डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..!

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
7 Aug 2008 - 10:57 am

बरं झालं असतं "ओएसओ" जर बघितला नसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..

डोळ्यांमधल्या अजब अदा राहून राहून छळणार.
दिलाचे पतंग आणि किती श्वासावरती जळणार.
जग सुनं सुनं होणार पिक्चर सरता सरता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..

युवराजसोबत फ़िरते ती अन ढोणीसोबत दिसते.
क्रिकेटमधले तिला सांगा नक्की किती कळते !
क्रिकेट,बॉलीवुड तेवढंच खरं बाकी गोंधळ नुसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..

या जन्मी जर नाही जमलं पुढच्या जन्मी बघू.
आपण सुद्धा तेव्हा ओम कपूरसारखं जगू.
"दि एन्ड" नाही, पिक्चर अजून बाकी आहे दोस्ता,
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..!

-- अभिजीत दाते

कविताप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

पक्या's picture

7 Aug 2008 - 12:42 pm | पक्या

हम्म्म्...ओएसओ च्या स्टोरी मध्ये दम नसला तरी दिपिका खरेच सुंदर दिसते. आपल्याला तर जाम आवडली ती.

सुमेधा's picture

7 Aug 2008 - 4:44 pm | सुमेधा

अभिजित मित्रा ,

मस्त आहे कविता.....आवडलि मला........अश्याच हलक्या फुलक्या कविता करत रहा :)

ही कविता अन दीपिका सारख्याच!|
-चांगल्या पण जरा जास्त लांब!
बाकी जीतराव , मित्रा जिंकलस!
चंपक 'गुप्ते'