मी आणि ते

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
14 Jan 2015 - 1:15 pm

"ते" असतातच तुमच्या आजूबाजूला, लहानपणी माहित नसतं, हळू हळू मोठे होत जातो तसे त्यांची व्याप्ती लक्षात यायला लागते,तरीही तसा त्यांचा त्रास नसतो तुमचे शिक्षण पूर्ण होते,मग तुम्हाला नोकरी लागते.वय तिशी कडे झुकायला लागले कि तुमच्याच घरातले घात करतात, आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात.मग कधीही दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री ते तुम्हाला दर्शन द्य्याला लागतात,तुम्हाला त्यांच्यात ओढायचा त्यांचा बेत असतो,जणू तेच त्यांचे जीवितकार्य असते.साम दाम दंड भेद सगळे मार्ग अवलंबिले जातात.या मध्ये काही मध्यस्त आणि तुमचे नातेवाईक सुद्धा असतात,कुठूनही ते तुम्हाला शोधू शकतात,लपायचा काहीच चान्स नाही
अस्मादिक हि याला कसे अपवाद असतील.या वर्षीचा वाढदिवस साजरा झाला आणि मातोश्रींनी बॉम्ब टाकला चला, नावनोंदणी करून टाकू, जाहिरात करायला आता आम्ही मोकळे, बस झाले उंडारणे.माझ्या परवानगी सारख्या मामुली गोष्टीची अर्थातच त्यांना आवश्यक्यता वाटली नाहीच,काही दिवस शांत गेले आणि अचानक मला कुठल्या कुठल्या नंबर वरून फोन यायला लागले.ते "तेच" होते,भेटायचं म्हणत असायचे मी मेल वर पत्रिका पाठवा म्हणून कटवायचो
त्यातल्या त्यात माझे सुदैव असे कि घरी पत्रिका हा मुद्दा महत्वाचा असल्याने मी सुखी होतो, जल्ला एकही पत्रिका जुळायला मागत नसल्याने पुढचा काही त्रास नव्हता.
पण त्यांनी आक्रमणाचा जोर वाढवला आणि घरीही यायला लागले.काल काही समदुक्खी मित्र wats app वर गप्पा मारत असताना हा विषय निघाला, एक एक किस्से एवढे वाढत गेले,कि हे दुख्ख इथवर मर्यादित ण ठेवता सर्वदूर पसरले पाहिजे या मतावर सर्व आले
आखिर दर्द बाटनेसेही तो कम होता हे म्हणून हा प्रपंच

प्रसंग एक :- रात्री ९ च्या दरम्यान कसाबसा दमून भागून घरी आलो, "ते" बसलेले होते, पहिलाच अनुभव असल्याने मी आत जाऊन आईला विचारले कोण ब्वा हे.. मग समजले मुलीचे पिताश्री. बाहेर आलो वर पासून खालपर्यंत स्क्यान्निंग झालं. मग नमस्कार चमत्कार बाबांनी विचारलं मुलगी काय करते, बस्स इतकच विचारायची वाट बघत होते वाट्त ते , धाडधाड गोळीबार सुरु, मुलगी कुठल्या नर्सरीत शिकायची इथपासून सुरवात झाली...मध्येच ती दुसरीत मलेरिया मुळे सहामाही मध्ये मराठीत नापास झाली होती हि महत्वाची माहिती पण मिळाली
पोटात मरणाचे कावळे बोंबलत होते.तरी तसाच हां हु करत पुराण ऐकत होतो.शेवटी समजल कि ढोर मेहनत करून मुलीने मास्टर्स केले आहे IT मध्ये. घशाला कोरड पडली म्हणून पाणी प्यायला आत आलो, मागोमाग आई .. अरे भयंकर शिकलेली दिसतेय हि मुलगी तिला चालेल का पण , नाहीतर डॉक्टर , इंजिनिअर अशा अपेक्षा असतात हो मुलींच्या हल्ली, म्हटल मला काय विचारतेस, तुम्ही आणलाय न हे .. तुम्हीच विचारा, परत बाहेर आलो
समोरून स्तुतीसुमनांचा धबधबा कोसळतच होता, तरी तशीच तशीच हिम्मत करत चालत्या ट्रेन मध्ये चढलो,विचारलं नोकरी कुठे करते ? एखाद्या भिकार्याकडे बघतात तसं माझ्याकडे बघत म्हणाला, तिच्या प्रोफाईल ला सुट होईल असा जॉब आहेच कुठे मुंबईत, शोधतेय तरी
म्हटलं ओह, (अच्चा अच्च जाल तल - हे मनातल्या मनात) अजून २० मिनिटे पुराण ऐकवल्यावर त्याने तिचा बायो डेटा माझ्याकडे सरकवला, आई बाबांनी एव्हाना धीर सोडलेला होता, मी पण सहज नजर टाकली, शिक्षण: बी.कॉम ( सेकंड क्लास), tally, आणि आणि

MSCIT.

