लहरत लहरत आली बहरत
साद मिळाली प्रेमाची
मंद धुंद ही गो...ड सुगंधी
कस्तुरि पहिल्या प्रेमाची
हाय तिचा तो चेहेरा मोहक
डोळे धुं....दं शराबी हो
तन ही नाजुक ,नाजुक काया
कांती त्यात गुलाबी हो
हातावरची मउ-मेहेंदि ती
जितक्या नाजुक रेषा हो
मनावरी ती भिनता होते
मोहक मोहक स्पर्शा हो!
संवादी ते शब्द असे की
श्रवणाने ऐकावे हो
शब्द शब्द ही शीतल छाया
शांत मना निजवावे हो.....!
भोग नव्हे तो योग सुगंधी
नशिबाच्या पलिकडला हो
जगता जगता हाती आला
नशिबाही तो हुकला हो!
एक सुगंधा आली बहरत
सुगं.........ध देऊन गेली हो
चार दिसांची अल्लड सोबत
जगणे जगणे झाली हो
=======================
.
अतृप्त..
प्रतिक्रिया
22 Dec 2014 - 1:18 pm | मदनबाण
हाय तिचा तो चेहेरा मोहक
डोळे धुं....दं शराबी हो
तन ही नाजुक ,नाजुक काया
कांती त्यात गुलाबी हो
आहाहा... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
22 Dec 2014 - 1:20 pm | गौरी लेले
आहा !
कित्ती सुंदर हळुवार कविता आहे ही . बरेच दिवसांनी असे काही वाचायला मिळाले :)
भोग नव्हे तो योग सुगंधी
नशिबाच्या पलिकडला हो
जगता जगता हाती आला
नशिबाही तो हुकला हो
ह्या ओळी फार आवडल्या . एखादा सुगंध हाती येता येता अलगद निसटुन जाणे ही वेदना काही औरच !
फार सुरेख कविता अत्रुप्त आत्माजी !
लिहित रहा :)
22 Dec 2014 - 1:37 pm | अनुप ढेरे
आवडली कविता. चालीत म्हणता येईल अशी!
22 Dec 2014 - 1:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आरतीच्या चालीत म्हणून पाहिली मजा आली.
अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो|
प्रतिपदेपासूनी ती घटस्थापना करूनी हो|
मूलमंत्र जप करूनी भोवते रक्षक ठेवूनी हो|
ब्रम्हाविष्णूरुद्र आईचे पूजन करीती हो|
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
-दिलीप बिरुटे
22 Dec 2014 - 2:49 pm | सस्नेह
धुंद शराबी डोळे अन गुलाबी काया अचानक सिंहावर बसून गर्जत डोळ्यांना सामोरी आली *lol*
22 Dec 2014 - 1:40 pm | प्रसाद गोडबोले
ही कवित नक्की बुवांनीच लिहिली आहे का की कोठुन तरी ढापली आहे ? अशी जोरदार शंका उपस्थित करीत कविता अत्यंत आवडल्याचे नोदवत आहे !
तुफ्फान जबरदस्त कविता ओ बुवा :)
22 Dec 2014 - 1:56 pm | प्रचेतस
काय ओ आत्मूदा, सध्या खूप मोकळा वेळ मिळतोय वाट्टं.
तुमच्या लेखनातील विविधतेचे कौतुक करावेसे वाटते.
जिलबीपाडू विडंबनातून जितक्या सहजपणे भावविश्वात रमता तितक्याच सहजतेने व्यसन आणि देवांची तुलना करून एखाद्या सुगंधी लेखातून पुढे जात जात सुगंधी कविता लिहिता.
कविता आवडलीच. तुफ्फान झालीय.
22 Dec 2014 - 2:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुप दिवस झाले रसग्रहण पाडले सॉरी केले नव्हते आज सायंकाळी कवितेचं रसग्रहण करतोच करतो.
-दिलीप बिरुटे
22 Dec 2014 - 2:37 pm | सूड
आयडी हॅक झालाय का तुमचा?
22 Dec 2014 - 3:14 pm | वेल्लाभट
गुड वन्न ! ! ! !
