अश्वत्थामा

निलरंजन's picture
निलरंजन in जनातलं, मनातलं
3 Oct 2014 - 10:27 pm

अश्वत्थामा ...
अंगिरा गोत्रात उत्पन्न भारद्वाज ॠषिंचे पौत्र अर्थात नातू व द्रोणाचार्य या दिव्य अयोनिज ऋषिंचा पुञ
द्रोणाचार्यांनी वडिलांच्या आदेशानुसार धर्मपारायण, सुशील ,तपस्वी अश्या कृपी या कृपाचार्यांच्या बहिणीशी विवाह केला,

या दिव्य दांपत्याला शंकराच्या घोर तपश्चर्येच्या नंतर दिव्य तेजस्वी असा अश्वत्थामा हा पुञ झाला
जो जन्माला आल्या आल्या होते उच्चस्वारात घोड्या समान किंचाळला
त्याचा स्वर दिशदिशांत घुमला और संपूर्ण नभोमंडल व्यापले
तेव्हाच आकाशवाणी झाली कि हया
बालकाचे नाव अश्वत्थामा होईल -

पुत्र जन्मानंतर द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि ब्राह्मणांना सहस्त्र गायी व धनदान केले
द्रोणाचार्यांकडे त्यावेळी पैशाचा अभाव नव्हता
परंतु नंतर द्रोण भगवान परशुरामाकडे दिव्यास्ञ ची विद्या प्राप्त करायला गेले आणि नंतर
घराची आर्थिक स्थिती ढासळत गेली आणि विपन्नावस्था आली तीही इतकी की
द्रोण आश्रमात परतले तेव्हा घरात एक साधी गाय पण नव्हती .
नंतर ऋषि कुमारांना दूध पिताना पाहून अश्वत्थामा दूधासाठी रडत होता तेव्हा एक दिवस द्रोणाचार्यांनी ने पाहिले कि ऋषिकुमार पिठाचा घोल बनवून अश्वत्थामाला पाजले होते आणि तो अवोध बालक – "मी दूध पिले" –
याने आनंदित होत होते
हे सगऴे पाहून द्रोणाचार्यांना स्वतःचीच लाज वाटली की आपल्या परमप्रिय पुञाला साधे दूध सुदधा देऊ शकत नाही...?
त्यांनी स्वतः ला च कोसले आणि मग त्यांनी पुञासाठी गाईची व्यवस्था करण्यासाठी द्रोण
स्थान-स्थान पिंजून घडले,
पण त्यांच्या वाट्याला हे धर्मदान मिळालेच नाही नंतर त्यांना आपला सखा आश्रमातला मिञ राजा द्रुपदाकडे जाण्याचे ठरविले

द्रुपदाच्या राजसभेत प्रथम त्याने ओळखच दाखवली नाही आणि नंतर त्यांचा अपमान केला
पित्याचा अवमान बालक अश्वत्थाम्याने पाहिले त्याचबरोबर पाहिली पित्याची विवशता त्यांची
क्रूर विटंबना हया शस्त्र – शास्त्रशिरोमणिची सत्तासीन मदमस्त द्रुपदाद्वारा अपमानित द्रोणाचार्यांनी द्रुपदा ला पराभूत करण्याची प्रतिज्ञा केली
त्यानंतर कृपाचार्याच्या सल्ल्यानुसार अश्वत्थामाला घेऊन द्रोण पांचाल राज्य सोडले आणि कुरु राज्य में हस्तिनापुर(मेरठला) आले

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

3 Oct 2014 - 11:57 pm | आयुर्हित

अतिशय सुरेख सुरवात.....

इतके सुंदर लेख मिपावर वाचायला मिळणार म्हणून मी आता वाचनालयात जाणार नाही, असे ठरवायला हरकत नाही!

नेत्रेश's picture

4 Oct 2014 - 5:22 am | नेत्रेश

अशा शालजोडीने नवोदीत, नवउत्साहीत लेखक हतोत्साहीत, हतवीर्य, वगैरे होतील व मि.पा. हुच्च साहीत्याला मुकेल.

आयुर्हित's picture

4 Oct 2014 - 10:54 am | आयुर्हित

अहो ही तर १००% प्रशंसाच आहे.

प्रशंसा व शालजोडी यातला फरक सांगावा लागेल आपल्याला!

जेपी's picture

4 Oct 2014 - 6:00 am | जेपी

अप्रतिम,
अश्वत्थामा बद्दल या अँगलने आजपर्यँत मी विचार केला नाही.आणी मिपावर पण वाचले नाही.पुलेशु.

