मिपादेवीची विनवणी?

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
30 Oct 2014 - 1:01 am

अनेक शतकी धागे पाहुनि, नावे मजला ठेवू नका।
मीच विनविते हात जोडुनी उगाच मजला छळू नका।।
जिलब्यांचा अतिदिव्य वारसा मिसळपाविनो तुम्हा मिळे।
उणे कुणाचे दिसता किंचित दवंडी द्याया विसरू नका।|
व्हा ज्ञानाचे वाढपी तुम्ही, जिलबीमारा करीत रहा ।
कलम चालवा सालभर तरी सण शिमग्याचा आणु नका।|
जिलब्यांच्या उत्साहावरती कधीच विरजण घालू नका।
टीआरपीच्या धाग्यांवरती मागे कोणी राहू नका।|
जिलबी पाडा, काकू पाडा, जमले तर मग लेखही पाडा।
पण काकूचे काश्मीर करताना बर्फामध्ये पडू नका।|
मिपा आपुले करा नामांकित परी, इतरा नावे ठेवू नका।
डु आयडी ने लिहिता लिहिता वरिजनलला विसरू नका ।|
कंपू पेरा अपुल्या भवती, पिंक पिंकेने रंगतसे।
हे ज्याच्या हृदयात ठसे, खरा मिपाकर तोच असे।|

विडंबनप्रतिसाद

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

30 Oct 2014 - 1:18 am | तुमचा अभिषेक

हा हा .. भारी जमलेय !!!

पगला गजोधर's picture

30 Oct 2014 - 9:17 am | पगला गजोधर

आनंदमामाला, जेव्हा जाग येते...
तेव्हा काव्य असे हे प्रसवते ....

ह. घ्या.

बॅटमॅन's picture

30 Oct 2014 - 5:27 pm | बॅटमॅन

आहा!!!! एकच नंबर.

'पन्नाशीची उमर गाठली' आणि 'बिकट वाट वहिवाट नसावी' या दोहोंची लक्षणे उत्तम उतरली आहेत. एक फर्मास विडंबन.

असंका's picture

30 Oct 2014 - 5:35 pm | असंका

जबरद्स्त!!!

(शेवटची ओळ वाचून डोळ्यात पाणी आले...कधी साधायचे हे!!)

माम्लेदारचा पन्खा's picture

30 Oct 2014 - 5:58 pm | माम्लेदारचा पन्खा

"प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट"......!!

मिपाचे राष्ट्रगीत करायला हवे ह्याला.. आम्ही प्रस्ताव मांडलेला हाये....आणुमोद्क हाय का कोनी ?

अत्रुप्त आत्मा's picture

30 Oct 2014 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा

ज्जो राsssssत हणुमोदण्ण! :-D

असंका's picture

30 Oct 2014 - 6:11 pm | असंका

आमचेपण आमचेपण!!

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2014 - 6:33 pm | टवाळ कार्टा

आणखी येक

नाखु's picture

31 Oct 2014 - 10:38 am | नाखु

हे गीत धोरण या धाग्यात "मार्गदर्शनात्मक" लावावे ही विनंती

मुक्त विहारि's picture

30 Oct 2014 - 10:44 pm | मुक्त विहारि

मिपाचे गीत एकच...

"मोकलाया दाही दिशा"

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2014 - 11:34 pm | टवाळ कार्टा

स्पेलिंग मिश्टेक आहेत :)

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Oct 2014 - 9:10 am | माम्लेदारचा पन्खा

पन हे जन गण मन आणि ते वंदे मातरम !

हरकाम्या's picture

31 Oct 2014 - 9:29 am | हरकाम्या

माझे " अणुमोदन " हाये.

सुहास..'s picture

30 Oct 2014 - 6:15 pm | सुहास..

हा हा हा हा !!

बोबो's picture

31 Oct 2014 - 12:14 am | बोबो

झकास

अनुप ढेरे's picture

31 Oct 2014 - 11:06 am | अनुप ढेरे

मस्तं!