पुरुषांचं डायेटिंग -- माझा अनुभव

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
25 Jun 2014 - 7:12 pm

आमची प्रेरणा
(अनघाताई, कृपया ह घ्यावे.)
बायकांचं डायेटिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच्या वाढत्या ढेऱ्या हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. पुराणात नाही का , भोजनावळीचे आयोजन पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना आहाराचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चार कप्पी डबा घेवून जातेय (अर्थात माझं डायेटिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं डब्याचे जे कप्पे असतात ते हलका आहार संयमितपणे पोटात जाण्यासाठी असतात, आणि त्यानंतर चहा-वडा इ. अबर-चबर टाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. आहाराच्या शर्ती या पाळण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी असतात. अन या पुरुषांना भोजन एकदाचे ढेरीत ढकलण्याची एवढी घाई असते कि ते मागेपुढे कोणी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ हादडायला सुरु करतात. वय आणि ढेरी वाढत असताना चमचमीत खाणे कमी करणे, किंवा वडा, भजी या प्रकारांना फाटा देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , बुफेच्या मागच्या रांगेत असलेल्या डायेटिंगवाल्या बायकांना काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग लग्नघर/हॉटेल स्वता:च्या मालकी हक्काचे असल्यासारखे दणकून खातात. थोडेच, पण पोटभरीचे खाणे खाण्याची यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मधल्या टेबलवरचे सामोसे, कटलेट किंवा उजवीकडील टेबलवरची बिर्याणी अन चिकन आणि कडेच्या टेबलवरचे आईस्क्रीम अन फ्रुटसॅलड सर्वांवर सारखाच हात चालवतात. जसे काही यांना घरचे खाणे खायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि बकासुराच्या खाण्यामध्ये इंचभरसुद्धा अंतर नसते.
सर्व लोक्स डेझर्ट खात असताना मधेच यांना तंदुरी खाण्याची हुक्की येते. यात ढेरीवाले, मसल्सवाले पण आले. आपण दोन्ही प्रकारच्या खाण्याचे पोटात कॉकटेल करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. व्हेज-नॉनव्हेज दोन्हीकडची महागाई आपल्यामुळे भडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे चिकन संपल्याबद्दल बुफेवाल्या बेअराशी हुज्जत घालणे .अहो मान्य आहे यांना थोडसं नॉनव्हेज आवडत असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे खाणं जीथल्यातीथे थांबवणार, प्लेटी हातात धरणार अन्ही मागच्या बिर्याणीवाल्याशी किंवा पुढच्या रस्सावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या बायका आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी पंगत थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. प्लेटा बाजूला ठेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री वजन कमी करून आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते खिल्ली उडवतील , आजूबाजूच्या ढेरीवाल्यांना ना कॉम्प्लीमेंटस देतील, पण त्या स्त्री डायेटिंग वाली च्या मनोनिर्धाराला खच्ची करून टाकतील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री खाद्यप्रेमीं पार्टीत गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला गर्दी माजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.

विडंबनअनुभव

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

25 Jun 2014 - 7:18 pm | मधुरा देशपांडे

हहपुवा. जबराट. *lol*

कुसुमावती's picture

25 Jun 2014 - 7:18 pm | कुसुमावती

विडंबन एकदम खुमासदार झालयं. *ok*

प्रसाद गोडबोले's picture

25 Jun 2014 - 7:23 pm | प्रसाद गोडबोले

लोल =))))

अजया's picture

25 Jun 2014 - 7:27 pm | अजया

सही *lol*

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 7:30 pm | बॅटमॅन

ळॉळ =)) =)) =))

जबरीच =))

सूड's picture

25 Jun 2014 - 7:34 pm | सूड

कठीण आहे =))))

सुहास..'s picture

27 Jun 2014 - 9:51 am | सुहास..

हाहाहा

यशोधरा's picture

25 Jun 2014 - 7:35 pm | यशोधरा

*lol*

आदूबाळ's picture

25 Jun 2014 - 7:46 pm | आदूबाळ

हितं दोनसं कोन करनार?

मितान's picture

25 Jun 2014 - 7:49 pm | मितान

*lol* *lol*

सखी's picture

25 Jun 2014 - 8:04 pm | सखी

कहर आहेस तु! मस्त जमलयं विडंबन.

एस's picture

25 Jun 2014 - 8:06 pm | एस

पुरुषांच्या ढेरीबद्दल म्हणजे शरीराच्या एका महत्त्वाच्या अवयवाबद्दल असे जाहीरपणे काहीही बोलले जातेय हे पाहून एक मिपाकर म्हणून... वैग्रे वैग्रे (संमं, इकडे लक्श द्या, हे कुठल्या धोरणात बसतं वैग्रे वैग्रे.) त्यात भर म्हणून पुरुष त्यात कायकाय ढकलत असतात याचेही चर्वितचर्वण आपले वर्णन उघडपणे चालवले आहे. जणू काही बेटर हाफ् ला ढेरी नसतेच. आमची ढेरी तर तुमची कंबर. आमचे चरणे हे हादडणे आणि तुमचे चरणे काय तोंडी लावणे असते? आणि काही करा पुरुषच जबाबदार. ही पाळी तुमच्या गेल्या हज्जारो वर्षांच्या सैपाकामुळेच ओढवली नाय काय? तरी याचा पंक्तीपुरता विदा गोळा करून नि:पक्षपातीपणे स्यूडोस्ट्याटीस्टीक्स वैग्रे वैग्रे निष्कर्श काढावे आणि मग मांडावे अशी णम्र इनंती.

असो, ढेरी ही ढेरी असते. त्यात स्त्रियांची ढेरी आणि पुरुषांची ढेरी असे काही नसते. एकमेकांच्या इंचांचे मोजमाप करण्यात काही हशील नाही. तुमच्या जेवणावळ्या सोप्प्या होवोत या शुभेच्छा देऊन आणि एवढे(च) बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जै म्हाराष्ट्र!

(पार्श्वसंगीतात कडाम् कुडूम् असा आवाज...!!!)

यशोधरा's picture

25 Jun 2014 - 8:13 pm | यशोधरा

ही मग अ‍ॅपल टु अ‍ॅपल तुलना झालीये का? हे म्हणजे मोठ्ठा फणस टू अ‍ॅपल होईल फार तर! ;)

सखी's picture

25 Jun 2014 - 8:34 pm | सखी

यशो खुर्चीतुन पडले ना गं बाई मी!

एस's picture

25 Jun 2014 - 10:25 pm | एस

केसाळ फणस...!

सस्नेह's picture

25 Jun 2014 - 9:12 pm | सस्नेह

तुमी तर नाराज झाले की भौ !
अवो, मस्ती मस्तीका मामला है, समजून घ्या ना !
बाकी ढेरी ही लिंगसापेक्ष नसावी यावर सहमत.

एस's picture

25 Jun 2014 - 10:28 pm | एस

तुमी तर शीरियस झाल्या की तै!
अवो, आमचाबी इडंबनविडंबन का मामला है, हसून घ्या ना थोडं !
बाकी विडंबन हे हास्यनिरपेक्ष नसावे ह्यावर एकमत. ;-)

सस्नेह's picture

26 Jun 2014 - 2:14 pm | सस्नेह

*lol*

रेवती's picture

25 Jun 2014 - 9:53 pm | रेवती

ही ही ही.

इशा१२३'s picture

25 Jun 2014 - 8:07 pm | इशा१२३

*lol*

केदार-मिसळपाव's picture

25 Jun 2014 - 8:09 pm | केदार-मिसळपाव

फाउल नोंदवत आहे.
आता ह्या अश्या धाग्यांची मिळुन एक मोठी सुतळी तयार होइल.

