✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बत्तीस शिराळा - नागपंचमी

अ
अमोल केळकर यांनी
Tue, 08/05/2008 - 17:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7406 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

चांगले झाले की

मनिष
Tue, 08/05/2008 - 17:41 नवीन
त्यामुळे काही वर्षांपासुन इथे आता प्रतिकात्मक मिरवणुक काढली जाते.
हे चांगले झाले की!
नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरीक येत असत. यातील आणखी एक वैशिष्ठ म्हणजे २ वर्षाच्या बालाकापासुन ते म्हातार्‍या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालुन फोटो काठत असत
अचानक भीती कमी होण्याचा आणि नाग न चावण्याचा चमत्कार होत नसेल तर मग ह्याच्यासाठी सापांची/नागांची तोंडे बांधली/शिवली जातात....मग हे थांबवले तर बिघडले कुठे?
पकडलेल्या नाग, साप, धामणी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई
असे होत नाही, कित्येक साप मेले, कायमचे अधू झाले याचा शोध घेअतलाय का कोणी? निदान बंदीमुळे हे प्रकार कमी झाले तरी खूप आहे! :)
  • Log in or register to post comments

सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/05/2008 - 17:44 नवीन
आणि आपल्या आनंदासाठी मुक्या जनावरांना दावणीला बांधणं योग्य नाही वाटत!
  • Log in or register to post comments

न बांधलेली

प्रकाश घाटपांडे
Tue, 08/05/2008 - 21:12 नवीन
आणि आपल्या आनंदासाठी मुक्या जनावरांना दावणीला बांधणं योग्य नाही वाटत!
बैल गाड्यांच्या शर्यती त्यानंतर घोड्याच्या शर्यती वेळी पण हा कायदा आहे. पण पाळतो कोण? चीन चे खेळाडू पण ऑलिंपिक ला प्राणीच होतात. त्यांना पण वेठीसच धरल असतं. पण ते कागदामागे असते. रेस कोर्स च्या घोड्याची काय सरबराई केली जाते. यांची पण केली जाते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

टाईम साप्ताहिकात दोनेक महिन्यांपूर्वी

चतुरंग
Tue, 08/05/2008 - 21:28 नवीन
चीनच्या ऑलिंपिक तयारीबद्दल लेख आला होता. त्यात टाईमचा वार्ताहर खेळाडूंशी बोलायला लागला की तिथे 'निरीक्षक' असे तो पुढे येई. "ह्या खेळाची मला लहानपणापासून आवड आहे. मला ह्यात खूप सुविधा मिळतात." इ.सगळे खेळाडू ठरीव साच्याची पढवलेली उत्तरे देत. ह्यापेक्षा वेगळे कुणी काही बोलतंय असे वाटले की निरीक्षक मधे येऊन बोलणे खंडित करी! चीनमध्ये गावागावातून 'निरीक्षक' पाठवून४ - ५ वर्षाच्या लहान लहान मुले/मुली ह्यांना अक्षरशः वेचून वेचून खेळात जाण्यासाठी नेले जाते. त्यांनी कोणता खेळ खेळायचा हे ते निरीक्षकच ठरवतात, त्या मुलांना चॉईस नसतो (त्यांच्या पालकांना तर मुले कुठे आणि का जातात एवढेच सांगितले जाते)! त्यांना खेळाच्या सर्व सुविधा पुरवून जबरदस्तीने खेळात प्राविण्य मिळवणे भाग पाडले जाते आणि पदकांची लूट करण्यासाठी अनैसर्गिक पद्धतीने त्या त्या खेळात लोटले जाते! (रेसचे घोडे बरे त्यांना बोलता तरी येत नाही! आणि खिंकाळले तरी निरीक्षक नसतात बाजूला!!) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अगदी बरोबर

श्रीयुत संतोष जोशी
Tue, 08/05/2008 - 20:55 नवीन
नमस्कार, आणि आपल्या आनंदासाठी मुक्या जनावरांना दावणीला बांधणं योग्य नाही वाटत! पूर्णपणे सहमत. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

शिराळशेठ

धनंजय
Tue, 08/05/2008 - 21:06 नवीन
नागपंचमीच्या आसपास शिराळशेठ नावाच्या एका इसमाची पूजा (काही गावांमध्ये) करतात. याचे बहुधा औट घटकेचे राज्य होते - किशोर मासिकात आख्यायिका वाचल्याचे अंधूक आठवते. याच्याबद्दल कोणाला माहिती आहे काय?
  • Log in or register to post comments

बत्तीस शिराळा - नागपंचमी

वटवाघूळ
Wed, 08/06/2008 - 17:38 नवीन
प्रति अमोल केळकर, बत्तिस शिराळा हे खेडे गाव नाही ते तालुक्याचे शहर आहे. आजुबाजूच्या बत्तिस खेड्यांचा तालूका म्हणूनच नाव बत्तिस शिराळा पडले आहे. नागपंचमी बद्दल दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद मला वाटते मनिष तुम्हाला बराच गैरसमज आहे नागपंचमी बद्दल "अचानक भीती कमी होण्याचा आणि नाग न चावण्याचा चमत्कार होत नसेल तर मग ह्याच्यासाठी सापांची/नागांची तोंडे बांधली/शिवली जातात....मग हे थांबवले तर बिघडले कुठे?" बत्तिस शिराळा या गावात नागांची पुजा होते. ह्या गावात गारुडी नाहीत जे तुम्हि म्हणताय तसा प्रकार करायला. आणि माहित नसेल तर माहित करुण घ्या नाग पकडण्या पासुन ते त्याना पकडल्या जागेवर सोडण्या पर्यंत त्यांना कसे सांभाळतात ते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा