दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
21 Sep 2014 - 11:53 pm

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण,
आकर्षण ते लवणादी प्रोक्षण,
कर्तन करुनी या शब्दांचे
सारे करुया जिल्बी भक्षण

पैसा ताई फू...फुंकरुनी
निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ )
मम हाती तो तांब्या-कसला
जिल्बी पडता जीवच घेई

दुष्ट हत्ती तो काड्या लावी
संधी कधिही सोडत नाही
स्वतःच देतो तांब्या भरुनी
आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ )

धन्या वाकडू सामिल यांना
हल्ली तो ही काड्या सारी
धन्या वा कडू... असला तरिही
दगड मारण्या तयार भारी

खाटुक म्यानी भाषाSभक्षी
मधेच येऊन तांब्या ओढी
शब्द प्र'भावी असले तरिही
मनात याच्या अट्टल खोडी =))

कसे दुष्ट हे सारे जमले
मम आत्म्याला क्लेशच देती
परस्परांच्या संगनमतीने
खरड्वहीतुन दगड मारती

मी ही आता कवने रचुनी
तैय्यारी ती पुरती केली
बघता बघता शब्द जुळोनी
फिरला तांब्या,जिल्बी झाली! =))
========
lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu
http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif

कॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडभूछत्रीहास्यरौद्ररसमौजमजा

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

21 Sep 2014 - 11:58 pm | भिंगरी

कित्ती कित्ती त्रास हो तुम्हाला?

पैसा's picture

22 Sep 2014 - 12:08 am | पैसा

=)) =)) =))

तुम्ही एवढे खिलाडूपणाने घेता म्हणून तुम्हाला छळतात सगळे! जिल्बी मस्त झालीय एकदम, फर्मास!!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा

जिल्बी मस्त झालीय एकदम, फर्मास!!
http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif
====================
सं'तुष्ट आत्मा
http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif

धन्या's picture

22 Sep 2014 - 12:16 am | धन्या

या काव्यात सातवाहन आणि अ‍ॅक्टिव्हावाहन हे दोन व्यवच्छेदक शब्द नाहीत.

कवितानागेश's picture

22 Sep 2014 - 12:52 am | कवितानागेश

ते तुम्हाला सुडंबनात वापरायला राखून ठेवलेत. :)

धन्या's picture

22 Sep 2014 - 12:11 am | धन्या

एकदा एक भटजी
बघायला* गेला
कुणीच दिसले नाही
परत फिरुन आला

* पुन्हा एकदा ह्या... ह्या... ह्या...

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/guns/big-machine-gun.gif धन्या....

धन्या's picture

22 Sep 2014 - 1:12 am | धन्या

>> धन्या....
यापुढचा "डोसाखाऊ" शब्द राहीला काय लिहायचय? ;)

प्रचेतस's picture

22 Sep 2014 - 2:26 pm | प्रचेतस

आणि ते 'भटजी' नसून 'भडजी' आहे निरिक्षण नोंदवतो.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 2:39 pm | टवाळ कार्टा

बेक्कार हसतोय हापिसात =))

त्य "भडजी" शब्दाचे उद्गाते आम्हीच असून केवळ सार्वजनिक मंचावर सांसदीय भाषा वापरण्याचा संकेत पाळावा म्हणून आम्ही त्या मुळ चारोळीला फाटा दिला.

ईच्छुकांनी श्री होयंका* गुरुजींची भरडवही* पाहावी.

* श्रेयः वल्ली
** श्रेय: खुद्द श्री. होयंका गुरुजी

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 4:00 pm | टवाळ कार्टा

ती चारोळी व्यनी करणार का ;)

दिपक.कुवेत's picture

22 Sep 2014 - 12:21 am | दिपक.कुवेत

कस कसं कसं???

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2014 - 1:56 am | श्रीरंग_जोशी

वा वा वा, झकास.

काव्य असावे तर असे.... :smile: .

बादवे अनेक वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो आहे. त्याचा नेमका अर्थ काय हो?

जुइ's picture

22 Sep 2014 - 2:48 am | जुइ

छान जमली आहे हो अगदी!!

खटपट्या's picture

22 Sep 2014 - 2:50 am | खटपट्या

दुष्ट हत्ती तो काड्या लावी
संधी कधिही सोडत नाही

हे नक्की कोण ?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 6:36 am | अत्रुप्त आत्मा

@वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो >> दू...दू... मंजे दुष्ट..दुष्ट..!
===============
@हे नक्की कोण ?>>> ज़रा वेळ थांबा,येइलच इतक्यात! :-D
मग प्रतेक्षच दाखिवतो! ;-)

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2014 - 6:56 am | श्रीरंग_जोशी

मी दुष्ट दुर्जन किंवा दुष्ट दुराचारी असे समजत होतो :smile: .