वपाडाव's picture

25 Jun 2014 - 8:17 pm | वपाडाव

अगदीच मिळमिळीत... उगाच खुमासदार वेग्रे म्हणौन धाग्याचा ट्यार्पी वाढौ नये... असो...
दोन-चार रायते, पाप्डं अन कश्मीरी पुलावाची कमतर्ता माझ्यासारख्या व्हेज माणसाला जाणौली...

-- फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो --

ह्या धाग्याच्या निमित्ताने का होईना आपण अज्ञातवासातून बाहेर आलात हेही नसे थोडके. लोकं व्यनितून चवकशी करायलीत तुमच्याबद्दल, कुटं हायसा?

केदार-मिसळपाव's picture

25 Jun 2014 - 8:18 pm | केदार-मिसळपाव

अजुन एकाही समारंभात चिकण, आईस्कीम, टंदुरी अथवा फ्रुट्सालाड असे कोणतेही पदार्थ आलेले नाहीत. आम्ही आपले बटाटा भाजी, वांग्याची भाजी, गेलाबाजार चक्रीची भाजी आणि पोळ्या, भात, वरण झालेच तर कांदा-टमाट्याची कोशिंबीर इतक्यावरच भागवतो. त्यामुळे तो ढेरीचा प्रश्ण आमच्यापुरता तरी निकालात.

पिंगू's picture

25 Jun 2014 - 8:53 pm | पिंगू

काय राव ढेरी आपला जीव की प्राण. सध्या सायकलिंगमुळे ढेरी आटोक्यात आलीये, पण पंगतीला हादडायची सवय तरी जात नाय.. बाकी जय हो ढेरीपुराण..

प्यारे१'s picture

25 Jun 2014 - 9:10 pm | प्यारे१

नाही हो. अस काही नाहीये. मी रोज ३ पोळ्या खातो पण अगदी शिडशिडीत दिसणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक करुन ५-६ पोळ्या खाऊन जातात. माझा स्पीड जेमतेम मिनिटाला अर्धी पोळी एवढा असतो. नि ह्या पोरी २ मिनिटात पोळ्या...

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 9:42 pm | बॅटमॅन

इतके पाप्याचं पितर दिसणारे समोर येईल ते हादडतात तरी ढेरी कै धरत नै अन आम्ही साला आंध्रा मेसमध्ये भात वरपला तरी ढेरी!!! बहुत नाइन्साफी ए!!!!

सस्नेह's picture

25 Jun 2014 - 9:50 pm | सस्नेह

साक्षात हभप प्यारेमहाराजांना 'पाप्या' म्हणतोस..?
वाल्गुदेया, कुठे फेडशील ही 'पापे' ?
भात सोड अन पोळ्या खा पोळ्या ! 'पापे' कमी होतील अन ढेरीसुद्धा ! *nea*

एका वाक्यात किती 'पापे'!! *dash1*

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 10:01 pm | बॅटमॅन

'पापी' पेट का सवाल है ;) =))

विजुभाऊ's picture

26 Jun 2014 - 3:26 pm | विजुभाऊ

पापी' पेट का सवाल है
ब्याट्या. ह्या "पापी" त अन लहान मुलांची घेतो त्या पापीत नक्की काय फरक आहे रे?
पापी हा शब्द पाप या शब्दावरून डीराईव्ह केलेला आहे का?

विजुभौ तुम्हीच बघा खरे मर्म ओळखलेत =))

डोंट ड्रिंक & डिराईव्ह ;) =))

भात इ. सोडण्याबद्दलचा सल्ला विचारार्ह आहेच, परंतु

'पापे' कमी होतील अन ढेरीसुद्धा !

याच्याशी अंमळ असहमती दर्शवितो. ढेरी कमी झाल्यावर 'पापे' कमी होतील असे समहौ वाटत नाही ;)

ए तू ऋजुता दिवेकर नावाच्या बाईंची पुस्तकं वाच..
त्यात त्या म्हणतात..

"...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईच्या हातचंही जेवतात.. बायकोच्या हातचंही जेवतात.. बहीणीच्या हातचंही जेवतात.. "
दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या डब्यात काहिही भरुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते दिलेलं मुकाट्याने खातात.."

