरी . तिला प्रस्थापित विरुद्ध नवे , आहे रे विरुद्ध नाही रे , ब्राम्हण सारस्वत विरुद्ध बहुजन असे अनेक larger dimension होते . नंतर नेमाडे स्वतःच प्रस्थापित लेखकराव बनले हा मुद्दा वेगळा .
9 Feb 2015 - 9:46 am | पिंपातला उंदीर
अवांतर - बाकी उचकापाचक करत असताना हे एक interesting प्रकरण सापडलं . लेखकांनी लेखकांच्या केलेल्या अपमानावर . भन्नाट आहे .
http://flavorwire.com/188138/the-30-harshest-author-on-author-insults-in...
9 Feb 2015 - 3:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
“बिढार” ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे."
" स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? " (चोप्य-पस्ते) दुवा ब्लॉग नेमाने नेमाडेवरुन साभार.
-दिलीप बिरुटे
9 Feb 2015 - 2:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार...!
-दिलीप बिरुटे
7 Feb 2015 - 10:29 pm | पाषाणभेद
हे जे काही आहे म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानपीठ वैगेरे वैगेरे ते मिळाल्यामुळे नेमाडेंचे अभिनंदन करतो.
एक माहीती हवी होती उदाहरणार्थ म्हणजे नेमाडे हे इंग्रजीचे प्राध्यापक होते ना?
8 Feb 2015 - 9:42 am | नांदेडीअन
खरंच जग खूप जवळ आलंय.
नेमाडेंना बोलवा ट्विटरवर.
8 Feb 2015 - 9:45 am | पिंपातला उंदीर
सन्दर्भ कळाला नाहि
8 Feb 2015 - 9:56 am | विकास
हा घ्या संदर्भ...
8 Feb 2015 - 10:24 am | पिंपातला उंदीर
धन्यवाद
8 Feb 2015 - 1:48 pm | आदूबाळ
आपले मत काहीही असो - पण नायपॉल, रश्दी यांच्यावर वैयक्तिक आगपाखड करणे अकारण आहे.
चिमुकल्या वॉशिंगटनच्या कुऱ्हाडीची आठवण झाली.
8 Feb 2015 - 2:44 pm | पिंपातला उंदीर
हा एक नवीन टेक या प्रकरणावर
http://ekregh.blogspot.in/2015/02/blog-post_8.html
8 Feb 2015 - 10:12 am | llपुण्याचे पेशवेll
एका मराठी माणसाला हे पारितोषिक मिळाल्याबद्दल आनंद वाटला. अडगळ वगैरे वाचून असे वाटले की ते पुस्तक वाचल्या न वाचल्याने तसाही काही फरक पडला नसता; त्यामुळे 'एका मराठी माणसाला' सोडता बाकी काहीच फरक पडला नाही.
8 Feb 2015 - 1:40 pm | माहितगार
मी कथा कादंबर्यांचा वाचक नसल्याने साहित्याबद्दल समीक्षेतूनच अधुन मधून माहिती घेत असतो. जनस्थान पुरस्कार मिळाल्या नंतरच्या नवशक्तीच्या या अग्रलेखात त्यांच्या साहित्यविषयक प्रतिभेला आमचा आक्षेप नाही किंवा साहित्यातील शिव्यांना आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप त्यांच्या चुकीच्या दंभस्फोटाबद्दल आणि औचित्याचे भान सुटण्यावर आहे. अशी टिका आली होती. हिंदू या कादंबरी बद्दल युनिक फिचर्सवर सुहास पळशीकरांचे समीक्षण आणि मायबोलीवरील साजिरा यांचे रसग्रहणातूनच बरीचशी माहिती मिळाली. भालेराव (अरुण अनंत?) यांचा नेमाने नेमाडे या नावाचा नेमाडेंवर नेमाने टिका करणारा एक ब्लॉगही आहे.
9 Feb 2015 - 4:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितगार, वेगवेगळ्या दुव्याबद्दल आभार...!
-दिलीप बिरुटे
10 Feb 2015 - 4:58 pm | एस
असेच म्हणतो.
बाकी माहितगार, आपण कृपया नेमाडेंच्या कादंबर्यांबद्दलची विकीपाने सुरू कराल का? एक कोसला सोडलं तर बाकीच्या कादंबर्यांबद्दल फारशी माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध नाही. (हाच धागा पुढे वाढवून मराठीतील वेगवेगळ्या साहित्यकृतींबद्दल विकिपीडियावर माहिती टाकली जावी अशी विनंती.)
