अत्तरायण..! भाग - १
इसीलिये हीना अपना पेहेला प्यार है। वो जिंदगी के आखरी दम तक चलता रहेगा।
पुढे चालू.....
====================
२) अत्तरफूल :- काय वाटतं नाव ऐकल्यावर? गोंधळात पडायला होतं ना? पण हे अत्तर ज्याचं आहे..त्या फुलानीच आजवर कित्येकांना गोंधळात टाकलय. कित्येकांचे गोंधळ सोडवलेत,वाढवलेतंही! मी ही पहिल्यांदा गोंधळलोच होतो. (आणि तो गोंधळाचा प्रसंग मला पुन्हा आठवून दिला तो एका गोंधळ्यानीच!) म्हणजे ही केवळ शब्दक्रीडा नव्हे. आमचा एक पथ-नाट्यांच्या कंपूत भेटणारा मूळचा देवीचा गोंधळी असणारा पहाडी आवाजाचा मित्र...(हाय हाय! याला एकदा मिपावर का पेश करु नये? :) ) मला एकदा भेटला.आणि म्हणतो कसा? :- "ओ भटजीबाबा..किती दिसानी भेटले!? आता जरा हात करा आधी फुडं..मागल्या टायमाला आमाला लावलंवतं, त्ये तुमचं कळीमोगरा सोडा...आनी ह्ये बगा अस्सल मोगरा" असं म्हणून त्यानी माझ्या हतावर ते चढवलं..आणि मी वासावरून तरंगत तरंगत एकदम तीन ठिकाणी गेलो..त्यातलं पहिलं ठिकाण म्हणजे मी नववीत (आणि नवं-वीत! ;) ) असतांना दातार क्लासेसच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाच्या इमारती शेजारील एका म्होट्या झाडावर यंगून एक म्होट्टं मश्रुम काढलवतं..(त्या क्लासच्या जीवशास्त्राच्या बैं च्या सांगण्या वरून! ) आणि माझा ह्यो पराक्रम पाहून..(पराक्रम मंजी पावसानं निसरड्या झालेल्या झाडावरून आदी २ जनं निसटलेवते,आनी आमी फैल्याच फटक्याला डायरेक वर!) तर...,माझा ह्यो पराक्रम पाहुन, आमच्या त्या नव्वीच्या क्लास मधल्या एका कोमल फुलानी, "तू खुप धाडसी आहेस!" असं मोहक वाक्य म्या पामराच्या कानांवर सोडून मला हे अत्तरफूल हातास लावलंवतं! आणि उरलेलंही (मलाच!) दिलं होतं. हाय...हाय.. :D नंतर म्या येक अटवडा पूर्न हवेत होतू..आनी माजा मैतर जग्या'ला दर्रोज त्ये हत्तराची बॉटली दाकवून जळवत होतू. पुढे बॉटल संपली..पण तो पहिला वहिला सुगंध मनावर इतका बिंबवून गेली,की आता मोगर्याचं अत्तर म्हटलं ,की मला दातार क्लासेसची ती इमारत,आणि तो कोमल प्रसंग अठवतो.
दुसरी आठवण नगरच्या वेदपाठशाळेत असतानाची. ते दत्तमहा(सं)स्थान असल्यामुळे, तिथे अनेक उत्सवांना देवळात निरनिराळी अत्तरे (भेट) यायची.. त्यात एकदा ASHAN या कंपनीचं हे अत्तर अत्तरफूल या नावानी समोर आलेलं.
(फोटो:- अं.जा.वरुन.)
मला तेंव्हाही हे नाव एकदम पटलं होतं. अहो..,ज्या फुलात,त्याच्या सुवासातच एक निसर्गदत्त अत्तर आहे,त्याचच नाव त्याला दिलं तर तेच योग्य आहे..फुलात अत्तर..म्हणून अत्तरफूल! मी ती छोटीशी बाटली,एका सेवेकर्याला गुळ-लाऊन मिळवती होती. आणि रोज रात्री छातिला व्हिक्स चोळतात ,तसं ते अत्तर लाऊन मी गोपायचो. आहाहाहाहाहा... मेले डास कचकून चावायचे,त्यात हेच एक सूख होतं तिथे.