फुल हादरलो , MSCIT??????? (नाही रे नाही नसतं रे असं ... अरे ए .. सांगा रे कोणीतरी याला , पहिलीतली मुले पण देतात हि परीक्षा)
म्हटलं मास्टर्स कुठून केलं? तर म्हणाले इथूनच गजाजन काम्पुटर मधून घराखालीच आहे, सरकारी नोकरी आता अश्शी मिळेल.. दोन मिनिटे काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतो नंतर चेहऱ्यावर कुठलेच भाव येत नव्हते... हातपाय लटपटत होते त्यांना तसेच वंदन केले आणि कशीबशी त्यांची बोळवण केली. सुदैवाने नंतर पत्रिका जुळली नाही, आणि मी वाचलो

प्रसंग २ : काही दिवस शांततेत गेले आणि अजून एक वेगळे "ते" श्री. XXX असेच रविवार संध्याकाळचे घरी उगवले,नेमक्या एक काकू घरी येऊन बसल्या होत्या.मागचा अनुभव असल्याने मी सावरून बसलो आणि आधी बायो डेटा वर झडप मारून शिक्षण चेक केलं.हा ठीके आतापुढे
हे गृहस्थ मिस्टर बिन चा मराठी अवतार म्हणता येईल असे, नुसती चळवळ, आई बाबा हस्तायेत माझ्याकडे बघून. मी शक्य तेवढा मख्ख चेहरा ठेऊन थंडपणे बोलत होतो, मग हे साहेब आई बाबांना अहो आई , अहो बाबा म्हणायला लागले, आईंग म्हटल डायरेक्ट आई आणि बाबा ? आपण कुठे कामाला होतात म्हटल्यावर एकदम ताडकन उभेच राहिले, आणि शर्टात हात घालून काहीतरी शोधायला लागले, म्हटल आता हे काय, ५ मिनिटांनी त्यांना त्यांचे ओळखपत्र सापडले, साहेब रेल्वेत होते.आता रिटायर. मग म्हणे मला AC टून प्रवास असतो,
तेही मोफत आहात कुठे ?
मी :हँ,हँ.. हो का ? मस्तच
ते : मग,आणि मी कोणाला अजून एकाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण मोफतच,बाबांना फिरवेन मी मस्त.काय बाबा याचं लग्न झालं कि आपण दोघे मोकळेच कि (मायला याच्या कुठे पोचला हा),बाबांनाच असं नाही हा तुम्हाला पण अख्खा भारत फिर्वेन मी.
मी : (ए नको रे नको असं बोलू, कंट्रोल जातोय माझा,तोंडावर हसेन मग मी येड्यासारखा,बरे दिसेल का ते) आ ?
ते: : म्हणजे कोणीही एक चालतो. पुरूषच पाहिजे असं काही नाही, उद्या समजा या काकूंना पण मी घेऊन जैन (तोवर काकू ताडकन ..ऑ नको नको.. काहीतरीच आपलं,असं काहीसे घशातून विचित्र आवाज काढत बरळत उठून चपला घालायला लागल्या, आई आत पळाली ती शेवटपर्यंत बाहेर आलीच नाही) म्हणजे माझी हि बहिण आहे असे सांगीन हो मी, तात्पर्य काय कि आता ट्रेन ची चिंता नाही
मी : ण हसल्याने आतडी पीळवटली गेली होती, काकू पसार झालेल्या होत्या, मी आणि बाबा दोघे आता खिंड लढवत होतो.
ते: मी काय म्हणतो जावाय बापू (संपलोच), आता नेमके आपण किती जवळ राहतो, रात्री कधीही जेवायला आलात तरी तुम्ही दोघे ५ मिनिटात घरी, सगळे आपण एकत्रच म्हणजे ( मेलो मेलो )
मी : काका, अहो एवढा पुढचा विचार नको हो, आधी पत्रिका तर जुळून दे.
ते: ती जुळली आहेच मी आधीच दाखवली आहे, आता कशाला वेळ घालवायचा, पटापट पुढच्या गोष्टी बोलायला लागू या, आणि मुलगी तुला आवडेलच प्रश्नच नाही, मी सांगतो ना. काय बाबा ? (वारलो)
हे ऐकून उरले सुरले त्राण गेले, पुढचे काहिच ऐकू आले अहि बहुधा नातवंडांची नावे काय ठेवायची यावर चर्चा सुरु होती, मी शुद्धीत आलो तेंव्हा ते गेलेले होते. घर शांत होतं