8 Feb 2015 - 1:54 pm | चिगो
श्री. भालचंद्र नेमाडे ह्यांचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन..
8 Feb 2015 - 1:56 pm | सव्यसाची
नेमाडे यांनी सन्मान परत करावा या अर्थाचे विनय हर्डीकर यांचे पत्र आज लोकसत्ता मध्ये आहे.
विनय हर्डीकर यांनी याधीही नेमाडे यांच्यावर टीका केल्याचे आठवते आहे. लोकसत्ता मधेच वर्षभरापूर्वी लेख होता कि कोसला ला ५० वर्ष पूर्ण झाली त्यासंदर्भात.
कुणाला तो लेख मिळाला तर जरूर लिंक द्या.
8 Feb 2015 - 1:57 pm | सव्यसाची
वरचा प्रतिसाद जरा चुकलाच. ती लिंक टाकायची होती पण चुकून quote केले गेले.
8 Feb 2015 - 2:46 pm | पिंपातला उंदीर
बाकि नेमाडे यान्चा पण 'लेखक राव ' झाला आहेच
8 Feb 2015 - 3:16 pm | ईंद्रनिल
पांडुरंग सांगवीकर उवाच : तर भाऊ हे ज्ञानपिठ पुरस्कार म्हणजे काय अस तुम्ही विचाराल,तर ज्ञानपिठ पुरस्कार म्हणजे तत्कालिन सरकार कुणातरी वयस्कर लेखकाला एक बाहुली किंवा शाल आणि नारळ देऊन आता निवृत्त व्हा किंवा निजधामाला जा असा अप्रत्यक्ष आदेश देत असे त्याला ज्ञानपिठ पुरस्कार म्हणत असत.पण सरकार आणि लेखक म्हनजे काय तर चार एकमेकांना पाण्यात पहानारे दोन पक्षातील लोक एकत्र येऊन जनतेच्या भल्याचा देखावा करुन आपापले खिसे भरत अशा लोकांची टोळी आणि उदाहरणार्थ आमचीच टोळी कशी चांगली यावरुन भांडणाऱ्या लोकांना कार्यकर्ते म्हणत तसेच मराठी लेखक म्हणजे इतर भाषांतील अडगळितले साहित्य वाचुन स्वतःच्या नावावर खपवणारे लोक,हे लेखक लोक स्वतःच्या मुलांना ईंग्रजी भाषेतील शिक्षण देऊन परदेशी पैसा कमवायला पठवत आणि मराठी भाषा संपत चालल्याची हाकाटीही करत असा एक प्रवाद उदाहरणार्थ त्याकाळी होता.
त्या काळातील लोकांचे दुटप्पी वर्तन येथेच थांबत न्हवते त्या काळात नाचगाणे करणाऱ्या लोकांना फ़ार मान मिळत असे.हे नाच गाणे करणाऱ्या मुली किंगफ़िशर कॅलेंडर वर नग्न अवस्थेतील फ़ोटो छापवुन घेत,जाहिर कार्यक्रमात जननेद्रियांवर विनोद ऐकुन घेत आणि स्वतः करत पण त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे अर्ध अनावृत्त स्तन छापल्यावर स्त्रियांकडे वाईट दृष्टिने पहाता म्हणुन आरडाओरडा देखिल करत कारन पैसा नामक कागदी वस्तु बुडाली असे त्यांना वाटे.किंगफ़िशर कॅलेंडर म्हणजे काय तर भिंतिवर टांगायचा एक बारा पानी कागद,त्यावर मुलींचे फ़ोटो छापवुन घेण्याचा शौक तत्कालिन उद्योजकाला होता आणि त्या शौकात तो कर्जबाजारी झाला असे समजते.चित्रपट नामक गोष्टीत हे जे जे करत आणि दाखवत त्याच्या बरोबर उलट कृत्य हे प्रत्यक्ष जिवनात करत,असे लोक म्हणजे सिनेस्टार आणि याबद्दल लोक त्यांना डोक्यावर घेत.आपण करतोय ते भारतीय नावाच्या संस्कृतीत आधीपासुनच होते असे ते सांगत यासाठी ते खजुराहोचे पुरावे देत,उदाहरणार्थ आता खजुराहो म्हणजे काय तर नुकत्याच केलेल्या उत्खननातुन खजुराहो म्हणजे बियर नावाचे द्रव्य असलेली बाटली असे निष्पन्न झालेले आहे.
