आपल्याला शाळेत असताना प्रश्न विचारायचे, तु मोठेपणी काय होशिल? आपण पण सांगायचो, इंजीनिअर, डॉक्टर. बास एवढच माहिती. माझ्या एका मित्राने साइंटिस्ट असे सांगून देखण्या मॅडमची वाहवा मिळवली होती. आत तो आयटी मधे हमाल आहे. असो. मी नोकरी चालू केल्यापासून मला नेहमी एक प्रश्न पडत आलाय, मी माझ्या क्षेत्रात पुढे काय बनेन, मॅनेजर कि लिडर? कि दोन्ही? म्हणजे मी ऑन रोल मॅनेजर असेन पण माझ्या हाताखाली काम करणारे कर्मचारी मला काय समजतील? आता कितीही प्रयत्न केला तरी कोणी आदर्श (लोकप्रिय नव्हे) मॅनेजर बनू शकत नाही. मान्य. पण हा लिडर बनणे म्हणजे काय प्रकार असतो?
मॅनेजर आणि लिडर या तशा वेगवेगळ्या आणि विशिष्ट अर्थ असलेल्या संज्ञा आहेत. राजकारणातल्या किंवा सामाजिक कार्य करणार्या व्यक्तीला आपण मॅनेजर म्हणत नाही. तसेच एखादे मोठे हॉटेल चालवणार्या व्यक्तीस आपण लिडर म्हणणार नाही. देवाच्या नावावर माया गोळा करणार्यांचा देवाचे मॅनेजर म्हणून तिरस्कार करण्यात येतो. व्याख्येनुसार मॅनेजर हि अशी व्यक्ती असते जिच्याकडे काहि ठराविक कार्ये करुन घेण्याची जबाबदारी असते. हि कार्ये एकट्या व्यक्तीने करण्याजोगी नसतात आणि यासाठी मॅनेजरच्या हाताखाली काही कर्मचारि असतात. तसेच लिडर हि तिच्या क्षेत्रातली एक प्रभावशाली व्यक्ती असते जीच्या विचारांचे इतरांवर नियंत्रण असते आणि त्यांना काम करण्यास प्रवृत्त करू शकते.
परंतु क्षेत्र बदलते तसे यांचे अर्थ बदलतात, एकमेकात घुसडण्यात येतात. उदा. कार्पोरेट क्षेत्र, त्यातल्या त्यात भारतातील आयटी क्षेत्र. ईथे मॅनेजर पदाला पोहोचलेल्या व्यक्तीला सर्रास लिडर म्हणले जाते. त्यात कहर म्हणजे मॅनेजरच्या व्हायच्या आधिचा एक रोल असतो; काही कंपन्या त्याचे नामकरण करतात टिम लिडर. (एका कंपनीने हुशारी दाखवत याचे नाव 'टेक्नॉलॉजी लिडर' केले. काम तेच.) काही अपवाद वगळता हा रोल हरकाम्याचा जास्त असतो. म्हणजे मॅनेजर सांगेल तशी कामे करायची (स्वतःची आणि मॅनेजरची) आणि हाताखालच्या दोन चार लोकांना कामे वाटून द्यायची. मग हा लिडर काय झाला कप्पाळ! विचार करा, आजपर्यंत आपण ज्याच्या हाताखाली काम केले असा कुठला मॅनेजर लिडर वाटतो? या आयटी मधे तरी किती मॅनेजर आहेत कि जे प्रोजेक्ट बिलिंग, डेडलाईन्स आणि रिक्वायरमेंट च्या पलिकडे जाउन आपल्या कर्मचार्याला निदान करियरसाठी तरी मार्गदर्शन करतात? थोडक्यात अशा क्षेत्रातल्या मॅनेजरना लिडर म्हणणे म्हणजे एक विनोद आहे, किमान मधल्या फळीतल्या तरी!
आता काही मॅनेजमेंट गुरूंच्या मते सध्या कॉर्पोरेटमध्ये मॅनेजमेंट आणि लिडरशीप यांचा वेगवेगळा विचार करता येउच शकत नाही. असे असेल तर 'लिडिंग द प्रोजेक्ट' आणि 'मॅनेजिंग द प्रोजेक्ट' मधे काही फरक आहे कि नाही? मुळात 'लिडिंग द पिपल' असा लिडरचा आशय असताना 'लिडिंग द प्रोजेक्ट' हा नवा विचार जन्माला घातला आहे.