22 Dec 2014 - 3:53 pm | प्यारे१
वा बुवा! सुंदरच.
'बघायला' जाताना ही कविता घेऊन जा बरोबर आणि म्हणा.
येताना 'तिला'च घेऊन याल.
>>>>चार दिसांची अल्लड सोबत
>>>>जगणे जगणे झाली हो
ह्याचं रुपांतर
'चार दिसांची अल्लड सोबत
साथ आयुष्याची व्हावी हो!'
असं व्हावं हीच त्या 'सत्यनारायणा'चरणी प्रार्थना. :)
अवांतरः 'डाव्या' हाताच्या बुवांनी आज 'उजवा' हात वापरलेला दिसतोय. ;)
22 Dec 2014 - 11:22 pm | अत्रुप्त आत्मा
मदनबाण
@आहाहा... Wink >>> बाणोबा ..निवड्क आहात हं अगदी! :-D
===========================
गौरी लेले
@फार सुरेख कविता अत्रुप्त आत्माजी ! >> फेसबुकि मराठी..
@लिहित रहा>> नक्कीच!
===========================
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@आरतीच्या चालीत म्हणून पाहिली मजा आली.>> :-D धन्य हो आपुली हो! :-D
@खुप दिवस झाले रसग्रहण पाडले सॉरी केले नव्हते
आज सायंकाळी कवितेचं रसग्रहण करतोच करतो.>>> वाटिंग... ;) आपलं ..ते..हे...वेटिंग!
===========================
स्नेहांकिता
@धुंद शराबी डोळे अन गुलाबी काया अचानक सिंहावर बसून गर्जत डोळ्यांना सामोरी आली>> =)) _/\_ =))
===========================
प्रगो
@ही कवित नक्की बुवांनीच लिहिली आहे का की कोठुन तरी ढापली आहे?>> हो....य महाराजा! म्याच लिवलिया.
(याचा पुरावा..प्रत्यक्ष भेटीत दाखवेन..मंजे.................
डायरीत काहि ओळी खरडल्या होत्या..सुरवातीच्या..त्याचा पुरावा! *mosking* )
@तुफ्फान जबरदस्त कविता ओ बुवा Smile>> धन्यवाद.
===========================
वल्ली
@काय ओ आत्मूदा,सध्या खूप मोकळा वेळ मिळतोय वाट्टं.>> मला नाही तसं वाटत...असो!
@तुमच्या लेखनातील विविधतेचे कौतुक करावेसे वाटते.>> *mosking* कित्ती ते...?, व्बॉर..,धन्यवाद. :D
@जिलबीपाडू विडंबनातून जितक्या सहजपणे >>> हां.....आत्त्ता कस्सं ग्गार..ग्गार वाटलं बरं! :COOL:
@भावविश्वात रमता तितक्याच सहजतेने व्यसन आणि देवांची तुलना करून एखाद्या सुगंधी लेखातून पुढे जात जात सुगंधी कविता लिहिता. >> हम्म्म्म्म...
@कविता आवडलीच. तुफ्फान झालीय. >> धन्यवाद.
===========================
सूड
@आयडी हॅक झालाय का तुमचा? >> मला स्वतःला अजुनंही तसं वाटत नाहि! ;)
===========================
@प्यारे१ >> संपूर्ण प्रतिसाद,त्यातील भावना,आणि काहि विशेष निरिक्षणात्मक कल्पित सद् भावनांबद्दल,मनःपूर्वक आभार/हाबार!
===========================
23 Dec 2014 - 9:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता- सर्वसामान्य वाचकांचं कवितेबाबत काय मागणं असतं तर ती कविता कळली पाहिजे. कवितेतून निर्भळ आनंद मिळाला पाहिजे. काव्यातून केल्या जाणार्या शब्दांच्या क्सरतीपेंक्षा कवितेतला आशय सहज वाचकाच्या र्ह्दयाला भिडला पाहिजे. अ.आ. यांची कविता अतिशय साधा वेश परिधान करुन आलेली आहे. 'सुगंध' हा कवितेचा आत्मा आहे. कवितेतला प्राण म्हणजे आशय आणि आकृतीबंध या दोन्ही गोष्टी परिपूर्ण अशा दिसतात. चार चार ओळी दिसत असल्या तरी त्या कोणत्या एका वृत्तात आहेत असे म्हणता येणार नाही. अक्षर संख्या नियमित नाही म्हणुन ही कविता तशी मुक्तछंदातली अशी आहे.