निलरंजन's picture

4 Oct 2014 - 6:30 am | निलरंजन

प्रिय मिपामिञवर्यहो

नवोदित लेखकाचे हक्काचे व्यासपीठ म्हणूनच मिपाला पाहिले जाते
काही काही ठिकाणी टंकित चुका झाल्या आहेत त्याबद्दल क्षमस्व

त्या चुका शक्य तितक्या टाळून अश्वत्थामा हया एकूणच चरित्रावर ही लेखमाला रबोलेल
एका वेगळ्या अॅगलने अश्वत्थामा पाहण्यास तयार राहा...

पुढचा भाग लवकरच

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Oct 2014 - 9:52 am | माम्लेदारचा पन्खा

रच्याकने... अश्वत्थामा हा एक नेहमीच गूढ विषय वाटत आलेला आहे आणि त्याची एक प्रकारची कणव वाटते.

प्रचेतस's picture

4 Oct 2014 - 10:17 am | प्रचेतस

कणव कशाबद्दल?

मृत्युन्जय's picture

4 Oct 2014 - 10:30 am | मृत्युन्जय

खरे आहे. कणव वाटण्याजोगे अश्वत्थाम्याच्या आयुष्यात कधीच काही घडले नाही (लहानपणचे दारिद्र्य सोडले तर). पण त्याबद्दल कौतुहल मात्र नेहमी वाटत आले आहे. महाभारतातला सर्वात अंडररेटेड यौद्ध आहे तो,

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Oct 2014 - 4:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे

रामायणातल्या शत्रुघ्नासारखा ?? ;-)

मृत्युन्जय's picture

4 Oct 2014 - 7:02 pm | मृत्युन्जय

शत्रुघ्नापेक्षा जास्त महत्वाचे पात्र आहे ते नक्कीच. शत्रुघ्न आणि अश्वत्थामा दोघांवरही लेख लिहिले आहेत मी. हव्यात का लिंका

*blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:

नर्मदापरिक्रमेतल्या श्री टेंबे स्वामी यांच्या अनुभवावरून त्याला हे नकोसं झालंय असं वाटत राहतं.

कविता१९७८'s picture

4 Oct 2014 - 2:10 pm | कविता१९७८

श्री टेंबेस्वामींच्या मी वाचलेल्या पुस्तकात तर तो भेटला इतकच लिहिलंय, त्याच्या त्रासाबद्द्ल तर काहीच लिहिलेलं नाहीये, पण श्री. आणि सौ. चितळे यांनी २००९ साली जी परीक्रमा केलीये आणि त्यात तो भेटल्याचा जो किस्सा सांगितलाय त्यावरुन तो खुपच अस्वस्थ आहे आणि त्याला हे नकोसं आहे हे दिसतंय. तु नळी वर सौ . चितळ्यांच्या परिक्रमा कथनाचे व्हिडीओज आहेत . एकुण १८ भाग आहेत , १६ की १७ व्या भागात ह्याचा उल्लेख आहे.

धन्या's picture

4 Oct 2014 - 10:14 pm | धन्या

तेव्हढा तो अश्वत्थामा परीक्रमावाल्यांना भेटल्याच्या माहितीवर काही लिंका असतील तर दया ना.

कविता१९७८'s picture

6 Oct 2014 - 3:03 pm | कविता१९७८

तु नळीवर चितळे परीक्रमा असा शोध घ्या , १६ व्या की १७ व्या भागात उल्लेख आहे, टेंबे स्वामींचे पुस्तक वाचले होते लेखिका - लीला गोळे , त्यात जेव्हा टेंबेस्वामी गरुडेश्वरला पोहोचले तेव्हा उल्लेख आहे, नर्मदे हर हर या जगन्नाथ कुंटेच्या पुस्तकात शेवटी शेवटी उल्लेख आहे.

कविता१९७८'s picture

4 Oct 2014 - 9:53 am | कविता१९७८

माझ्यासाठी खुपच इंटरेस्टींग विषय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Oct 2014 - 10:18 am | कैलासवासी सोन्याबापु

आमच्याकडे विदर्भात अश्वथामा पुजल्या जातो,आदिवासी समाजात बहुतेक,तो सातपुडा पट्ट्यात दिसतो असे मी मान्यतेत आहे, भगवान श्रीकृष्णा ने कपाळा वरचा मणि कप्ल्यावर झालेल्या जख्मे साठी तो तेल मागत फिरतो म्हणतात! खरे खोटे साक्षात् युगंधर जाणोत!

