आर्ट ऑफ द स्टेट

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
1 Jan 2015 - 8:42 am

नेहमी सारखा तो दिवस उगवला, म्हणजे सुर्य उगवला आणि दिवस सुरु झाला, दोन चार दिवसापुर्वीच परीक्षा संपलेल्या असल्यानं घरातली सकाळची गडबड शांत झालेली होती, तरी पण वर्षभराच्या सवयींनं सगळं घर जागं झालेलं, अर्थात त्या जागेपणावर आळसाची एक मस्त साय आलेली होती.

मी, बायको अन दोन्ही पोरी सगळेजण निवांत बेडवर लोळत होतो, दोन्ही पोरींचं लाथा आणि उशीयुद्ध मधुन मधुन नियंत्रित करत, रविवारची सकाळ कुणाच्या घरी धाड घालावी यावर आम्ही दोघंही स्वतंत्र विचार करत होतो.

एका क्षणी, दोघांचा एकदमच आवाज आला, ''बंडाकडं जायचं ?'', आता एकमेकांना एकच प्रश्न विचारला म्हणजे उत्तर होकारार्थीच असणार होतं, ही दोन लेकरं आमच्या आयुष्यात येण्याआधी आम्हां दोघांचं असं एकमत फार दुर्मिळ होतं, पण या दोन लेकरांनी त्या असहमतीच्या वेड्या वाकड्या काठ्या मोडुन टाकल्या होत्या, दोघांचे प्रखर इगो विरघवळुन त्याचाच नॉर्थन लाईट सारखा विस्मयकारक शो दोन लेकी आम्हाला दाखवायच्या.

पण बंडाकडं जायचं म्हणजे सोपं काम नव्हतं, सगंळ्यांत महत्वाचं बंडा कुठंतरी ट्रेस होणं, दर रविवारी ' मी माझा' याला वाढवुन 'आम्ही आमचे' तत्त्वात फिरणारे बंडा आणि त्याचं कुटुंब, घरी असेल किंवा नाही याची खात्री नसायची. बायकोनं आमच्या दोघांत दहा-वीस केलं आणि निर्णय दिला की फोन करायची पाळी तिची आहे, मी पुन्हा पांघरुणात गुरफटुन गेलो आणि ही गेली बंडाला फोन करायला.. दोनच मिनिटांत हॉल मधुन हिचा आवाज आला. ' अहो, तुमचा फोन बंद पडला आहे, रात्री चार्जरचं बटण चालुच केलं नव्हतं आणि वायफाय चालु राहिलं बहुतेक, काय करु ?', अंथरुणातुन न उठताच मी ओरडलो, ' चार्जिंगला लाव ना मग, होईल पाच मिनिटात चालु,' , ओके बॉस, आणि उठा आता मी कॉफि करते आहे, चला लवकर - इति बायको हॉलमधुन. आई कॉफि करणार आहे, दोन्ही पोरींनी ऐकलं आणि उशा तशाच टाकुन, 'बाबाला सुट्टी आवरायची डुट्टी' हा नियम ऐकवुन बाथरुममध्ये गेल्या पण. अशा क्षणांना मी जगुन घेतो, आपल्याच संसाराकडं थोडंसं त्रयस्थ नजरेनं पाह्तो आणि डोक्यात ' लागो न द्रुष्ट माझी माझ्याच संसाराला' म्हणुन घेतो..