तुझा आत्मा शांsssssत होईल..!!

(त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर स्वयंपाकाच्या बाबतीत डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!)

बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी..

-मिलियन वायडर ;)

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 10:26 pm | बॅटमॅन

मिलियन वायडर

रोफळ ळोळ =)) =)) =))

एस's picture

25 Jun 2014 - 10:28 pm | एस

ठ्ठो!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2014 - 6:35 am | अत्रुप्त आत्मा

@मिलियन वायडर>>>. =)) .. =)) .. =))

मदनबाण's picture

26 Jun 2014 - 7:33 am | मदनबाण

सूड... एकदम मोठ्ठा षटकार मारलात की राव ! ;)

अत्रुप्त दिवेकरांनी 'ढेरीबिरी दे सोडून, तू खा दणकून!' असे पुस्तक काढलंय आणि त्याला वल्लीशेठ बोरकरांची प्रस्तावना* लाभली आहे आणि उभ्या महाराष्ट्रात लोक ते वाचून आडवे झाले आहेत असं काहीसं स्वप्न पडलं आम्हांला काल...! ;-)

*(ऋजुतातैंच्या पुस्तकाला जिने प्रस्तावना लिहिलीयं तिचा फॅन)

प्रचेतस's picture

26 Jun 2014 - 10:12 am | प्रचेतस

=))

यशोधरा's picture

26 Jun 2014 - 10:38 am | यशोधरा

*mail1* अत्रुप्त दिवेकर

*mail1* वल्लीशेट बोरकर

>>अत्रुप्त दिवेकरांनी 'ढेरीबिरी दे सोडून, तू खा दणकून!'

अत्रुप्त दिवेकरांनी पुस्तक काढलं तर त्याचं नाव काहीसं असं असेल, "माझीच ढेरी तरी खायची चोरी". ;)

पिलीयन रायडर's picture

26 Jun 2014 - 1:25 pm | पिलीयन रायडर

____/\_____

साष्टांग आहे बरं का!!

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 1:36 pm | प्यारे१

+१११

विशेषतः मिलियन वायडर साठी ;)

विवेकपटाईत's picture

25 Jun 2014 - 9:27 pm | विवेकपटाईत

तीव्र निषेध, *stop* बायकोच्या हातचे जे मिळते तेच खावे लागते किबहुना पोटात ढकलावे लागते. स्वाद घेत घेत न खाल्या मुळे जेवण पचत नाही. परिणाम ढेरी निघते. त्यात पुरुषाँचा काय दोष. शिवाय जिथे स्वादिष्ट मेजवानी असेल तिथे आम्ही भरपूर ताव मारला त्यात आमची काय चूक. *mamba*

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2014 - 3:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

जाहीरपणे असे कबूल करताय? उद्यापासुन घरी जेवण बंद होईल ना

पिलीयन रायडर's picture

26 Jun 2014 - 4:10 pm | पिलीयन रायडर

पोटात ढकलावे लागते

स्वयंपाक शिका..

ते त्यांचं त्यांचं बघून घेतील की. फुक्कट सल्ला द्या म्हणून कुणी विचारायला आलंय का हो तुम्हांला? जिथेतिथे उपदेश-एरंडेल पाजत बस्ता ते? की संस्थळावर लिहिले म्हणून कोणीही यावे आणि सल्ले देत बसावे असं आहे?

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2014 - 4:33 pm | टवाळ कार्टा

+१११११

बचेंगे तो और भी लडेंगे
..
..
..
तुम लडो ब्याट्या...हम कपडा सम्भालता हय :)

पिलीयन रायडर's picture

26 Jun 2014 - 4:34 pm | पिलीयन रायडर

त्यांना उपदेश द्यायचे की नाही.. फुकट द्यायचे की कसे.. उपदेश एरंडेल पाजावे की अमृत.. हे आम्ही दोघं बघुन घेऊ ना..
तसंही त्यांच्या कनपटीवर बंदुक रोखुन स्वयंपाक कराच असा आग्रह करत नाहीये ना कुणी..