त्या काळात ’धर्मनिरपेक्ष"या शब्दावरुन खुप वादविवाद झाला होता असे कागदपत्रांवरुन समजते.धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे शोधन्यासाठी आम्ही आणखी दस्तावेज चाळले असता असा निष्कर्ष निघाला आहे की त्या काळातील लोक काळा,गोरा,पिवळा,असा शारीरिक भेद तर करतच पण कुणाचा देव मोठा आणि कुणाचा धर्म भारी यावरुन एकमेकांचे गळे कापत,या लोकांशिवाय जी जमात होती ती जमात म्हणजे "धर्मनिरपेक्ष".या जमातीचे लोक शाळेच्या दाखल्यावर "धर्मनिरपेक्ष"असे न लिहता स्वतःची जात लिहत किंवा स्वतःच्या घरातील पोराबाळिंचे विवाह स्वजातीतच लावत पण जाहिर चर्चांमधुन धर्मनिरपेक्षतेवर तावातावाने बोलत.याशिवाय विचारवंत नावाची देखिल जमात होती.उदाहरणार्थ बहुसंख्य लोक जे मत व्यक्त करत असत त्याच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना विचारवंत म्हणत.असे लोक कायम क्रिया न करता फ़क्त प्रतिक्रिया देत असत.याबद्दल त्यांना मोठा मान मिळे.विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष जमात यांनी त्या काळात मोठ्ठा गोंधळ उडवुन दिलेला होता असे समजते.
8 Feb 2015 - 10:58 pm | खटपट्या
बाबौ !!
8 Feb 2015 - 3:21 pm | पिंपातला उंदीर
भन्नाट. तुम्हि लिहिले आहे का?
8 Feb 2015 - 4:16 pm | ईंद्रनिल
प्रश्न भन्नाट नामक व्यक्तिला असल्यास उत्तर "नाही" असे आहे.
8 Feb 2015 - 3:25 pm | जयंत कुलकर्णी
.....ही जी मंडळी आहेत या सगळ्यांनी त्या काळात फ्रँझ काफ्काच्या दाट छायेखाली लेखन केले आहे. यात अजून एक लेखकाचे नाव जोडायचे असल्यास श्याम मनोहर आफळे....पण फ्रँझ काफ्काने माणसाच्या मनातील वैचारिक आंदोलनावर चांगले व सवीस्तर भाष्य करत कादंबर्या लिहिल्या तर या लोकांनी त्याच्या विचारांची भ्रष्ट नक्कल करत, जमतील तेवढ्या दगडावर पाय ठेवत, वैचारिक कोलांट्याउड्या मारत लेखन केले. बहुदा काफ्काच्या मेटामॉरफॉसिस मधील सेंटीपिडच्या अनेक तंगड्या यांनी उचलल्या असतील. जेवढ्या तंगड्या जास्त तेवढे जास्त दगड उपयोगात आणता येतात.....
"सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे."
जो माणूस असे लिहू शकतो त्याबद्दल एवढे लिहिणेही वेळेचा अपव्यय आहे पण......
Unfortunately this Gentlemans writing is not worth the honour...if he is gentleman in true sense...पण जसं मेल्यावर दुष्मनी संपुष्टात येते तसे ज्ञानपीठ मिळाल्यावर अभिनंदनही करावेच लागेल.......
अर्थात हे माझे मत आहे.........
8 Feb 2015 - 3:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
-दिलीप बिरुटे
8 Feb 2015 - 5:48 pm | अत्रन्गि पाउस
अस्तरदार, शब्दे, घोंगे , अभया थोपटे ....सुरेश ..बोगस call
असे पुल सॉरी क्लाउन चे लेखन आठवले
8 Feb 2015 - 10:13 pm | आदूबाळ
खरेक्ट. प्रस्तुत लेखातले प्रा. शब्दे हेच असावेत असा मला संशय होता. आज खात्री पटली :)
8 Feb 2015 - 4:18 pm | ईंद्रनिल
@ पिंपातला उंदिर
प्रश्न मला असल्यास उत्तर "हो"आहे.
प्रश्न भन्नाट नामक व्यक्तिला असल्यास उत्तर "नाही" असे आहे.
9 Feb 2015 - 1:07 am | चिरोटा
नेमाडे ह्यांचे अभिनंदन.