प्रसंग ३ : या तडाख्यातून सावरायला वेळ लागला, आता घरी मी नसताना कोणालाही बोलवायचं असेल तर बोलवा हे डील मी फायनल केलं
एका शुक्रवारी मी ऑफिस मध्ये असताना मातोश्रींनी फोन केला, अरे ऐक ना, एक श्री XXXX म्हणून आहेत त्यांनी फोन केलेला, ते तुला भेटायचं म्हणत आहेत आज,सोबत पत्रिका नी फोटो घेऊन येतील, तर त्यांना भेटून घे ओके? तुझा नंबर दिलाय मी त्यांना. मी काही बोलायच्या आत अर्थात फोन ठेवला गेला. चायला विकेंड चा एकतर मी कसंही ऑफिस ला जातो , थ्री फोर्थ आणि वर टी शर्ट, आजच यायचं होतं काय.आणि मागचे अनुभव बघता मला कल्पनेनेच घाम फुटायला लागला, आता तर मी एकटा होतो, होम ग्रौन्ड पण नव्हतं. कामातले लक्ष उडाले, साधारण १२ ला त्यांचा फोन आला. मी पत्ता सांगितला, ऑफिस च्या बाजूला CCD मध्ये भेटायचे ठरले.बोलण्यावरून तरी तो माणूस बरंच शांत वाटला, जरा धीर आला. २ ची वेळ ठरलेली, ३ वाजले तरी पत्ता नाही, म्हटल चला बराय वाचलो हे महाशय काही येत नाहीत आता, तेवढ्यात फोन वाजलाच, ते आलेले होते, मीपण निघालो CCD त. २ कॉफी ऑर्डर केल्या आणि बसलो, परत सेम नमस्कार चमत्कार, स्वतःची ओळख वेग्रे. माणूस एकदम शांत होता प्रश्नच नाही.मी मुलीबद्दल विचारले, तर त्याने पिशवीतून एक जाडजूड फाईल काढली ( मी घाबरलो म्हटल हिची सर्तीफिकेत्स आणली कि काय ह्याने पहिलीपासूनची)
ते : मी xxxx,सर्प मित्र आहे
मी : अरे वा
ते : होय १९६५ पासून वयाच्या १५ व्या वर्षीपासून मी साप पकडतो, ( फाईल उघडून - त्यात वर्तमान पत्रांची कात्रणे चिकटवलेली होती) हे १९७० पासून पेपरात माझी नावे यायला लागली. (मायला हा लग्नाचा अल्बम दाखवतो तसा मला एक एक पान दाखवत होता , नको रे ए नको न प्लीज्ज )
साधारण अर्ध्या तासानंतर अर्ध पुस्तक संपलं
ते: अशी पटापट पाने नका उलटू , तुम्हाला समजणार नाही मग, एक एक बातमी नीट वाचा, आता वेळ काढून आलाच आहात म्हणून सांगतोय , नाहीतर हल्लीच्या तरुण मुलांना जर्रा म्हणून वेळ नसतो, हा बघा मी हिमाचल मध्ये पण एक साप पकडलेला, तिकडच्या पेप्रातली बातमी. नंतर हॉटेल वाल्याने मला कुरियर केला पेपर,अशी दयाळू माणसे असतात
मी : मुलगी काय करते ?
ते : हा तर त्यानंतर मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णपणे यात उतरलो ( अरे ए .. मे क्या बोल रहा हु, तू क्या बोल रहा हे , मी तेरी मुलगी के बारे मे पुच रहा हु णा)नोकरी महत्वाची कि साप पकडणे ? सांगा पाहू ?
अजून साधारण पंधरा मिनिटांनी
मी : पत्रिका आणि फोटो मागितलेला आईने आणलाय का ?
ते: हल्ली सर्प मित्र उरलेत कुठे पण , माझं पण वय झालाय आता, मी अजून एक पण काम करतो , समाजसेवा म्हणता येईल, अंधांसाठी मी ब्रेल लिपीत पुस्तके लिहितो, हि बघा (पोतडीतून त्यांनी अजून काही जाडजूड पुस्तके काढली, अता मला काय घंटा कळणारे त्यातले साहेब माझा हात हातात घेऊन त्या पुस्तकावर ठेऊन मला सांगत होते हे बघा हि ब्रेल लीपी (काय सांगताय काय? हाव च्वित) इकडे ऑफिस मधून फोन वर फोन पोरगा गायब झाला कुठे
पुढील बराच वेळ मग अंध, ब्रेल लिपी आणि समाजसेवा यावर गेला
मी: पत्रिका देताय णा
ते : देतो हो त्या आधी मी एक गम्मत आणलीये , तुमच्या साठी नवीन असेल, मला उशीर का झाला याचे कारण
मी : ??? (अजून एक काळी पिशवी टेबलावर आली)
ते : तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला, चेंबूर BARC भागात मध्ये धामण दिसलीये, मग आधी तिकडे गेलो, (

तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली, आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती

)
मग पकडली आणि आणली इथे आता इथून येऊर ला जाणार आणि सोडणार, हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते, माझी बोबडी वळलेली होती, माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करत होते, ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती.
मी: काका अहो नको लोक बघतायेत आपण निघुयात आता, नंतर केंव्हातरी मी येईन साप पकडायला,(तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली, आधीच एकतर हुच्च्च लोकस पुढे काय झाले असेल , कल्पना करा लिहित बसत नाही)
आता मला त्या CCD मध्ये घेत नाहीत :(

त्या मुली बद्दल काहीही समजले नाही, पत्रिका नंतर त्यांनी मेल केली, ती अर्थातच जुळली नाही
आता पुढचा धक्का कधी बसणारे या विचारात दिवस काढतोय,
बापू म्हणतात बेटा ये तो ट्रेलर हे ,पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त!!!!!

-धक्क्याला लागलेला (स्पा )

बालकथाप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 9:29 pm | टवाळ कार्टा

नुस्ते नगाला नग असून चालत नाही

नाखु's picture

15 Jan 2015 - 8:56 am | नाखु

शिवाय गेल्या १०-१२ वर्षात मुलींच्या अपेक्षा ( अर्थात तिच्या आडून आई-बापांच्या) महागाई निर्देशांकापेक्षा १० पटीने वाढल्यात हे नजरेआड केले जाते. =-O =O =-o =0 O_O O_o o_O O_0 o_0 0_O 0_o
स्पा ने जरा जहाल शब्दात सांगीतले इतकेच.
बाकी लेखावरील प्रतिक्रियाही मासलेवाईक आहेतच.

काय रे हे संकट ! बाबाबाबाबा !

साप्प्पाचा सीन बाकी सुम्साट झाला असणार. तुझ्या तोंडून संस्कृत भाषा नाय काय निघाली त्या व्यक्तीने साप काढल्यावर? म्हणजे मॉडिफाइड संभाषण असं झालं असतं.....

