हुंडा देणे, घेणे गैर आहे हे माहित असूनही अजूनही हे प्रकार सर्रास चालूच आहेत.
याविषयावर अनेक चर्चाही होतात.
पण काही ठिकाणी चांगल्या प्रथाही पहावयास मिळतात.
जसे,.काही समाजात (कोकण भागातील) अशी प्रथा आहे ,लग्नाचा खर्च उभय पक्षांनी समान वाटून घ्यायचा.
हि पद्धत न अवलंबिल्यास त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात येते.
अशा पद्धतींचे अनुकरण सगळ्यांनी करणे गरजेचे आहे.
परंतु आजकाल टीव्ही,सिनेमा पाहून इतर समाजाच्या पद्धतीने नटणे,त्याच पद्धतीचे जेवणाचे अनेक पदार्थ,अन्नाची नासधूस यातच समाज अडकत चालला आहे.
यात वेळ,पैसा, श्रम यांचा विनाकारण अपव्यय होतो.
समाजातील काही लोक स्वतः बदल घडवू इच्छितात पण त्यांना अनुभव विचित्र येतात
ज्या मुलाकडचे लोक म्हणतात आम्हाला तुमच्याकडून काही नको फक्त मुलगी द्या,अशा मुलांना चक्क नकार आलेला आहे
कारण काय तर मुलात काही दोष असेल म्हणून काही मागत नाही (मला मान्य आहे काही वेळा असे असतेही,पण या गोष्टीची चौकशी करून माहिती काढता येतेही.)
मुलामुलींच्या अपेक्षाही वाढत चालल्या आहेत.
विशेषतः मुलींच्या,कारण त्या जास्त शिकलेल्या असतात,जास्त कमवत असतात,मग मुलगा त्यांच्यापेक्षा जास्त कमावणाराच पाहिजे असतो
शिवाय मुलगा सुप्रस्थापित (वेल सेटल्ड ) पाहिजे,स्वतःचे घर,चारचाकी गाडी असावी या अपेक्षा असतात.
अशा अपेक्षा असण वाईट नाही पण एकदम या गोष्टी मिळण थोड कठीण असतं.
मुलांचाही शिक्षणासाठी खर्च झालेला असतो (जसा मुलींचाही झालेला असतो आणि म्हणूनच मुलाकडच्यांनी हुंडा मागू नये,.)शिक्षणासाठीचे कर्ज,घरासाठी कर्ज यातून निघून हळूहळू तो सर्व काही मिळवू शकतो पण त्यासाठी काही वेळ जावा लागतो आणि हे सर्व पूर्ण करून मग लग्न करायचे तर वय वाढलेले असते,
म्हणून मला असे सांगावेसे वाटते कि मुलीकडच्यांनी या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेतले पाहिजेत.कारण या अपेक्षेतील मुलगा मिळेपर्यंत मुलींचेहि वय वाढत जाते आणि शेवटी कुठेतरी समझोता करावा लागतो.
(सदर लेख यापुर्वी चेपुवर प्रकाशित झाला आहे.)
प्रतिक्रिया
11 Sep 2014 - 11:49 pm | भिंगरी
आणि हो.जरी मुली शिकलेल्या नसतील तरीही हुंडा घेउ नये.
13 Sep 2014 - 1:15 pm | टवाळ कार्टा
ते "बाहेर सेटल झालेलाच" वर पाहिजे राहिले की ;)
13 Sep 2014 - 2:17 pm | खटपट्या
(थोडे विषयांतर)
मुलीला नोकरी असो किंवा नसो पण मुलाला नोकरी पाहिजेच. हा हट्ट का ? नोकरी वाली मुले बिना नोकरी वाल्या सुशिक्षित मुलीशी लग्न करतातच ना.
मग एखाद्या नोकरी वाल्या मुलीने एखाद्या सुशिक्षित बेरोजगाराबरोबर का लग्न करू नये ? हि समानता कधी येणार.
नोकरीवाल्या मुलीना आपल्यापेक्षा जास्त पगार असलेला नवरा हवा असतो. इथे स्त्रिया स्वत:च स्वत:ला कमी लेखत नाहीत का ?
13 Sep 2014 - 3:41 pm | कवितानागेश
बरोबर आहे.:)
13 Sep 2014 - 10:31 pm | भिंगरी
आपल्या मताशी पुर्ण सहमत.
14 Sep 2014 - 12:02 pm | उपास
हे तेव्हाच शक्य
आहे जेव्हा तो सुशिक्षित बेरोजगार मुलगा पूर्णवेळ घरकामाची, मुलांची काळजी घेईल (उनाडपणा, सिगरेटी फुंकणे आणि इतर फालतू पुरुषी अहंकार बाजूला ठेवून..
