काल राती आकाशात, चांद दिसला हासरा
कानी सांगून तो गेला,आला दसरा दसरा
घरोघरी लाडू शिरा, गोडाधोडाचा पसारा
परि तोंडहि आवरा, ठेवा नियम आहारा,
आला दसरा दसरा
परिक्षा आली तोंडावर, करा अभ्यासाचा जोर
त्यात मास ऑक्टोबर, दगा देईल सत्वर
पण अभ्यास विसरा, एक दिनच विसरा, आला दसरा दसरा
गोष्ट आहे पुरातन, मोठा दसर्याचा मान, देती सोन्याचेहि पान!
नाहि राहिलि ती शान, वर किंमत महान, देती आपट्याचे पान, देती फुकाचाच मान!
येई दसरा दसरा, जाई दसरा दसरा, सर्वां करुनि हासरा,
सणांच्याही या सणाला, करु मानाचा मुजरा!
आला दसरा दसरा