आयुर्हित's picture

4 Oct 2014 - 10:57 am | आयुर्हित

भारतीय पौराणिक काव्यात अश्वथामा चिरंजीव आहे असे सांगितले जाते.

अश्वत्थामा शुलपाणीच्या जंगलात बर्‍याच जणांना दिसल्याचे वाचले आहे , शक्यतो नर्मदा परीक्रमा करणार्‍यांची भेट होते जे जंगलाच्या वाटेने परीक्रमा करतात, आता २००९ पर्यंत नर्मदा परीक्रमावाल्यांना दिसल्याचे ऐकले आहे. खरे खोटे देव जाणे, ज्याला अश्वत्थामाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांचा खरे वाटेल ज्यांना नाही त्यांच्याबद्द्ल काही सांगता येणार नाही.

धन्या's picture

4 Oct 2014 - 10:19 pm | धन्या

ज्याला अश्वत्थामाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांचा खरे वाटेल ज्यांना नाही त्यांच्याबद्द्ल काही सांगता येणार नाही.

यात विश्वास असण्याचा आणि नसण्याचा कुठे संबंध येतो? जर अश्वत्थामा खरंच जीवंत असेल तर त्याची ओळख पटणे काय अवघड आहे? विश्वास असणे आणी नसणे जी गोष्ट दाखवता येत नाही त्याबद्दल संबंधीत असते. जर तो परिक्रमावाल्यांना दिसतो तर तो त्याच भागात फीरत असणार नाही का?

एक महाभारतकालीन शापित व्यक्तिमत्व आजही त्या भागात फीरतंय आणि आपण महान संस्कृतीवाले काहीच करत नाही हे कसे काय? की त्याला मिळालेला शाप त्याने भोगायला हवा म्हणून जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय?

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2014 - 11:27 pm | टवाळ कार्टा

सश्रध्ध लोकाम्ना असे विचारायचे नस्ते...मग आपल्यावर नास्तिकतेचा शिक्का बसतो

आपणास अश्वथामा दर्शनाची आस आहे असे भासते लिंका मागुन पर ज्ञानावर आपली बुध्दि खर्च करणेपेक्षा आपण परिक्रमाच का बरे करत नाही ?

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2014 - 11:35 pm | टवाळ कार्टा

परिक्रमा केल्यावर पक्का दिसेलका?

काउबॉय's picture

5 Oct 2014 - 1:24 am | काउबॉय

कसे आहे माझ्याच सोयिने मी न कळवता तुमच्या घरी आलो(टपकलो) तर तुम्ही घरात असालहि अथवा नसालहि पण याचा अर्थ असा नाय की तुमी तिथे रहात नाय पण राहता म्हणजे भेटालच असेही नाही... म्हणजे रहात नाही असे तर अजिबात नाही होय ना ?

मला अश्वत्थामाच्या दर्शनाची मुळीच आस नाही.

अश्वत्थामा आणि इतर सहा जण अमर आहेत असे जे काही पोथ्या पुराणांमध्ये म्हटले आहे त्या निव्वळ कवीच्या कल्पना आहेत हे कळण्याईतपत भान मला आहे.

मी जे संदर्भ मागितले ते "आम्हाला नर्मदा परिक्रमा करताना अस्वत्थामा भेटला होता" असं म्हणणार्‍यांचे मत "फ्रॉम हॉर्सेस" माऊथ ऐकण्यासाठी/वाचण्यासाठी.

काउबॉय's picture

6 Oct 2014 - 6:56 pm | काउबॉय

म्हणजे तुम्ही तुमचे भान काय सांगते ते प्रमाण मानून इतरांना कवी कल्पना ठरवणार आहात होय. मला वाटले काही वैदन्यानिक पुरावे घेउन चर्चेला आलाय. असो.

धन्या's picture

6 Oct 2014 - 7:04 pm | धन्या

चालू दया तुमचे. :)

कारण आपले आत्मभान आपण मधे आणले . मी फक्त एखादी गोष्ट मोघम असेल तर त्याला मोघम म्हणावे आत्मभान वगैरे घुसडून विशिष्ट रिजल्ट लादायाच्या फंदात पडू नये या मताचा आहे.

धन्या's picture

6 Oct 2014 - 7:20 pm | धन्या

तू महान आहेस आत्मशुन्य.

काउबॉय's picture

6 Oct 2014 - 7:23 pm | काउबॉय

लोकांचे महानपण काढण्यापेक्षा आपले मत विज्ञान निष्ट बनवावे.