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 9:43 am | खटपट्या

अन्दाज आलाय तसा. पण तुम्हीच स्पष्ट केलेलं बरं...

चित्रगुप्त's picture

22 Sep 2014 - 6:33 am | चित्रगुप्त

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण,
आकर्षण ते लवणादी प्रोक्षण,
बोडण करुनी या शब्दांचे
सारे करुया जिल्बी भक्षण

बोडणात जिल्बी सयुक्तिक वाटणार नाही आणि पुरणपोळी मीटरमध्ये बसणार नाही म्हणून कर्तन वापरलेलं दिसतंय. ;)

आनन्दिता's picture

22 Sep 2014 - 6:45 am | आनन्दिता

कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ? मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा. :-D =D :biggrin:

खूप सारे "ण" जमवले की तुम्ही .
जिलबी छानच बरं ़ का!

मिपावर गेले काही दिवस धर्मं, कर्म,मंत्र्, तंत्रं , साधना, परिक्र्मा, इतिहास-भूगोल-ना. शास्त्रं, चूक, बरोबर - असं जड जड वाचून वाचून दमायला झालं होतं अगदी.
बरं वाटलं !

प्रचेतस's picture

22 Sep 2014 - 8:15 am | प्रचेतस

उगीच नाही तुम्हाला बुवेश जिल्बीपाडवी म्हणत. =))

बाकी सुचतं कसं ओ असं लिहायला???

प्रचेतस's picture

22 Sep 2014 - 8:16 am | प्रचेतस

खाटुक म्यानी भाषाSभक्षी
मधेच येऊन तांब्या ओढी

इथे

खाटुक म्यानी भाषाSभक्षी
हळूच लपवलेले भांडे शोधी

असं पायजे ना?

धन्या's picture

22 Sep 2014 - 8:38 am | धन्या

कसले भांडे ? ताकाचे का ? भांडे का लपविता...???

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 10:21 am | अत्रुप्त आत्मा

@खाटुक म्यानी भाषाSभक्षी
हळूच लपवलेले भांडे शोधी

असं पायजे ना? >>> जिल्बीत हात-भार लाऊन स्वयं"सिद्ध असल्याचे जाहिर केल्या बद्दल धन्यवाद! =))

अन्या दातार's picture

22 Sep 2014 - 9:20 am | अन्या दातार

याची आठवण झाली. :)

नाखु's picture

22 Sep 2014 - 9:53 am | नाखु

मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे!
मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!!
दु.दु.भारी खट्याळ ! दिसे जरी मवाळ!
हुर्यो करी असा !मी अडवू तरी कसा !!
मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे!
मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!!
बॅट्या-धन्या जोडीने बघतात (काडी) सारून माझ्याकडे कसा !
जीव हो वेडापीसा ! वाटे द्यावा ठोसा (स्माईलीचा) कसा देऊ रे!!
मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे!
मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!!
===
अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर

अगागा... चांगलाच षटकार मारलात का का. :)

स्पा's picture

22 Sep 2014 - 10:22 am | स्पा

अच्च जालं तर

किसन शिंदे's picture

22 Sep 2014 - 10:45 am | किसन शिंदे

खिक्क :-D

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 12:36 pm | अत्रुप्त आत्मा

@आनन्दिता

कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ?
मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF हेच्च..हेच ते!!! सर्व माहित असूनंही.. =))
म्हणूनच नेहमी म्हणतो:- छळू आगोबा हत्तीची बहीण- दुत्त दुत्त आ...नन्दिता! =))
=================
@अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif बरीच चांगली खुडबुड करिता वो टुंम्ही! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif
=================
@स्पा http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-546.gif
अच्च जालं तर>>> :-/ तू गप रे हलकटा!!! =))

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 1:35 pm | बॅटमॅन

=)) =)) =)) =)) =))

सध्या काव्यबद्धकोष्ठ झालाय. तो मोकळा झाला की जिल्ब्या पाडायला हाजीर हायेच!!!!!

आत्मूसची ही जिल्बी न्हेमीप्रमाणेच मस्त ;)

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 2:04 pm | प्यारे१

चान चान!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा

चान चान!>> आणि आपण महान! :p

कविता बिघडली जिल्बी झाली छान,
आम्हाला लागला गुर्जींचा वाण. ;)

आयला. प्यारेगुर्जींनी पाडलेली जिल्बीसुद्धा चक्क आध्यात्मिक आरतीच्या चालीत म्हणता येते. धन्य _/\_

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 4:12 pm | प्यारे१

दत्ताची आरती काय रे?