कविवर्य मंगेशपाडगावकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की ' जीवनातील नानाविध अनुभव कवी घेत असतो, या अनुभवातून कलाकृतीची बीजे त्याला दिसतात. या अनुभवाची प्रकृती त्याच्या मनाला जशी जाणवते तशी तो छंद,वृत्त, एकुण रचना यांची निवड तो करीत असतो. एखादा अनुभव तो बोलीभाषेची लय पकडून मुक्तछंदात व्यक्त करतो'' कवीनेही इथे आपला जिवनानुभवात आलेले काही अनुभव इथे मांडले आहे. 'हो' या शब्दातून व्यक्त झालेले नाद आणि ताल हा त्यांच्या व्यवसायातुन आलेला आहे आणि तो इथे यमकाचे काम करतांना दिसतो. कवितेला एक नाद, ताल, लय प्राप्त व्हावी हाच त्यांचा उद्देश आहे. आरती परंपरेतील आकृतीबंध त्यांनी इथे निवडलेला दिसतो.
कवितेच्या आशयाबाबत म्हणाल तर केवळ 'दरवळणारा सुगंध' एकच विषय आहे परंतु वाचकांनी ती आपल्या कल्पनेच्या पातळीवर आस्वाद घेतला तर ती प्रेम कविता वाटण्याचीच जास्त शक्यता आहे. कवीच्या आयुष्यात 'कस्तुरी' आणि 'सुगंधा' अशा दोन स्त्रीया आल्या असाव्यात असेही म्हणता येऊ शकते. (हान) आणि या दोघी कशा तर अत्तराच्या किंवा चाफा मोगरा या फुलाच्या सुगंधासारख्या त्या कवीच्या आयुष्यात दरवळत आहेत असेही म्हणता येते.
कस्तुरी- कस्तुरीमृगाच्या बेंबीत सापडणारे, काळ्या रंगाचे एक सुगंधी द्रव्य हा तसा साधा शब्द आणि ज्याच्याकडे आहे त्याला त्याचा गंध नाही. आपण करतो ते प्रेम त्यांच्यापर्यंत नीट पोहचत नाही, एक अस्वस्थता कस्तुरी शब्दातून प्रकट होतांना दिसते. गंध आहे पण दिसत नाही, येत नाही. आणि असेल असा दरवळ तर लहरत लहरत बहरत येतोय. स्त्रीचं वर्णन प्राचीन काळातील वाड:मयातून दिसून येतो त्याच परंपरेतून इथेही स्त्री देहाचं वर्णन येतांना दिसतं. आधुनिक काळात स्त्री काय प्रदर्शनाची वस्तू आहे काय या मताला छेद देऊन त्यांनी कवितेत स्त्रीचा मोहक चेहरा, ते डोळे, ’तन आणि काया’ याबद्दल वर्णन केले आहे. ’तन आणि काया’ एकाच अर्थाचे शब्द परंतु कवीने नाजुकपणा व्यक्त करायचा म्हणुन ते शब्द वापरल्याचे दिसते. स्त्रीयांना मेहंदी लावायला आवड्तं. मेहंदी काढणे ती पाहणे आणि अतिशय सुंदर नक्षीकामात तल्लीन होऊन जाणे हा अनुभव देहभान हरपुन जाण्याचा. आणि अशा या सुंदर मेहंदीने प्रियकराला केलेला स्पर्श एक हवाहवासा आणि त्या आठवणींचा दरवळ मेहंदीतून कवीला इथे येतांना दिसतो. कोणत्याही आवडत्या व्यक्तीच्या काही आठवणी असतात, काहींना मेहंदी, काहींना गोड आवाज, काहींना चाफा-मोगरा, काहींना पायातले पैंजन, तोडे, याची आठवण येते कवीला तिचा आवाज गोड वाटतो. संवाद हवाहवासा वाट्तो, संवाद न थांबणारा असा असावा असे वाटत असते. तिचे शब्द ट्ळटळीत उन्हातला गारवा, सावली असते. प्रेमात पडल्यानंतर सर्वच क्षण आनंदाचे नसतात. कवी इथे भोग असा शब्द वापरतो, भोग हे वाईट कर्माचे फळ या अर्थाने वापरतात परंतु इथे कवी भोगांनाही सुखाचे क्षण मानतो, त्यातही ही सुगंध दडलेला दिसतो. दरवळणारा सुगंध येतो आणि निसटून जातो. हातात आहे आणि निसटून गेला ही भावना इथे दिसते. आयुष्याच्या रहाट्गाड्यात 'सुगंध' एक जगणं झालं असे कवी म्हणतो.