बेड आवरुन, सकाळची आन्हिकं आवरुन हॉलमध्ये येईपर्यंत, बायकोच्या दोन वेळा आणि पोरींच्या दहा वेळा हाका मारुन झाल्या होत्या. हॉल मध्ये पेपरच्या पसा-यात आमच्या घरातली बहुमतातली मेंबरं बसुन होती. एवढ्या वेळात फोन चालु झाला म्हणुन मी बंडाला फोन लागतोय तो पाहतोय तर, फोन ढिम्मच, निदान चार्जिगचा सिग्नल देखिल येत नव्हता. 'तुझा फोन बघु ग, ह्याला काही तरी झालंय पुन्हा', असं म्हणुन बायकोचा फोन घेउन बंडाला फोन लावला, तर त्याचा फोनमधुन 'आप कतार में और हम सतार में' हे ऐकु आलं. कॉफि पिउन मगच बघुया असं म्हणुन कॉफि प्यायला बसलो. सुडोकु, शब्दकोडं आणि ठिपके जोडुन हत्ती बनवा हे करुन झाल्यावर, पुन्हा फोन लावला बंडाला तर पुन्हा तेच 'आप कतार में और हम सतार में'. मग चिडुन पुन्हा माझ्या फोनकडे नजर फिरवली, साहेब अजुन ढिम्मच होते. तिकडुन ओठाच्या कोप-यातुन बायको हसत म्हणाली, ' घ्या अजुन घ्या साडेपाच ईंची फोन सात हजारात, काय तर म्हणे कार्बन, मी तर या नंतर हेलियमचा फोन घेणार आहे, एकदम हवासेभी हलका'. तिच्या जवळ जाउन कानात खुसपुसलो, बट साईझ ड्झ मॅटर मॅडम'. आणि तिनं तिचा फेवरिट प्रश्न विचारला, ' स्वल्पविराम कुठं, ?' आणि अजुन एका रविवारची सुरुवात मनमुराद हास्यानं झाली.

' चल गं, मी आंघोळ आवरुन घेतो, तु ट्राय करत रहा तुझ्या फोन वरुन' असं म्हणत मी सटकणार, तर लगेच ऑर्डर आली, ' एक नग घेउन जा विसळायला, दुसरा मी विसळते', चला धाकटीला उचलुन संडे बाथची मज्जा असं म्हणत बेडरुम मध्ये निघुन गेलो. शॉवरच्या गार पाण्यात चांगला अर्धा तास घालवल्यावर त्या पाण्याच्या आवाजाच्या वरताण बायकोचा आवाज आला तसं पोरीला बाहेर पिटाळ्लं आणि लगेच मीपण आवरुन घेतलं, बाहेर येउन पाह्तो तो मोठी कन्या आणि बायको, कपाटातुन जुना टॅब काढुन त्यात सिमकार्ड घालुन तो चालु करुन बसल्या होत्या, त्यावरुन फोन लावत बंडाला. मला पाहुन कन्या बोलती झाली ' बाबा हा टॅब सारखा हँग होतो आहे, मध्येच एक फाईल उघडते सारखी, खुप जुना आहे ना रे, किटकॅट टाक ना यात.

रविवारीच मंडे ब्लुच नाही तर ब्लुच्या सगळ्या शेड डोक्यात घुमायला लागल्या...' हज्जार वेळा वाद झालेत ना त्या टॅबवरुन मग का पुन्हा चालु केला आज, काय हौस आहे एवढी रिस्क घ्यायची, आधुनिक काळातला पेशव्यांचा उजव्या सोंडेचा गणपती आहे हा, आणि आता बंद सुद्धा होत नाहीये, ' तो टॅब बेडवर आपटत मी बोललो. ' अरे पण मग ठेवलासच का घरात, का नाही देत टाकुन तळ्यात, जादुच्या दिव्याची जादु हवीय पण धुर नकोय हे कधीपर्यंत चालणार. निदान आतातरी घाल बत्ता त्यावर, ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी, आहे का दम तेवढा ?' दोन्ही पोरी बाहेर टिव्हीला चिकटवुन बेडरुमचा दरवाजा लावुन आम्हां दोघांचा वाद चालु होता.

' तुझं काय नुकसान केलं होतं मी ? हा एकच प्रश्न जवळ्पास २९७ पानं टाईप केलेला होता, आणि हा आकडा वाढतच होता.