कुठलीही जण्रल आरती. तिची एक पेट्ट चाल असते. काही आरत्या विशेष फेमस इ. झाल्या की लोक चाल बदलतात तरी किंवा उगा लाडिक गायकी ढंगाची चाल तरी बशिवतात. पण अगोदरची बेशिक चाल तीच असते. उदा. च पायजे तर 'सुखकर्ता' ची नॉन गायकी वाली चाल- जी घरोघरी म्हटल्या जाते ती.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 4:54 pm | अत्रुप्त आत्मा

.................................एक आरती-खाटुक-म्यानी!!!

आरती खाटुक म्याना तुझी नामे किती ना..ना
आंम्ही केवळ शब्द'धारी नुसत्या डोलवितो माना॥धृ॥

संस्कृत असो कन्नड तामिळी,तिथे मेंदुत बसे गोळी
अजब हा खाटुकम्यान,भाजतो कुठेही ती पोळी॥१॥
..........आरती खाटुक म्याना॥धृ॥

व्याकरणाचे शिक्रण ते, केवळ ऐकू'लागे ग्वाड
खाटुक हा पुढे तिथेही,आहे पक्का शब्द'द्वाडं॥२॥
..........आरती खाटुक म्याना॥धृ॥

वृत्तातही परंफेक्टं हा,नाही अक्षरांशी-मोड
आमचा मामला अर्थवाही,फक्त आशयाची जोड॥३॥
..........आरती खाटुक म्याना॥धृ॥

मेंदूची हार्ड-डीस्स्स्स्स्स्स्कं...पाहू आहे किती ज..ड
आम्ही लक्षात ठेऊ जाता,लावे आंम्हा मेली थ...ड :-/ ॥४॥
..........आरती खाटुक म्याना॥धृ॥

करवावे सम-रूप, खाटुकम्याना - संस्कृतात
पाहू आम्म्हा जिल्बि'कांना,किती मार्क पडतातhttp://www.pic4ever.com/images/2i1d1co.gif॥५॥
..........आरती खाटुक म्याना॥धृ॥
=============================

http://www.pic4ever.com/images/Ghelyon.gif
....

प्रचेतस's picture

22 Sep 2014 - 4:58 pm | प्रचेतस

=)) .. =)) ..=))

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 5:01 pm | प्यारे१

=))

बॅट्याला अम्मळ उंच स्थानी ठेवून बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा

@बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले>>> आक्षी बराब्बर वळिकलं बगा तुमी! ;) फकस्त आरती'चा संकल्प तुमच्या णावाणी सोडिला होता...तुमाला ण सांगताच! =)) तेची पावती मिळाली तुमच्या परतीसादानी! :p

म्हंजे प्यारेकाका अजून थोडं पुण्येवंत झालं म्हणायचं.

सूड's picture

22 Sep 2014 - 5:13 pm | सूड

*HELP* *dash1*

अत्रुप्त आत्मा ऐसे लेवुनिया नाम
संचारी त्रिलोकी आणिक चारी धाम ||धृ.||

कार्य करी, बोध सवे, करी खादाडी
रांगोळीही काढी लेखनजिल्बी पाडी ||१||

पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी
अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२||

दु दु आगोबा, धन्या आणि सूड
पेटविति सदा त्यामागे चूड ||३||

आणिक सदस्य ऐसे- उदा. हा स्पांडू,
खोडी काढी, बुवा म्हणे मारिन हां दांडू ||४||

खोड्या काढुनिया लोक ते हसती
आत्म्याची परी आगळी आहे महती ||५||

पौरोहित्य करी, परी पुरोगामी
कैक गोष्टींत पुरता मूलगामी ||६||

पाहुनि आत्म्याची शीघ्ररचित आरती
बॅटमॅन म्हणे, भेट तुजप्रती ||७||

देववाणी राहो, सध्या मायभाषा
मानुनि घ्याल गोड हीच बहु आशा ||८||

बुवाला अम्मळ उंच स्थानी ठेवून बॅटमॅन त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहे असे दृश्य डोळ्यापुढे आले.

;)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा

@पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी
अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|>>> =)) अफा ....ट !!! __/\__ =))

प्रचेतस's picture

22 Sep 2014 - 9:38 pm | प्रचेतस

_/\_
महान आहे बाट्या

आदूबाळ's picture

22 Sep 2014 - 10:25 pm | आदूबाळ

अ‍ॅक्टिव्हा? मागे बुवांनी एलिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा पेप्रात झळकलेला फटू चिकटवला होता.