साधे शब्द, वृत्ताचा सोस नाही, ओढून ताणुन केलेली शब्द रचना नाही, सहज मंत्र म्हणता म्हणता हे स्फुरलेलं काव्य. अधिक वाचन आणि कवी कल्पनेचा उत्तम वापर करुन, संयम ठेवून, उत्तम रचना पुढेही या कवींच्या येतील, अस वाटते, पुढील लेखनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
-दिलीप बिरुटे
23 Dec 2014 - 9:55 am | प्रचेतस
अतिशय सुरेख रसग्रहण.
बिरुटे सरांनी कवीचं मनोगत नेमकं टिपलंय असं जाणवतंय.
हे तर अगदी परफेक्ट.
वास्तववादी, प्रत्ययकारी रचनाकार असे आम्ही उगीचच नाही म्हणत.
23 Dec 2014 - 12:33 pm | अत्रुप्त आत्मा
बिरुटे सर,
पहिल्यांदा मनःपूर्वक धन्यवाद.
आता रसग्रहणा विषयी..
@अ.आ. यांची कविता अतिशय साधा वेश परिधान करुन आलेली आहे. 'सुगंध' हा कवितेचा आत्मा आहे.>>> बरोबर. फक्त या आत्म्याचे मूळ एका सर्वांग सुंदर स्त्री चा फोटो आहे. (कविता येण्याआधी फक्त काहि क्षण फेसबुकावर पाहिलेला!) तरिही असं म्हणावं का?,की ही कविता म्हणजे फक्त त्याच एका स्त्री'ची..तर नाही..!!! अश्या कित्येक मंत्रमुग्धा यापूर्वीही पाहाण्यात आलेल्या आहेत.या नंतरही पहाण्यात येणार आहेतच. मग नेमके त्या फोटोचे वेगळेपण काय? तर तिचे डोळे या सर्व गोष्टी..,ज्या मी मांडल्या त्या.., अतीशय सहज पणे बोलत होते! बस्स!!! मला ते ऐकू यायला लागले,आणि कविता संपेपर्यंत नंतर दुसरे काहिच दिसले नाही. सुगंध सापडला तो तिथुन! (आणि सदर काव्याच्या काहि वेळा पूर्वीच माझ्याच कस्तुरीहीनाच्या धाग्यावर मी कस्तुरीचे गुणगान करत होतो. त्यात कस्तूरीच्या सुगंधाचं मी जे वर्णन केलय(आणि अनुभवलय..) तशीच ही स्त्री/किंबहुना तिचा तो फोटो होता.)
@म्हणुन ही कविता तशी मुक्तछंदातली अशी आहे.>> ठिक.. लिहिताना तर ,मुक्तछंद आहे किंवा काय? असं काहिही मनातच नव्हतं..(आणि इतर कवितांचे वेळीही ते असंही मी कधी पाहात नाही,मला जाणच नाही तेव्हढी त्यातली!) त्यामुळे आता पुन्हा या कवितेकडे पहाताना,मी तिला मुक्तछंद म्हणण्यापेक्षा छंदमुक्ति म्हणेन! तेच अधिक वास्तविकंही होइल माझ्यासाठी.
