मच्छरांनो :)
ससुलापंत दिसतो कसा ?
जजाने कोठडीत ठेवलाय जसा !
ससुल्या गडी करतो कडी,
काढीन म्हणतो न्यायाची खोडी !
तुमचं न्यायालय हवं कशाला ?
मी चावलो, तो गुन्हेगार झाला !
गुन्हेगाराला चावून, काय गून्हा केला ?
प्रसिद्धीत रहायचय पुन्हा त्याला !
तक्रार यांची, त्यांचेच चूक
चावल्याने भागते लालसेची भूक !
ससुलाल नाटक करतो छान,
लटके आरोप ताठ मान !! :)
प्रतिक्रिया
24 May 2014 - 12:58 pm | पैसा
:)
24 May 2014 - 1:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या......!!!
-दिलीप बिरुटे
24 May 2014 - 3:15 pm | श्रीगुरुजी
मस्त!
24 May 2014 - 7:00 pm | मदनबाण
:)
25 May 2014 - 8:22 am | असंका
अरे वा....इथे पण झेंडा रोवला का? अभिनंदन....
29 May 2014 - 2:40 pm | आत्मशून्य
आता मिपाकर बनु लागले आहेत
29 May 2014 - 2:58 pm | आत्मशून्य
इथे आल्यावर फक्त त्यांनी मान्य केलं की ते मिपाकर आहेत =))
29 May 2014 - 4:20 pm | माहितगार
:) आपल्या दोघांचेही अभिनंदन प्रतिसाद वाच्यार्थाने घेऊन आभार मानतो. मिपाकर झालो असलो तरी लक्ष्यार्थ काही असल्यास समजण्या एवढा अद्याप तरी नाही. :)
29 May 2014 - 6:05 pm | असंका
तांत्रिकदृष्ट्या कविता छानच जमली आहे. आणि आपली कविता आधी कधी बघितल्याचंही आठवत नाहिये. (मजकूर मला आवडला नाही. अभिनंदन देताना ते डोक्यात नव्ह्ते असे म्हणवत नाही. पण ज्याचा त्याचा दृष्टीकोन्. यावेळी परत एकदा, पण अधिक मोकळेपणाने-) अभिनंदन.
29 May 2014 - 7:19 pm | माहितगार
तांत्रिकदृष्ट्या कविता जमल्याच कळवलत त्या बद्दल धन्यवाद, पण हे दुसर्या बडबडगीताच विडंबन असल्यामूळे फॉर्मॅटच खर श्रेय मूळ कवीला. मी बर्याचदा satire हा प्रकार लेखनासाठी निवडतो (अस इतर काही लोक्स म्हणतात). मजकुराबाबत सहमत होण्याचा आग्रह नाही. मजकुराच म्हणाल तर एकाच दिवशी साधारणतः दोन-अडीच तासात तीन विडंबन आली म्हणजे यातील प्रत्येक विडंबन माध्यमाचा आधार घ्यावा एवढ काहीतरी खटकल त्या भावना आपापल्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेला अस वाटत. तार्कीक उणीवा माझ्या अभ्यासाचा विषय असल्यामुळे माझा मुख्य उद्देश काही तार्कीक उणीवांकडे निर्देश करण होता. अर्थात वाचक त्याच्या त्याच्या पद्धतीने रसग्रहण करण्यास मोकळा असतोच. योगायोग असाकी दुसर्या आणखी एका विडंबन कवीनेही बडबडगीताचाच फॉर्मॅट निवडला होता. असो.
माझी मिपावरील पहिल काव्य पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला साधारणतः अशाच प्रकारच्या विषयावर सर्वात अलिकडील विडंबन मंत्रालयात भूलाबाई पण बघ जरा बघ जरा काहीसा वेगळा विषय हाताळते.
मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद
29 May 2014 - 2:50 pm | नानासाहेब नेफळे
एका लोकनायकाची कीती ती बदनामी.
29 May 2014 - 4:32 pm | llपुण्याचे पेशवेll
छान कविता. :)