मी: पत्रिका देताय णा
ते : देतो हो त्या आधी मी एक गम्मत आणलीये , तुमच्या साठी नवीन असेल, मला उशीर का झाला याचे कारण
मी : आयच्या गावात हे काय??? (अजून एक काळी पिशवी टेबलावर आली)
ते : तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला, चेंबूर BARC भागात मध्ये धामण दिसलीये, मग आधी तिकडे गेलो, (तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली, आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती)
मग पकडली आणि आणली इथे आता इथून येऊर ला जाणार आणि सोडणार, हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते, माझी बोबडी वळलेली होती, माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करत होते, ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती.
मी: काका अहो नको लोक बघतायेत आपण निघुयात आता, नंतर केंव्हातरी मी येईन साप पकडायला,
ते: अरे बघून तर घे रे
मी: अहो..... (चायला) (अपने रंग मे आते हुए) अरे ए बाबा! आवर ना; इथे फाटलीय माझी ! नीट सांगतोय ना नको म्हणूण???? तू आणि तुझा साप दोघेही निघा इथून !

(तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली,
मी: अरे ए....वेडझव्या ! (मोठ्याने पब्लिक ला उद्देशून) मी यांना ओळखत नाही (हे म्हणता म्हणताच CCD बाहेर धूम ठोकत)

वेल्लाभट's picture

14 Jan 2015 - 5:58 pm | वेल्लाभट

तो सापाचा किस्सा वाचताना आणि हसताना सहज सुचलेली गंमत लिहिली आहे वर. कुणाचा अपमान, हेटाळणी इत्यादी करण्याचा हेतू, इच्छा, प्रवृत्ती नाही. पुढचे प्रतिसाद वाचून आधीच सांगावं म्हटलं.

आतिवास's picture

14 Jan 2015 - 4:21 pm | आतिवास

:-)

शैलेन्द्र's picture

14 Jan 2015 - 4:31 pm | शैलेन्द्र

भन्नाट...

अजुनही असे बरेच अनुभव येतील.. त्याआधीच फडके रोड जवळ करावा..

ब़जरबट्टू's picture

14 Jan 2015 - 4:45 pm | ब़जरबट्टू

कहर... :)

जबराट आहेत एकेक किस्से... :))

विनोदी लेखन म्हणून छान आहे.

वधुपिते प्रामाणिकपणे आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी सांगत असतात आणि त्यावर काम होईल असे त्यांना सारखे वाटत असते तेव्हा हेटाळणी नको असे माझेही मत आहे.
(फक्त हातभर फाटली हा वाकप्रचार काढ).

मराठी_माणूस's picture

14 Jan 2015 - 5:34 pm | मराठी_माणूस

हेटाळणी नको

सहमत.

बॅटमॅन's picture

14 Jan 2015 - 5:49 pm | बॅटमॅन

च्यायला वधूपित्यांचा तो प्रामाणिकपणा आणि समोरच्यांना काय भावभावना नाहीत का? हे बरंय आपलं.

तदुपरि साध्या साध्या वाक्प्रचाराने कित्ती त्रास व्हावा हेही बाकी रोचक आहे.

स्पा's picture

14 Jan 2015 - 5:51 pm | स्पा

चालायचचं

मनीच्या बाता :- अशा वादांनी धाग्याची वेगळी पब्लिसिटी होऊन तो सुखरूप १०० री पार जाईल :)

संमं चाप लावेपर्यंत पायजे तितके प्रतिसाद पाडू आपण, हाकानाका. बाकी सदस्यांनीही हे अनावृत पत्र समजावे पायजे तर. ;)

Pain6's picture

15 Jan 2015 - 2:10 pm | Pain6

सहमत

वधुपिते प्रामाणिकपणे आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी सांगत असतात

फक्त चांगल्या'च' सांगत असतात. त्या ऐकून एखादा गळाला लागला की नंतर नाण्याची दुसरी बाजू आपोआप समजते, पण तोवर उशीर झालेला असतो.

आठवला म्हणून एक किस्सा सांगतो. मुलगी साध्या घरातली साध्या घरातली म्हणून नात्यात एक लग्न झालं. सहा सात महीने झाले असतील, रात्री सगळेजण जेवायला बसले असताना नव्या सूनबाई दाताखाली काहीतरी आलं म्हणून पानावरुन उठल्या. समोरच्या दातांपैकी एक दात तुटून हातात आला होता. नंतर कळलं की मुलीला तो आर्टिफिशिअल बसवला होता.
दुसर्‍यादिवशी सकाळी सकाळी मुलीला घेऊन मुलगा तिच्या मुंबईच्या डेंटिस्टकडे गेला.

न राहवून मुलाची आई म्हणाली की हे का नव्हतं सांगितलं आधी, भांडण वाढू नये म्हणून 'तुला मुलगी असती आणि तिचं असं झालं असतं तर काय केलं असतंस' असं आईला विचारुन वेळ मारुन नेली.

अर्थात मुलांच्या बाबतीतही लपवाछपवीचे किस्से घडत असतील. पण वरच्या प्रतिसादात वधूपित्यांचा कळवळा आलेला दिसला म्हणून हा लेखनप्रपंच!!

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 9:30 pm | टवाळ कार्टा

१ दात नसणे हे नाही सांगितले तर आजच्या जगात काही बिघडते का?

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 10:51 am | बॅटमॅन

गंडवागंडवी होतेच, पण ही गोष्ट न सांगण्याने फार मोठी फसवणूक झाली असे वाटत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 3:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

जास्त/कमी बिघडण्या न बिघडण्यापेक्षा जास्त हा प्रश्न प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणाचा आहे.

जर इतकी 'न बिघडणारी आणि नंतर सहज पकडली जाऊ शकते अशी' गोष्ट लपवली तर मग 'अधिक गंभीर' गोष्टींबद्दल संशय निर्माण होतो.

कोणतेही संबंध, आणि विशेषतः वैवाहिक संबंध, 'प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा' यावर प्रस्थापित झाले आणि त्याच पायावर पुढे चालू राहिले तरच खरोखरीने सबळ व आनंददायक राहतात.

सूड's picture

15 Jan 2015 - 7:39 pm | सूड

जर इतकी 'न बिघडणारी आणि नंतर सहज पकडली जाऊ शकते अशी' गोष्ट लपवली तर मग 'अधिक गंभीर' गोष्टींबद्दल संशय निर्माण होतो.

अगदी!!

हाडक्या's picture

15 Jan 2015 - 7:36 pm | हाडक्या

टका, अतिशय सहमत..
अगदी अगदी.!!

असेच आमच्या मित्राच्या बाबतीत झाले होते. त्याचा एक दात कृत्रिम होता. बायको त्याला म्हणे, लग्नाआधी इतक्या गप्पा मारल्या तेव्हा हे का नाही सांगितले ? कित्ती तरी दिवस समजूत काढत होता तिची (अजून काहीही लपवले नाहीय म्हणून. ;) )

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2015 - 9:27 pm | टवाळ कार्टा

खिक्क...मला पटकन जोईचा फ्रेंडस मधला "१००% नॅचरल" वाला किस्सा आठवला ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jan 2015 - 5:37 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! एकदम जंक्शान! =))

असंका's picture

14 Jan 2015 - 5:39 pm | असंका

@ प्रसाद१९७१

संपूर्ण सहमत. हा लेख वाचून एक दोन नावं आठवली. आणि तेही आमची अशीच चेष्टा करत असतील का आपल्या वर्तुळात, या कल्पनेने संतापाने अंगाला थरथर सुटली आहे. ती थांबायला तयार नाही. हे प्रसंग अत्यंत खासगी रहावे अशी अपेक्षा होती.

मी वहावत जात असेल कदाचित... पण हा लेख आणि त्यावर हसून प्रतिसाद देणारे आपण सगळेच महान आहात.

लग्नाचे पाणी चाखायचे शक्यतो टाळावे. आपल्यातला 'स्पा'र्क विझतो. मग एकदा का इकडे 'आणा' चालू झाले की तिकडे मित्रमंडळीत आपला उल्लेख 'नाना' असा होऊ लागतो. ;-) बॅच्लरपणाचा टॅग चिकटलाय तोपर्यंत काय हुंदडायचे ते हुंदडून घ्यावे. नंतर टाळ कुटायचेच असतात! :-) (अनुभवी लोकांना ह्या 'संज्ञा' लगेच समजतील! :-D)

मित्रमंडळीत लग्नात ढोग साईडला नंबर असला की ह्या हुंदाडण्याचाही कंटाळा येतो. ;)

मुक्त विहारि's picture

14 Jan 2015 - 5:56 pm | मुक्त विहारि

पण.....

सध्या मुलांची स्थिती फार बिकट आहे.

हे हसरे चेहरे कुठुन कॉपी करायचे जरा मदत करा.

प्रचेतस's picture

14 Jan 2015 - 6:19 pm | प्रचेतस

=))

प्रचेतस's picture

14 Jan 2015 - 6:20 pm | प्रचेतस

=))

कवितानागेश's picture

14 Jan 2015 - 6:38 pm | कवितानागेश

मला वाटले पूर्वीचे ' ते' परत आले.
जास्त भितीदायक कोण आहेत रे?

सखी's picture

14 Jan 2015 - 6:46 pm | सखी

भारी किस्से! मेले हसुन ऑफीसमध्ये! क्रमशः विसरले असेल लिहायचं अशी आशा आहे.

पैसा's picture

14 Jan 2015 - 6:54 pm | पैसा

भारी किस्से! मंडळीला जरा वाईट वाटलेलं दिसतंय, पण या गंमती स्वभाव आणि वागण्यातून प्रसंगातून तयार होतात. अगदी जुनं ठकीचं लग्न किंवा चिमणरावाच्या बहिणीचे लग्न जुळवायच्या हकीकती आठवा बघू!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jan 2015 - 7:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

इतक्या अनुभवांनंतरही लेख लिहिण्याएवढी विनोदबुद्धी शिल्लक आहे म्हणजे अजून काही अनुभव लिहून येण्याची शक्यता वाढली आहे... क्रमशः अ‍ॅडवायचं काय ? +D

गौरी लेले's picture

14 Jan 2015 - 7:34 pm | गौरी लेले

वर म्हणल्या प्रमाने विनोद म्हणून ठीक ठाक लेखन .

ह्या निमित्ताने नाचता येइना अंगन वाकडे आणि कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या डॉडॉ दोन म्हणी आठवल्या :)

स्पा's picture

14 Jan 2015 - 7:48 pm | स्पा

लेले म्याडम

- स्पा कोल्हे

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2015 - 9:24 pm | अत्रुप्त आत्मा

@स्पा कोल्हे >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif
आला आला पांडु आला,सं'क्रांतीला आंबट बोलिला!http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

आनन्दिता's picture

15 Jan 2015 - 1:03 am | आनन्दिता

- स्पा कोल्हे

=))

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 3:58 pm | बॅटमॅन

खी खी खी =)) =)) =))

निमिष ध.'s picture

14 Jan 2015 - 7:48 pm | निमिष ध.

मला वाटलं स्पाला पुन्हा एकदा ते भेटले की काय पण इकडे हॉररच्या ऐवजी ह्युमर निघाला! मस्त लेख. :biggrin:

सुबोध खरे's picture

14 Jan 2015 - 8:48 pm | सुबोध खरे

वा स्पा
छान लिहिले आहेस. असे अनुभव मलाही आले होते २२ वर्षापूर्वी.
मुलीचा बाप मी पण आहे. सामाजिक प्रश्न हा विनोदी माध्यमाने दाखविला तर तो वैयक्तिकपणे घेऊ नये असे मला वाटते.
बाकी मूवी -- मला मुलगा पण आहे तेंव्हा मी सुखात आहे कि दुःखात असायला पाहिजे तेच कळत नाही.