अवांतर-भारतिय भाषांतले प्रतिथयश लेखक (पारितोषिक मिळाल्या मिळाल्या!) इण्ग्रजी लेखकांवर टिका का करतात कळत नाही.सलमान रश्दी ह्यांच्या साहित्यकृतीत विशेष गुणवत्ता नाही हे कोसलाकारांना सांगायची गरज काय? रश्दी आवडोत न आवडोत, तेही एक मोठे लेखक आहेत हे मान्य करावे लागते व पुरस्कारांनी उंची मोजायची तर त्यांचीही उंची बरीच आहे.असो.
9 Feb 2015 - 10:55 am | विटेकर
वास्तविक नेमाडेंपेक्षा अधिक उजवे , परिणामकारक आणि वास्तवदर्शी लिहिणारे अनेक लेखक मराठीत होते , होऊन गेले...
पुलंच्या लेखनाचा मराठी सारस्वतावर आणि माणसांवर जो दिर्घकालीन परिणाम झाला तसा अन्य कोणत्याच लेखकाचा झाला नाही असे माझे नम्र मत आहे.
या इथेच मिपावर पुलंच्या लेखनातील कितीतरी संदर्भ सहजपणे येत असतात. आणि पुलंनी काय फक्त मध्यममार्गी गुडी गुडी लिहिले का ?
आणि असे अनेक लेखक मराठीत होऊन गेले जे ज्ञानपीठाचे खरे हक्कदार होते ...
गोनींदा , कुरुंदकर , दुर्गा भागवत, जयवंत दळवी ,श्री ना ...किती तरी !
ज्यामुळे माणसाच्या जगण्याच्या जाणीवा अधिक प्रगल्भ होतात, हे जग मी अधिक सुंदर करुन जाईन... असे मनापासून वाटायला लावते ते लेखन अधिक समृद्ध !
शेवटी पुरस्काराने काय होते ? लोकांच्या मनावर जो अधिराज्य गाजवतो तो खरा लेखक .. असे आमचे वैयक्तिक मत !
असो , नेमाड्यांचे (तरिसुद्धा) अभिनंदन !
9 Feb 2015 - 11:30 am | सामान्य वाचक
सहमत
9 Feb 2015 - 11:39 am | सविता००१
फक्त कोसला साठीच अभिनंदन
9 Feb 2015 - 12:40 pm | प्रचेतस
पूर्णपणे सहमत.
9 Feb 2015 - 3:12 pm | पिंपातला उंदीर
हा मासेस विरुद्ध क्लास झगडा सर्वच क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात चालू असतो . सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सलमान खान विरुद्ध नसीर किंवा अमिताभ विरुद्ध इरफान . जितका कलाकार मासेस मध्ये लोकप्रिय किंवा जनाश्रय जास्त तितका क्लास वर्ग त्याची हेटाळणी करतो. पुल किंवा वपु काळे यांच्या लेखनाला जितका जनाश्रय आहे त्याच्या निम्मा पण नेमाड्याना नाही (जरी त्यांची पुस्तक बर्यापैकी खपली असली तरी ). दोन्ही आपल्या जागी श्रेष्ठ आहेत . म्हणजे इंग्रजी साहित्याला जशी रश्दी यांची गरज आहे तशी चेतन भगत ची पण आहेच . नेमाडे याना कितीही पुरस्कार मिळाले तरी जनमानसात पुलंना जे स्थान आहे ते त्यांना कधीही मिळणार नाही . कितीही इतरांची लेखकराव म्हणून हेटाळणी केली तरी नेमाडे यांना हे माहित असेलच
9 Feb 2015 - 4:33 pm | जयंत कुलकर्णी
हे ही खरेच आहे म्हणा.........
10 Feb 2015 - 12:03 am | फारएन्ड
मुद्दा बरोबर आहे. पण अमिताभ चे उदाहरण अचूक नाही असे वाटते - कारण त्याचे स्थान क्लासेस व मासेस दोन्हीकडे त्याच्या ऐन भराच्या काळात होते. सलमान चे उदाहरण मासेस साठी व नासिर, इरफान चे क्लासेस साठी बरोबर आहे.
(बाकी अमिताभ ने प्रयोग केले नाहीत वगैरेबद्दल वाद नाही, पण 'मासेस' वाला म्हणून शिक्काही कधी नव्हता त्याच्यावर. किंबहुना आर्थिक स्तर, स्त्री-पुरूष, क्लासेस-मासेस यात कोणत्याही एका डायमेन्शन मधे लोकप्रियता न बसणारे अत्यंत दुर्मिळ स्टार्स आहेत त्यात तो आहे -हीरॉइन्स मधे रेखा व माधुरी असाव्यात)
10 Feb 2015 - 9:43 am | पिंपातला उंदीर
मान्य आहे फारएन्ड साहेब : )
9 Feb 2015 - 3:25 pm | बॅटमॅन
एका मराठी माणसाला ज्ञानपीठ मिळाले याचा आनंद आहे.