नवर्याची नोकरी सुटलेय आणि घरातील बाई नोकरी सांभाळून घरी येऊन पोळ्या लाटतेय, मुलांकडे वघते आणि तिएचे सुशिक्षित बेरोजगार नवरोबा मित्रांबरोबर चकाट्या पिटतायत हे चित्र बरेचदा बघायला मिळतेच.. ;)
14 Sep 2014 - 11:34 pm | मुक्त विहारि
+१...
15 Sep 2014 - 2:04 am | शिद
+२
असेच म्हणतो.
15 Sep 2014 - 9:39 am | कविता१९७८
हेच लिहणार होते तोवर हा प्रतिसाद दिसला.
13 Sep 2014 - 4:54 pm | जेपी
+1 टु माउतै आन खटपट्या.
14 Sep 2014 - 1:24 pm | स्वतन्त्र
१०० % सहमत !
14 Sep 2014 - 5:10 pm | फुंटी
कितीकाळ आपण लग्नाच्या त्याच घिस्यापिट्या गोष्टींवर चर्चा करत राहणार??? नातेसंबंध ही व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते ..आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे...
15 Sep 2014 - 12:21 am | रवीराज
"आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे गुंतागुंतीचे झाले आहे.त्यात सुटसुटीतपणा येणे आवश्यक आहे"...
उलट मी तर असे म्हणेन की आज मानवी समूहजीवन कधी नव्हे तेवढे सुटसुटीत झाले आहे.त्यात आपलेपणा येणे आवश्यक आहे...एकत्र कुटुंब पद्धत संपली, पति-पत्नी दोघे कमविते त्यामुळे संतति नियमन,झाले तर एखादेच तेही उशिरा, त्यात सांभाळणेसाठी वेळेचा अभाव- पाळणाघरांची संख्या वाढत आहे, जे संस्कार आजी-आजोबा द्यायचे त्यासाठी आता वर्ग चालू झाले, एखाद्या मोठ्या कार्यासाठी पुर्वी मित्र मंडळी मदतीला तत्पर असायची, आता कोणाची गरजच नाही- डेकोरेटर्स, केटरर्स, पॅकर्स न मुवर्स, काय नाही ते सर्व मिळते पैसे टाकुन, जग जवळ आले माणसं दुर गेली भावनिक गुंतागुंत कमी झाली, वृद्धाश्रमे वाढली.
अजुन किती सुटसुटितपणा पाहिजे?
( नम्र विनंती- कोणी व्यक्तीगतरित्या घेऊ नये.)
15 Sep 2014 - 12:47 pm | फुंटी
तुम्ही म्हणताय त्या बाबतीतली भावनिक गुंतागुंत कमी झाली याबाबत दुमत नाहीच.तुम्हाला अपेक्षित सुटसुटीतपणा हाच असेल तर तेही मान्य... भावनिक गुंतागुंत कमी झालेली असली तरी गुंतण्याची भावनांची वृत्ती दिशाहीन भरकटत चाललीय .गुंतण्याची ठिकाण बदलली आहेत.सोशल नेट्वर्किंग चा मोठा प्रभाव भावजीवनावर पडला आहे.सोशल नेट्वर्किंग वर पोसलेली पिढी अजूनही या बाबत स्पष्ट विचार मांडू शकत नाही.गे,लेस्बियन रिलेशनशिप हे वास्तव होत आहे.वयाच्या तिशीनंतर /चाळीशीनंतर सोशल नेट्वर्किंग वापरणारी मंडळी या सगळ्यापासून काही प्रमाणात दूर आहे . तेव्हा समूहजीवन गुंतागुंतीचे झालंय हेही तेवढच सत्य आहे.
15 Sep 2014 - 4:33 pm | कवितानागेश
मला वाटतं (complication) आणि (involvement) यात गल्लत होतेय.
गुंतवणूक कमी होतेय आणि गुंतागुंत वाढतेय.
15 Sep 2014 - 11:51 pm | फुंटी
<<गुंतवणूक कमी होतेय >> हे नीटस समजल नाही. लग्न करण्यातली म्हणजे लग्नाच्या खर्चाबद्दल बोलताय का? कि तुमचा रोख निष्ठेकडे आहे?
16 Sep 2014 - 12:26 am | कवितानागेश
खर्चाबद्दल नाही. भावनिक गुंतवणूक आणि परस्पर संबंधातली गुंतागुंत या बद्दल बोलतेय.
हल्ली गुन्ता वाढलाय.
