"ते" असतातच तुमच्या आजूबाजूला, लहानपणी माहित नसतं, हळू हळू मोठे होत जातो तसे त्यांची व्याप्ती लक्षात यायला लागते,तरीही तसा त्यांचा त्रास नसतो तुमचे शिक्षण पूर्ण होते,मग तुम्हाला नोकरी लागते.वय तिशी कडे झुकायला लागले कि तुमच्याच घरातले घात करतात, आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात.मग कधीही दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री ते तुम्हाला दर्शन द्य्याला लागतात,तुम्हाला त्यांच्यात ओढायचा त्यांचा बेत असतो,जणू तेच त्यांचे जीवितकार्य असते.साम दाम दंड भेद सगळे मार्ग अवलंबिले जातात.या मध्ये काही मध्यस्त आणि तुमचे नातेवाईक सुद्धा असतात,कुठूनही ते तुम्हाला शोधू शकतात,लपायचा काहीच चान्स नाही
अस्मादिक हि याला कसे अपवाद असतील.या वर्षीचा वाढदिवस साजरा झाला आणि मातोश्रींनी बॉम्ब टाकला चला, नावनोंदणी करून टाकू, जाहिरात करायला आता आम्ही मोकळे, बस झाले उंडारणे.माझ्या परवानगी सारख्या मामुली गोष्टीची अर्थातच त्यांना आवश्यक्यता वाटली नाहीच,काही दिवस शांत गेले आणि अचानक मला कुठल्या कुठल्या नंबर वरून फोन यायला लागले.ते "तेच" होते,भेटायचं म्हणत असायचे मी मेल वर पत्रिका पाठवा म्हणून कटवायचो
त्यातल्या त्यात माझे सुदैव असे कि घरी पत्रिका हा मुद्दा महत्वाचा असल्याने मी सुखी होतो, जल्ला एकही पत्रिका जुळायला मागत नसल्याने पुढचा काही त्रास नव्हता.
पण त्यांनी आक्रमणाचा जोर वाढवला आणि घरीही यायला लागले.काल काही समदुक्खी मित्र wats app वर गप्पा मारत असताना हा विषय निघाला, एक एक किस्से एवढे वाढत गेले,कि हे दुख्ख इथवर मर्यादित ण ठेवता सर्वदूर पसरले पाहिजे या मतावर सर्व आले
आखिर दर्द बाटनेसेही तो कम होता हे म्हणून हा प्रपंच
प्रसंग एक :- रात्री ९ च्या दरम्यान कसाबसा दमून भागून घरी आलो, "ते" बसलेले होते, पहिलाच अनुभव असल्याने मी आत जाऊन आईला विचारले कोण ब्वा हे.. मग समजले मुलीचे पिताश्री. बाहेर आलो वर पासून खालपर्यंत स्क्यान्निंग झालं. मग नमस्कार चमत्कार बाबांनी विचारलं मुलगी काय करते, बस्स इतकच विचारायची वाट बघत होते वाट्त ते , धाडधाड गोळीबार सुरु, मुलगी कुठल्या नर्सरीत शिकायची इथपासून सुरवात झाली...मध्येच ती दुसरीत मलेरिया मुळे सहामाही मध्ये मराठीत नापास झाली होती हि महत्वाची माहिती पण मिळाली
पोटात मरणाचे कावळे बोंबलत होते.तरी तसाच हां हु करत पुराण ऐकत होतो.शेवटी समजल कि ढोर मेहनत करून मुलीने मास्टर्स केले आहे IT मध्ये. घशाला कोरड पडली म्हणून पाणी प्यायला आत आलो, मागोमाग आई .. अरे भयंकर शिकलेली दिसतेय हि मुलगी तिला चालेल का पण , नाहीतर डॉक्टर , इंजिनिअर अशा अपेक्षा असतात हो मुलींच्या हल्ली, म्हटल मला काय विचारतेस, तुम्ही आणलाय न हे .. तुम्हीच विचारा, परत बाहेर आलो
समोरून स्तुतीसुमनांचा धबधबा कोसळतच होता, तरी तशीच तशीच हिम्मत करत चालत्या ट्रेन मध्ये चढलो,विचारलं नोकरी कुठे करते ? एखाद्या भिकार्याकडे बघतात तसं माझ्याकडे बघत म्हणाला, तिच्या प्रोफाईल ला सुट होईल असा जॉब आहेच कुठे मुंबईत, शोधतेय तरी
म्हटलं ओह, (अच्चा अच्च जाल तल - हे मनातल्या मनात) अजून २० मिनिटे पुराण ऐकवल्यावर त्याने तिचा बायो डेटा माझ्याकडे सरकवला, आई बाबांनी एव्हाना धीर सोडलेला होता, मी पण सहज नजर टाकली, शिक्षण: बी.कॉम ( सेकंड क्लास), tally, आणि आणि
MSCIT.
