बत्तीस शिराळा
सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील हे खेडे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिध्द होते. काळाच्या ओघात काही अनिष्ट पध्द्ती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील एक वैशिष्ठपुर्ण उत्सवाची पार रया गेली आहे.
पुणे - बेंगलोर महामार्गावर कोल्हापुर कडे जाताना, पेठ नाका ( इस्लामपुर ) पासुन उजव्या बाजुला एक फाटा फुटतो. इथुन साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गाने समृध्द आहे. बत्तीस शिराळ्या पासुन जवळच चांदोली अभयआरण्य, चांदोली धरण आहे. अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेले हे बत्तीस शिराळा गाव
जेंव्हा पुर्वी हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेंव्हा नागपंचमीच्या एक महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत असत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेउन ५-६ तरुणांचा ग्रुप मोहिम फत्ते करत असे.. पकडलेल्या नाग, साप, धामणी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई
नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पुजा करुन साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणुक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजीत केले जात. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळाना बक्षिसे देत असत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरीक येत असत. यातील आणखी एक वैशिष्ठ म्हणजे २ वर्षाच्या बालाकापासुन ते म्हातार्या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालुन फोटो काठत असत
शिराळ्याची नागपंचमी पूवीर् देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूवीर् लाखभर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली.
त्यामुळे काही वर्षांपासुन इथे आता प्रतिकात्मक मिरवणुक काढली जाते.
प्रतिक्रिया
5 Aug 2008 - 5:41 pm | मनिष
हे चांगले झाले की!
अचानक भीती कमी होण्याचा आणि नाग न चावण्याचा चमत्कार होत नसेल तर मग ह्याच्यासाठी सापांची/नागांची तोंडे बांधली/शिवली जातात....मग हे थांबवले तर बिघडले कुठे?
असे होत नाही, कित्येक साप मेले, कायमचे अधू झाले याचा शोध घेअतलाय का कोणी?
निदान बंदीमुळे हे प्रकार कमी झाले तरी खूप आहे! :)
5 Aug 2008 - 5:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि आपल्या आनंदासाठी मुक्या जनावरांना दावणीला बांधणं योग्य नाही वाटत!
5 Aug 2008 - 9:12 pm | प्रकाश घाटपांडे
बैल गाड्यांच्या शर्यती त्यानंतर घोड्याच्या शर्यती वेळी पण हा कायदा आहे. पण पाळतो कोण? चीन चे खेळाडू पण ऑलिंपिक ला प्राणीच होतात. त्यांना पण वेठीसच धरल असतं. पण ते कागदामागे असते. रेस कोर्स च्या घोड्याची काय सरबराई केली जाते. यांची पण केली जाते.
प्रकाश घाटपांडे
5 Aug 2008 - 9:28 pm | चतुरंग
चीनच्या ऑलिंपिक तयारीबद्दल लेख आला होता. त्यात टाईमचा वार्ताहर खेळाडूंशी बोलायला लागला की तिथे 'निरीक्षक' असे तो पुढे येई.
"ह्या खेळाची मला लहानपणापासून आवड आहे. मला ह्यात खूप सुविधा मिळतात." इ.सगळे खेळाडू ठरीव साच्याची पढवलेली उत्तरे देत. ह्यापेक्षा वेगळे कुणी काही बोलतंय असे वाटले की निरीक्षक मधे येऊन बोलणे खंडित करी!
चीनमध्ये गावागावातून 'निरीक्षक' पाठवून४ - ५ वर्षाच्या लहान लहान मुले/मुली ह्यांना अक्षरशः वेचून वेचून खेळात जाण्यासाठी नेले जाते. त्यांनी कोणता खेळ खेळायचा हे ते निरीक्षकच ठरवतात, त्या मुलांना चॉईस नसतो (त्यांच्या पालकांना तर मुले कुठे आणि का जातात एवढेच सांगितले जाते)!
त्यांना खेळाच्या सर्व सुविधा पुरवून जबरदस्तीने खेळात प्राविण्य मिळवणे भाग पाडले जाते आणि पदकांची लूट करण्यासाठी अनैसर्गिक पद्धतीने त्या त्या खेळात लोटले जाते!
(रेसचे घोडे बरे त्यांना बोलता तरी येत नाही! आणि खिंकाळले तरी निरीक्षक नसतात बाजूला!!)
चतुरंग
5 Aug 2008 - 8:55 pm | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
आणि आपल्या आनंदासाठी मुक्या जनावरांना दावणीला बांधणं योग्य नाही वाटत!
पूर्णपणे सहमत.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
5 Aug 2008 - 9:06 pm | धनंजय
नागपंचमीच्या आसपास शिराळशेठ नावाच्या एका इसमाची पूजा (काही गावांमध्ये) करतात.
याचे बहुधा औट घटकेचे राज्य होते - किशोर मासिकात आख्यायिका वाचल्याचे अंधूक आठवते. याच्याबद्दल कोणाला माहिती आहे काय?
6 Aug 2008 - 5:38 pm | वटवाघूळ
प्रति अमोल केळकर,
बत्तिस शिराळा हे खेडे गाव नाही ते तालुक्याचे शहर आहे. आजुबाजूच्या बत्तिस खेड्यांचा तालूका म्हणूनच नाव बत्तिस शिराळा पडले आहे.
नागपंचमी बद्दल दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद
मला वाटते मनिष तुम्हाला बराच गैरसमज आहे नागपंचमी बद्दल
"अचानक भीती कमी होण्याचा आणि नाग न चावण्याचा चमत्कार होत नसेल तर मग ह्याच्यासाठी सापांची/नागांची तोंडे बांधली/शिवली जातात....मग हे थांबवले तर बिघडले कुठे?"
बत्तिस शिराळा या गावात नागांची पुजा होते. ह्या गावात गारुडी नाहीत जे तुम्हि म्हणताय तसा प्रकार करायला.
आणि माहित नसेल तर माहित करुण घ्या नाग पकडण्या पासुन ते त्याना पकडल्या जागेवर सोडण्या पर्यंत त्यांना कसे सांभाळतात ते.