16 Sep 2014 - 12:38 am | फुंटी
गुंता वाढला आहे .तरुणाई भावनिक द्विधा अवस्थेत सापडली आहे.एकीकडे आजूबाजूच्या माणसांकडून,कुटुंबाकडून होणारे संस्कार आणि दुसरीकडे सोशल नेट्वर्किंग चा मारा ...कस वागलेल चालेल आणि कस नाही याबद्दल प्रत्येक घराचे अदृश्य संस्कार असतात,त्याच्याशी सोशल समूहजीवन कम्पेअर केल जात त्यातून मानवी स्वभाव बनत जातो.पुरेसा संवाद होत नाही.परिणामी गुंतागुंत वाढत जाते...सरसकट बोलण योग्य नाही कारण व्यक्तीनुसार अवस्था बदलतात.
14 Sep 2014 - 11:04 pm | चौथा कोनाडा
१०० % सहमत ! आता तर लिव्ह-इन ची चर्चा दळायला पाहिजे.
14 Sep 2014 - 11:18 pm | कवितानागेश
लोकांमध्ये लग्न करण्याची पद्धत शिल्लक आहे, तोपर्यंत चर्चा होतच रहाणार की.
15 Sep 2014 - 12:34 pm | फुंटी
लग्नाबद्दल फारशी उत्सुक नसलेली आजची पिढी आहे....जे काही उत्सुक असतात त्यांची उत्सुकता किती काळ टिकते हाही संशोधनाचा विषय आहे.
15 Sep 2014 - 2:47 am | शिद
२०११ ची गोष्ट असेल.
माझा मित्र (मेकॅनिकल इंजिनिअर) त्यावेळी लग्नासाठी स्थळं पाहत होता व त्यानं सांगीतेलेलं खालील अनुभवकथन:
१) मुलगी फक्त १२वी शिकलेली. जॉब करत नव्हती व लग्नानंतर करायचा देखील नव्हता. मुलगा मुलूंडला आई-वडिलांबरोबर राहतो म्हणून मुलीच्या आईची इच्छा कि टाऊनमध्ये एखादा फ्लॅट विकत घ्यावा मग ह्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं.
२) मुलगी बी.कॉम. आई-वडील चालतील पण भाऊ व वहीनी बरोबर राहण्यास तयार नव्हती. मित्राने सगळ्यांसमोर १ वर्षाचा अवधी मागीतला नविन फ्लॅट घेण्यासाठी पण मुलीला तेव्हढा वेळ थांबण्याची इच्छा नव्हती.
३) एका मुलीच्या आईची इच्छा कि मित्राने लग्नानंतर घरजावई म्हणून राहण्यास यावं. मुलीला विचारलं की तुला मान्य आहे का तर म्हणते आई म्हणेल तसं सगळं होईल म्हणून. (चहापेक्षा किटली गरम).
४) मुलीला २०००० पगार तर म्हणे मुलाला ६०००० पेक्षा जास्त हवा व स्वःतचे घर आणि गाडी (२/४ व्हीलर).
५) अश्या बर्याच विचित्र मागण्या असण्यार्या...आता लगेच आठवल्या तेव्हढ्या नमूद केल्या.
बिचारा मुली पाहून फार म्हणजे फारच वैतागला होता व प्रत्येक कांदेपोह्यानंतर मला फोन करुन मनातली सगळी भडास बाहेर काढायचा.
त्याचं २०१२-१३ च्या दरम्यान एका चांगल्या सुस्वरूप मुलीशी (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर) लग्न झालं व आता सुखाचा संसार चालू आहे आई-वडील व मोठ्या भाऊ-वहीनी सोबत.
15 Sep 2014 - 9:10 am | खटपट्या
अहो हे तर काहीच नाही.
माझ्या एका मिपा मित्राला बघायला मुलीचे वडील येणार होते. मित्र घोडबंदर ला राहतो. मुलीच्या वडिलांनी स्टेशन ला रिक्षा पकडली आणि प्रवास चालू झाल्यावर लक्षात आले कि घोडबंदर स्टेशन पासून बरेच दूर आहे. याच कारणास्तव मुलाच्या घरी न जाता अर्ध्या वाटेतून परत फिरले.
मुलगा बघायला आले होते कि घर ? ठीक आहे घर लांब असेल, मुलगा तर बघून घ्या.
दादर परळ मध्ये राहणाऱ्या मुली तर ठाण्याच्या पुढचे स्थळ पहायला तयार नसतात.
मी माझ्या चुलत भावाची लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. बोरीवलीला. मुलीच्या वडिलांनी विचारले कि तुम्ही कुठे राहता. मी सांगतिले कळव्याला राहतो. तर त्यांचे उद्गार "हो कळव्याला सुद्धा लोक राहायला लागले आहेत आज काल !!" असे वाटले होते कि लगेच उठून यावे. म्हणजे सेन्ट्रल ला जे राहतात ती माणसेच नाहीत.
16 Sep 2014 - 12:43 am | काळा पहाड
अशा केसेस् ना सांगायचं, सध्या फक्त प्रॉबॅशन बेसिस वर लग्न करायचा विचार आहे. पर्फोर्मन्स पाहून पर्मनंट लग्नाचा विचार करण्या येईल.
15 Sep 2014 - 11:13 am | कवितानागेश
असं बघायला जायच नाही घाईने. फोनवर नीट अंदाज घ्यायचा.:)
15 Sep 2014 - 11:55 pm | हरकाम्या
मी "शिद " व "खटपट्या " यान्च्या मताशी सहमत आहे. मी सध्या माझ्या मुलासाठी वधुसन्शोधन करीत आहे
मला तर फार विचित्र अनुभव येत आहेत.
१) आपण मुलीच्या वडिलांना स्वत फोन केल्यास त्यांनी मरगळलेल्या आवाजात उत्तर देणे.
२) फोन केल्यानन्तर आपण वरावर उपकार करतो आहोत या भावनेने उत्तरे देणे
३) मुलगी १० वी पास असली तरी तिला ४०,०००रु. पगाराचा नवरा पाहिजे.
४) मुलीच्या आईने विचारणे " लग्नानन्तर मुलगा व मुलगी वेगळे रहातील का?
५) हा शेवटचा अनुभव भयानक होता.
मी मुलीच्या वडीलांना फोन केला. त्यांनी सांगितले मी सध्या गाडी चालवतोय १० मिनिटांनी फोन करा
मी १५ मिनिटांनी फोन करुन माझ्या मुलाची व घराची सर्व माहिती दिली व विचारले की तुमच्या जावयासम्बम्धी काय अपेक्षा आहेत ? पलीकडुन उत्तर आले " आम्हाला आमचा जावयी "Don " पाहिजे.
मला वाटले हे फार विनोदी दिसतात. म्हणुन मी परत विचारले म्हणजे नेमके काय ? त्या माणसाने ग्राम्य भाशेत
शिवी देउन विचारले " तुला दाऊद ईब्राहिम " माहित नाही कारे **** ?.
त्याने उच्चारलेले शब्द येथे लिहिण्यासारखे नाहीत.
त्या दिवसानन्तर मी ५/६ दिवस बेचैन होतो. मला फोन वाजला तरी फोन उचलण्याची भीती वाटत होती.
आता हे असे जर मुलींचे " पिताश्री " असतील. तर यांना काय करावे.
16 Sep 2014 - 12:02 am | फुंटी
सभ्य शब्दात म्हणजेच पाणी लाऊन हजामत करायची....आपल्या ब्लेड ची धार पण जात नाही आणि हजामत पण छान होते...
16 Sep 2014 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे
मी तर म्हणेन अश्या माणसांची बिनपाण्याने हजामत करावी आणि आपल्या मुलाचे लग्न अश्या घरातल्या मुलीशी होण्याची आपत्ती टळली म्हणून खूषीत पार्टी करावी... जमल्यास याच कारणासाठी पार्टी केली होती हे त्यांनाही सांगावे.
16 Sep 2014 - 12:37 am | काळा पहाड
याच्या उत्तरासाठी एक विनोदी ऑडियो (व्हाट्सअॅप वर आलेला) अपलोड करायचा होता. कसा करावा?
16 Sep 2014 - 7:16 pm | रेवती
पूर्वी असे आणि याहून वाईट अनुभव मुलीकडल्यांना सर्रास यायचे (अजूनही लहान गावांमध्ये येतात). आता समानतेचा जमाना आल्याने मुलांनाही येतात.
बरे झाले तुम्ही सुटलात. पाच सहा दिवसांची बेचैनी परवडली, नंतरची उस्तवारी करण्यापेक्षा!
अशा लोकांचा यथायोग्य सत्कार करायला हवा. कसला अनुभव आहे! श्श्या!
20 Sep 2014 - 7:48 pm | साती
बहुते़क तुमचा एकाच माणसाला दोनदा राँग नंबर लागला असेल.
तो तुम्हाला पकवत असेल.
16 Sep 2014 - 12:33 am | कवितानागेश
हा वधूवरसूचक मंडळाचा दोष आहे. उगीच भलत्या ठिकाणी आपण सिन्सिअरली आपली माहिती सांगत बसणं धोक्याचं आहे.
त्यातून तिथे माहिती म्हणून जे काही लिहितात ते, इतके त्रोटक असतं, म्हणजे रंग, उन्ची, डिग्री, पगार इतकाच लिमिटेड माणूस कळतो.
एका मंडळात ४ इन्च रुन्दीचे आणि १० इन्च लांबीची वही पाहिलिये, त्यात एका पानावर एका व्यक्तीची अशीच त्रोटक, अर्धवट माहिती लिहिलेली असते. काही मंडळांमध्ये मात्र ५-५ पानी फॉर्म्स पाहिलेत.
16 Sep 2014 - 4:24 pm | तिमा
आधी परिचय नसेल तर लग्न ही १००ट्क्के लॉटरी आहे.
16 Sep 2014 - 9:21 pm | प्रभाकर पेठकर
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे.
(आणि 'ती (लॉटरी) नेहमी दुसर्यालाच लागली आहे' असे जन्मभर वाटत राहते).
16 Sep 2014 - 9:48 pm | दादा कोंडके
लोल! खरंय.
20 Sep 2014 - 3:53 pm | विलासराव
आधी परिचय असेल, नसेल तरीही केंव्हाही 'लग्न ही १००ट्क्के लॉटरीच आहे.
जुगार आवडत नाही म्हणुनच आपण खेळ्लो नाही बॉ.
20 Sep 2014 - 5:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
20 Sep 2014 - 6:59 pm | यसवायजी
शेवटी काय?? तर हे आठवलं-
![arranged](http://photos.hamariweb.com/photos/Funny-Love-Vs-Arrange-marriage-4631.jpg)
16 Sep 2014 - 5:08 pm | प्रसाद गोडबोले
इस्लाममधील विवाहसंस्था ही हिंदु (आणि हिंदु विवाहकायद्याखाली येणार्या इतरधर्मातील) विवाह संस्थांपेक्षा कैकपटीने चांगली आहे असे आमचे एक स्पष्ट मत आहे . :)
16 Sep 2014 - 6:28 pm | टवाळ कार्टा
कशी?
16 Sep 2014 - 6:33 pm | सूड
आवरा !!
17 Sep 2014 - 3:33 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
..
.
..
.
;)
17 Sep 2014 - 3:49 pm | जागु
रवीराज यांच्या मताशी सहमत.
20 Sep 2014 - 2:44 pm | खबो जाप
माझे काही अनुभव ( मी स्वत BE telecom , पगार ५५ ह. नोकरी चेन्नई मध्ये, घरकामात जमेल तशी मदत करायला तयार )
१ . मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे.
मी म्हंटले लहान असताना शेतीकाम केले आहे, गेली १० वर्ष शिक्षण/नोकरी साठी बाहेर आहे त्यामुळे मला स्वताला काही ज्यास्त कळत नाही आणि मी काही मागणार नाही.
तुमच्या मुलीला शेतीतले काय काय येते, किंमान बांधावर उभारून काय चालू आहे ते पाहता येईल काय -- मुलगीला काही माहित नाही / येत नाही.
२ मुलगी (BE सिविल ) - लग्नानंतर वेगळे राहावे लागेल,पुण्यातच नोकरी शोधून शिफ्ट व्हावे. नोकरी करायची इच्छा नाही.
३ मुलगी ( BE इलेक्ट्रिक नुकतीच पूर्ण ) - आईचा प्रश्न माझी मुलगी खूप मोडर्ण आहे, तीचे खूप बॉय फ्रेंड्स आहेत ( त्यांना ऑफिस मधले पुरुष सहकारी म्हणायचे होते ), त्यांचे फोन सुट्टीच्या/सणाच्या दिवशी वेगेरे येतात त्याला आक्षेप नसावा , खरेतर त्यांना आपण किती मोडर्ण आहोत ते सांगायचे होते.
आणखी सेम; वेगळे राहावे लागेल, पुण्यात नोकरी
४. मुलगी (BE सिविल इन्तेरेरिअर देकॉरेतर ) नोकरी करायची इच्छा नाही.माझ्याबद्दल काहीच विचारले नाही पण आमचे हे पाहुणे आमदारांचे पीए आहेत दुसरे पाहुणे संचालक आहेत … नुसता वैताग …।
५ मुलगी ( MBA मुंबई मध्ये नोकरी ) - सगळे मान्य, होकार सांगितला , नंतर अचानक मुलगा चेन्नई मध्ये आहे , पुण्यात किव्हा मुंबई मध्ये शिफ्ट होत असेल तर लग्न करू असा निरोप पाठवला, आयला नोकरी बदलन काय खाऊ आहे … कमीत कमी ८-१० महिने तर लागतात पण लगेच पाहिजे
एकीने तर कहरच केला स्वतः MBA, नोकरी करायची नाही पण, onsite जातो तर फक्त US वालीच onsite घ्यायची आणि स्वतःला पण बरोबर घेवून जाव लागेल अशी अट
दुसरी US मध्ये कायमचा सेटल मुलगा पाहिजे पण स्वतः डिप्लोमा धारक.