फुल हादरलो , MSCIT??????? (नाही रे नाही नसतं रे असं ... अरे ए .. सांगा रे कोणीतरी याला , पहिलीतली मुले पण देतात हि परीक्षा)
म्हटलं मास्टर्स कुठून केलं? तर म्हणाले इथूनच गजाजन काम्पुटर मधून घराखालीच आहे, सरकारी नोकरी आता अश्शी मिळेल.. दोन मिनिटे काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतो नंतर चेहऱ्यावर कुठलेच भाव येत नव्हते... हातपाय लटपटत होते त्यांना तसेच वंदन केले आणि कशीबशी त्यांची बोळवण केली. सुदैवाने नंतर पत्रिका जुळली नाही, आणि मी वाचलो
प्रसंग २ : काही दिवस शांततेत गेले आणि अजून एक वेगळे "ते" श्री. XXX असेच रविवार संध्याकाळचे घरी उगवले,नेमक्या एक काकू घरी येऊन बसल्या होत्या.मागचा अनुभव असल्याने मी सावरून बसलो आणि आधी बायो डेटा वर झडप मारून शिक्षण चेक केलं.हा ठीके आतापुढे
हे गृहस्थ मिस्टर बिन चा मराठी अवतार म्हणता येईल असे, नुसती चळवळ, आई बाबा हस्तायेत माझ्याकडे बघून. मी शक्य तेवढा मख्ख चेहरा ठेऊन थंडपणे बोलत होतो, मग हे साहेब आई बाबांना अहो आई , अहो बाबा म्हणायला लागले, आईंग म्हटल डायरेक्ट आई आणि बाबा ? आपण कुठे कामाला होतात म्हटल्यावर एकदम ताडकन उभेच राहिले, आणि शर्टात हात घालून काहीतरी शोधायला लागले, म्हटल आता हे काय, ५ मिनिटांनी त्यांना त्यांचे ओळखपत्र सापडले, साहेब रेल्वेत होते.आता रिटायर. मग म्हणे मला AC टून प्रवास असतो,
तेही मोफत आहात कुठे ?
मी :हँ,हँ.. हो का ? मस्तच
ते : मग,आणि मी कोणाला अजून एकाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण मोफतच,बाबांना फिरवेन मी मस्त.काय बाबा याचं लग्न झालं कि आपण दोघे मोकळेच कि (मायला याच्या कुठे पोचला हा),बाबांनाच असं नाही हा तुम्हाला पण अख्खा भारत फिर्वेन मी.
मी : (ए नको रे नको असं बोलू, कंट्रोल जातोय माझा,तोंडावर हसेन मग मी येड्यासारखा,बरे दिसेल का ते) आ ?
ते: : म्हणजे कोणीही एक चालतो. पुरूषच पाहिजे असं काही नाही, उद्या समजा या काकूंना पण मी घेऊन जैन (तोवर काकू ताडकन ..ऑ नको नको.. काहीतरीच आपलं,असं काहीसे घशातून विचित्र आवाज काढत बरळत उठून चपला घालायला लागल्या, आई आत पळाली ती शेवटपर्यंत बाहेर आलीच नाही) म्हणजे माझी हि बहिण आहे असे सांगीन हो मी, तात्पर्य काय कि आता ट्रेन ची चिंता नाही
मी : ण हसल्याने आतडी पीळवटली गेली होती, काकू पसार झालेल्या होत्या, मी आणि बाबा दोघे आता खिंड लढवत होतो.
ते: मी काय म्हणतो जावाय बापू (संपलोच), आता नेमके आपण किती जवळ राहतो, रात्री कधीही जेवायला आलात तरी तुम्ही दोघे ५ मिनिटात घरी, सगळे आपण एकत्रच म्हणजे ( मेलो मेलो )
मी : काका, अहो एवढा पुढचा विचार नको हो, आधी पत्रिका तर जुळून दे.