@कविवर्य मंगेशपाडगावकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की ' जीवनातील नानाविध अनुभव कवी घेत असतो, या अनुभवातून कलाकृतीची बीजे त्याला दिसतात. या अनुभवाची प्रकृती त्याच्या मनाला जशी जाणवते तशी तो छंद,वृत्त, एकुण रचना यांची निवड तो करीत असतो. एखादा अनुभव तो बोलीभाषेची लय पकडून मुक्तछंदात व्यक्त करतो>>> अतीशय अचूक. +++++११११११
@ कवीनेही इथे आपला जिवनानुभवात आलेले काही अनुभव इथे मांडले आहे.>>> अनुभव नव्हे,फक्त अनुभूती!
@'हो' या शब्दातून व्यक्त झालेले नाद आणि ताल हा त्यांच्या व्यवसायातुन आलेला आहे आणि तो इथे यमकाचे काम करतांना दिसतो.>>> नाही नाही...अजिब्बात नाही.
@कवितेला एक नाद, ताल, लय प्राप्त व्हावी हाच त्यांचा उद्देश आहे.>> हे कदाचित खरं असेल्,त्यावेळी लिहिताना असं कुठेतरी मला जाणवलं असेल
@आरती परंपरेतील आकृतीबंध त्यांनी इथे निवडलेला दिसतो. >> तेच वरचं म्हणतो परत. नाही नाही...अजिब्बात नाही.निवड करण्याइतका मी स्वतंत्र होतोच कुठे त्यावेळी..मी पूर्णतः त्या फोटोत अडकलेला होतो.( क्या बेहोशी है वो..और उसकी सुंदरता! हाय..हाय..!) मला असं वाटतं,की तुंम्ही माझ्या पौरोहित्याच्या व्यवसायामुळे त्या रचनेच्या प्रकाराकडे असं बघितलत्,पण ते चुकून किंवा नकळतंही माझ्या हातून घडलेलं असण्याची शक्यता नाही.कारण ज्या आरती'शी तुंम्ही तुलना केलेली आहे. ती आमच्या रोजच्या म्हणण्यातली आरती तर नाहीच,शिवाय मी सदर आरती गेल्या १५ वर्षात फारतर (खरोखर..) नगण्य वेळा म्हटलेली आहे. त्यामुळे तीचं बीज माझ्यात आलेलं नाही,तर नकळत तरी कुठून असं ते नंतर येणार..??? मी दुसर्या कडव्यात ती ओळ लिहुन गेलो,आणि तुंम्ही म्हणता ते ताल,नाद,लय मला त्यातून मिळालं,एव्ह्ढच चपखल पणे खरं आहे. :)
@कवितेच्या आशयाबाबत म्हणाल तर केवळ 'दरवळणारा सुगंध' एकच विषय आहे >>> हे रुपकानी घेतलं तर खरच आहे.
@परंतु वाचकांनी ती आपल्या कल्पनेच्या पातळीवर आस्वाद घेतला तर ती प्रेम कविता वाटण्याचीच जास्त शक्यता आहे.>>> रैट्ट..रैट्ट... प्रेमकविताच!