तुम्ही लोकांच्यात नाक खुपसणं आणि काड्या सारणं कधी बंद करणार? तुम्ही अगोदर ही फुकट फौजदारी बंद करा.. (हो.. हा सल्ला आहे..)

इथे लोक काय वाट्टेल ते लिहीतील, सल्ले देतील.. एकमेकांचे गळे धरतील.. तुमचे काय जाते? तुमचा संबंध असेल तिथेच याना... उगाच प्रतिसाद हुंगत कशाला फिरता..

बाकी तुम्ही "आक्रस्ताळेपणा (किंव रडिचा डाव वगैरे वगैरे) आम्ही फाट्यावर मारतो.." असले नेहमीचे पांचट प्रतिसाद टाकालच..

(ह्या माणसाला एकदा(चा) रामराम ठोकलेला कळत का नसावा?)

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 4:37 pm | बॅटमॅन

'चोर तो चोर वरती शिरजोर' ही म्हण संदर्भासहित स्पष्ट केल्याबद्दल अतिशय धन्यवाद!!!

पिलीयन रायडर's picture

26 Jun 2014 - 4:39 pm | पिलीयन रायडर

तुम्ही तर बर्‍याच म्हणी अनेक दिवसांपासुन सार्थ करत आहात.. पण असो..
तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही..
जमल्यास गप बसा.. (आग्रह नाही..)

तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही..

म्हणून अजून खाली रसातळाला जाता, होय की नाही?

बाकी ज्याची त्याची समज वगैरे...चालायचंच!

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2014 - 4:55 pm | टवाळ कार्टा

माझी ही १ काडी/तेल्/पेट्रोल काय वाटेल ते समजा... :)

त्यांना उपदेश द्यायचे की नाही.. फुकट द्यायचे की कसे.. उपदेश एरंडेल पाजावे की अमृत.. हे आम्ही दोघं बघुन घेऊ ना..

इथे पिरा"भाईं"शी सहमत

तसंही त्यांच्या कनपटीवर बंदुक रोखुन स्वयंपाक कराच असा आग्रह करत नाहीये ना कुणी..

नैच्च करत आहे कुणी...पण जो सल्ला आहे तो यापेक्षा जालीम आहे त्याचे काय :)

इथे लोक काय वाट्टेल ते लिहीतील, सल्ले देतील.. एकमेकांचे गळे धरतील.. तुमचे काय जाते? तुमचा संबंध असेल तिथेच याना...

हेच पिरा"भाईं"नासुध्धा लागु पडते...पण दिलाच ना आगव सल्ला =))

बाकी तुम्ही "आक्रस्ताळेपणा (किंव रडिचा डाव वगैरे वगैरे) आम्ही फाट्यावर मारतो.." असले नेहमीचे पांचट प्रतिसाद टाकालच..

ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों...

साभार - इस्माईल"भाय" चार्मिनारांवालें ;)

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 5:02 pm | प्यारे१

माँ की किरकिरी .... ;)

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 5:05 pm | बॅटमॅन

ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों...

अर्रे टवाळभाई, इत्ते साल मिपामिनार पे बैठे तो क्या खाला लोगांका टेन्शन लेनेकु? हमारी इज्जतां सस्ती नै होती कि कोई बी आये आउर बैगन मे मिलाकर भुर्ता बनाके खाये! ऐसा नै होता टवाळभै, पूरी प्लॅनिंग करनी पडती! अब हम लोगां रहते मुद्देपे, वो लोगां रहते फाटेपे! अब ह्यांसे व्हां जाना बोले तो पूरा एक मेगाबायटी प्रतिसाद होता यारो =))

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2014 - 5:38 pm | टवाळ कार्टा

कहर.. =))

