कैलाश आणी मलाला,तुमचा अभिमान आहे, नव्हे त्यापेक्षाही वेगळ काही वाटत तुमच्याविषयी, कुठे तरी आशेचा किरण जाणवतोय्,की जगात सगळेच प्रश्न काही तलवारीच्या धारेवर आणी बंदुकीच्या गोळीने सुटत नाहीत्,तुमच्याकडे पाहुन पटतय मला की प्रेमानेही आणी अहिंसेने बरच काही शक्य होते,ज्या सिद्धार्थ गौतमाचे,महात्म्याचे,आणी दिनदुबळ्यांची आई मदर तेरेसाच्या तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या माझ्या भारतभुमीचा उर आज आनंदाने भरुन आला असेल.
कैलाश माझ्या सुधारणेकडे वाटचाल करणार्या भारतात कितीतरी कोवळे अंकुर खुरडले जातात्,त्यांच्या हक्का करिता तुम्ही लढताय, उभे राहताय्,त्यांचा आधार बनले आहात्,हे मानवतेचा वसा ज्या महात्म्याने सांगितला,ज्या आईने दिनदुबळ्यांच्या प्रेमाची वाट उभ्या जगाला दाखवली त्या माझ्या देशाचे तुम्ही प्रतिनिधित्व तुम्ही केलेत्,कुठेही तुम्ही कमी पडला नाहीत्,खरच अभिमान वाटला. तो वसा चालवण्याच्या शक्य तो प्रयत्न नक्की करेन याची खात्री बाळगा.
मलाला,खरच पोरी तुझ्यासारखी तुच,रणरागिनी तुच, दुर्गाही तुच,कालीही तुच आणी सरस्वतीही तुच.तुझ्या बद्दल काय लिहु,सगळ जगच तुझ कौतुक करताना थकत नाहीये, आणी माझ्याकडे तर शब्दच नाहीत,एकच संगतो,माझ्या लेकींना तुझी वाटचाल नक्की दाखवेल.तुला घडवणार्या आणी तुझ्या मागे पहाडासारख्या उभ्या राहणार्या त्या तुझ्या कणखर बापालाही सलाम.
प्रतिक्रिया
11 Oct 2014 - 12:57 pm | विलासराव
कैलाश आणी मलाला,तुमचा अभिमान आहे
सहमत.
11 Oct 2014 - 1:23 pm | रवीराज
दोघांचे अभिनंदन,
परंतु मलालास विशेषण लावताना सावधान, अहो तुम्ही तिला देवी बनवले, कट्टरपंथी मुस्लिमांच्या पचनी पडणार नाही ते,उगिचच निषेध करतील,मोर्चे निघतील. आपल्या सारखा मानवतावादी विचार नाही मानत हे लोक.
11 Oct 2014 - 4:02 pm | प्रदीप
इथे पहा
ह्याचसाठी केला होता पारितोषिक समितीने सगळा अट्टाहास!!