हा माणूस लिडर आहे. बर हा काय लिड करतो तर हा प्रोजेक्ट लिड करतो. म्हणजे नक्की काय करतो, तर हा प्रोजेक्ट सांभाळतो म्हणजेच मॅनेज करतो. अरे हा तर प्रोजेक्ट मॅनेजर आहे, गेला बाजार ह्याला त्या प्रोजेक्ट मधले लोक स्वतःचा लिडर समजतात का? नाही, उलट याला शिव्या घालत असतात. मग कसला डोंबलाचा लिडर? लिडरशीप हि गोष्ट आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्या म्हणण्यात नाही तर आपल्यासाठी जे लोक काम करत असतात त्यांच्या समजण्यात असते.
आता कंपनीच्या उच्च्पदस्थांना सर्रास लिडर म्हणले जाते कारण ते एखादा विभाग किंवा पुर्ण कंपनी सांभाळत अहं लिड करत असतात. भलेही लिडर म्हणवून घ्यायचे मुलभूत गुण त्यांच्यात असोत कि नसोत. म्हणजे त्यांच्यावरती कोणी मॅनेजर नाही म्हणून ते आपोआप लिडर होतात. आता हे बिरूद उच्च्पदापर्यंत मर्यादित न राहता हरकाम्या टिम लीड पर्यंत येउन पोहोचले आहे. काही पुरस्कार सोहळेही आहेत जिथे कॉर्पोरेट क्षेत्रातले 'लिडरशिप पुरस्कार' अशा उच्च्पदस्थांना देण्यात येतात ज्यांनी त्यांची कंपनी उत्तमरित्या चालवून दाखवलेली आहे. अशा पुरस्कारांसाठी निवडताना यांच्या ज्या 'लिडरशिप कॉलिटीज' विचारात घेण्यात येतात त्यायल्या किती लिडरशिप या सदरात मोडतात आणि किती मॅनेजमेंट या सदरात?
मॅनेजरची व्याख्या आहे तशीच आहे याबाबत कुणाचे दुमत नसेल. पण यामुळे लिडरच्या आता दोन व्याख्या तयार झाल्या आहेत. एक, ज्याच्या हाताखाली काही लोक काम करतात तो लिडर आणि दोन, जो यशस्वीरित्या कंपनीसाठी भरिव योगदान देतो तो त्यातल्या त्यात उत्तम लिडर.
प्रतिक्रिया
17 Jan 2015 - 3:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
चांगला मॅनेजर = जो कंपनीचे (आणि पर्यायाने स्वतःचे) भले साधू शकतो.
चांगला लिडर = जो मॅनेजर सांगतो ते काम त्याच्या हाताखालच्या मजूरांकडून करून घेऊ शकतो.
हुशार लिडर काही कालाने मॅनेजर बनतो... खाजगी क्षेत्रात त्याला मॅनेजर / एव्हिपी / व्हिपी / डायरेक्टर, इ नावे पडतात तर सार्वजनिक जीवनात त्याला कॉर्पोरेटर / स्टँडिंग कमिटिचा अध्यक्ष / मेयर / एमएलए / एमपी / मंत्री / सीएम / पीएम इ नावे आहेत.
एक महत्वाचा फरक...
वरच्या पदाकडे जाताना खाजगी क्षेत्रात स्वतःबरोबर कंपनीचे भले बघावे लागते...
याउलट सार्वज्ञिक क्षेत्रात स्वतःचे भले साधणे सर्वोच्च असते --- शहराचे / राज्याचे / देशाचे भले साधल्याचा आभास निर्माण केला तरी पुरे असते --- कधी कधी तर त्या आभासाचीही जरूरी नसते, फक्त काही लिडर आणि मजूर विरोधी आवाजाचा बंदोबस्त करायला ठेवले तरी पुरेसे असतात.
