धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी...
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात...
देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना ह्या स्वातंत्र्यदिनी विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे.
प्रतिक्रिया
15 Aug 2014 - 2:17 pm | प्रभाकर पेठकर
शिरसाष्टांग प्रणिपात.
15 Aug 2014 - 3:16 pm | उपास
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी...
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात...
देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना ह्या स्वातंत्र्यदिनी विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे.
आजचे पंत्रप्रधानांचे भाषण अप्रतिम, प्रांजळ तरीही परखड - https://www.youtube.com/watch?v=yOwD2S3oHjU
15 Aug 2014 - 3:23 pm | उपास
हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..
गदिमांचे शब्द, भावनांने ओथंबलेले असणारच.. माझं लहानपणापासूनच खूप आवडतं गाणं, सुरुवातीच्या बिगुलासहित.. :)
https://www.youtube.com/watch?v=OPeN2wNI8Ks
15 Aug 2014 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रमाण.
सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
15 Aug 2014 - 10:28 pm | कविता१९७८
माझ्याकडुन "प्रणाम" च्या जागी चुकुन प्रमाण टाईपलं गेलंय , पेठेकरजींनी निदर्शनास आणुन दिलं पण धाग्यात बदलता येत नाहिये.