तदुपरि कोण नेमाडे? धन्यवाद.
9 Feb 2015 - 9:07 pm | श्रीगुरुजी
'कोसला' जवळपास ३० वर्षांपूर्वी वाचली होती. वाचून फारसा इंप्रेस झालो नव्हतो. हीच कादंबरी ६-७ वर्षांपूर्वी परत वाचली. दुसर्यांदा वाचल्यावरही कादंबरी साधारणच वाटली. 'हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ' अजून वाचलेली नाही. त्यामुळे पास.
नेमाड्यांना नक्की का ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले याची कल्पना नाही. असो. मराठी लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन!
10 Feb 2015 - 12:04 am | फारएन्ड
कोसला आवडली होती कॉलेज मधे असताना वाचली होती तेव्हा. नंतर अनेक वर्षांनी बिढार वाचू लागलो, पण कंटाळा आल्याने सोडून दिली. आता हिंदू वाचायची उत्सुकता आहे.
नेमाडेंचे अभिनंदन!
10 Feb 2015 - 1:23 am | अर्धवटराव
आणि त्याची ना खंत ना खेद उमटले महराष्ट्रात :(
10 Feb 2015 - 1:42 am | विकास
खूपच छान अग्रलेख! धन्यवाद!
10 Feb 2015 - 8:48 am | जयंत कुलकर्णी
जे पेराल तेच उगवणार ना ! नेमाड्यांनी इतर लेखकांबद्द्ल जे उद्गार काढले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी असे लिहिले तर आश्चर्य वाटायला नको..... :-)
10 Feb 2015 - 11:21 am | अर्धवटराव
:(
आणि म्हटलं तरी तो मराठी बाणाच आहे ( असं म्हणायची पद्धत आहे). रश्दि कुटल्या बाण्याचे ?
10 Feb 2015 - 5:05 pm | मृत्युन्जय
रश्दीनी अतिशय अश्लाघ्य आणि अनुचित भाषा वापरली. त्याबद्दल त्यांचा नक्कीच निषेध. पण नेमाड्यांन उगाच नसत्या वादाला तोंड फोडायला सांगितले कोणी होते?
10 Feb 2015 - 5:08 pm | पिशी अबोली
ज्ञानपीठाबद्दल नेमाडेंचे अभिनंदन.
पण ज्ञानपीठ मिळालं म्हणून वाट्टेल ती विधानं त्यांनी करावीत आणि ती लोकांनी डोक्यावर घ्यावीत हा प्रकार घडू नये.
असो. मराठी अस्मितेच्या अभिमान्यांना बर्याच छान छान गोष्टी पहायला मिळत आहेत/ मिळतील अशी हवा आहे एकूण.. हरकत नाही, पण ते 'माज आहे मराठी असण्याचा' वगैरे गोष्टी टाळून खरोखर मराठीचं संवर्धन व्हावं असं मनापासून वाटतं..
10 Feb 2015 - 7:52 pm | पैसा
नेमकं काय घडलं माहित नाही, पण परवा अचानक मराठी अभिजात भाषा म्हणून स्वीकारली गेली, शिवाय हे ज्ञानपीठ पारितोषिक. निदान काही लोकांना तरी अच्छे दिन आलेले दिसतात!
11 Feb 2015 - 8:55 am | विटेकर
तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे लघवी केली
आणि आपली उर्वरित वर्ष
त्यामुळे दर्याची उंची किती वाढली, ते मोजण्यात खर्ची घातली'
नम्र नेमाडेला नागवनारा नरम नुस्का ... ख़ास विन्दांचा
18 Feb 2015 - 5:13 pm | अत्रन्गि पाउस
यकदम सही !!
18 Feb 2015 - 6:19 pm | हाडक्या
हे असं पायजे.. ;)
(बादवे, हे वाचून दादा पवारांची आठवण येणारा मी एकलाच आहे का ? ;) )
11 Feb 2015 - 9:45 am | पिंपातला उंदीर
छान चर्चा झाली या निमित्ताने . सर्वाना धन्यवाद