ते: ती जुळली आहेच मी आधीच दाखवली आहे, आता कशाला वेळ घालवायचा, पटापट पुढच्या गोष्टी बोलायला लागू या, आणि मुलगी तुला आवडेलच प्रश्नच नाही, मी सांगतो ना. काय बाबा ? (वारलो)
हे ऐकून उरले सुरले त्राण गेले, पुढचे काहिच ऐकू आले अहि बहुधा नातवंडांची नावे काय ठेवायची यावर चर्चा सुरु होती, मी शुद्धीत आलो तेंव्हा ते गेलेले होते. घर शांत होतं
प्रसंग ३ : या तडाख्यातून सावरायला वेळ लागला, आता घरी मी नसताना कोणालाही बोलवायचं असेल तर बोलवा हे डील मी फायनल केलं
एका शुक्रवारी मी ऑफिस मध्ये असताना मातोश्रींनी फोन केला, अरे ऐक ना, एक श्री XXXX म्हणून आहेत त्यांनी फोन केलेला, ते तुला भेटायचं म्हणत आहेत आज,सोबत पत्रिका नी फोटो घेऊन येतील, तर त्यांना भेटून घे ओके? तुझा नंबर दिलाय मी त्यांना. मी काही बोलायच्या आत अर्थात फोन ठेवला गेला. चायला विकेंड चा एकतर मी कसंही ऑफिस ला जातो , थ्री फोर्थ आणि वर टी शर्ट, आजच यायचं होतं काय.आणि मागचे अनुभव बघता मला कल्पनेनेच घाम फुटायला लागला, आता तर मी एकटा होतो, होम ग्रौन्ड पण नव्हतं. कामातले लक्ष उडाले, साधारण १२ ला त्यांचा फोन आला. मी पत्ता सांगितला, ऑफिस च्या बाजूला CCD मध्ये भेटायचे ठरले.बोलण्यावरून तरी तो माणूस बरंच शांत वाटला, जरा धीर आला. २ ची वेळ ठरलेली, ३ वाजले तरी पत्ता नाही, म्हटल चला बराय वाचलो हे महाशय काही येत नाहीत आता, तेवढ्यात फोन वाजलाच, ते आलेले होते, मीपण निघालो CCD त. २ कॉफी ऑर्डर केल्या आणि बसलो, परत सेम नमस्कार चमत्कार, स्वतःची ओळख वेग्रे. माणूस एकदम शांत होता प्रश्नच नाही.मी मुलीबद्दल विचारले, तर त्याने पिशवीतून एक जाडजूड फाईल काढली ( मी घाबरलो म्हटल हिची सर्तीफिकेत्स आणली कि काय ह्याने पहिलीपासूनची)
ते : मी xxxx,सर्प मित्र आहे
मी : अरे वा
ते : होय १९६५ पासून वयाच्या १५ व्या वर्षीपासून मी साप पकडतो, ( फाईल उघडून - त्यात वर्तमान पत्रांची कात्रणे चिकटवलेली होती) हे १९७० पासून पेपरात माझी नावे यायला लागली. (मायला हा लग्नाचा अल्बम दाखवतो तसा मला एक एक पान दाखवत होता , नको रे ए नको न प्लीज्ज )
साधारण अर्ध्या तासानंतर अर्ध पुस्तक संपलं
ते: अशी पटापट पाने नका उलटू , तुम्हाला समजणार नाही मग, एक एक बातमी नीट वाचा, आता वेळ काढून आलाच आहात म्हणून सांगतोय , नाहीतर हल्लीच्या तरुण मुलांना जर्रा म्हणून वेळ नसतो, हा बघा मी हिमाचल मध्ये पण एक साप पकडलेला, तिकडच्या पेप्रातली बातमी. नंतर हॉटेल वाल्याने मला कुरियर केला पेपर,अशी दयाळू माणसे असतात
मी : मुलगी काय करते ?
ते : हा तर त्यानंतर मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णपणे यात उतरलो ( अरे ए .. मे क्या बोल रहा हु, तू क्या बोल रहा हे , मी तेरी मुलगी के बारे मे पुच रहा हु णा)नोकरी महत्वाची कि साप पकडणे ? सांगा पाहू ?
अजून साधारण पंधरा मिनिटांनी
मी : पत्रिका आणि फोटो मागितलेला आईने आणलाय का ?
ते: हल्ली सर्प मित्र उरलेत कुठे पण , माझं पण वय झालाय आता, मी अजून एक पण काम करतो , समाजसेवा म्हणता येईल, अंधांसाठी मी ब्रेल लिपीत पुस्तके लिहितो, हि बघा (पोतडीतून त्यांनी अजून काही जाडजूड पुस्तके काढली, अता मला काय घंटा कळणारे त्यातले साहेब माझा हात हातात घेऊन त्या पुस्तकावर ठेऊन मला सांगत होते हे बघा हि ब्रेल लीपी (काय सांगताय काय? हाव च्वित) इकडे ऑफिस मधून फोन वर फोन पोरगा गायब झाला कुठे
पुढील बराच वेळ मग अंध, ब्रेल लिपी आणि समाजसेवा यावर गेला
मी: पत्रिका देताय णा
ते : देतो हो त्या आधी मी एक गम्मत आणलीये , तुमच्या साठी नवीन असेल, मला उशीर का झाला याचे कारण
मी : ??? (अजून एक काळी पिशवी टेबलावर आली)
ते : तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला, चेंबूर BARC भागात मध्ये धामण दिसलीये, मग आधी तिकडे गेलो, (
तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली, आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती
)
मग पकडली आणि आणली इथे आता इथून येऊर ला जाणार आणि सोडणार, हात लावा ना (नको हो नको , हातभर फाटलीये माझी) अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते, माझी बोबडी वळलेली होती, माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करत होते, ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती.