:) :(
17 Jan 2015 - 4:53 pm | जातवेद
तुमच्या प्रतिसादाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात तुम्ही लिडरचा बदललेला अर्थ विचारात घेतला आहे. एखादि संज्ञा परिस्थितीनुसार बदलायची झाली तरी त्यातल्या मुळ संकल्पना अबाधित रहाव्यात पण लिडरचा जो अर्थ घेतला जातोय त्यात मुळचे मुद्देच नाहित. तुम्ही दुसर्या भागात म्हणताय तेही बरोबर आहे ते वाईट लिडर म्हणा, पण तेही लिडरच आहेत. :)
17 Jan 2015 - 8:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझ्या प्रतिसादाच्या खालच्या दोन स्मायल्या पाहिल्यात तर ध्यानात येईल की मी पुस्तकी व्याख्या (आयडीयल्स) सांगितल्या नाहीत तर बहुसंख्य परिस्थितींतली वस्तुस्थिती सांगितली आहे. :)
(बाकी, आयडियल्स प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न करणे हा माझा छंद आणि व्यवसायाचा भाग आहे.)
17 Jan 2015 - 4:47 pm | सोत्रि
कंपन्यांमधल्या हुद्द्यांमुळे गल्लत होते आहे असे वाटते. लेख अंमळ फसला आहे.
लीडर हा निष्णात मॅनेजर असतो, पण मॅनेजर लीडर असेलच असे नाही.
मॅनेजर प्रकल्प किंवा कर्मचारी सांभाळतो म्हणजे त्यांच्याकडून ठरलेली कामे करून घेतो, तो टास्क मास्टर, टॅक्टीकल असतो. लीडर स्ट्रॅटेजीक असतो, कंपनीला किंवा कंपनीच्या एखाद्या विभागाला दिशा देण्याचे काम लीडर करतो. लीडर कंपनीत अजून लीडर तयार करतात.
कुठल्याही क्षेत्रात ह्या व्याख्या सेमच असतात.
-(लीडर) सोकाजी
17 Jan 2015 - 5:26 pm | जातवेद
म्हणजे कंपनीतल्या लिडरची संकल्पना अंमळ वेगळीच असती तर. प्रकल्पाला दिशा दाखवली म्हणून लिडर ठरतात. म्हणजे याचा मुळ लिडर व्याख्येशी फारसा संबंध नाही.
17 Jan 2015 - 8:20 pm | अत्रुप्त आत्मा
@लीडर हा निष्णात मॅनेजर असतो, पण मॅनेजर लीडर असेलच असे नाही.…>> +++++१११११
ठेकेदार हा (आधी) उत्तम हमाल असतो,पण हमाल ठेकेदार असेलच असे नाही!
असे आमच्या'त मी नेहमीच म्हणतो. ;-)
आत्मंभट्ट ठेकावाले! ;-)
17 Jan 2015 - 4:55 pm | स्पा
17 Jan 2015 - 5:09 pm | जातवेद
ते जरा आकसून घ्या कि. तो लिडर स्नेहांकिता तैंना ओढतोय असे दिसतय ईकडे :D
17 Jan 2015 - 5:12 pm | स्पा
स्व संपादन नसल्याने आमचा पास :D
18 Jan 2015 - 4:54 pm | सस्नेह
वरच्या फोटोत मी आहे ?
संभ्रमांकिता *blush*
18 Jan 2015 - 6:36 pm | जातवेद
तुम्ही तेव्हा हॉटेलात होता :)
17 Jan 2015 - 4:55 pm | स्पा
17 Jan 2015 - 5:30 pm | आरोह
लिडर हा स्ट्र्याटीजिस्ट असतो.तो कंपणीची ध्येय-धोरणे ठरवतो. माझ्या मते सर्व कंपण्याचे मालक हे लिडर असतात.
आणि म्यानेजर हा ती धोरणे अमलात आणतो.
17 Jan 2015 - 5:43 pm | जातवेद
फार उच्च्पदस्थ लोक लिडर असतिलही. पण ध्येय-धोरणे ठरवली म्हणून त्याला लिडर म्हणणे योग्य नाही, स्ट्र्याटीजिस्ट किंवा संचालक म्हणणे ठिक आहे.
17 Jan 2015 - 5:52 pm | सोत्रि
Managers have employees. Leaders win followers.
Managers react to change. Leaders create change.
Managers have good ideas. Leaders implement them.
Managers communicate. Leaders persuade.
Managers direct groups. Leaders create teams.
