प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

केसुरंगा's picture
केसुरंगा in जे न देखे रवी...
9 Aug 2008 - 1:58 am

आपल्या चमत्काराने चक्क जुलै-आगष्टात देखील एप्रिल फळे क्रमशः चाखायला देणारे आणि आपल्या स्वप्नांच्या चमत्कारी(क) दुनियेतून क्रमशः फिरवून आणणारे आमचे परमजालस्नेही विजूभाऊ यांनी आज एका विडंबनाला प्रतिसाद देताना टीका करण्याच्या जोषात 'वेडात मराठे वीर दौडले सात' चे विडंबन करुन दाखवा पाहू आणि स्वतःला धन्य समजा, असे उद्गार काढले मात्र!

डोक्यातुनी उठली एक वीज जोरात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

हे लिहिले कुचकट थोडे किंचित वेले
सरदार आम्ही सरसावुन उठलो शेले
आव्हान देऊनी आज, तुम्ही हो फसले
करणार विडंबन पाहा आता, फटक्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

विषण्णसुन्न वाचून विडंबन सेना
अपमान बुजविण्या तेग काढूनी म्याना
मिपावर फिरले शोध, शोध त्या कवना
सापडले गाणे जालावर निमिषात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

खालून राग, वर राग, राग बाजूंनी,
प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी
गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी
बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

कवितांवर दिसतिल अजुनी आमुच्या टाचा
'मिसळीत' तरंगे अजुनी रंग शब्दाचा
खरडींतून उठतो अजुनी सूर भीतीचा
अद्याप शहाणी कुणि जालावर येत
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

स्वप्नात तुम्ही तो प्रवास इतुका केला
क्रमशः फळांनी वाचक पुरता छळला
मग काय करावे इरशाद आमुचा झाला
अन् 'बैल' मिळाला आज आम्हा सस्त्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

केसुरंगा

कविताविडंबनप्रतिभा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

9 Aug 2008 - 2:09 am | केशवसुमार

केसुरंगाशेठ,
लाज राखलीस रे माझ्या बाबा.. >:D<
एकदम जोरदार.. चालू द्या..
(निवृत्त समाधानी)केशवसुमार
स्वत:शी वेड्यासारखी बडबडः ही नवी पिढी फार पोचलेली आहे रे.. बर झाल निवृत्त झालो.. आपल्याला नसत बॉ हे झेपले.. #:S

सर्किट's picture

9 Aug 2008 - 2:11 am | सर्किट (not verified)

खालून राग, वर राग, राग बाजूंनी,
प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी
गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी
बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

हे खूप आवडले.

- (विडंबनप्रेमी) सर्किट

बेसनलाडू's picture

9 Aug 2008 - 2:15 am | बेसनलाडू

भारी!
(वाचक)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

9 Aug 2008 - 2:19 am | मुक्तसुनीत

कविमित्रा !
तुझा उत्साह नि आवेश वाखाणाण्याजोगा आहे. पण वजन सांभाळायला हवे होते. विडंबन मार्मिक होवो न होवो , ते निदान अचूक असणे आवश्यक नव्हे काय ?

चतुरंग's picture

9 Aug 2008 - 2:22 am | चतुरंग

एकदम घनचक्कर विडंबन!

कवितांवर दिसतिल अजुनी आमुच्या टाचा
'मिसळीत' तरंगे अजुनी रंग शब्दाचा
खरडींतून उठतो अजुनी सूर भीतीचा
अद्याप शहाणी कुणि जालावर येत
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

स्वप्नात तुम्ही तो प्रवास इतुका केला
क्रमशः फळांनी वाचक पुरता छळला
मग काय करावे इरशाद आमुचा झाला
अन् 'बैल' मिळाला आज आम्हा सस्त्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

हे खासंच!

(स्वगत - बोलती बंद झाली अन् काय! [( )

चतुरंग

विजुभाऊ's picture

9 Aug 2008 - 9:53 am | विजुभाऊ

सलाम केसु
टीयरी हात ठेवुन सलाम ( हे शब्द पाडगावकरांचे आहेत)
मजा आ गया
सविस्तर प्रतिसाद नन्तर लिहितो.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

कवटी's picture

24 Dec 2009 - 1:58 pm | कवटी

केसुरंगाशेठ,
हे बघायचे राहिले होते.... एकदम फक्कड झालय....

>>सविस्तर प्रतिसाद नन्तर लिहितो.

(सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत)कवटी

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Aug 2008 - 12:10 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंच, हाण तिच्या *** :)

काल विजुभाऊंचा प्रतिसाद वाचला तेव्हाच मनात खूणगाठ बांधली... २४ तासांच्या आत येणारच काहितरी मुंहतोड.... आलंच !!!

रंगाभाऊ, मस्तच आहे विडंबन.

विषण्णसुन्न वाचून विडंबन सेना
अपमान बुजविण्या तेग काढूनी म्याना
मिपावर फिरले शोध, शोध त्या कवना
सापडले गाणे जालावर निमिषात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

खालून राग, वर राग, राग बाजूंनी,
प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी
गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी
बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

बिपिन.