अर्रे संक्षीभाईं..अर्रे हमारे ब्याट्याभाईंकी लडाईं हो गयीं भाई खालालोगांसे...जर्रा कुच उप्परनीचे हुआ तो आप संभालल्येओ खालांलोगोंको ....अर्रे भ ब्याट्याभाईं...संक्षीभाई बोलरेले है तुम्हारे लिये खालालोगां क्या पुरा संमं संभाललेंगे... (आल लाईन बीजी आ रहा है ;) )

संक्षींनी ह.घे. हि विनंती :)

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 5:48 pm | बॅटमॅन

परसो मिपापुरेमें क्या लडाई हुवी मालूम...चिंध्या लडाई हुई..मै टवाळ, बुवा, वल्ली, सूड, धन्या पूरे गये थे लोगां..मैं क्या करा बोले तो कंपुटरपे बोटां दबादबाके वो लिखा वो लिखा, घाप घीप घाप घीप घाप घीप =))

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 6:02 pm | प्यारे१

हे असं होतं बघा स्नेहातै,

आता आवडला ना एखादी गोष्ट की त्याचा पार भुगा केल्याशिवाय पुरुषांना चैन पडत नाही...

मग समोर 'स्माईल'भाई असो, की आईसक्रीम असो की तंदूरी असो की आणखी काही .... (चाणाक्ष वाचक ओळखतीलच ;) )

डायेट कोलमडते ते असं. ;)

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2014 - 6:54 pm | टवाळ कार्टा

तुम लोगां सिरेस कायकु लेते यारों ...मिपा के पठ्ठे हैं...१-२ साल से मिपा पे बैठा हुवा हु...मेरी कुच इज्जत हैं यारों ...तुम लोगां क्यातोबी संमझे रे मेरेकू

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 7:04 pm | बॅटमॅन

परसो क्रीष्ना ओबेरॉय मे दावत थी ;)

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2014 - 7:07 pm | टवाळ कार्टा

अर्रे इदर लोगोंकू नरम बोटी बिर्यानी खाने कि आदत है...इत्ते इत्ते से कपा वाले हम होना ;)

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 7:12 pm | बॅटमॅन

खल्लास =))

मेरेकु बोर मार्रा पार्टी मे, लांग ड्राईव्ह पे जाना बोली.

अम मै क्या करां, उने बोल री बोल के ले गया. पयले पाकृ के धागे में फटु देखे, फिर जिलब्या देखा हाउर फिर ह्यां आये सीद्धाइच प्रतिसाद-प्रतिसाद खेलते. उन्हे बोली, बॅटू, मेरेकु जिलबी होना. वहीं फिर 'मोकलाया' वाली जिल्बी खिलाया उसकू, पाच-पाच डब्बा भरके जिलब्या खाये. फिर मेरेकु बोली, तुम किधर जानावाना मत, ऐसा कैसा होता? अब उने बोल री बोल के मै गया रूमपे, अब रातभर क्या हुवा नक्कॉ पूछू =))

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2014 - 7:17 pm | टवाळ कार्टा

हैट्ट आहे =))

अर्रे जिल्बी जिल्बी करके कित्ता बोला तुम्कू ...अबी क्या पुरें सौ करनेका इरादा है?

पैसा's picture

26 Jun 2014 - 7:37 pm | पैसा

तुम लोगांको सुपारी दिया क्या स्नेहाबै?

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2014 - 7:58 pm | टवाळ कार्टा

हल्लू बोलो रे...लोगां सुनते..तुम लोगां बैंगन मे मिलाते मेरी इज्जत कू ...मा की किरकीरी...

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 8:03 pm | प्यारे१

अब्बा, पैसाक्का को भी पता चल गया? ;)

पैसा's picture

26 Jun 2014 - 9:25 pm | पैसा

हम लोगां को सब पता रैता हय.

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 10:09 pm | बॅटमॅन

हा हा हा हा =)) =)) =))

रुक्साना आणि इस्माईलभाई =))

सस्नेह's picture

26 Jun 2014 - 8:17 pm | सस्नेह

माझ्या धाग्याचं काश्मीर..??
मै कहां हूं..?? *shok*

चिंता नक्को, काश्मीर सुंदर हय.

