कार्टून्स आणि कॉमिक्स

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
9 Jan 2015 - 10:55 am

… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला . कॉमिक्स शी असणारा संबंध पण संपला . नंतर काही वर्षांनी सुट्टी घेऊन घरी आलो होतो . मी घरी पेपर वाचत बसलो होतो . आई भाजी निवडत बसली होती . बोलता बोलता माझ्या मित्रांचा विषय निघाला . आईने नितीन बद्दल सांगितलं ,"अरे तो नितीन आहे ना कुलकर्णी बाईचा . त्याला काहीतरी रोग झाला रे . पायातली ताकत च गेली . व्हील चेयर वर खुरडत फिराव लागत बिचार्याला . किती हुशार मुलगा होता आणि काय झाल बिचार्याच ." मला एकदम कसतरीच झाल . न राहवून कपडे चढवले . बाजूच्या कॉलनी मधल्या त्याच्या घरी घरी त्याला भेटायला गेलो . त्याची आई बाहेर देवासमोर दिवा लावून बसली होती .

"काकू नितीन आहे ?"

"हो आहे कि . उदगीरकर न रे तू ? बर्याच वर्षांनी आलास . नितीन मधल्या खोलीत आहे . भेटून घे . चांगल वाटेल त्याला . आताशा फारस कोणी येत नाही . "

मी खोलीत गेलो . नित्या पलंगावर आडवा पडून वाचत होता . जवळ गेल्यावर कळल . त्याच्या हातात पण सुपर कमांडो ध्रुव च पुस्तक होत . आजुबाजू ला पण कॉमिक्स पडली होती .
"आता नीट वाचल्यावर आणि या वयात कळतंय . सुपर कमांडो ध्रुव च भारी होता ." नित्या हसत हसत बोलला . मला काही बोलवेच ना . गळ्यात काहीतरी अडकल्यासारख झाल होत .

……… मी आणि बाबा दोघेही Tom & Jerry चे चाहते . आम्ही दोघेही एकत्रच ते कार्टून बघायचो . आणि मग सगळ घर हसण्या ने भरून जायचं . बाबा Tom च्या बाजूने तर मी jerry च्या बाजूचा . नेहमी शेवटी jerry च जिंकायचा . मग बाबा माझ्या पाठीवर बुक्का मारून म्हणायचे , " अगली बार ." पण ती अगली बारी कधीच नाही आली . एकदा मी उसासून बाबाना म्हणालो , " का तुम्ही नेहमी हारणाऱ्या Tom ची बाजू घेता ?" एकदम हसणार्या बाबांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आल , "ते तुला अजून काही वर्षांनी कळेल ." आता मी तिशीत आहे . अजून पण वेळ मिळेल तस टोम &जेरी बघतो . बाबा त्यावेळेस काय म्हणाले होते ते आता कळत आहे . हा साला जेरीच खोड काढतो टोम ची . आणि आकाराने मोठा असून पण भाबडा Tom नेहमी जेरी कडून मार खातो . साला जेरी च दुष्ट आहे . गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट .

…… ज्यादिवशी नांदेड वरून काका आणि आजोबा येणार असत त्यादिवशी मी एकदम खुश असे . येताना ते माझ्यासाठी खूप कॉमिक्स घेऊन येत . एकदा असेच ते आले तेंव्हा त्यांच्या हातात कॉमिक्स नव्हते . माझा चेहरा उतरला . "अरे पुढच्या वर्षी दहावी न तुझी . आता तु मोठा झालास . आता कसले कॉमिक्स वाचतोस . " मामा ने बहुतेक माझ्या मनातले भाव वाचले असावेत .
मी मोठा झाल्याच माझ्या अगोदर इतराना कळल होत . मोठ झाल्यावर कॉमिक्स वाचता येत नसतील तर काय करायचं मोठ होऊन . मी कमवायला लागल्यावर घर भरून कॉमिक्स घेईल असा बेत मी आखला होता . मी बघितलेलं भविष्य काळासाठीच ते पाहिलं स्वप्न होत . स्वतःच अस काहीतरी . त्यादिवशी ते तुटल . आणि हि तर फ़क़्त सुरुवातच होती .

……… नौकरी ला लागल्यावर पहिले भाड्याने flat घेतला . आता कुणासोबत आपली स्पेस शेयर करायची गरज नव्हती . एक टीवी पण घेतला . डिश टीवी वाल्याच्या दुकानात गेलो . तो मला वेगवेगळे packages समजावून द्यायला लागला . पण कामाच तो काही बोलेना . शेवटी न राहवून मीच बोललो , "मुझे कार्टून चानाल्स भी चाहिये . मुझे कार्टून देखना अच्छा लगता है ." त्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेले सहानुभूतीचे भाव अजून पण डोळ्यासमोरून जात नाहीत .