20 Sep 2014 - 4:26 pm | विलासराव
मुलगी ( बी फार्मसी नोकरी नाही )-- मुलगीचे वडील (प्राथमिक शिक्षक ) नोकरी वेगेरे सगळे ठीक आहे पण तुमच्या वाटणीला वडिलाची किती जमीन येणार आहे.
मी नुकतीच माझ्या चुलतभावासाठी पंढरपुरजवळ एक मुलगी पाहिली.
मुलगी बीफार्मच्या तिसर्या वर्षाला. वडील नाहीत. थोडीशी शेती आहे, दोन लहान भाउ आहेत्,मोठ्या बहिनीचे लग्न झाले आहे. शिक्षणाची फी मामा लोक भरतात. घर अगदी साधं पण मुलगी सुंदर.
माझा भाउ आठवी पास, दिसायला बरा, गावी त्यानेच घर बांधलेय, जमीन अडीच एकर, बहीणी दोन मोठ्या लग्न झालेल्या. आई-वडील गावी. हा माझ्याबरोबर लालबागला रहातो. स्वकमाईची विक्रोळीला चाळीत रुम आहे, खारघरला प्लॅट घ्यायचा आहे ( सगळी तयारी झालीय, लोण फक्त १५ लाख घेणार), कमाई ७५ के. स्वतःचा चांगला जम बसलेला व्यवसाय आहे.कुठलेही व्यसन नाही, कामाचे सोडुन.
आम्ही जाउन मुलगी पाहीली. मी लगेच होकार सांगीतला, कारण मध्यस्थी माझा मित्र आहे. नंतर महिन्याने ते लोक आमच्या गावी जाउन आले. पसंत आहे असेही सांगीतले. पण परत काय फोन नाही २ महीने झाले. मध्यस्थीही मौन बाळगुन आहे. त्याला म्हणालो की बाबारे त्यांचा नकार असेल तर तसे सांग , कारणही सांगण्याची गरज नाही. पण तो म्हणतो मी त्यांना विचारले १-२ दा, आता आपण वाट पाहु. आता आणखी किती वाट पहायची. मुलाचे वय २७ आहे. मी नकार धरुनच चाल्लोय. त्यांना म्हणालो तुम्हाला जे काही माहीती हवी ती देतो, कागदपत्रे दाखवतो.आता काय करावे ते सुचवा.
भावाला सांगीतले की बाबा दहा वर्षापासुन इतके ऑफीसमधे फिरतोस साल्या तुला एक पोरगी पटवता येउ नये. पोरगी तु पटव बाकी लग्न मी लावुन देतो. त्याला काही जमेना बुवा. कालच आमच्या ब्राझीलच्या मैत्रीणिला हे सांगीतले तर ती म्हणाली त्याला ब्राझीलला पाठवुन दे , मी एकच काय दोन मुली पाहुन लग्न लावुन परत भारतात पाठवुन देते.
खरोखर दिलेली माहीती पुर्ण खरी आहे, मिपावर देखील कोणी याच्यासाठी मुलगी सुचवेल तर माझी काहीच हरकत नाही. मुलीला मुंबईत रहावे लागेल. नोकरी केली तरी चालेल, नसेल तर त्याच्याच व्यवसायात घरुन / ऑफीसला येउन हातभार लावु शकेल.मुलगी स्वभावने चांगली(मनमीळावु) असावी. रजीस्टर लगन केले तर बरे पडेल. देण्याघेण्याची भानगड नाही.
या निमीत्ताने मिपावर स्वयंवरही होउन जाउद्या मग. अट एकच ईथे जमले तर सगळ्या मिपाकरांनी कुठलेही कारण न सांगता लग्नाला यायच बरं का.
22 Sep 2014 - 4:13 pm | फुंटी
आमच्यासाठी पण बघा....आमचे हीच आमची संपत्ती ..च्यामारी...होऊन जाउदे....
20 Sep 2014 - 3:42 pm | भिंगरी
माझ्या मुलाच्या मित्राचा साखरपुडा झाला. त्या आधी तो मुलीला घरच्यांच्या परवानगीने हॉटेलमध्ये भेटला. जाताना हाफ टी शर्ट घालुन गेला होता. कारण त्याच्या अंगावर खुपच केस आहेत्.आणि त्याने हे लपवले नाही.त्यानंतर साधारण २५ दिवसांनी साखरपुडा झाला. मात्र साखरपुडा झाल्यानंतर १५/२० दिवसांनी मुलीने नकार दिला.मुलाकडच्यांनी तिला व तिच्या घरच्यांना विचार करायला काही दिवसांची मुदतही दिली पण मुलीने ठामपणे नाही सांगीतले.
कारण एकच, मुलाच्या अंगावर केस आहेत.