@कवीच्या आयुष्यात 'कस्तुरी' आणि 'सुगंधा' अशा दोन स्त्रीया आल्या असाव्यात असेही म्हणता येऊ शकते. (हान)>>> नाय हो नाय! =)) तसे (अजुन) काहिही नाय! =))
@आणि या दोघी कशा तर अत्तराच्या किंवा चाफा मोगरा या फुलाच्या सुगंधासारख्या त्या कवीच्या आयुष्यात दरवळत आहेत असेही म्हणता येते. >>> वर कवितेचं कारण स्पष्ट झालेलं आहेच. त्यामुळे यावर अधिक लिहित नाही. तरी थोडसं सांगतो. मी मुलतः (अगदी लहानपणापासून) चित्र,फुलं,रंग,रसं,गंध,रांगोळ्या यातला माणूस! त्यामुळे त्यासमं असं काही बेहोष करणारं सौंदर्य कुठेही दिसलं की मला स्वतःला काही कळायच्या आत,मी त्यात संपूर्णपणे मिसळला गेलेला असतो. तेच झालं त्या फोटोमुळे! (बाकि आपण बांधलेला अंदाज फक्त अत्तरांच्या बाबतीत खरा आहे. ;) पण तो इतर बाबतीतंही खरा ठरावा,असे मनापासून वाटते! :D )
@कस्तुरी- कस्तुरीमृगाच्या बेंबीत सापडणारे, काळ्या रंगाचे एक सुगंधी द्रव्य हा तसा साधा शब्द आणि ज्याच्याकडे आहे त्याला त्याचा गंध नाही. आपण करतो ते प्रेम त्यांच्यापर्यंत नीट पोहचत नाही, एक अस्वस्थता कस्तुरी शब्दातून प्रकट होतांना दिसते. गंध आहे पण दिसत नाही, येत नाही. आणि असेल असा दरवळ तर लहरत लहरत बहरत येतोय.>> तुंम्ही बांधलेल्या अंदाजांनुसार,थोडसा गोंधळ झालाय कल्पनेच्या वापरात. पण असो..तो मुख्य मुद्दा नाही.
@स्त्रीचं वर्णन प्राचीन काळातील वाड:मयातून दिसून येतो त्याच परंपरेतून इथेही स्त्री देहाचं वर्णन येतांना दिसतं.>> रैट्ट..रैट्ट..
@आधुनिक काळात स्त्री काय प्रदर्शनाची वस्तू आहे काय या मताला छेद देऊन त्यांनी कवितेत स्त्रीचा मोहक चेहरा, ते डोळे, ’तन आणि काया’ याबद्दल वर्णन केले आहे. ’तन आणि काया’ एकाच अर्थाचे शब्द परंतु कवीने नाजुकपणा व्यक्त करायचा म्हणुन ते शब्द वापरल्याचे दिसते.>> *HAPPY* अगदी अगदी बरोब्बर! आणि सामान्यतः आपण ज्याला वासना म्हणतो,त्या वासने शिवाय जर का असं वर्णन येत असेल,तर ते मला आजंही नैसर्गिक आणि स्वाभाविक वाटतं! :)
@स्त्रीयांना मेहंदी लावायला आवड्तं. मेहंदी काढणे ती पाहणे आणि अतिशय सुंदर नक्षीकामात तल्लीन होऊन जाणे हा अनुभव देहभान हरपुन जाण्याचा.
आणि अशा या सुंदर मेहंदीने प्रियकराला केलेला स्पर्श एक हवाहवासा >>> कल्पनेनी का असेना? खरच मी संगतो,माझ्यासाठी असा स्पर्श म्हणजे..(खरच झाला तर! ;) ..) मुक्ति देणारा स्पर्श.
@आणि त्या आठवणींचा दरवळ मेहंदीतून कवीला इथे येतांना दिसतो.>>> बिरुटे सर!!!!!!!!!!!!!! पुण्याला आलात,तर माझ्याकडून एक मस्तानी हो तुम्म्हाला या परफेक्ट मॅच निरिक्षणा बद्दल! हाय..हाय..मेरे मन को ही बोल डाला..! फक्त यात "आणि त्या (कल्पना केलेल्या..)आठवणींचा दरवळ" असा उचित बदल मी करून घेतो. :)
@कोणत्याही आवडत्या व्यक्तीच्या काही आठवणी असतात, काहींना मेहंदी, काहींना गोड आवाज, काहींना चाफा-मोगरा, काहींना पायातले पैंजन, तोडे, याची आठवण येते कवीला तिचा आवाज गोड वाटतो. संवाद हवाहवासा वाट्तो, संवाद न थांबणारा असा असावा असे वाटत असते. तिचे शब्द ट्ळटळीत उन्हातला गारवा, सावली असते. >>> आता मी या स्त्रीला तिच्या लेखनातून भेटलेलो आहे. तिचे लेखन वाचलेले आहे. परस्पर ओळख म्हणाल..तर ती अजिबात नाही. सदर व्यक्ति माझ्या कलेची भरपूर तारिफ करणारी आहे. पण तरिही ते नातं एक कलाकर ते दुसरा कलाकार इतकच आहे. पण जसं तिचं सौंदर्य आहे,तसच लेखनंही आहे. म्हणून मला तो संवाद ऐकायला आला! बास्स...इतकेच. :)
@प्रेमात पडल्यानंतर सर्वच क्षण आनंदाचे नसतात. कवी इथे भोग असा शब्द वापरतो, भोग हे वाईट कर्माचे फळ या अर्थाने वापरतात परंतु इथे कवी भोगांनाही सुखाचे क्षण मानतो, त्यातही ही सुगंध दडलेला दिसतो. >>> नै ..नै..नै...चुकलं..चुकलं..चुकलं..काहितरी गडबड झाली. मी मला काय वाटलं ते सांगतो.