चारमिनार के बाजूवाली गली में झा पे इस्माईलभाई की गँग है! ;)

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2014 - 8:09 am | टवाळ कार्टा

चारमिनार के बाजूवाली गली में नै रे....हम लोगां २५ साल से चारमिनारांमेंइच हय

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 10:08 pm | बॅटमॅन

सौ तो हो गये रे भै =))

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2014 - 8:11 am | टवाळ कार्टा

स्नेहाभै...खुश?? बिर्यानी खायेंगे... ;)

सस्नेह's picture

27 Jun 2014 - 9:33 pm | सस्नेह

खायेंगे भी हौर खिलायेंगे भी !

अरे वो २-३ पेज में कौन किसकू प्रतिसाद दिया मेरेकु कुछ नै समझा रे...जबतर उसी एक पेजपे उनकू प्रतिसाद नै देता तबतक मेरा टंकनकंडु शांत नै होयेगा रे ;)

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2014 - 8:31 am | टवाळ कार्टा

भोत गलत जगा पे दम है भाई... ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Jun 2014 - 10:27 am | विश्वनाथ मेहेंदळे

बाकी सगळे राहुदे, कनपटीवर हा शब्द काळजाला भिडला :-)

हाडक्या's picture

27 Jun 2014 - 4:23 pm | हाडक्या

हॅ हॅ हॅ ..

कुणाला कशाचं अन ***ला केसाचं .. *fool*

लॉरी टांगटूंगकर's picture

25 Jun 2014 - 9:48 pm | लॉरी टांगटूंगकर

==))

अग्गायायाय! मस्त गं, मस्त! ए थांबा ना, मलाही एखाद्या प्रतिसादाचे विडंबन करू द्या!

रेवती's picture

25 Jun 2014 - 10:04 pm | रेवती

गिर्जाकाकांचा प्रतिसाद विडंबायला घेतला होता पण जमले नाही हे कबूल करून फक्त वाचनाचा आनंद घेण्याचे ठरवलेय. ;)

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2014 - 11:58 am | प्रसाद गोडबोले

कोणता ?

एकदा प्रतिसाद देवुन झाल्यावर सहसा माझ्या लक्षात रहात नाही ... शॉर्ट टर्म मेमरी लॉस *wacko*

एकदोन वेळा तर मीच माझ्या जुन्या प्रतिसादांशी कॉन्ट्रॅडिक्टरी बोललोय ...एकाच धाग्यावर *biggrin*

तुम्हाला एका चारचाकीवाल्या म्याडमनी दोन वाहनांच्या फटीतून नो असे म्हणत जाऊ दिले नाही तो प्रतिसाद विडंबायचा प्रयत्न केला हो, पण जम्या नै.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Jun 2014 - 11:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

"लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र" वगैरे सिरीज आठवुन डोळे पाणावले....बाकी हा धागा पण हिट्ट !!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2014 - 6:44 am | अत्रुप्त आत्मा

ट्रकवरील नवघोषवाक्य-- "हमारी ढेरी वाढती..तो,तुम काय कू चिडती!". ;)

सुबोध खरे's picture

26 Jun 2014 - 9:12 am | सुबोध खरे

पूर्वी माणसे फार दिवसांनी भेटली कि उराउरी भेटत
आता उदरा उदरी भेटतात *yahoo*

वेल्लाभट's picture

26 Jun 2014 - 10:26 am | वेल्लाभट

बाकी काय धागे निघतायत ! हाह! वाट्टॅल ते!:लोल

पैसा's picture

26 Jun 2014 - 10:41 am | पैसा

भीतीदायक धागा आहे! *ROFL*

मात्र अनघाच्या धाग्यावर सुपारी घेतल्यासारखे प्रतिसाद देणारे या धाग्यावर कधी सुरू होतात याची वाट बघत आहे! *blum3*

लिखाण नेहमीप्रमाणेच खास स्नेहांकिता स्टायल!