@ब्याट - आरती फक्कड जमलीये!

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2014 - 10:35 pm | टवाळ कार्टा

लिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा

आमच्या हत्तीला रानटी म्हंटल्याबद्दल जोरदार निषेध

बुवांनी बायडी बदललीये बहुतेक. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2014 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

लय भारी !

आता संमंने "आखिल वैश्विक मिपा शीघ्रकवी संमेलन" संयोजित करण्याचे मनावर घेतलेच पाहिजे ! =))

किसन शिंदे's picture

23 Sep 2014 - 9:12 am | किसन शिंदे

:D :D अफाट लिवलंय रे बॅट्या.

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 9:42 am | खटपट्या

ही आर्ती फुड्च्या येळच्या आर्ती संग्रात छापणेत येइल. कल्जी नसावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2014 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

सही पण सही आहे ;)

आंबट चिंच's picture

22 Sep 2014 - 2:43 pm | आंबट चिंच

ओ आत्मुदा आता जिलब्या बस झाल्या आम्हला लाडू पाहिजेत आता.

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 3:14 pm | बॅटमॅन

लाडू खाल्ले तर चिंचेचा आंबटपणा निघून जाईल की हो.

गलत...

आधी लाडू आणि मग थोडे दिवसांनी, चिचा आणि बोरे.

सूड's picture

22 Sep 2014 - 10:27 pm | सूड

>>आधी लाडू आणि मग थोडे दिवसांनी, चिचा आणि बोरे.

नोत नेचेस्सर्य

कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेले काव्य !!

>>फिरला तांब्या,जिल्बी झाली!

अच्छा!! मला अजूनपर्यंत वाटत होतं की चकली बिघडली की कडबोळं करतात तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 3:55 pm | अत्रुप्त आत्मा

@तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.>>> बास की आता!!!!!!!!!! :p

ही जिलबी कुंथून कुंथून पाडलीत का एकाच फ़टक्यात तांब्या गरागरा फिरवून पाडलीत म्हणे?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2014 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा

@ तांब्या गरागरा फिरवून पाडलीत म्हणे?>>> http://www.sherv.net/cm/emoticons/playful/making-bronx-cheer-smiley-emoticon.gif
निरर्थकतेचा ................... विजय असो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/making-bronx-cheer-smiley-emoticon.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2014 - 4:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजकाय शिघ्रकवितेचा व्हायरस जोरात पसरला आहे.... डेंगीला टक्कर देऊन आहे असे समजते ! =))

गुर्जी तुमाला पण चावला काय ? लय भारी कविता !

प्रमोद देर्देकर's picture

22 Sep 2014 - 4:36 pm | प्रमोद देर्देकर

" अशी पाखरे येती, आणिक जिलबी पाडूनी जातीईईई,
दोन टग्यांची भांडणे होता
दोन टग्यांची भांडणे होता
बघे खदखदुनी हसती,

अशी पाखरे येती..... ||क्रमश:||

सस्नेह's picture

22 Sep 2014 - 5:07 pm | सस्नेह

कडक जिल्बी !

पाषाणभेद's picture

22 Sep 2014 - 6:39 pm | पाषाणभेद

:-)

चित्रगुप्त's picture

22 Sep 2014 - 10:23 pm | चित्रगुप्त

आहे तृप्त तरी तयास म्हणती, अत्रुप्त किं कारणी
दर्पण सर्पण अर्पणोनि अवघे, पाडीत जिल्ब्या झणीं.

मुक्त विहारि's picture

22 Sep 2014 - 10:26 pm | मुक्त विहारि

खरडफळ्यावरचा धांगड-धिंगा बोर्डावर आला...

डोईवरती कढई, हाती घेऊनी झारा
तांब्या फिरवी बघा आत्मू हा गरागरा :P

a

हे नक्कीच अभ्याचं काम असणार.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 11:06 am | अत्रुप्त आत्मा

काम अभ्याचं .. डोकं अगोबाचं ! :-/

जेपी's picture

23 Sep 2014 - 9:20 am | जेपी

काय आरती चालली आहे एक दुर्स्याची
=))