मी: काका अहो नको लोक बघतायेत आपण निघुयात आता, नंतर केंव्हातरी मी येईन साप पकडायला,(तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली, आधीच एकतर हुच्च्च लोकस पुढे काय झाले असेल , कल्पना करा लिहित बसत नाही)
आता मला त्या CCD मध्ये घेत नाहीत :(
त्या मुली बद्दल काहीही समजले नाही, पत्रिका नंतर त्यांनी मेल केली, ती अर्थातच जुळली नाही
आता पुढचा धक्का कधी बसणारे या विचारात दिवस काढतोय,
बापू म्हणतात बेटा ये तो ट्रेलर हे ,पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त!!!!!
-धक्क्याला लागलेला (स्पा )
प्रतिक्रिया
14 Jan 2015 - 1:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हसुन ठसका लागुन मेलोय!!! पोचवा रे कोणीतरी. =))
14 Jan 2015 - 1:33 pm | अनुप ढेरे
=))
जबर्या!
14 Jan 2015 - 1:34 pm | राजाभाउ
एक नंबर !!
14 Jan 2015 - 1:35 pm | स्पंदना
आवो जावाय बापू इकडं अडकला व्हता होय?
म्या म्हणल गेल्लं कुट्टं ?
न्हाय म्या काय म्हंतो, आवं सगळीच मेटाकूटीला आल्याली असत्यात. त्ये काय म्हंत्यात ना...जात्यातले....सुपातले.तस्स.
तर जर्र्र्राआ दमान घ्या. उअद्या ह्यातलीच कोणतरी नागीन डान्स आयटम भाळी लिवलेली असायची आन ती ह्ये आर्टीकल वाचायची. मग ते सीसीडी बीसीडी चांगलच गळ्याशी यायचं.
भारी आण्भव!!
पोरग मोठ्ठं झालं हो ऽऽऽ!! कर्तव्य आहे हो यंदाऽऽ!!
च्या मारी मी म्हनल डायरेक्ट,"मी अडकलू!! आता सासूबाय मला इसरा!" असं सांगतोय का काय?
14 Jan 2015 - 1:44 pm | Mrunalini
हा हा हा हा.... भयंकर लिहले आहेस रे.. हसुन हसुन मेले मी. :D
14 Jan 2015 - 2:00 pm | अजया
=))
15 Jan 2015 - 4:20 pm | भावना कल्लोळ
वेड्या सारखी हसतेय…. मस्तच स्पा.
14 Jan 2015 - 1:49 pm | प्रभो
>>आता मला त्या CCD मध्ये घेत नाहीत
आरारारा !! =)) =)) =))
14 Jan 2015 - 1:51 pm | योगी९००
विनोदी म्हणून खुपच छान लिहीलेयं..
पण या लेखात मला उपवर मुलींच्या वडीलांची मुलीला चांगले घर मिळावे, चांगला नवरा मिळावा म्हणून केलेली धडपड जाणवली. चांगले संबंध रहावेत म्हणून लग्न ठरायच्या/ मुलगी दाखवायच्या आतच त्यांना असा प्रकार करावा लागतो किंवा लाचार व्हावे लागते (ते ही या युगात) असे वाटले. यामुळे तितके हसू नाही आले..
14 Jan 2015 - 1:55 pm | मधुरा देशपांडे
:)))
14 Jan 2015 - 2:00 pm | प्रसाद प्रसाद
मस्त लेख. प्रसंग क्र. ३ खरेच खरा आहे का?
14 Jan 2015 - 2:01 pm | प्रसाद१९७१
@ स्पा - टीपीकल मराठी लेखकांचे विनोदी लिखाण म्हणुन ठीक आहे पण मला तुमचा दृष्टीकोन, विचार बरोबर वाटले नाही. आणि तुम्ही ज्या प्रकारे चेष्टा उडवत आहात त्याचे ही वाईट वाटले.
पहील्या प्रसंगातील मुलीच्या शिक्षणावरुन केलेली चेष्टा बरोबर नव्हती.
तिसर्या प्रसंग तर खोटा वाटला. कोणी साप पिशवीत घालुन मुलाच्या घरी येइल असे वाटत नाही.
स्पा - लक्षात घ्या, तुम्ही खुप, खुप हुशार, कर्तबगार वगैरे असाल. पण जगात साधीसुधी, कमी शिकलेली, तुमच्या पेक्षा आर्थिक परीस्थितीनी खालची असलेली लोक असतात. त्यांची अशी चेष्टा उडवू नये. त्यांनी तुमचे काही घेतले नाहीये ( थोडा वेळ सोडुन ).
खरे तर अशी ३ उदाहरणे तुमच्याच बाबतीत का घडली हा प्रश्न मला पडला आहे.
14 Jan 2015 - 2:03 pm | स्पा
प्रसाद १९७१
ह्युमर ठेवा थोडा
नीट वाचलंत तर बर होईल,
इथे कोणाचीच चेष्टा केलेली नाहीये मी :)
14 Jan 2015 - 2:05 pm | स्पा
याचा विचार पालकांनी करायला हवा
आम्हीही काही मोठे शकलेलो नाही, पण निदान जे आहे ते सत्य सांगतो
असो या वादात मला पडायचे नाहीये :)
14 Jan 2015 - 3:28 pm | कपिलमुनी
तुम्ही मुलीकडच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आता काय खरा नाय हां
14 Jan 2015 - 3:32 pm | स्पंदना
:))))
*WALL*
2 Jul 2015 - 9:24 pm | अरवीन्द नरहर जोशि.
आपल्या लिखाणांशी मी सहमत आहे.