कार्टून्स आणि कॉमिक्स ने प्रचंड आनंदाचे क्षण दिले आहेत त्या सर्व क्षणांसाठी हा लेखन प्रपंच . आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

Pain6's picture

15 Jan 2015 - 2:04 pm | Pain6

सुमीत चा फास्टर फेणे पण खासच

तो कुठे उपलब्ध होऊ शकेल का? फाफआ, बिपीन बुकलवार वगैरे फार आवडायच लहानपणी

पिंपातला उंदीर's picture

14 Jan 2015 - 7:22 pm | पिंपातला उंदीर

लै भारि

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jan 2015 - 2:42 am | निनाद मुक्काम प...

सिंदबाद म्हटला कि डोळ्यासमोर येतो
ते अलिफ लैला
रामानंद सागर ची अजरामर प्रस्तुती
एखाद्या छोट्या मजकुराएवढे एक उर्दू वाक्य
आणि सिंदबाद ची तलवारे सुलेमानी
आणि विलासराज

कहर's picture

15 Jan 2015 - 11:54 am | कहर

चिमा मस्त कि हूल हूल *diablo* ]:->

कहर's picture

15 Jan 2015 - 11:13 am | कहर

मस्त धागा

लहानपणी आत्या मावशी वगैरे पाहुण्यांनी खाऊसाठी दिलेले एक दोन रुपये साठवून १०-१५ रुपये साठले कि बस स्थानकावरच्या बुक डेपो मधून कॉमिक्स आणायचो ( त्याच दुकानात मिळायची)। चाचा चौधरी,शक्तीपुत्र , अग्निपुत्र अभय, फौलादी सिंह आणि किती किती कॉमिक्स जमवली होती । अजूनही एक पिशवी भरून आहे … सध्या dl करूनच वाच्तो…
x men , iron man , avenger आणि नागराज, ध्रुव, भोकाल ,भेरीया, डोगा, परमाणु, योध्द्ध असे कितीतरी कॉमिक्स ने जवळपास २०-३० gb जागा नक्कीच भरली असेल laptop ची

सध्या ध्रुव चे Hunters , मल्टीस्टारार सर्वनायक - सर्वसंहार प्रकाशित झाले आहे । नागराज च्या नरकाहुति आणि क्षतीपुर्ती च्या प्रतीक्षेत आहे

(नागराज का ) कहर

पिंपातला उंदीर's picture

15 Jan 2015 - 8:41 pm | पिंपातला उंदीर

x men , iron man , avenger आणि नागराज, ध्रुव, भोकाल ,भेरीया, डोगा, परमाणु, योध्द्ध असे कितीतरी कॉमिक्स ने जवळपास २०-३० gb जागा नक्कीच भरली असेल laptop ची

कस जमवलत? दोउन्लोड कुठुन केल?

इंग्रजी कॉमिक्स साठी torrent आणि हिंदी साठी http://comicscollection.blogspot.in

पिंपातला उंदीर's picture

16 Jan 2015 - 4:03 pm | पिंपातला उंदीर

धन्यवाद : )

Pain6's picture

15 Jan 2015 - 2:02 pm | Pain6

Transformers चा उल्लेख कसा झाला नाही अजून?
मायकेल बेने चित्रपटांचा चुथडा केला असला तरी मूळ मालिका भारी होत्या.

सौंदाळा's picture

15 Jan 2015 - 3:32 pm | सौंदाळा

चाचा चौधरी, पिंकी बरोबर बांकेलाल पण खुप वाचायचो.
शेंडीवाला बांकेलाल अडचणीत सापडलेल्या राजाला मदत करायचा.
ही बघा लिंक

अजून पोपोय हि आठवला नाही का कुणाला ? हिरव्या पालेभाज्या नावडणार्या अमेरिकन मुलांना spinich (पालक) खाण्यात रस निर्माण व्हावा म्हणून या कार्टून पात्राची निर्मिती झाली …. त्याच्या हिंदी अनुवादात gf ऑलिव ला मेघना एरंडे नि आवाज दिला होत…

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jan 2015 - 3:26 am | निनाद मुक्काम प...

आंजा च वेग चांगला असेल तर प्रत्यक्ष रेषेवर वाचण्यासाठी
हि साईट लय भारी आहे.

खंडेराव's picture

4 Mar 2015 - 5:33 pm | खंडेराव

गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट .

बरोबर.

कार्टुन्स आवड्ने हे निर्भेळपनाचे लक्सन वाटते मला.