Managers try to be heroes. Leaders make heroes of everyone around them.
Managers take credit. Leaders take responsibility.
Managers are focused. Leaders create shared focus.
Managers exercise power over people. Leaders develop power with people.
ह्याने फरक समजण्यास मदत व्ह्यावी. आधि म्हतल्याप्रमाणे मुळ लेख जरा फसला आहे. संकल्पनांची गल्लत होते आहे हुद्द्यांबरोबर असेच अजुनही वातते आहे.
- (लीडर) सोकाजी
17 Jan 2015 - 5:56 pm | जातवेद
पण मधल्या फळीतल्या आणि त्यातल्या त्यात टिम लिड सारख्या लोकांना लिडर म्हणणे कितपत योग्य आहे?
17 Jan 2015 - 6:01 pm | सोत्रि
तेच म्हणतोय, तुम्ही कंपनीतले डेसिग्नेशन आणि संकल्पना यांच्यात गल्लत करत आहात. कंपन्यांमधले हुद्दे, खासकरून, आयटीमधले फारच फसवे असतात. मॉड्युल लीड, टीम लीड, टेक लीड हे सगळे च्युXX बनवायचे धंदे आहेत. त्याला काहीच अर्थ नसतो. नुसताच इगो कुरवाळणे असते ते.
- (लीडर) सोकाजी
17 Jan 2015 - 6:08 pm | जातवेद
पण या गोंधळामुळे विशेषतः आयटी मधे लिडर म्हणण्याचे सरसकटीकरण झाले आहे.
17 Jan 2015 - 5:45 pm | क्लिंटन
इसिलिए इंडिया मार खाता है :) या इंजिनिअरींग आणि डॉक्टरकीच्या शुक्लकाष्ठातून भारतीय विद्यार्थी (आणि मुख्य म्हणजे त्यांचे पालक) बाहेर पडतील तो सुदिन असेल.
17 Jan 2015 - 5:54 pm | सोत्रि
हा खरा कळीचा मुद्दा!
- (शुक्लकाष्ठातून बाहेर आलेला पालक) सोकाजी
17 Jan 2015 - 5:57 pm | जातवेद
गावाकडे अजुन हेच चालतं
19 Jan 2015 - 6:28 pm | बॅटमॅन
शहरातही काही दिवे लावत नाहीत. मेट्रो शहरांत तुलनेने जरा जास्त लोक वेगळ्या वाटा निवडतात इतकेच. गावाकडं काय आणि लहानमोठ्या शहरांत काय, दिव्याखाली अंधारच. अडाणचोट जनतेची नुस्ती गर्दी आहे सगळीकडे.
17 Jan 2015 - 6:39 pm | आजानुकर्ण
किंवा
ह. घ्या बरं का!
17 Jan 2015 - 7:01 pm | सुबोध खरे
अहो नावात काय आहे
आजकाल कोणालाही कितीही मोठे नाव असते
उदा फिल्ड सेल्स एक्झीक्युटीव्ह म्हणजे डोक्यावर पाटी घेऊन फिरणारा भाजी किंवा मासे विक्रेता
एक्झीक्युटीव्ह इन हॉस्पिटालिटी म्हणजे वाढपी
पहा --गोल्डमन सारख्या मोठ्या कंपनीत ४०% कर्मचारी उपाध्यक्ष( VICE PRESIDENT) पदावर आहेत म्हणजे तब्बल १२०००( बारा हजार)
http://news.efinancialcareers.com/uk-en/87814/goldman-has-12000-vps-and-...
कसला लीडर आणी कसला म्यानेजर
18 Jan 2015 - 5:54 am | संदीप डांगे
हायला…!
गावाकडे कुणी विचारलं तर ठसक्यात सांगावं "गोल्डमन चा व्ही पी आहे मी". आणि ऐकणाऱ्याने हा पेपर तोंडावर मारावा कि झाला इज्जत का फालुदा और मेहनत का भाजीपाला :-)
18 Jan 2015 - 9:26 am | क्लिंटन
फक्त असा पेपर फेकून मारणार्यांनी गोल्डमन सॅक्स आपल्याला किमान इंटरव्ह्यूला तरी बोलावेल याची खात्री केलेली बरी. नाहीतर इतरांच्या इज्जतचा फालुदा करायच्या नादात आपलेच वस्त्रहरण व्हायचे :)
20 Jan 2015 - 12:24 am | संदीप डांगे
गावाकडे असंच असते हो.