14 Jan 2015 - 2:01 pm | अत्रुप्त आत्मा
पां डुब्बाssssssssss!!!! =))
.
.
.
.
.
.
.
.
.
आता लेख वाचतो सावकाश! ;-)
14 Jan 2015 - 4:22 pm | अत्रुप्त आत्मा
@धाडधाड गोळीबार सुरु, मुलगी कुठल्या नर्सरीत शिकायची इथपासून सुरवात झाली...मध्येच ती दुसरीत मलेरिया मुळे सहामाही मध्ये मराठीत नापास झाली होती>> =))))))
तुफ्फान हाणले आहेस रे... पां डुब्बा! =)) .. हसून हसून वारल्या गेलो आहे! =))
14 Jan 2015 - 2:11 pm | छोटा डॉन
म॑स्त रे, चालु देत अजुन पुढे.
- छोटा डॉन
14 Jan 2015 - 2:20 pm | सविता००१
मस्त लिहिलं आहेस रे!! ह.ह.पु.वा
14 Jan 2015 - 2:36 pm | सौंदाळा
क्रमशः लिहायचे विसरला का?
पुभाप्र
स्वगतः स्पा देखिल आता सुडास लागणार
अवांतर : 'सुडास लागणे' हा लव्हाळी मधे वाचलेला वाक्प्रचार आहे, अर्थ : जगरहाटीत येणार, संसारी होणार असा काहिसा असावा. कृपया वेगळा अर्थ काढु नये.
14 Jan 2015 - 2:50 pm | स्नेहल महेश
मस्त लिहिलं आहे ह.ह.पु.वा
14 Jan 2015 - 2:58 pm | टवाळ कार्टा
वेलकम टू क्लब ;)
14 Jan 2015 - 3:04 pm | अबोली२१५
मला हि असेच अनुभव आलेत पण येथे मुली नाही तर मुलगे होते.
मी लग्न अगोदर कविता करायाची त्या कविता माझ्या आई ने माझी इच्छा नसताना
एक नात्यातला मुलाला दाखवल्या… हे महाशय माझ्या कडे प्रेमभरल्या नजरेन बघू लागले आणि मी आई ला खाऊ का गिळू .
एक मुलगा मला पहाचे सोडून माझ घर आणि घरची छत हे पहाण्यात जास्त इंटरेस्टेड होते.
जसे कोणी तरी याला दम्म देऊन बसवलंय . मला आईने एकदा वाढू मंडळात काही फोटो दाखवयाला घेऊन जायची
मी खूप वैतागाची पण आई साहेबांसमोर काहीच करू शकत नव्हते , मग एका टकलू मुलाचा फोटो पाहून अरे आई हा गजनी आहे असे जोरात ओरडली.
सगळे मुला आणि मुलींचे पालक माझ्या कडे पाहू लागल्यावर मला आई ने परत कधीची मंडळात घेऊन गेली नहि.
पण ती माझी आई असल्यामुळे माझे लग्न २००९ मध्ये सुरळीत पार पडले.
14 Jan 2015 - 3:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
द्येवा... वाचव रे आमच्या शारुकला!!
भन्नाट भन्नाट... बरच काही आठवलं.. भेट एकदा बैला सांगतो गमतीजमती... उगा चारचौघात नको. ;)
14 Jan 2015 - 3:11 pm | अत्रन्गि पाउस
अक्षरश: ठ्ठो ठ्ठो हसलो ...आजूबाजूचे चमत्कारिक नजरेने बघताहेत :D
14 Jan 2015 - 3:17 pm | विटेकर
एक ललित लेखन म्हणून ठिक आहे , पण मला वाटते गेल्या १० वर्षात वधुपित्यांची अवस्था ॠणको कडून धनको अशी संक्रमित झाली आहे त्यामुळे लेखन वस्तुस्थितीस धरून असावे आणि कल्पनाविलास असावा असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. ( जर लग्नाळू मुलगा सल्लू पेक्षा देखणा आणि बिल गेट्स पेक्षा श्रीमंत असेल तर बाब वेगळी)
वधूपित्याने चिंता करण्याचे दिवस हद्द्पार झाले असून आता ल्ग्नाळू मुलांच्या आई-बापाने चिन्ता करावी असेच दिवस आहेत.
आपल्या बाबतीत घडलेले प्रसंग जर खरे असतील तर हे लोक चक्रम या सदरात मोडत असावेत किंवा अपवाद असावेत कि ज्याने वरील नियम सिद्ध होतो.
अस्तु !