धन्या's picture

6 Oct 2014 - 7:31 pm | धन्या

:)

मग 100% वैज्ञानिक कसोटीला जवळ करा. सोयीला विज्ञान सोयिला अध्यात्म पकडू नका आणि पकड़त असाल तर नुसते विज्ञाननिष्ठ बिरुद मिरवू नका.

बोका-ए-आझम's picture

4 Oct 2014 - 11:15 am | बोका-ए-आझम

अश्वत्थाम्याच्या संदर्भात एक विसंगती नेहमी जाणवते. एकीकडे त्याचा उल्लेख अमर म्हणून केला जातो पण मग महाभारतात द्रोणाचार्यांचा वध करताना अश्वत्थामा मेल्याची अफवा पसरवली जाते आणि द्रोणाचार्य त्याला बळी पडतात हे कसे काय? आपला मुलगा अमर आहे हे काय द्रोणाचार्यांना माहीत नसेल?

कविता१९७८'s picture

4 Oct 2014 - 12:02 pm | कविता१९७८

परंतु ही बातमी जेव्हा प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णाने सांगितल्यावर ते विचलित झाले आणी त्यांनी युधिष्ठीराला विचारले कारण युधिष्ठीर केव्हाही खोटे बोलत नसे. युधिष्ठीराने अश्वत्थामा मेला असे सांगितले व अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला असे खुप हळु आवाजात सांगितल्याने युधिष्ठीराला खोटे ही बोलावे लागले नाही आणि द्रोणाचार्याचा विश्वास ही बसला असे मी वाचले होते.

काउबॉय's picture

4 Oct 2014 - 7:21 pm | काउबॉय

रोचक प्रतिसाद....! धर्माचे माहीत नाही पण कृष्णावर द्रोणाचार्य विश्वास ठेवणार नाही जर तो शत्रुपक्षी असेल तर नक्कीच.

कानडाऊ योगेशु's picture

4 Oct 2014 - 8:50 pm | कानडाऊ योगेशु

एकीकडे त्याचा उल्लेख अमर म्हणून केला
बहुदा तो जन्मजात अमर नसावा. युध्दाच्या शेवटी द्रौपदीने त्याला अमरत्व शाप म्हणुन दिले. तोपावेतो तो बहुदा इतरांप्रमाणे मर्त्य मानवच असावा.

मृत्युन्जय's picture

4 Oct 2014 - 10:09 pm | मृत्युन्जय

कृष्णाने. द्रौपदीने नाही. आणि शाप अमरत्वाचा नसुन ४००० वर्षे रानावनात जखमी अवस्थेत भटकण्याचा होता

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Oct 2014 - 10:46 pm | माम्लेदारचा पन्खा

५००० वर्षे झाली ना? त्याची सुटका व्हायला हवी होती एव्हाना...

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 6:53 pm | बॅटमॅन

नै पण मग

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: । कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: ।

इथे अश्वत्थामा सात चिरंजीवी लोकांत धरलेला आहे त्याचे काय?

प्रचेतस's picture

8 Oct 2014 - 7:02 pm | प्रचेतस

तो श्लोक लै नंतरचा आहे.
बाकी ४००० वर्षे नसून ३००० वर्ष भटकत राहण्याचा शाप मिळालेला होता.

ओक्के, सो वरिजिनल महाभारतात (भांडारकरवाल्या) अश्वत्थामा अमर नाहीये का?

प्रचेतस's picture

8 Oct 2014 - 7:07 pm | प्रचेतस

भांडारकर काय, उलट महाभारताच्या कुठल्याही मान्य प्रतीत (उदा. नीलकंठी, वि.म., किसारी मोहन गांगुली) हा श्लोक नाहीये. तो कुठल्यातरी पुराणांतला आहे.

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 7:08 pm | बॅटमॅन

हो रे, पुराणातला आहे ते माहितीये. पण श्लोक सोडून दे. महाभारतात बाकीच्यांचा उल्लेख न करता अश्वत्थामा एकटा तरी अमर आहे असे कुठे म्हटलेय का?

प्रचेतस's picture

8 Oct 2014 - 7:09 pm | प्रचेतस

नाही.

शिवाय द्रोणपर्वातील षोडशराजकीय उपाख्यानात अमर समजल्या जाणार्‍या भार्गवरामालाही मृत्यु येणार आहे स्पष्ट लिहिलेय.