अवांतर-- एका वधुवर सूचक मंडळाचे ब्रीद वाक्य --
सर्वत्र प्रेमिकः सन्तु
सर्वे सन्तु प्रियामयः
सर्वे लग्नानी कुर्वन्तु
मा कश्चिद ब्रम्हचारीणः
(संस्कृतची चूक भूल द्यावी घ्यावी)

आज लेख टाकतो...

प्रसाद गोडबोले's picture

15 Jan 2015 - 12:16 am | प्रसाद गोडबोले

असे अनुभव मलाही आले होते २२ वर्षापूर्वी.

"मी बोटीवर होतो तेव्हा ...." हे लिहायचे राहुन गेले की काय सर ? =)

सुबोध खरे's picture

15 Jan 2015 - 9:22 am | सुबोध खरे

प्र गो साहेब
बोटीवर नव्हतो. चांगला पुण्यात ए एफ एम सी ला एम डी रेडियोलॉजी करत होतो. बोटीवर म्हटल्यावर परत कुणा मुलीच्या बापाचा पापड मोडायचा.

स्पा's picture

15 Jan 2015 - 10:18 am | स्पा

सामाजिक प्रश्न हा विनोदी माध्यमाने दाखविला तर तो वैयक्तिकपणे घेऊ नये असे मला वाटते

काही लोकांना हे समजेल तो सुदिन

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 9:28 pm | टवाळ कार्टा

अजून १०० झाले नाहित?

मझे कांद्यापोह्यांचे अनुभव जरा भीषणच आहेत मग..

- पिंगू

प्रसाद गोडबोले's picture

15 Jan 2015 - 12:33 am | प्रसाद गोडबोले

=))

भारी लिहिलय स्पावड्या =))

आमचा अणुभव आठवला ह्या वरुन =

मी- माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे , मला तिच्याशी लग्न करायचे आहे . फक्त मला सेटल व्हायला थोडा वेळ पाहिजे
ते - असं का ... बरं बरं .

दुसर्‍या दिवशी "ते" आमच्या घरी येवुन.

ते - ओ , तुमच्या पोराचं आमच्या मुलीवर प्रेम आहे , आता लग्न केलेच पाहिजे लवकरात लवकर , डिसेंबर नंतर मुहुर्त नाहीयेत , आणि आत्ता लग्न केले नाही तर हा मुलगा परत लग्नाच्या भानगडीत पडणार नाही असं आमच्या गुरंनी पत्रिका बघुन सांगितलय , आता लग्न केलेच पाहिजे ताबडतोब...

ह्या त्यांनी केलेला तमाशा इतका फुल्ल फिल्मी होता की शब्दात वर्णन करण अशक्य आहे , एकाच वेळी भीती पॅनिक , राग आणि आनंद आणि अशा अनेक भावनांचे मिश्रण होते त्यांच्या स्वरात . ( लपवायचे काय , तो तमाशा पाहुन माझ्या घरातील काही व्यक्तींनी 'तु काही "घोळ" तर करुन बसला नाहीयेस ना रे ?' असे स्पष्ट विचारले होते मला *blush* :-\ )

अखेर डिसेबरात लग्न झाले . *dash1* पण सध्या भावाच्या लग्नाचे बघत आहेत त्यात पोरींच्या अपेक्षा पाहुन झाले ते बरेच झाले असे वाटते *pleasantry* नाहीतर पत्रिका नाही पण ह्या कारणाने गुरुंचे भविष्य नक्की खरे झाले असते *blum3*

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jan 2015 - 3:13 am | निनाद मुक्काम प...

तुमच्या सासरची मंडळी मिपावर नसावीत म्हणूनच एवढे प्रांजळपणे आपला व्यक्तिगत अनुभव कथन केलात

प्रसाद गोडबोले's picture

15 Jan 2015 - 9:29 am | प्रसाद गोडबोले

तुमच्या सासरची मंडळी मिपावर नसावीत

हो . हे ही खरच आहे म्हणा . मिपावर सासरची नाहीत अन बायकोही नाही (बायको मागे लागलीये की मला मिपावर अकाउंट काढुन दे म्हणुन ... मी म्हणालोय की तुला माझा डु आय्डी समजुन तुझे अकाउंट अप्प्रोव होणार नाही *biggrin* )

Pain6's picture

15 Jan 2015 - 2:13 pm | Pain6

म्ह्णजे अजून एक माई - नानांची जोडी ;)

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2015 - 3:21 pm | टवाळ कार्टा

मग ते लिहितील .... आमची "हि" म्हणते
:)

घरातील काही व्यक्तींनी 'तु काही "घोळ" तर करुन बसला नाहीयेस ना रे ?' असे स्पष्ट विचारले होते मला

अगागा =)) =))

नंदन's picture

15 Jan 2015 - 1:53 am | नंदन

जबरदस्त!