- दोन दोन मुलांचा बाप असलेला ( सचिण्त) विटेकर
14 Jan 2015 - 3:18 pm | प्यारे१
अच्चा अच्च जाल तल ;)
14 Jan 2015 - 3:19 pm | विटेकर
एक ललित लेखन म्हणून ठिक आहे , पण मला वाटते गेल्या १० वर्षात वधुपित्यांची अवस्था ॠणको कडून धनको अशी संक्रमित झाली आहे त्यामुळे लेखन वस्तुस्थितीस धरून नसावे आणि केवळ कल्पनाविलास असावा असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. ( जर लग्नाळू मुलगा सल्लू पेक्षा देखणा आणि बिल गेट्स पेक्षा श्रीमंत असेल तर बाब वेगळी)
वधूपित्याने चिंता करण्याचे दिवस हद्द्पार झाले असून आता ल्ग्नाळू मुलांच्या आई-बापाने चिन्ता करावी असेच दिवस आहेत.
आपल्या बाबतीत घडलेले प्रसंग जर खरे असतील तर हे लोक चक्रम या सदरात मोडत असावेत किंवा अपवाद असावेत कि ज्याने वरील नियम सिद्ध होतो.
अस्तु !
- दोन दोन मुलांचा बाप असलेला ( सचिण्त) विटेकर
14 Jan 2015 - 3:22 pm | स्पा
विटेकर काका आम्ही पण त्याच चिंतेत आहोत (आम्ही म्हणजे समवयस्क तरुण मुलांची पिढी )
म्हणून प्रसाद १९७१ ला म्हणालो ह्युमर समजा
14 Jan 2015 - 3:25 pm | स्पंदना
अहो विटेकर बुवा तुम्हीपण दमधरा.
हे सगळ कस असत माहिताय का? कोण बोलण्यात वरचढ त्यावर अवलंबुन असतं.
14 Jan 2015 - 6:39 pm | प्रसाद१९७१
आणि हे चक्रम लोक बरोबर आपल्यालाच शोधत कसे आले हा ही पण फार विचार करायची गोष्ट आहे. :-)
14 Jan 2015 - 7:21 pm | स्पा
गोष्टी हलक्या घ्या प्रसाद साहेब, मुद्दे नसले की माणूस व्यक्तीगत होतो. सो बेटर माईंड ढिस :)
बाकी तुमच्या मुद्द्यांचा आदर आहेच
14 Jan 2015 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरेच्या हा मुलगा लग्नाचा आहे हे विसरलोच होतो.
उद्याच चांगल्या १० - १२ उपवर मुलींचे फोटु आणि पत्रिका, तिळगुळ आणि एक धामण घेउन तुझ्या घरी येतो.
बघतोच कसा नाही म्हणतोस ते.
पैजारबुवा,
14 Jan 2015 - 3:26 pm | स्पंदना
पैजारबुवा तुम्हाला १०-१२ उपवर मुली आहेत?
आणि वर तुम्ही धामणसुद्धा स्पाच्या गळ्यात मारणार?
:))))
14 Jan 2015 - 4:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
एका मुलीच्या बापाचे दु:ख तुम्हाला कसे कळणार? जाउद्या
आणि उगाच काड्या सारुन माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी टाकु नका. ( मी उगाच का स्पावड्याच्या प्रत्येक लिखाणाची वहाव्वा करतो?)
(तुम्हाला म्हणुन सांगतो मि.पा. वरचे असे बरेच होतकरु मी हेरुन ठेवले आहेत. त्यातले १० मासे तरी माझ्या गळाला लागलेच पाहिजेत असे माझे टारगेट आहे. बघा जमल तर मदत करा, तुम्हालापण पुण्य मिळेल आणि लग्नाची पत्रिका देखील. बायद वे तुमच्या पहाण्यात आहे का कोणी होतकरु?),
पैजारबुवा,
14 Jan 2015 - 4:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
संपादकांना विनंती,
वरील प्रतिसादातले, कंसातले शब्द कोणत्याही होतकरु तरुणाने वाचायच्या आधी पांढरे करुन द्या
पैजारबुवा,
15 Jan 2015 - 2:26 am | खटपट्या
ओ, माझं लग्न झालंय बर्का !! :)
15 Jan 2015 - 3:16 am | स्पंदना
पैजार बुवा स्पा ने अगर जनम लिया है,तो सिर्फ इसलीये के वो मेरा जावई बन सके।
15 Jan 2015 - 4:18 am | अत्रुप्त आत्मा
=))
15 Jan 2015 - 10:16 am | स्पा
धन्य __/\__
15 Jan 2015 - 4:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता एक नविन मालिका बनण्याच्या मार्गावर आहे...
"जावई पळवणे आहे... " +D
16 Jan 2015 - 5:08 pm | ज्ञानोबाचे पैजार
जाउद्या अपर्णाताई उगा चॅलेंज करु नका.
मि.पा.वर एवढे होतकरु तरुण आहेत त्यातला दुसरा एखादा बघा.