तिसरी आठवण आहे,ती २००४ साली ज्ञानप्रबोधिनीच्या इमारती बाहेर भेटलेल्या एका नामी अत्तर व्यापार्याचीच.. मी त्याला माझी अत्तरातली मुशाफिरी दाखवता दाखवता,त्यानी ह्या मोगर्या'चा असा काहि कड्क माल माझ्या शर्टाला लाऊन दिला,की पुढे दोनदा धुतल्यानंतरही त्या शर्टाला तो वास कायम होता. (सध्या ही व्यक्ती माझी अत्तरगुरु आहे. आणि शक्य झाल्यास मी त्याच्याकडून शिकुन ह्याही धंद्यात पडण्याचे चिंतन मनात करत आहे..साला गुरु माणूस आहे एकदम..पण मेला,त्याच्या विद्येविषयी विचारतोय..असा वास जरी लागला,तरी चटकन विषय बदलतो.पण मी ही खमक्या आहे,सोडणार नाही त्याला! ;) )
तर ही झाली माझी आणि मोगर्याच्या अत्तराच्या परिचयाची झलक. बाकि,मोगरा हे फूल असो वा अत्तर..! शोकमुक्त्/भयमुक्त करून मनाला प्रस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्न्न्न्न्न्न्न करणारा याचा वास असतो. मी ह्या फुलांच्या रांगोळ्यांकरिता मार्केट यार्डात जातो..तेंव्हा मोगर्याच्या सिझनला तर मला रांगोळ्यात ह्याला वापरायचा मोह होतो..तो केवळ याच्या त्या मंत्रमुग्ध करणार्या वासामुळेच! या मोगर्यावर कित्येक प्रेमिकांनी/कविजनांनी आणि कुणि कुणि आपलं शब्दभांडार मुक्त हस्तानी उधळलेलं आहे. मी मोगर्याच्या वासाला उपमाच द्याविशी वाटली,तर ती माणुसकीची देइन! ती प्रत्येकामधे जेव्हढी असते .. तेव्हढीच येते!.फुकटचा आणला आव,की गडगडला त्याचा भाव... हे मोगर्याशी नातं जोडण्याचं सूत्र आहे.
मोगरा आहे शायरी
मोगरा आहे फकिरी
मोगरा आहे दरबारी
राजे अन् देवादिकांच्या
मोगरा प्रेमाचा कळस
मोगरा प्रीतीचे बाळसं
जाई जुईला स-रसं
त्या त्या वेलीच्या
गजरा म्हणूनी माळावा
उगे नुसता चाळावा
न जमला तर वहावा
पायी देवतांच्या!!!
ऐशी याची महती
सांगू किती तुंम्हा प्रती?
ज्याची त्याची स्व'मती
त्याने त्याने शोधावी.
पहा........काहिही ध्यानी मनी नसताना,ह्या नम्र आणि साध्या स्वभावाच्या फुलाने मला कित्ती तरी लिहितं करून सोडलं आज!
आता शब्द खुंटलेले आहेत.पुढे काहिही बोलता येणार नाही.
तेंव्हा..काहि क्षण गुंततो..
आता मी.....
माझ्या त्या...
अत्तरफुलात..!
=================================
क्रमशः
प्रतिक्रिया
10 Dec 2014 - 12:51 am | मुक्त विहारि
क्रमशः वाचून फार बरे वाटले...
10 Dec 2014 - 1:30 am | बोका-ए-आझम
अथा तो अत्तरजिज्ञासा! मस्तच!
10 Dec 2014 - 1:43 am | खटपट्या
अहाहाहा !!
लगेच खालच्या ओळी आठवल्या. तुमचे लेख फक्त अत्तरांबद्द्ल माहीती देत नाहीत तर अत्तरांबद्द्लच्या आठवणींना साद घालतात.
https://www.youtube.com/watch?v=kGyvZ1R8kec
10 Dec 2014 - 4:12 am | hitesh
छ्हान
10 Dec 2014 - 4:42 am | रेवती
छान!
10 Dec 2014 - 4:50 am | स्पंदना
आहा! गुरुजींच्या आयुष्यातली एक सुगंधा समजली ब्वा!!
सुरेख हो!
ये उ दे!
10 Dec 2014 - 1:49 pm | अत्रुप्त आत्मा
@एक सुगंधा समजली ब्वा!! >>> =)) मी नंतर बोलायचा लै प्रयत्न केलावता. पण ती कोमला दरवेळी नाजुकसे हसून निघुनच जयाची! =)) नंतर तिच्या एका दू...दू... मैतरणिनि तिचे कान फ़ुंक्ले :-\ आणि जे 'चालु' होतं ,ते ही बंद झालं! :-\
10 Dec 2014 - 5:32 am | कंजूस
"तू खूपच धाडसी होतास दादा."
10 Dec 2014 - 1:49 pm | प्यारे१
दादा????
हवेतनं धाडकन खाली? दादा मुळं लेख परत वाचला. दादा नै हो.
आजपासून बुवांचं नाव 'धाडसी पराग' ;)
बुवा येऊ दे अजून अत्तरदाण्या.
10 Dec 2014 - 6:10 am | किसन शिंदे
आहा! मस्तच आहे "अत्तरफूल" :)
10 Dec 2014 - 6:52 am | लीलाधर
पु.भा.शुभेछा येउदे लवकरच
10 Dec 2014 - 7:01 am | अजया
कोमल फूल,अत्तर फूल!बुवांनी आज मिपाची सकाळ सुगंधित करुन टाकली!
