एका तळयात होती बदके पिले अनेक....
मी एक रानफूल.. नि तो राजहंस एक...
संगणक शिकण्यासाठी जॉईन केलं 'अपटेक'...
होती सुट्टी क्लासला.. म्हणून गुंफिला गजरा सुरेख...
सुटे पैसे नव्हते, म्हणून भाजीवाल्याला दिला चेक...
पण त्या अडाण्याला, तो वटवण्याची कळली नाही मेख...
कशी कळणार त्याला, तो भाजीवालाच होता फेक...
जेवायचा नव्हता मूड, म्हणून घेतलं नुसतं मिल्कशेक...
सर्विसिंगला गाडी टाकली, कारण फेल होते ब्रेक...
आईने दिले देवाचे निर्माल्य, म्हणाली पाण्यात टाक...
सापडले एक तळे मजला, म्हणजे विंग्रजी तला लेक...
त्याच, एका तळ्यात होती बदके पिले अनेक....
( 'प्राची' ला 'गच्ची 'जोडण्याचा...एक अंमळ अट्टाहास...) :)
प्रतिक्रिया
8 Aug 2008 - 2:43 pm | विसोबा खेचर
सगळी यमके आवडली! :)
चालू द्या!
8 Aug 2008 - 2:45 pm | मृगनयनी
थँकु थँकु...विसोबा खेचर....
आम्हाला तृप्तीचा आला ढेकर....:)
8 Aug 2008 - 11:32 pm | वर्षा
हे वाचून रेखाच्या 'खूबसूरत'ची आठवण झाली...त्यात असंच यमके जुळवून बोलण्याचा खेळ दाखवलाय्...('काफिया' की काहीतरी?)
:)
-वर्षा
8 Aug 2008 - 3:49 pm | नरेंद्र गोळे
धन्य ती मृगनयनी! धन्य विसोबा खेचर!!
8 Aug 2008 - 10:34 pm | विसोबा खेचर
आणि चांगल्या चांगल्या हिंदी गाण्यांची आपल्या लै भारी मराठी अनुवादाने पार वाट लावणारे धन्य ते नरेंद्र गोळे! ;)
8 Aug 2008 - 8:26 pm | चतुरंग
तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे! सगळी बदके आवडली!
(स्वगत - रंग्या, लेका विडंबनाचा राजहंस कुठे रे गेला? सगळी बदकच की रे होती? :? :O )
चतुरंग