एकदा आमच्या गावाकडे गेलो होतो, आमच्या एका काकांनी विचारले, "काय चालू आहे मग? कुठे असतो, काय करतो?" मी म्हटले मी मुंबईत असतो, आयपीएल मध्ये डिझाईन हेड आहे. त्यावर काकांचे उत्तर, "मग त्यात काय एवढे मोठं. माझा मुलगा पण सुरतला रिलायंस मध्ये आहे". मी म्हटले काय करतो. म्हणाले "लिफ्टमन आहे."
18 Jan 2015 - 9:36 am | क्लिंटन
असे हुद्दे बरेच मिसलिडिंग असतात हे नक्कीच. मी पण एका खाजगी ब्यांकेत दोन वर्षात सिनिअर मॅनेजर झालो होतो. काही महिन्यांपूर्वी घरकर्जाच्या निमित्ताने अलाहाबाद ब्यांकेत बघितले तर तिथे सिनिअर मॅनेजर म्हणजे कर्ज मंजूर करायची पॉवर असलेला मोठा अधिकारी होता. मला तिथपर्यंत पोहोचायला माझ्या ब्यांकेत किमान १० ते १२ वर्षे लागली असती. :)
20 Jan 2015 - 8:54 pm | सोत्रि
आजच्या तीव्र स्पेर्धेच्या युगात ते रास्तच आहे! त्यात काही चुकीचे असावे असे वाटत नाही.
गोल्ड्मन कंपनीच्या पदावर टिप्पणी करण्यापुर्वी इन्व्हेस्टमेंट बँकाची कामाची पद्धत आणि पदांची उतरंड समजून घेतली असती तर १२०००( बारा हजार) VICE PRESIDENT का आणि कशासाठी ह्यामागची कारणमिमांसा कळली असती.
http://en.wikipedia.org/wiki/Vice_president ह्या लिन्कवर अधिक माहिती मिळू शकेल.
- (उपाध्यक्ष) सोकाजी
17 Jan 2015 - 7:29 pm | विजुभाऊ
स्टीफन कोव्हे म्हणतो तसे मॅनेजर हा मॅनेज करतो.
लीडर हा निर्णय घेतो. दिशा दाखवतो.
उदा तुम्ही एका जंगलातून मार्ग चालत आहात. मॅनेजर म्हणेल आम्ही "पुढे" चाललो आहोत. लीडर गरजे नुसार उंच झाडाव्र चढून योग्य दिशेचा अंदाज घेईल आणि गरज वाटली तर बाकीच्याना आपण चुकीच्या दिशेने "पुढे" जातोय दिशा बदलायला हवी असे सांगेल.
17 Jan 2015 - 8:11 pm | hitesh
डायरेक्टर
लीडर
ंयानेजर
सुपरवायजर
वर्कर
17 Jan 2015 - 10:35 pm | बोका-ए-आझम
पीटर सेंगे या मॅनेजमेंट गुरूने लर्निंग आॅर्गनायझेशन किंवा शिक्षणोत्सुक संस्थेची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार लीडरशिप ही परिस्थितीजन्य असू शकते. उदाहरणार्थ अमुक एका परिस्थितीत त्याविषयी सखोल ज्ञान असलेला माणूस हा लीडर होतो. आणि प्रत्येकाला प्रत्येकातलं कळतंच असं काही नसल्यामुळे प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळा लीडर असू शकतो.
18 Jan 2015 - 9:22 am | अत्रन्गि पाउस
ह्यांचे
हे भारतीय वातावरणात फार फार लागू पडते ...:D
18 Jan 2015 - 12:17 am | अभिदेश
तुमचे म्हणणे एकदम पटले . पण आपल्या I.T. कंपन्या मध्ये हि संकल्पना अतिशय चुकीच्या पद्धतीने राबवतात . वास्तविक लीडर चा रोल हा टीम ला मोटिवेट करून त्यांना उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करणे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे असते. त्यामुळे लीडर हा खूप महत्वाचा रोल आहे. परंतु I.T. कंपन्या मध्ये मॅनेजर ला जास्त महत्व दिले जाते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा कामावर परिणाम होतो.