"एक बार जो मैने कमिटमेंट कर ली, तो कर ली समझो - उसके बाद तो मैं अपनी भी नहीं सुनता" *diablo* ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo:
मै भिष्मप्रतिज्ञा करता हु "मै किसीभी किमत पर स्पावड्याको अपना जावई बनाके रहुंगा. उसके लिये मुझे दुनिया इधरकी उधर करनी पडेगी तो बेहत्तर." *i-m_so_happy* *HAPPY*
स्पावड्या "मै आ रहा हु" @=
पैजारबुवा
16 Jan 2015 - 5:13 pm | स्पा
पळा ................... =))
19 Jan 2015 - 12:38 am | डॉ सुहास म्हात्रे
इतके लोक मागे लागले असताना..... "पळा ................... " हीच मूळ समस्या दिसते आहे ;)
: इ ए फुक्टेविष्लेषणकर
14 Jan 2015 - 3:27 pm | पियुशा
स्पावडी!!!!!
जबर्या !!
समदुखी समदुखी का काय म्हण्तात त्येच ते !
14 Jan 2015 - 5:37 pm | बिपिन कार्यकर्ते
क्काय्य!!!!??? तुलाही मुली सांगून येताहेत? ;)
14 Jan 2015 - 5:53 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
15 Jan 2015 - 4:18 am | अत्रुप्त आत्मा
ठ्ठो....ठ्ठो....ठ्ठो....!
14 Jan 2015 - 6:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगागागगगगगग!!! =))
18 Jan 2015 - 5:52 pm | दिपक.कुवेत
अतिशय बेक्कार हसतोय बिकांच्या कमेंट्वर.....धड लिहिताहि येत नाहिये....
14 Jan 2015 - 9:24 pm | टवाळ कार्टा
खिक्क
15 Jan 2015 - 10:40 am | सविता००१
पियू की भावनाओं को समझो जरा!
आप भी ना.........................
15 Jan 2015 - 10:45 am | स्पा
=))
15 Jan 2015 - 11:24 am | पियुशा
च्यायला माझा बाजार .................
अय्यो...... बिका हम आप्को नही चॉडेगा , आप मिलो
एक बार, हम भी पिशवी मे धामन लेके आयेन्गा फिर देको कौन तेज बागती तुम की धां म ण :p
15 Jan 2015 - 11:35 am | बॅटमॅन
प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच ट्रान्स्लिटरवून पाहिला आणि फुटलो =))
15 Jan 2015 - 11:40 am | स्पा
मि पण =))
वारल्याच गेलो एकदम
15 Jan 2015 - 11:44 am | बॅटमॅन
खी खी खी =)) तरी बरं अर्थ ठीकच आहे =)) =))
15 Jan 2015 - 11:54 am | पियुशा
अब्बे ....ए़ ......कार्ट्यानो क लिवलय मला
बी सान्गा ना हसताय का गधड्यानो !
15 Jan 2015 - 12:47 pm | टवाळ कार्टा
फारच सोज्वळ ब्बॉ तुम्ही =))
15 Jan 2015 - 2:48 pm | पियुशा
आला का टवाळ खोर ? ये ये तुझिच कमी होती
15 Jan 2015 - 2:50 pm | पियुशा
स.म. माझी प्रतिक्रिया उड्वुन टाका ,
लोकानी कै च्या कै अर्थ़ काढन्यापेक्षा ते बरे :(
15 Jan 2015 - 3:20 pm | टवाळ कार्टा
रौ दे की...मला मस्करी समजते :)
15 Jan 2015 - 11:58 am | प्रमोद देर्देकर
होय रे बॅट्या माझीही तिच अवस्था झाली प्रथमार्ध वाचल्यानंतर.
मी ऑफिसच्या बाहेर पार्कींग लॉट मध्ये पळालो मगच फुटलो. आयायाईग. :-D
15 Jan 2015 - 1:56 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रथमार्ध पुन्हा एकदा मनातच ट्रान्स्लिटरवून पाहिला आणि फुटलो >>> =))))) अत्यंत सखोल आणि खोचक आहे,हां खाटुक! =))
15 Jan 2015 - 2:51 pm | Pain6
हाहाहा
15 Jan 2015 - 3:45 pm | सूड
हो ना राव!! लै मंजे लैच हसतोय!!
15 Jan 2015 - 2:58 pm | Pain6
फारच संकुचित मनाचे ब्वा तुम्ही ;)
15 Jan 2015 - 3:18 pm | मोहनराव
:)
14 Jan 2015 - 3:28 pm | सूड
आयला! वेड्यासारखा हसतोय तो धामणवाला किस्सा वाचून!! येवढे पेशन्स? अपमान करु नको पाह्यजे तर, पण एखादा शालजोडीतला तरी द्यायचा.
14 Jan 2015 - 3:30 pm | MaheshW
.....हा हा हा आजून हसतो आहे .............