बायको, आणि पोरी तिच्या भावाकडं गेल्यावर हॉलमध्ये एकटाच बसुन त्या टॅबकडं पाहात होतो, आणि शेवटी धीर करुन हात उचलला, आणि टाइप केलं..

' हेम्या, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी, त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर.'

कथातंत्रराहणीविरंगुळा

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

1 Jan 2015 - 8:54 am | सतिश गावडे

नविन वर्षाच्या शुभ मुहुर्तावर केलेल्या पुनरागमनाचे स्वागत !!!

आणि हेम्या रॉक्स !!!

सस्नेह's picture

1 Jan 2015 - 9:06 am | सस्नेह

पुनरागमनार्थ स्वागत !
क्रमशः आहे काय ?

नाखु's picture

1 Jan 2015 - 9:18 am | नाखु

हेम्या आणि "हेम्या कर्त्याचे" स्वागत.

चौकटराजा's picture

1 Jan 2015 - 9:27 am | चौकटराजा

पन्नासू परतुनि आला
मोद सग्याला झाला
चेव "ग्रूप" ला आला
२०१५ माजी

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2015 - 12:11 pm | अत्रुप्त आत्मा

@२०१५ माजी >> +++१११ ( ;) )

वेलकम बॅक! ( की आफ्टर पॉझ.. म्हणू!? ;) )

प्रसाद१९७१'s picture

1 Jan 2015 - 9:34 am | प्रसाद१९७१

कळले नाही

नावातकायआहे's picture

1 Jan 2015 - 11:38 am | नावातकायआहे

झेपले नाही...

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2015 - 12:10 pm | अत्रुप्त आत्मा

असेच काहिसे..शेवट कळ्ळा नै!

@एक नग घेउन जा विसळायला, दुसरा मी विसळते', >> हे वाक्य मात्र कहर! =))

..वा वा पन्नासराव.. या या.. कुठे गायबलेलात..??

...

प्रचेतस's picture

1 Jan 2015 - 10:42 am | प्रचेतस

वेलकम ब्याक ५० आणि हेम्या.

काळा पहाड's picture

1 Jan 2015 - 12:07 pm | काळा पहाड

शेवट जरा समजावून सांगाल काय? हेम्या कोण?

पैसा's picture

1 Jan 2015 - 12:14 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/19455 ही मालिका वाचा.

नावातकायआहे's picture

1 Jan 2015 - 12:20 pm | नावातकायआहे

आठवला हेम्या...
धन्यवाद पैसा ताई!

पैसा's picture

1 Jan 2015 - 12:09 pm | पैसा

हेम्या इस ब्याक! मजा आली!! क्रमशः विसरलंय ना?

साती's picture

1 Jan 2015 - 1:17 pm | साती

क्रमशः राहिलंय ना?

सविता००१'s picture

1 Jan 2015 - 3:06 pm | सविता००१

होतात कुठे?
हेम्या वाचून परत तेवढीच मज्जा आली.

अजून हे भूत त्या टॅबातच बसलयं?

बाकि ती बहूमतातली मेंबरं....अग्गाअगागा!!

मुक्त विहारि's picture

1 Jan 2015 - 7:01 pm | मुक्त विहारि

आज ऑफीसमधली कामे निपटली आणि ह्या हेम्याचा शोध घेतला...

सुसाट लिहीले आहे....

(आता हेम्या-पार्ट-२ प्रतिक्षेत.)

नि३सोलपुरकर's picture

2 Jan 2015 - 12:43 pm | नि३सोलपुरकर

वेलकम बॅक!

होतात कुठे ?.....

मा. संपादक यांनी दिलेली लिंक वापरून लिंक लावून लेख वाचला.

अप्रतिम कथा.

धन्यवाद!!

किसन शिंदे's picture

3 Jan 2015 - 4:11 am | किसन शिंदे

वेलकम बॅ़क पन्नास!!