18 Jan 2015 - 10:00 am | जातवेद
>> वास्तविक लीडर चा रोल हा टीम ला मोटिवेट करून त्यांना उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करणे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे असते.
हेच म्हणतोय, हे कुठल्या पातळीवर होताना दिसत नाही.
18 Jan 2015 - 1:04 am | चिरोटा
लीडर- ह्या शब्दात लीड-म्हणजे त्या व्यक्तीकडून नेतृत्वगुण अपेक्षित आहेत.टीम मधील लोकांना प्रोत्साहन देणे,स्वतःचे काम करत असताना त्यांना कामात मदत करणे, आहे त्या परिस्थितीत मार्ग काढून काम पूर्ण करणे हे पाहिले जाते.मॅनेजरकडूनही ही अपेक्षा असते पण.
टीम मधील एखाद्याने काम नीट नाही केले तर बुद्धिनिष्ठ मॅनेजर त्याच्याविरुद्ध तक्रार करेल."it's your job.not mine" म्हणेल व ते काम कदाचित दुसर्याला देइल.
लीडर हे काम का होत नाही आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करेल.त्या व्यक्तीबरोबर बसून्,ईतरांची मदत घेऊन ते काम पूर्ण होऊ शकते का ते बघेल.
बुद्ध्यांक व कष्टांचा जोरावर मॅनेजर होता येइल.लीडर होण्यासाठी ह्या गोष्टींबरोबर भावनांक(emotional intelligence) चांगला हवाच.
कंपनीत्,संस्थेत खूप वरची पदे म्हणजे तारेवरची कसरत असते.तेथे लीडर्,मॅनजरचे गुण अंगी बाणवावे लागतातच शिवाय दूरदृष्टी हा गुणही बाणवावा लागतो.
18 Jan 2015 - 3:01 am | hitesh
तात्पर्य : औरंगजेब हा कुशल म्यानेजर होता व शिवाजीराजे हे कुशल लीडर होते.
बरोबर का ?
18 Jan 2015 - 3:33 am | हाडक्या
आलमगीर औरंगजेब यांना "अरे तुरे" केल्याबद्दल (.)हितेश यांचा णिषेध ..!!
आमच्या भावना दुखवण्याचा तुम्हाला काय अधिकार..? }:->
18 Jan 2015 - 8:11 am | hitesh
मोघलकुलोत्पन्न महामहीम शहेनशाह आलमगीर औरंगजेब
18 Jan 2015 - 9:18 am | अत्रन्गि पाउस
श्री रा रा महा माहीम शहेनशाह आलमगीर औरंगजेब राव जी साहेब मोघल- (मौजे दिल्ली)
असे म्हणा ...
म्हणा बर !!!
18 Jan 2015 - 10:33 am | टवाळ कार्टा
खिक्क...."ह.भ.प. औरंगजेब" चालेल का?
18 Jan 2015 - 5:38 pm | हाडक्या
टका .. भावना दुखावणारी वक्तव्ये करु नयेत सांगून ठेवतोय. ( आज रविवार आहे. भरपूर वेळ पण आहे..) *aggressive*
18 Jan 2015 - 5:45 pm | टवाळ कार्टा
"ह.भ.प." वैट्ट आहे????
18 Jan 2015 - 6:07 pm | हाडक्या
आलमगीर जिकडे पहातात ते कधीच "भलतीकडे" असत नाही. तस्मात तुमचा कुजकट हेतू उघडकीस आला आहे. :)
18 Jan 2015 - 9:46 am | जातवेद
>> लीडर- ह्या शब्दात लीड-म्हणजे त्या व्यक्तीकडून नेतृत्वगुण अपेक्षित आहेत.टीम मधील लोकांना प्रोत्साहन देणे,स्वतःचे काम करत असताना त्यांना कामात मदत करणे, आहे त्या परिस्थितीत मार्ग काढून काम पूर्ण करणे हे पाहिले जाते
काहिंच्या मते कॉर्पोरेट मधे लिडरचा अर्थ कंपनीला दिशा देणारा किंवा पुढची ध्येय-धोरणे ठरवणारा असा आहे.
