मिपादेवीची विनवणी?
लेखनप्रकार
अनेक शतकी धागे पाहुनि, नावे मजला ठेवू नका।
मीच विनविते हात जोडुनी उगाच मजला छळू नका।।
जिलब्यांचा अतिदिव्य वारसा मिसळपाविनो तुम्हा मिळे।
उणे कुणाचे दिसता किंचित दवंडी द्याया विसरू नका।|
व्हा ज्ञानाचे वाढपी तुम्ही, जिलबीमारा करीत रहा ।
कलम चालवा सालभर तरी सण शिमग्याचा आणु नका।|
जिलब्यांच्या उत्साहावरती कधीच विरजण घालू नका।
टीआरपीच्या धाग्यांवरती मागे कोणी राहू नका।|
जिलबी पाडा, काकू पाडा, जमले तर मग लेखही पाडा।
पण काकूचे काश्मीर करताना बर्फामध्ये पडू नका।|
मिपा आपुले करा नामांकित परी, इतरा नावे ठेवू नका।
डु आयडी ने लिहिता लिहिता वरिजनलला विसरू नका ।|
कंपू पेरा अपुल्या भवती, पिंक पिंकेने रंगतसे।
हे ज्याच्या हृदयात ठसे, खरा मिपाकर तोच असे।|
वाचने
3315
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
हा हा .. भारी जमलेय !!!
आनंदमामाला, जेव्हा जाग येते
आहा!!!! एकच नंबर.
जबरद्स्त!!!
आणंद पोटात माझ्या माईना....
In reply to आणंद पोटात माझ्या माईना.... by माम्लेदारचा पन्खा
ज्जो राsssssत हणुमोदण्ण!
In reply to ज्जो राsssssत हणुमोदण्ण! by अत्रुप्त आत्मा
आमचेपण आमचेपण!!
In reply to आमचेपण आमचेपण!! by असंका
आणखी येक
In reply to आणखी येक by टवाळ कार्टा
आम्चा +१
In reply to आणंद पोटात माझ्या माईना.... by माम्लेदारचा पन्खा
@ माप...
In reply to @ माप... by मुक्त विहारि
स्पेलिंग मिश्टेक आहेत
In reply to @ माप... by मुक्त विहारि
ते हायेच वो....
In reply to आणंद पोटात माझ्या माईना.... by माम्लेदारचा पन्खा
राष्ट्रगीत.
हा हा हा हा !!
झकास
मस्तं!