धन्या's picture

23 Sep 2014 - 11:38 am | धन्या

आरती आत्मूबुवा
वाहन हे आक्टीवा
घालूनिया हो मांडी
कशी चालविता देवा
आरती आत्मूबुवा || धृ ||
आम्ही सारे अडाणभोट
काही कळेना हो आम्हा
करुनिया तुमची सेवा
देवा विनवितो तुम्हा
आरती आत्मूबुवा || १ ||
तुमच्या साधूवाण्याची
असे कथा हो वेगळी
नौका ती न हो बुडता
तया सद्बुद्धी ती झाली
आरती आत्मूबुवा || २ ||
मिळता ती संधी तुम्हा
करता प्रबोधन हो देवा
आम्हा पुस्तक पंडितांना
वाटतो तुमचा हो हेवा
आरती आत्मूबुवा || ३ ||
म्हणती जन तुम्हा दांभिक
परी अंतरी हो तुम्ही शुद्ध
म्हणे धन्या हा यथामती
ज्याने जाणले तो हो बुद्ध
आरती आत्मूबुवा || ४ ||

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 11:41 am | खटपट्या

या धाग्यातल्या सर्व आरत्या एकत्र करून एक आरती पुस्तक छापूया

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 12:31 pm | टवाळ कार्टा

_/|\_

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 1:03 pm | बॅटमॅन

निव्वळ थोर _/\_

धन्यानेही या निमित्ताने आपल्या विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2014 - 2:38 pm | अत्रुप्त आत्मा

धनाजीराव.... जबरीच हो! __/\__
आणि या सांगते'साठी विशेष आभार! http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif

म्हणती जन तुम्हा दांभिक
परी अंतरी हो तुम्ही शुद्ध
म्हणे धन्या हा यथामती
ज्याने जाणले तो हो बुद्ध

===========================
@विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.>>> आणि खाटुकमॅनास +++१११

विजुभाऊ's picture

23 Sep 2014 - 1:39 pm | विजुभाऊ

जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा
तुमचा काय विचार वर्णावा नामा
मुखे आणी फेस लिहोनी भाषा नाना
संस्कृत उर्दू कन्नड काहीही म्हणाना.
काडीसारुनी होता हळूच पळ काढाना
वाढे स्मित वदनी मग पॉपकॉर्न खाताना
जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा

चौकटराजा's picture

23 Sep 2014 - 4:43 pm | चौकटराजा

हरे आत्मा हरे आत्मा हरे हरे हरे
आमची कॉमेंट येते तेंव्हा मुखी मूग भरे .....
कारे ब्याट्या कारे धन्या कारे कारे कारे ?
बुवाचा असा छळ करता नाही हे बरे ....

आता कोणाला जमेल तर मंत्र पुष्प येउन द्या !
नमो व्रात्यपतये आत्मू दादाय नमो नमः

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2014 - 8:37 pm | टवाळ कार्टा

सगळ्या आरत्या दिवळी अंकात टाकाच अशी संपादकांना णम्र विणंटी

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 8:41 pm | प्यारे१

>>> दिवळी

जुन्या घरांच्या जाड भिंतींमध्ये छोटे १.५ फुट बाय १.५ फूट आणि साधारण १ फुट खोल असा कप्पा असे.
त्याला दिवळी म्हणत.

बहुतेक संध्याकाळी/ रात्री दिवे/कंदिल/ चिमण्या ठेवण्यासाठी त्यांचा वापर होत असे. ते आठवलं.

सस्नेह's picture

24 Sep 2014 - 12:40 pm | सस्नेह

आरती संग्रह दिवाळी अंकात आलाच पहिजे ! !

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2014 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा

:D :D :D

गुरुजी आले परत घेऊनी तांब्या पाडी कविता फार सुंदर. गुरुजी तांब्या ब जिलबी उत्तम. बॅटमॅन साहेब व धन्यासाहेब तुमचया कविता फार उत्तम.

वा वा गुर्जि ..वल्लि धन्या काका आणि सुड काका आणि ते खाटु़क कोण ते कळ्ळं नै ..

पण ..
' रचता कवणे जिल्बी होइ
अगोबा करी खाण्याची घाई
काकाहि माझे जिल्बीवेडे
जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई =))

अत्रुप्त आत्मा's picture

25 Sep 2014 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा

@जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई >>> =)) बालिका आली!!! =))
धूम धूम धमाल!!!!!! :-D

अाता अारती पैैसाताईची!!
॥ अारती पैसाताईची ॥
जय देवी पैसाताई,मिपा संपादिनी
भक्तांना पावसी ट्रोलांवर तू धावसी॥

अनाहिते पाठी उभी राहसी
टवाळां धपाटे घालसी
कर्तरी वापरोनी
संपादना तू करिसी॥१॥

कधी विनोद साधण्या कि.ती.शहाणी तू होशी
कधी सुबक भाषेत लिखाण करिशी
कधी काड्या तू सारिशी
कंपुबाजांसोबत कधी मौजा तू करिशी ॥२॥
जय देवी पैसा ताई..