'नेहेमीच ... तुझ्यामुळे' ही बेसनलाडवाची कैफियत वाचून अगदी भरुन आले, ऊर्मी बराचवेळ दाबून ठेवली पण मळमळ थांबेना तेव्हा शेवटी इथे आलोच! आदतसे मजबूर दुसरे काय?! ;)
वृत्तात 'भांग'
अर्थास 'टांग'
नेहमीच ... तुझ्यामुळे
कवितेत घोळ
घालावी खोळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
कमरेत खूर
डोळ्यात पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
सगळे कसे
(फसले असे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
शब्दांची लाच
शब्दांना लाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
पहिलाच 'बार'
पहिलीच 'धार'
नेहमीच ... तुझ्यामुळे
वाचून झीट
विडंबन धीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
कवितेची भेट
'चतुरंग' थेट
नेहमीच ... तुझ्यामुळे
चतुरंग
प्रतिक्रिया
4 Aug 2008 - 7:45 pm | आनंदयात्री
वृत्तात 'भांग'
अर्थास 'टांग'
नेहमीच ... तुझ्यामुळे
सगळे कसे
(फसले असे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
रंगा भाय मानले बॉ तुम्हाला .. अगदी अगदीच जमले विडंबन :)
-
(शिकाउ उमेदवार) आंद्याटुकार
4 Aug 2008 - 7:46 pm | शितल
जबरा विडंबन झाले आहे.
:)
4 Aug 2008 - 7:53 pm | सुवर्णमयी
चालू द्या:)
विडंबन आवडले.
4 Aug 2008 - 7:57 pm | केशवसुमार
रंगाशेठ,
एकदम पहिल्या धारेचे विडंबन..चालूदे..
वाचून झीट
विडंबन धीट हा हा हा..
(निवृत्त)केशवसुमार..
4 Aug 2008 - 9:34 pm | बेसनलाडू
शेवटचे दोन पेग भारी. ह ह पु वा
(हसरा)बेसनलाडू
5 Aug 2008 - 5:00 am | सर्किट (not verified)
आधी वाचताना "कमरेत खूर" हे कळलेच नव्हते. आता पुन्हा वाचताना ती दुगाणी नीट बसली, आणि कळवळलो.
वा रंगाशेठ !
- सर्किट