14 Jan 2015 - 3:32 pm | नन्दादीप
मी ह्या सगळ्या विषयातून सुटलो...नशिबच माझ.... (तरी सांगत होतो तुला, आधीच सेटींग लाव म्हणून)
असो....... तुझ्या निमित्ताने जुने लोक परत आलेले बघून ड्वॉले पाणावले......
15 Jan 2015 - 10:17 am | स्पा
ह्येच बोल्तो ;)
15 Jan 2015 - 6:35 pm | बिपिन कार्यकर्ते
स्पा बाब्या क्याटेगरीत कैक वर्षांपूर्वीच आला होता. ;)
14 Jan 2015 - 3:33 pm | सस्नेह
लेख म्हणून छान आहे.पण प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळेच दिसते.
परवाच एका वधु-वर मेळाव्याला गेले होते. (गैरसमज नसावा, स्वयंसेविका म्हणून ). तर तिथे 'वर-वर' मेळावाच लागलेला दिसला.
.. 'वरा' च्या कक्षात पाचशे-एक मुले नटून थटून बसलेली आणि वधूंच्या कक्षात शुकशुकाट ! मग आयोजिका बाईंनी बरीच फोनाफोनी केल्यावर सताठ 'वधू' अनिच्छेने घरच्याच वेशभूषेत अवतरल्या. पण मेळावा संपेपर्यंत काही थांबल्या नाहीत. एकेका वराने शिक्षण इ. परिचय द्यायला सुरु केल्यावर एक तुच्छ कटाक्ष टाकून स्कूटरींवरून भुर्रं उडाल्या !
14 Jan 2015 - 3:41 pm | बॅटमॅन
अगायायो =)) =)) =))
अजून या भानगडीत पडलो नाही, त्यामुळे किरकोळ चकमकींवरच भागतंय. च्यायला स्पांडू तर फुल सुलतानढव्यात सापडलेला दिसतोय =)) _/\_
14 Jan 2015 - 3:53 pm | पिंपातला उंदीर
लेख आवडला . एकदम खुसखुशीत . On serious note मराठवाडा भागात लग्नाळू मुलांची परिस्थिती भीषण आहे . माझे कितीतरी जवळचे सुस्थिती मधले मित्र निव्वळ मुली मिळत नाहीत म्हणून नाईलाजाने ब्रम्हचारी आहेत .
14 Jan 2015 - 4:07 pm | कपिलमुनी
तुम्हाला अविवाहित म्हणायचा आहे का ;)
14 Jan 2015 - 4:08 pm | सूड
=))))
14 Jan 2015 - 4:22 pm | पिंपातला उंदीर
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
14 Jan 2015 - 4:13 pm | टवाळ कार्टा
अग्गागा =))
14 Jan 2015 - 5:06 pm | शिद
:))
14 Jan 2015 - 5:47 pm | बॅटमॅन
एका माजी पंप्र साहेबांचे ष्टेटमेंट आठवल्या गेले. =))
14 Jan 2015 - 3:58 pm | पदम
अहो ऑफ्फिस मधे बसुन वाचतेय. त्यामुळे जोरात हसताहि येत नाहि. बाकि मस्तच.
14 Jan 2015 - 4:01 pm | आदूबाळ
प्रसंग १ आणि २ कहर आहेत. ब्याक्कार हसतोय.
ओळखीच्या काकवा/मावश्या "हा कधी (ना कधी) तरी उपवर होईल, आणि हे स्थळ आपल्या चुलतभावजयीच्या पुतणीसाठी योग्य असेल" असे आडाखे बांधून आगोदरच फिल्डिंग लावून बसतात - हा अनुभव सर्वात भारी असतो.
14 Jan 2015 - 4:06 pm | सूड
भारी म्हणजे अत्यंत भारी असतो आणि फिल्डिंग कोसळल्यावर होणारा त्रागा अत्यंत करमणूक करणारा!! ;)
14 Jan 2015 - 5:46 pm | बॅटमॅन
खी खी खी, एकच नंबर =)) =)) =)) अतिशय नेमके =))
14 Jan 2015 - 6:35 pm | प्रसाद१९७१
कुठल्या जमान्यात आहात आदूबाळ. मुलाचे लग्न होण्यासाठी फक्त मुलगी असावी एव्हडीच अपेक्षा असावी अशी वेळ आली आहे.
14 Jan 2015 - 7:14 pm | आदूबाळ
नाही हो. माझ्या जवळच्या नातेवाईकांचं जुन्या पद्धतीचं वधूवरसूचक मंडळ आहे. तिथल्या निरीक्षणानुसार अजून तरी इतकी वाईट परिस्थिती आल्याचं जाणवलं नाही. म्हणजे मुलांच्या वीस फायली असतील तर मुलींच्या जवळजवळ तेवढ्याच. (अर्थातच नक्की मोजून पाहिलं नाहीये.)
जेंडर रेशो बिघडल्याचं गेल्या १० वर्षांत ऐकायला मिळालं आहे. त्याआधी जन्मलेल्या, म्हणजे सध्याच्या उपवर मुलांबाबत तितकासा प्रॉब्लेम नसावा.