10 Dec 2014 - 7:02 am | आयुर्हित
अत्तरस्य एवम् गुरुजीस्य कथा रम्य:|
10 Dec 2014 - 7:02 am | पक पक पक
चन्द्नना
12 Dec 2014 - 11:29 am | मृगनयनी
फारच शौकीन दिसता तुम्ही! .. अ.आ.. .. छान वाटले!!! .. ओव्हरऑल.... :)
10 Dec 2014 - 7:16 am | स्वप्नज
सुवासिक ....
10 Dec 2014 - 7:47 am | प्रचेतस
गुर्जींच्या भावविश्वातील अत्तरविश्व. :)
10 Dec 2014 - 10:16 am | मदनबाण
वाचतोय गुरुजी... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of Debt
10 Dec 2014 - 5:47 pm | दिपक.कुवेत
छान आहे लेखमाला....अत्तरासारखीच सुगंधीत
10 Dec 2014 - 6:24 pm | यशोधरा
वा! मस्त! पुण्यात कुठे मिळतील खात्रीशीर अत्तरं?
10 Dec 2014 - 7:03 pm | प्रचेतस
बुवाच अत्तरे विकतेत. साईड बिजनेस है त्यांचा.
10 Dec 2014 - 7:16 pm | यशोधरा
खरंच का? की उगाच आपलं दु.. दु.. दु.. पणा? :D =))
10 Dec 2014 - 7:18 pm | प्रचेतस
खरंच विकतेत.
मी पण विकतच घेतलं होतं. मित्र असूनही फुकट दिलं नव्हतं
10 Dec 2014 - 7:20 pm | यशोधरा
अरे वा, वल्ली धन्यवाद ह्या माहितीबद्दल.
बुवा, कोणती अत्तरे आहेत ह्याची यादी टाका ना प्लीज, संपादक मंडळाची हरकत नसल्यास. अथवा व्य नि कराल का?
10 Dec 2014 - 7:42 pm | अत्रुप्त आत्मा
@बुवाच अत्तरे विकतेत. साईड बिजनेस है त्यांचा.>>> हत्तीsssss :-\ हिते कशाला झैरात!??? :-\
@मित्र असूनही फुकट दिलं नव्हतं>>> :-\ lllllllluuuuuu :-\
"धंदे में ना कोई दोस्त ना भाई ना कोई, जा....उडा दे... "
भाई भाई का प्यार बीच में आए , तो दोनों को उडा दे!...ज्जा!!! "
सं दर्भ :- नानाचे डायलोग ..चित्रपट - परिंदा. :-D
10 Dec 2014 - 6:36 pm | सूड
वाचतोय.
10 Dec 2014 - 7:02 pm | प्रसाद गोडबोले
सुरेख :)
10 Dec 2014 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोगर्याचा अत्तराचा दरवळ पोहचला.
-दिलीप बिरुटे
11 Dec 2014 - 7:14 pm | मोहनराव
मस्त.. अत्रुप्त आत्मा अत्तरवाले...
11 Dec 2014 - 10:16 pm | मितभाषी
हेच बोल्तो.
पुभाप्र..........
11 Dec 2014 - 10:59 pm | पैसा
बुवांच्या आयुष्यात मोगरा कधी येणार देवाला ठौक!
11 Dec 2014 - 11:22 pm | सुबोध खरे
फक्त सव्वाशे रुपयात उपलब्ध आहे
http://www.amazon.in/AHSAN-Ahsan-Attar-Full-30ml/dp/B00K7UJMRK?tag=googi...
12 Dec 2014 - 10:59 am | स्वीत स्वाति
तुम्ही इतके सुंदर वर्णन केले आहे तर ट्राय करावे म्हणतेय :-)
12 Dec 2014 - 3:25 pm | पियुशा
अहाहा मस्त सुवासिक लेख
12 Dec 2014 - 4:36 pm | मदनबाण
मी चंपा / सोन चाफा... आणि मोगरा अत्तर वापरुन पाहिली होती... पण मला वाटतं जवळपास ३-४ वर्षा पूर्वी माणिकलाल कडुन मोगरा घेतले आणि खल्लास ! ५ मोगर्यांच्या गजर्यांचा वास मिळेल इतके भन्नाट ! :) हल्लीच छोटी बाटली तिकडुन आणवली... भन्नाट आणि भन्नाट !
गुरुजी कधी मुंबईला आलात किंवा मी पुण्यात आलो आणि आपली भेट झाली तर याचा अनुभव नक्की घडवीन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it
Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin'
Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'
12 Dec 2014 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा
@५ मोगर्यांच्या गजर्यांचा वास मिळेल इतके भन्नाट ! >>> सोच के ही मर गया मै। कुणी पुण्याकडे येत असेल..तर १ बॉटल द्या पाठवून..प्ली....ज!
12 Dec 2014 - 4:42 pm | बॅटमॅन
क्या बात है. अतिशय सुगंधी धागा! :)