@भोग नव्हे तो योग सुगंधी >>>
@नशिबाच्या पलिकडला हो >>> अशी स्त्री जर का आपल्या सहजीवनात आली,तर स्वाभाविक पणे अनेक जणं त्याचा अनुषंग नशिब या घटनेशी जोडून तिथेच थांबतात. मला मात्र असं वाटतं,की माझ्या आयुष्यात अशी व्यक्ति माझ्या ओळखिची/सहजीवनाची होणे हा भाग,मी केवळ भोगाचा/उपभोगाचा/नशिबाचा भाग मानणार नाही. मला तो माझ्या जीवनधर्मामुळे(च) जुळून आलेला सुगंधी योग वाटेल.आणि म्हणून तो (कल्पित किंवा अज्ञानमूलक) नशिबाच्या पलिकडला आहे.
आणि असा तो हाती आलेला योग म्हणजे....
...........@जगता जगता हाती आला
नशिबाही तो हुकला हो! >> असा झाला. म्हणजे पात्रता/अनुरूपता नसतानाही केवळ समाजधर्मामुळे/संस्कृतीमुळे अशा स्त्रीचा योग आयुष्यात आला तर तो परंपरागत नशिबाचा-भाग असू शकेल. मी म्हटलेल्या (माझ्यासारख्याच्या..) जीवनधर्मामुळे असा योग हाती येणं,हे त्या परंपरागत नशिबाच्या हातूनंही हुकलेलं आहे,एका मर्यादेत..मीच ते त्याच्याकडून जिंकुन घेतलेलं आहे---असं मी त्या ओळितून व्यक्त केलेलं आहे. :)
@ दरवळणारा सुगंध येतो आणि निसटून जातो. हातात आहे आणि निसटून गेला ही भावना इथे दिसते.आयुष्याच्या रहाट्गाड्यात 'सुगंध' एक जगणं झालं असे कवी म्हणतो.>>> येस कल्पनेनी का असेना..? असा मनाला मिळणारा क्षणैक सुगंध,आपले "जगणे" होतोच. :)
@साधे शब्द, वृत्ताचा सोस नाही, ओढून ताणुन केलेली शब्द रचना नाही, सहज मंत्र म्हणता म्हणता हे स्फुरलेलं काव्य. >>> यात... "सहज मंत्र म्हणावे..तसे हे सहज स्फुरलेलं काव्य." असा बदल मी करवून घेतो. बाकि बरोबरच आहे. :)
@अधिक वाचन आणि कवी कल्पनेचा उत्तम वापर करुन, संयम ठेवून, उत्तम रचना पुढेही या कवींच्या येतील, अस वाटते, पुढील लेखनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. >>> माझा उत्साह आणि जबाबदारी वाढविणार्या या ओळिंबद्द्ल,पुन्हा एकवार मनःपूर्वक धन्यवाद!!! __/\__ आणि आभार!
==============================================
अतृप्त...