आधी ही गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती का?
मुलगा बिचारा अतिशय भोळा आहे.
तिच्या घरच्यांनी मुलाच्या घरी साखरपुड्यात दिलेल्या वस्तू आणून दिल्यापासुन मुलाच्या आईचा रक्तदाब वाढला आहे.
20 Sep 2014 - 4:57 pm | इरसाल
तो फुल हाताचा शर्ट घालुन नाय गेला.
22 Sep 2014 - 3:52 pm | फुंटी
फुल शर्ट घालून गेला असता तर फसवणूक केली हे कारण सांगितल असत...
22 Sep 2014 - 3:59 pm | सूड
>>मुलाच्या अंगावर केस आहेत.
लैच वैट्ट कमेंट आली होती पण स्थळकाळाचं भान ठेवून लिहीत नाही.
22 Sep 2014 - 4:06 pm | बॅटमॅन
कोटी अभिप्रेत होती काय रे ;)
22 Sep 2014 - 4:40 pm | सूड
खिक्क !! =))))
22 Sep 2014 - 4:00 pm | प्यारे१
मुलीनं आपल्या पार्लरच्या खर्चात नवर्याच्या खर्चाचं शेअरींग करावं लागेल असा दूर विचार केला असावा.
किंवा तिच्या लक्षात कुणी आणून दिलं असावं.
होत्ताय होत्ताय!
साखरपुड्यातल्या वस्तू परत दिल्यानं आईचा रक्तदाब नॉर्मलला यायला हरकत नव्हती. नाहीतर लग्न नाही ते नाही आणि वस्तूही लंपास असं बर्याचदा दिसतं.
बाकी 'बिचारा अतिशय भोळा असणं' मुलाकडून नकार गेल्यानंतर (वाक्याचं) लिंग बदलून मुलीकडं गेलं असतं हे नक्की. :)
20 Sep 2014 - 5:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या एका मैत्रिणिचा किस्सा ऐका. मुलगी पुण्यातल्या एका नावाजलेल्या ईंजिनिअरींग कॉलेजमधे प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर आहे आणि पी.एच.डी. करतीये आता. तिला पाहायला आलेला आलेला मुलगा फक्त डिप्लोमा झालेला, फक्त ९६ ९६ च्या आग्रहापाई तिनी त्याला बघायला होकार दिला. ह्या बाबाजीच्या मागण्या काय तर म्हणे लग्नानंतर नोकरी आणि शिक्षण बंद करायच. लग्नानंतर ४ वर्षाच्या आत २ बाळं हवीत (असेंब्ली लाईन आहे का ती? च्यायला, पाहण्याच्या कार्यक्रमात अश्या मागण्या कोण करत?). वरुन हुंडा-करणी-मानपानाच्या मागण्या. ह्या मुलीनी शिस्तीत उभं राहुन नकार दिला. =))
20 Sep 2014 - 5:15 pm | प्यारे१
@ रेवाक्का/ आज्जी,
कुठंय तुमचं वधू वर सूचक मंडळ? च्यामारी एवढा 'खप' आहे तरी तुम्ही मागेच? मराठी माणसाला मार्केटींग करता येत नाही हेच खरं :-/
20 Sep 2014 - 5:47 pm | टवाळ कार्टा
किचेन तैंची काम्पीटिशन आहे ना ;)
20 Sep 2014 - 8:43 pm | रेवती
अर्र लई उशीर झाला हिकडं यायला. नेमकं आमी बिज्जी असताना हे धागे बरे चालतात.
22 Sep 2014 - 4:09 pm | फुंटी
उपवर मुलींना लग्नाच्या बाबतीत अक्कल नसलेला मेंदू असतो असे माझे स्पष्ट मत आहे .आपल्याला मार्केटमध्ये किती डिमांड आहे याचा त्या अंदाज घेत असतात.'नवरा'या कल्पनेच्या विस्तारातून अवास्तव अपेक्षा वाढत जातात ...काहीठिकाणी त्या भलत्याच करमणूक करणाऱ्या असतात...त्यानुसार त्यांचे होकार नकार ठरत असतात.मुंबईत घर असणार स्थळ ,अपडाऊन ला सोयीच स्थळ , किमान ५०००० च्या वर पगार असलेल स्थळ,असल्या भौतिक सुखाच्या मागण्या असलेल्या पोरी काय कप्पाळ संसार करणार?
त्यात हल्ली मुलीसोबत तिचे बेस्ट फ्रेंड (ती बिचारी बेस्ट फ्रेंड समजत असते.पुरुष स्त्रीशी आकर्षण विरहित बेस्ट फ्रेन्डशिप करू शकत नाही हेही माझ स्पष्ट मत.. ) वगैरे कोम्प्लीमेंटरी मिळतात ते वेगळे ...
