(चाहूल)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
6 Aug 2008 - 5:18 pm

लग्नाआधी अनिरुद्ध अभ्यंकरांची हळुवार'चाहूल' आम्हालाही लागत होती आणि त्या प्रणयधुंद काळानंतरची वास्तवाची चाहूल आम्हाला लागली ती अशी! आमच्यापाशी मूल सोडून काही कामानिमित्त गावाला गेलेली बायको दूरध्वनीवरुन विचारते आहे सगळे ठीक आहे ना?

किरकिरे तुझे ते मूल
मला चाहूल
सतत कानाशी
होईल पहाट
बदलतो कूस
पुन्हा जराशी

चालीत कसा मी मंद
गात्रात कुंद
दिवसाचा
हा असाच चाले
दिवस मास उत्सव
रडण्याचा

आकंठ रडे ते झोळीत
मुते खोलीत
तिथे ओल
तो स्पर्श नको
मज नको
बोबडे बोल

हे स्वप्ना परी वाटे
पण नसे खोटे
बोलू कुणाशी
थोपटले निजून मी
मूल लवंडलेले
उशाशी

चतुरंग

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

6 Aug 2008 - 5:25 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
एकदम जबदस्त विडंबन..
आवडले..
(निवृत्त)केशवसुमार
स्वगतः रंगा चौथ्या वर्गाची विडंबने करू ला अता.. :B

बेसनलाडू's picture

6 Aug 2008 - 10:58 pm | बेसनलाडू

आकंठ रडे ते झोळीत
मुते खोलीत
तिथे ओल
तो स्पर्श नको
मज नको
बोबडे बोल
अफलातून!
वा रंगराव, छान चाललंय!!!!!
मूल लवंडलेले
उशाशी

:O
हाहाहाहा
(हसरा)बेसनलाडू

रेवती's picture

7 Aug 2008 - 12:53 am | रेवती

पण पुन्हा वाचावेसे वाटले नाही. मुलाला लहानपणी डायपर्स का नाही बांधली? तेवढाच मनस्ताप कमी, एक विडंबन कमी, आणि बोबड्या बोलांचा आनंद लुटता आला असता (ह. घ्या.).

रेवती

विसोबा खेचर's picture

7 Aug 2008 - 9:22 am | विसोबा खेचर

वा! एक वेगळेच विडंबन....!

आनंदयात्री's picture

7 Aug 2008 - 9:24 am | आनंदयात्री

डायरेक्ट पोरगा !! भारीच !
विडंबन अन तुमची कल्पकता सहीच रंगाशेठ !

सर्व सावध आणि बेसावध वाचकांचे आभार! ;)

चतुरंग