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2015 - 1:58 am | पिवळा डांबिस

स्पावड्या, अगदी अफलातून किस्से!! =))
लेख आवडला हेसांनल!!
वर काही, "विनोदी लेखन म्हणून ठीक आहे पण..." अशा टाईपचे प्रतिसाद आले आहेत ते वाचून लेखाइतकीच करमणूक झाली. तिन्ही किश्श्यांमध्ये त्या स्वनामधन्य मुलीच्या पित्यांनी जी वागणूक केलेली दाखवलीये ती अगतिक नसून आचरट आहे. वरसंशोधन हे कठीण खरंच पण एकंदर आपल्या मुलीची पात्रता ध्यानी घेऊन तिला "अनुरूप" अशी मुलं बघितली तर अशी वेळ सहसा येऊ नये.

स्पा's picture

15 Jan 2015 - 10:20 am | स्पा

ठांकू पी डां काका
nice to see u ;)

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2015 - 10:32 am | पिवळा डांबिस

अरे असा मस्त लेख लिहिलास मग लॉगईन होऊन दाद नको द्यायला? :)
सौ साल जियो!!!

खटपट्या's picture

15 Jan 2015 - 2:25 am | खटपट्या

बाबौ !!
आज बॉस दोनदा येउन विचारुन गेला "आर यू ओके?"
एमएससीआयटी चा कीस्सा ऐकुन बाजुचापण हसायला लागला. त्यालापण हसताना बघून बॉस अजुन संतापलाय. :)

चाफा's picture

15 Jan 2015 - 3:06 am | चाफा

दिवसभराचा वैताग पार विसरलो.. प्रचंड धम्माल :))

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jan 2015 - 3:21 am | निनाद मुक्काम प...

ह ह पु आ
विनोदी लेखन आवडले ,सुरवातीला गुढकथा आहे असे वाटून पदरी पडलेल्या निराशा हसण्यात कशी नाहीशी झाली हे लेख संपेपर्यंत कळलेच नाही.
आजकाल मुलींच्या अपेक्ष्या खूपच वाढल्या आहेत असे आमच्या काही उपवर मित्र मंडळीकडून कळाले आहे , सगळ्या मुलींना इंजिनियर मुलगा तरी हवा हा एक सूर
माझा मित्र एम कॉम परदेशी कंपनीत लाखभर पगार मुंबईत
दीड करोड चे घर पण लग्न जुळत नाही कारण त्याने स्थळ नोंदवले आहे पण एम कॉम म्हटल्यावर त्याला अनेकदा नकार येतो , त्याचा आजचा पगार राहती जागा एकुलता एक असणे अश्या गोष्टी दुय्यम ठरतात,
मुलींना आपल्याहून दुप्पट किमान दीड पट पगार असणाऱ्या मुलाचे ठिकाण हवे ते मिळाल्यावर संसारात स्त्री पुरुष समानता कायदा जिथे राबविण्यात त्या आघाडीवर असतात.

सुबोध खरे's picture

15 Jan 2015 - 9:24 am | सुबोध खरे

निनाद शेट
एकुलता एक मुलगा नको म्हणतात मुली आजकाल ( म्हातारपणी सासू सासरे गळ्यात पडतात आणि मुलगा आईच्या जर जास्तच जवळ असतो म्हणून)
एस्टेट काय चाटायची आहे?

पियू परी's picture

18 Jun 2016 - 5:15 pm | पियू परी

एकुलता एक मुलगा नसला कि सख्ख्या मुलांमध्ये भेदभाव आणि हर बाबतीत पार्शलिटी फेस करावी लागते.

Pain6's picture

15 Jan 2015 - 2:15 pm | Pain6

सहमत

एवढं करून एकमेकास पसंत पडून {एकदाचे}लग्न ठरते राजस्थानात मंडपात दोन्ही बाजूंच्या स्त्रिया समोरासमोर बसून गाणी गातात (असं म्हणतात)त्याचा अर्थ असा असतो -आमचं ते रत्न तुमचं ध्यान गळयात पडलं ,शंभर रुपये मोजले अन नासके आंबे गऴयात पडले छाप इत्यादी.

साप आपल्या भक्ष्याला कसा डसतो ,विळखा घालून आवळतो अथवा नुसता विषारी फुत्काराने आंधळा करतो त्याची आगावू कल्पना वधुपित्याने प्रत्यक्ष CCDत आणून दिल्याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत. सापास गप्प करण्यासाठी पुंगी तयार ठेवा छाती फुटेस्तो वाजवावी लागेल- अभी तो ट्रेलर--बालकथा !

मिहिर's picture

15 Jan 2015 - 12:09 pm | मिहिर

मस्त लेख. मजा आली.

Pain6's picture

15 Jan 2015 - 2:17 pm | Pain6

ते परत आले की काय अशा विचाराने येथे आलो आणि भयंकर करमणूक झाली.
नशिबाने कोणी नागनाथ नाही भेटले अजून पण MSCIT चा अनुभव अगदी डिट्टो आला आहे!

मोहनराव's picture

15 Jan 2015 - 3:20 pm | मोहनराव

स्पांडुबा... कय लिवलय!!!

मदनबाण ह्यांनी मागे कधीतरी खालील फोटो खरडफळ्यावर टाकला होता त्याची ह्या धाग्यानिमित्त आठवण झाली.

1

५८ वर्षीय सतीश आपटेला २० वर्षीय लिजा मिळू शकते तर मग होतकरू तरुणांनो तुम्ही पण असेच प्रयत्न करुन पहायला काय हरकत आहे? :D

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2015 - 4:33 pm | टवाळ कार्टा

५८ पर्यंत कोण थांबणार :)

५८ पर्यंत थांबायला कोण सांगतोय?
लिजासारख्या २० वर्षीय तरूणीला पटवून लग्न करण्याबद्दल बोलतोय. :)

बाकी, आपटेंसारखं नशिब बलवत्तर नसतं सगळ्यांच. ;)

व्हय बेक्कार जळजळ झालेली बातमी वाचून =))

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 4:57 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

सूड's picture

15 Jan 2015 - 5:33 pm | सूड

आडनांवबंधू असून जळतोयेस??