" भारतीय लग्नसंस्थेचा पाया प्रेम ,विश्वास या त्यागाच्या मुल्यांकडून भौतिक सुखांकडे सरकताना दिसतो आहे.हे लग्न्संस्थेच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे."
हे मीच म्हटलेलं आहे....
23 Sep 2014 - 12:30 pm | दिपक.कुवेत
तो मुलगी बघायला गेल्यावर प्रश्नोत्तरात ह्यानी तिला १०० प्रश्न विचारले. तिने फक्त ह्याला "तूला आईसक्रिम आवडतं का?" हा एकच प्रश्न विचारला आणि त्याचा होकार आल्यावर हिने लगेच होकार दिला. ट्चवूड अजून तरी ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
26 Sep 2014 - 1:39 pm | असंका
मुलाने काय एवढे भारी प्रश्न विचारले , की त्या मुलीला काही प्रश्न न विचारताच त्या मुलाबद्द्ल सगळी आवश्यक माहिती मिळाली?
26 Sep 2014 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
"मुलगा फारच प्रश्नाळू (१०० प्रश्न ? बापरे !) आहे पण त्याला आवडणारी उत्तरे आपणे देऊ शकतो. शिवाय, त्याच्याकडे आयस्क्रिम खावू घालण्याइतके पैसे आहेत आणि ते खाण्याची त्याला आवडही आहे." इतके मूलभूत ज्ञान झाल्यावर मुलीच्या अजून काही अपेक्षा उरल्या नसाव्या असा अंदाज आहे... ते सुखाने नांदतात यावरून तो अंदाज बरोबर आहे असेच दिसते.
23 Sep 2014 - 9:29 pm | किसन शिंदे
लग्न करण्यासाठी आजकाल मुलींच्या मागण्या खूप वाढतच चालल्या आहेत याच्याशी मात्र १००% सहमत. बहुतेक ठिकाणी घरातल्या आई-वडीलांची विचारसरणी किंवा समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनही मुलीच्या होकार किंवा नकारासाठी अवलंबून असतो हे आता अनुभवातून कळालंय. गेल्या दिड ते दोन वर्षांपासून मेहूणीच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू आहे. दोनदा 'मुलगा' दाखवूनही मी स्वत: तोंडावर पडलो आहे, कारण यांच्या(मेहूणीच्या आणि सासूच्या) अवास्तव अपेक्षा. शेवटी मेहूणीसाठी वरसंशोधन करण्याचा नाद कंटाळून सोडून दिलाय आता.
24 Sep 2014 - 11:14 pm | फुंटी
मुलींना आई वडिलांच्या घरापेक्षा २ पावलं पुढे असलेलच सासर हव असत.स्वातंत्र्य, पैसा ,स्पेस वगैरे हवी असते हो आजकाल...आणि त्या सगळ्याच्या बदल्यात निष्ठा देतात पोरी ...म्यारेज इज अ डील ...
24 Sep 2014 - 11:21 pm | सूड
>>त्या सगळ्याच्या बदल्यात निष्ठा देतात पोरी
असली निष्ठा काय उपयोगाची!!
25 Sep 2014 - 10:58 am | फुंटी
उपयोगाची नसली तरी बरेचदा हेच वास्तव समोर येते.
25 Sep 2014 - 2:42 pm | सूड
खरंय!! एकजात सगळ्यां पुरषांनी लग्न करायचंच नाही असं ठरवायचं? जमणार आहे? नाही ना, मग आल्या प्रसंगा सामोरे जावे, कसें?
24 Sep 2014 - 11:27 pm | सूड
आमच्या आधीच्या पिढीतल्या बायकांनीही संसार केले. अगदी घर, मुलंबाळं, नोकर्या सांभाळून!! आधीच्या काळात घेत असतील हुंडा, लेखत असतील मुलींना कमी, पण आता आलेली आर्थिक सक्षमता, स्वावलंबन ह्यामुळे आधी मुलींना जशी वागणूक दिली तशीच मुलीचे आईवडिल मुलांना देत असतील तर साफ चूक आहे.
25 Sep 2014 - 9:27 pm | कवितानागेश
बरीच वर्षे एका बाजूला असलेला लंबक आता दुसर्या बाजूला गेलाय...
मध्य गाठायला वेळ लागणारच. तोपर्यंत सगळेच भरडले जाणार.
25 Sep 2014 - 9:33 pm | टवाळ कार्टा
दुसर्याबाजुला पटकन गेलाय
25 Sep 2014 - 10:24 pm | कवितानागेश
फक्त झुकलाय. अजून टोकाला जायचाय.... :)
समाजात बदल व्हायला वेळ लागतो.