श्रीमंत दामोदर पंत's picture

9 Aug 2008 - 12:35 pm | श्रीमंत दामोदर पंत

खालून राग, वर राग, राग बाजूंनी,
प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी
गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी
बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

हे खुप आवडलं.......
मस्त जमलय.............. =D>

साती's picture

9 Aug 2008 - 1:08 pm | साती

विडंबन आवडले.
साती

फटू's picture

9 Aug 2008 - 1:37 pm | फटू

झकास...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Aug 2008 - 5:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सही आहे.

पिवळा डांबिस's picture

10 Aug 2008 - 5:57 am | पिवळा डांबिस

मान गये राव!!!

खालून राग, वर राग, राग बाजूंनी,
प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी
गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी
बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

कवितांवर दिसतिल अजुनी आमुच्या टाचा
'मिसळीत' तरंगे अजुनी रंग शब्दाचा
खरडींतून उठतो अजुनी सूर भीतीचा
अद्याप शहाणी कुणि जालावर येत
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

हे मस्तच!! जवाब नही!!!!

बकुळफुले's picture

10 Aug 2008 - 6:02 pm | बकुळफुले

हे विजुभै लोकाना स्वतः चावतात आणि विसम्बन लिहायला भरीस पाडतात.
पण असे चॅलेन्ज घेतले तर मजा अधीक येते.
विडम्बन बहुतेक वेळा मनोरन्जना साठी असते त्याने वाचकाला हसु यावे ही अपेक्षा असते.
प्रस्तुत विडम्बन त्या बाबतीत थोडे फसले असे वाटते. कदाचित त्या बाबतीत तुमचा ईर्षाद झाला असावा.
ईर्षाद....

अविनाश ओगले's picture

10 Aug 2008 - 7:44 pm | अविनाश ओगले

केसुरंगाशेठ,
लाज राखलीस रे माझ्या बाबा.. ><
एकदम जोरदार.. चालू द्या..

असेच म्हणतो...

मनस्वी's picture

11 Aug 2008 - 10:23 am | मनस्वी

आवडले.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Aug 2008 - 7:02 am | llपुण्याचे पेशवेll

झक्कास विडंबन... :)
पुण्याचे पेशवे

केसुरंगा's picture

13 Aug 2008 - 5:06 pm | केसुरंगा

अजून धार लावणारे प्रतिसाद देणार्‍या आणि तळपते विडंबन वाचून प्रतिसाद म्यान करणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार!
-केसुरंगा

मैत्र's picture

13 Aug 2008 - 7:19 pm | मैत्र

मी सहसा विडंबनाच्या वाटेला जात नाही... पण हे वाचून दाद दिल्याशिवाय राहवंलं नाही...
एकदम शॉलिड!! जियो... कदाचित त्या शब्दांना असं वजन आहे की बास... विडंबन बाजूला ठेवलं तरी बेष्ट आहे...

JAGOMOHANPYARE's picture

23 Dec 2009 - 10:53 am | JAGOMOHANPYARE

मस्त........ आज बघितले.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Dec 2009 - 11:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरेच्चा, हे पहायचं राहिलं होतं का काय?? चोक्कस!!

अदिती

विजुभाऊ's picture

23 Dec 2009 - 11:24 am | विजुभाऊ

अदिती तै साहेब....
मस्त
प्रेषक ३_१४ विक्षिप्त अदिती ( शनी, 08/09/2008 - 17:39) .
सही आहे.

हे विसरलात की काय?
की मग तुमच्या नावाने दुसर्‍याच कोणी दिला होत अत प्रतिसाद ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Dec 2009 - 2:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दिला असेल; आमाला काय माहित ते कुना घाटीला विचार ने घाटीला! ;-)

(स्किझोफ्रेनिक) अदिती

jaypal's picture

23 Dec 2009 - 1:43 pm | jaypal

शिघ्रकवि आहात. मस्त कविता आहे.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सौरभ.बोंगाळे's picture

23 Dec 2009 - 2:00 pm | सौरभ.बोंगाळे

भन्नाट... मानलं तुमच्या विचारशक्तिला... २४ तासात फक्कड विडंबन केलय.

शक्तिमान's picture

23 Dec 2009 - 3:04 pm | शक्तिमान

ओत्तेरी... बोलेतो एकदम कडक!

फ्रॅक्चर बंड्या's picture

23 Dec 2009 - 3:30 pm | फ्रॅक्चर बंड्या

जबरा

binarybandya™

विशाल कुलकर्णी's picture

23 Dec 2009 - 4:03 pm | विशाल कुलकर्णी

आईच्यान ! थोबाड वासलेलं तसंच राहीलं....... :))

आजुबाजुचे दहा बारा क्युबिकल्सदेखील माझ्याकडे थोबाड वासुन बघत होते, हा असा का मुर्खासारखा हसतोय ? ;-)

जबराट ! शब्दच नाहीत दुसरे !! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

टुकुल's picture

24 Dec 2009 - 1:02 am | टुकुल

क आणी ड आणी क..
एकदम फॅटक.

--टुकुल

हर्षद आनंदी's picture

24 Dec 2009 - 6:56 am | हर्षद आनंदी

हे असं पाहीजे बघा!! आला अंगावर घेतला शिंगावर

विडंबन तर १ नंबर ... मजा आली!!!

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..