>> टीम मधील एखाद्याने काम नीट नाही केले तर बुद्धिनिष्ठ मॅनेजर त्याच्याविरुद्ध तक्रार करेल."it's your job.not mine" म्हणेल व ते काम कदाचित दुसर्याला देइल.
वास्तव मधे हे शक्य नसते कारण रिसोर्स बदलणे एवढे सोपे नाही. मग तो मॅनेजर पण गळ्याला पाणि आल्यावर लिडरचा आव आणातो :)
18 Jan 2015 - 1:46 pm | चिरोटा
सहमत. परिस्थिती ओळखून दिशा देणे,ध्येय-धोरणे ठरवणे ह्या गोष्टी 'गोल सेटिंग'मध्ये असतातच.
सहमत. पण मेनेजरमध्ये लीडरशीप असेल तर तो वेळीच रिसोर्समधील गुणवत्ता ओळखेल व त्याप्रमाणे काम त्याला देईल.लीडरशिप म्हणजे थोडीफार रिस्क्,जोखीम आलीच.
वालचंद ग्रूपचे संस्थापक वालचंद हिराचंद दोशी(१८८२-१९५३) ह्यांचे नाव लीडरशिपसाठी- विशेष करून गुणवत्तेची पारख करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.अभियांत्रीकीत विशेष ज्ञान नसतानाही ते अभियंत्यांच्या स्वतः मुलाखती घेत व कुठला अभियंता कुठल्या कामासाठी योग्य ह्याचे अचूक आखाडे ते बांधत.
एखाद्या मॅनेजरने जर राजिनामा दिला तर 'बरे झाले,ब्याद गेली' अशी प्रितिक्रिया टीममध्ये उमटली तर मॅनेजरमध्ये लीडर्शीपचे गुण म्हणावे तेवढे नाहीत असा अंदाज करता येईल.
बर्याचवेळ कंपनीतला एखादा उच्च अधिकारी राजिनामा देऊन दुसरीकडे जातो. काही महिन्यात तो आधीच्या कंपनीतल्या आपल्या विश्वासातल्या लोकांना नव्या कंपनीत बोलावतो. ही नक्कीच लीडरशिप असते.
अचूक
18 Jan 2015 - 6:52 pm | जातवेद
हे शेवटचे उदाहरण एका 'वि' ने चालू होण्यार्या आणि 'का' ने संपण्यार्या नावाच्या अधिकार्यासंदर्भात तर नाही ना? *ACUTE*
18 Jan 2015 - 9:19 pm | चिरोटा
ते सहज उदाहरण म्हणून दिले आहे.एखादी स्टार्ट अप पाहिलीत तर तसे अनेक वेळा दिसून येते.संस्थापक विश्वासातल्या लोकांना सुरुवातीच्या काळात 'पटवून' बोलावून घेतात.मोठी नोकरी सोडून अगदी ५/१० लोकांच्या स्टार्ट
अप मध्ये जाणे थोडे धोक्याचे असते.अशवेळी माणसांचे मनोबल उंचावून त्यांच्याकडून काम करून घेणे ह्यात लीडरशीपचा कस लागतो.
18 Jan 2015 - 9:20 am | अत्रन्गि पाउस
ह्या ऐवेजी ...कंत्राटदार, मुकादम आणि मजूर हि उतरंड कशी काय वाटते ??
19 Jan 2015 - 12:59 am | रेवती
वाचतीये. सोत्रींशी सहमत.
19 Jan 2015 - 4:01 pm | नाखु
एका कार्यशाळेत मॅनेजर चा अर्थ= मुकादम असाच ऐकला आहे.
वरच्याला "मुका"
खालच्याला "दम" *mosking* *JOKINGLY* 8P 8p
19 Jan 2015 - 5:18 pm | जातवेद
*lol*
19 Jan 2015 - 5:32 pm | रुस्तम
=))
19 Jan 2015 - 5:35 pm | शिद
=))
19 Jan 2015 - 6:06 pm | अनुप ढेरे
हा हा हा
=))
19 Jan 2015 - 6:30 pm | बॅटमॅन
अगागागागागा =)) =)) =))
धन्य =)) _/\_
20 Jan 2015 - 1:35 am | अनन्त अवधुत
फुटलो.__/\__
19 Jan 2015 - 5:39 pm | शिद