इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
18 Sep 2014 - 8:10 pm

सुखाचा केवढा झाला पसारा
बिलगला वेदनेचाही पहारा

तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा

तुझ्या वाणीत सारे भाव होते
नको सांगूस की केला पुकारा

तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी
नसे ही बातमी आहे इशारा

किती चेकाळली स्वप्ने उराशी
पहा मिळताच थोडासा उबारा

अजुन तुडवीत आहे पाय काटे
अजुन नक्की नसे माझा निवारा

शरीराची उडाली फार थरथर
मनामध्ये कुठे होता शहारा?

मला सांगून गेला आपलेपण
तुझा तो एक ओळीचा उतारा

दुरुन नुसतेच तू नाचू नको ना
इरेला पेटला आहे पिसारा

जगाला पाहिजे ते ते म्हणू दे
'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा

मराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

18 Sep 2014 - 10:22 pm | चौथा कोनाडा

मस्त आहे ! आवडली !

>> तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा <<
हे विशेष आवडले !

काउबॉय's picture

19 Sep 2014 - 12:14 am | काउबॉय

हां सागरी किनारा च्या चालीवर व्यवस्थित म्हणता येइल.

पैसा's picture

19 Sep 2014 - 11:10 am | पैसा

आवडले.

विलासराव's picture

19 Sep 2014 - 12:19 pm | विलासराव

आवडले

विवेकपटाईत's picture

19 Sep 2014 - 8:46 pm | विवेकपटाईत

हे विशेष आवडले
जगाला पाहिजे ते ते म्हणू दे
'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा

निरन्जन वहालेकर's picture

19 Sep 2014 - 9:22 pm | निरन्जन वहालेकर

"तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा"

व्वा ! क्या बात है ! !

अत्रुप्त आत्मा's picture

19 Sep 2014 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा

टाळ्या.....!
सुंदर रचना!

वेल्लाभट's picture

22 Sep 2014 - 3:19 pm | वेल्लाभट

खास जमली नाही. ओढून ताणून वाटली.

अजय जोशी's picture

22 Sep 2014 - 7:19 pm | अजय जोशी

खास जमली नाही. ओढून ताणून वाटली.<<<<<
8P
आवडला प्रतिसाद.