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 5:41 pm | बॅटमॅन

च्यायला काहीपण =))

महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंत ;) =))

महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंत

च्यायला! भारीच लॉजिक... :))

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 6:03 pm | अत्रुप्त आत्मा

@महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंत>>> =)) हा पांडू एक..आणि हा खाटुक दुसरा! =)) दोघेही मेले महावस्ताद आहेत! =))

>>महाभारत शिष्टीम असल्याशिवाय जळणें थांबायचें नाहीं, कांय समजलेंत

आता शिंचें आणखीं तींन शोधणें आलें !! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 4:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण त्यासाठी लै नाटकं (आणि शिनेमे) करावे लागतात :) ;)

पियू परी's picture

7 Jul 2016 - 4:55 pm | पियू परी

हि बातमी वाचलीत का?

http://www.newscrunch.in/2015/07/selfie-couple-splits-viral-marriage-of....

लग्नानंतर ३ महिन्यातच अमृता (आधीची लिजा/लिसा) त्यांना सोडून गेली.

सूड's picture

7 Jul 2016 - 5:01 pm | सूड

अय्य्याऽऽऽऽ कसं ना!!

कशेळे मिफा (मिपा) कट्ट्याचे शो स्टॉपर पक्के झाले आणि भांग न पिता हसत राहिलो आहे.

अभ्या..'s picture

15 Jan 2015 - 7:42 pm | अभ्या..

लैच भारी लिव्हलायस बे स्प्वावड्या.
.
.
बाकी लग्नाच्या बाजारात आपण कलाकारांना किम्मत नाय राव. :(
डॉक्टर, विंजिनेरांनी अन स्पेशली आयटीवाल्यांनी लै घाण करुन ठिवलाय ह्यो बाजार. पॅकेजशिवाय पोरी बोलतच नैत. :(
बघ एखांदी पैश्यापेक्षा कलेची कदर असणारी अन टाक बार ऊडवून.

डॉक्टर, विंजिनेरांनी अन स्पेशली आयटीवाल्यांनी लै घाण करुन ठिवलाय ह्यो बाजार. पॅकेजशिवाय पोरी बोलतच नैत. Sad
बघ एखांदी पैश्यापेक्षा कलेची कदर असणारी अन टाक बार ऊडवून.

जिंकलस गड्या, बास...

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 8:20 pm | अत्रुप्त आत्मा

@जिंकलस गड्या, बास...>> +++१११

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

विझत चाललेल्या धाग्याला हवा देण्याचा क्शीईईईईईईईण प्र्येत्न ! ;)

नाखु's picture

16 Jan 2015 - 9:13 am | नाखु

बेरोजगार लोकांना "भत्ता" देण्याची योजना आणि त्यांची संघटना असते तशी मिपावर लग्नाळू/लग्न्(टा)ळू संघटना चालू करावी काय म्हणजे वरील कॅट्यागिरीत नसलेल्या लोकांसाठी "आरक्षण" मागता येईल.

सुबोध खरे's picture

15 Jan 2015 - 10:04 pm | सुबोध खरे

"डॉक्टर, विंजिनेरांनी अन स्पेशली आयटीवाल्यांनी "
अहो डॉक्टर त्यातले नाहीत हो
जय -- मौसी, लडका ज्युनियर डॉक्टर है !
मौसी-- तो क्या अभी तक वो पुरा डॉक्टर बना नही है?
जय -- मौसी, पुरा डॉक्टर बननेके लिये दस बारह साल चाहिये ना?
मौसी -- हाय हाय तो क्या वो अभी कुछ भी नही कमाता?
जय -- नही नही मौसी मैने ऐसा कब कहा, कभी कभी शामको डॉमिनोज मे काम करने के लिये जाता है ना?
मौसी -- तो क्या वो रोज नही काम करता?
जय -- अब मौसी इमर्जन्सी ड्यूटी भी तो होती है हफ्ते मी चार पांच बार !
मौसी -- और वो इतना मायुस क्यू दिखता है?
जय --अब क्या करे मौसी घर जो नही जा पाता?कभी कभार हफ्ते मी एकाध बारहि तो घर जा सकता है!
मौसी -- तो फिर वो लडकी को वक्त कब दे पायेगा?
जय -- बस मौसी एक बार शादी हो जाने दो वो डॉमिनोज जाना छोड देगा, घर तो अपने आप हि छुट जायेगा !
तो मौसी मै ये रिश्ता पक्का समझू?
मौसी -- पक्का ?बेटा कान खोलकर सुनले! भले मै उसकी शादी कॉल सेंटर वाले से कर दु! डॉक्टर से हरगीज नही!
सगी मौसी हुं, कोइ सौतेली मां नही!
जय -- अजीब बात है मेरे इतने समझाने के बाद भी आप मान नही रही है! बेचारा डॉक्टर!!!!

स्पा's picture

15 Jan 2015 - 10:18 pm | स्पा

=)) डाॅक

अमोघ गाडे's picture

15 Jan 2015 - 9:00 pm | अमोघ गाडे

मेलो ठार मेलो!!! हासुन हासुन मेलो...

लेख आवडला. फारच चांगला लिहिला आहे. किस्से वाचताना प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले.

विशाखा राऊत's picture

16 Jan 2015 - 3:36 pm | विशाखा राऊत

गाववाले मस्तच लिहिले आहे :) हसुन हसुन वाट