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 7:11 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

बाकी भार्गवराम अमर नै असे लिहिलेला भाग लेटर अ‍ॅडिषन नसेल कशावरून ;)

प्रचेतस's picture

8 Oct 2014 - 7:18 pm | प्रचेतस

ते आहेच रे. षोडशराजकीय उपाख्यान नंतर घुसडलेले असू शकते. पण तरी अगदी नंतरचे निश्चित नाही. कारण ह्यात गय, नहुष, अंबरीश, ययाती अशा राजांची आख्याने आहेत. ह्यातील काही राजे आमच्या गौतमीपुत्राच्या प्रशस्तीत आले आहेत. तेव्हा किमान इसवीसनापूर्वीचे नक्कीच असावेत.

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 7:33 pm | बॅटमॅन

ओह अच्छा, मग असेलही.

बादवे- गौतमीपुत्राची प्रशस्ती नाशिकमधलीच ना?

प्रचेतस's picture

8 Oct 2014 - 7:40 pm | प्रचेतस

होय :)

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 10:56 pm | बॅटमॅन

ओक्के :)

मनीषा's picture

4 Oct 2014 - 11:41 am | मनीषा

हिंदी इन्टू मराठी ट्रान्सलेशन वाटते आहे .
वेगळा अँगल की काय तो या भागात दिसला नाही .
पुढील भागात असेल कदाचित .

तुषार काळभोर's picture

4 Oct 2014 - 12:50 pm | तुषार काळभोर

भाषांतर (ते पण थोडे चु़कीचे) वाटते आहे.
कदाचित भाषांतरात टंकनश्रम वाचवण्यासाठी चोप्य-पस्ते करताना अनावधानाने राहिले असेल.

दादा पेंगट's picture

4 Oct 2014 - 10:42 pm | दादा पेंगट

"पुञ" शब्द कोणत्या भाषेतला आहे हो? अर्थ कळला नाही. 'पुञाला' 'पुञासाठी' या प्रयोगावरुन हा शब्द 'नाम' असावा असे वाटते.
"दिव्यास्ञ " चा तर उच्चारही जमेना दादा.
"मिञ" हा शब्दही नवाच.मराठीत कधी पाहिला/वाचला नाही.

आदूबाळ's picture

6 Oct 2014 - 7:43 pm | आदूबाळ

खरेक्ट आहे.

गोत्र, पौत्र जमतं आणि "मिञ" करावं लागतं हा दैवदुर्विलास आहे.

विलासराव's picture

6 Oct 2014 - 9:58 pm | विलासराव

मी तर परिक्रमेत शुलपाणीतुन प्रवास केला आहे २०१२ ला, पण मला तर काय दिसला नाय बॉ तो अश्वत्थामा.

धन्या's picture

6 Oct 2014 - 10:07 pm | धन्या

तुमच्यासोबत असलेल्या शुन्यात्म्याला पाहून दुरुनच पळाला असेल.

काउबॉय's picture

6 Oct 2014 - 10:22 pm | काउबॉय

नंतर म्हणु नका तुमी अश्वत्थामा कवी कल्पना समजता म्हणून :)

होय मी विलासरावांसोबत होतो शूलपाणित आणि आम्हाला अश्वत्थामा आढळला नाही यावर आम्ही उपहासही व्यक्त केला होता. मला वैयक्तिक स्तरावर त्यासदृश्य काही अनुभवास यावे असे मनापासून वाटत होते पण असा अनुभव आला नाही. पण त्याबद्दल मुळात फार विचार केला न्हवता... प्रवास आनंद देतो. फलश्रुती देतोच असे नाही. मला शूलपाणी
प्रवासाचा आनंद आहे त्रासही असह्य न्हवता आणि अनुभव कायमच सोबत राहील.

मला गवसले नाही. जे काही लिहले बोलले असते त्यात पराकोटिचे प्रवासवर्णन रिपिटेशन झाले असते जे करून अर्थातच मला अजुन बोर मारायचे नाही म्हणून मी यावर अंजावर चर्चा केली न्हवती. पण माझी शांतता बहुदा मुर्खाना अजुन चेकाळुन गेली असावी व दुर्दैवाने काही शहानेसुधा त्याला सामिल झाल्याचे चित्र दिसत असल्याने शिरोमणिन्च्या प्रत्येक शंकेला बहुदा समाधान करायचा विरंगुळा होणार असे चिन्हे आहेत. असो :)

वाचतोय... पुढच्या भागाची वाट पाहतो.

मदनबाण.....
बदललेली स्वाक्षरी :- Junction Lo... ;) { Aagadu } with lyrics

निलरंजन's picture

8 Oct 2014 - 6:40 am | निलरंजन

अश्वत्थामा-2अश्वत्थामा-2