23 Dec 2014 - 1:33 pm | सस्नेह
__/\__ सुरस रसग्रहण !!!
24 Dec 2014 - 7:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्ली, बुवा, आणि स्नेहांकिता रसग्रहणाच्या कौतुकाबद्द्ल तहेदिलसे शुक्रिया. कधी कधी काहीबाही लिहायला कौतुक हवच असतं ! :)
-दिलीप बिरुटे
22 Dec 2014 - 11:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त ! यकदम गियर उल्टा गियर पल्डा बुवांच्या स्कूटर्ला +D
23 Dec 2014 - 1:13 am | श्रीरंग_जोशी
ते बिना गिअरचीच चालवतात, स्कूटर =)) .
ही रचना आवडली हो, अ. आ...
23 Dec 2014 - 12:19 am | खटपट्या
वा क्या बात है ?
23 Dec 2014 - 2:16 am | अर्धवटराव
खल्लास कविता.
23 Dec 2014 - 9:54 am | प्रमोद देर्देकर
यमकांच्या ओळींची जुळली टोकं,
भावनिक जिल्बीची भरली ताटं !!
कधी हीना तर कधी खस मध्ये मन गुंतले ,
परी कस्तुरीने जगणे थांबले !!
इतुके लग्ने लावियली वधू वरा तव मिळवियले,
मांडपातच योग घडावा अन कस्तुरीनेच स्वयंवरावे !!
परागकण तव उधळीता सुगंधी,
अतृप्त न आत्मा तो राहील,
चार दिसांची सोबत आता आयुष्याभरची होईल. !!
अत्म्याच्या अनेक अनेक शिष्यगणांपैकी एक शिष्य (पम्या ठाणेकर)
वो गुर्जी दिक्षांत / दृष्टांत कधी देनार आम्हास्नी?
23 Dec 2014 - 10:46 am | अत्रुप्त आत्मा
@वो गुर्जी दिक्षांत / दृष्टांत कधी देनार आम्हास्नी? >>> या की पुण्यात..कधिही.
23 Dec 2014 - 10:51 am | प्रमोद देर्देकर
मग आत्ता येणार्या शनिवारचा बेत आखतो चालेल काय?
23 Dec 2014 - 12:37 pm | अत्रुप्त आत्मा
@मग आत्ता येणार्या शनिवारचा बेत आखतो चालेल काय? >>> व्हाय नॉट...चालेल की. मी शनिवारी संध्याकाळी.. ७ नंतर फ्री आहे. दुपारी २ ते ५ पण फ्री आहेच. :)
फक्त..आता याबद्दलचे पुढील-खरडवहीत्,अथवा संदेशातून बोलू. :)
23 Dec 2014 - 12:43 pm | टवाळ कार्टा
भेटलात तर इथे सांगा...पम्याला याचि देही बघणारे तुम्हीच पयले असाल ;)
23 Dec 2014 - 1:06 pm | प्रमोद देर्देकर
खीक :)))
@ ट.का.:- येताना तुझा दिक्षांत पण घेवुन येव काय आपल्या गुर्जींकडुन?
23 Dec 2014 - 1:23 pm | टवाळ कार्टा
ये की...त्याबरोबर वट्ट सवा रुपया दक्षिणा पण ठेव हो गुर्जींसाठी
23 Dec 2014 - 1:30 pm | अत्रुप्त आत्मा
अरे बास की आता! __/\__
23 Dec 2014 - 10:48 am | ज्ञानोबाचे पैजार
मार डाला,
पैजारबुवा,
23 Dec 2014 - 1:59 pm | योगी९००
सुरेख कविता आणि बिरूटे सरांनी केलेले सुंदर रसग्रहण ..आहाहा...!!
बघूया कोणी विडंबन पाडण्याची हिंमत करतोय काय..!!
24 Dec 2014 - 12:09 pm | बॅटमॅन
खी खी खी ;)
24 Dec 2014 - 7:22 am | मुक्त विहारि
आवडली.
24 Dec 2014 - 12:09 pm | बॅटमॅन
मस्त कविता!!!!!!!!
"कस्तूरी जायते कस्मात् को हन्ति करिणां शतम् |
भीरु: कुर्वीत किं युद्धे मृगात् सिंहः पलायते ||" हा श्लोक उगीचच आठवला.