गणेशोत्सव

ऐका दाजीबा's picture
ऐका दाजीबा in जनातलं, मनातलं
27 Jul 2008 - 7:18 pm

टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना का केली? लोकांनी एकत्र यावे म्हणून. त्यांचा उद्देश साध्य झाला. लोक एकत्र आले. पण त्यांनी एकत्र येऊन काय केलं?

गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस जो तमाशा चालतो, त्याबद्दल हा ऊहापोह. काही मंडळं निदान दहा दिवसांत काही वेळा तरी भजनं लावतात. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र कहर होतो. अक्षरश: दारु पिऊन, "कोई मेरे साथ कोई रात गुजारे..." सारख्या गीतांच्या तालावर हे तथाकथित "गणेशभक्त" नाचत असतात.

अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! त्यासाठी गणपतीची अशी विटंबना कशाला? खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं की टिळक जर आज हयात असते, तर त्यांनी आज गणेशोत्सव बंद केले असते!!

संस्कृतीविचारमत

प्रतिक्रिया

टारझन's picture

27 Jul 2008 - 9:29 pm | टारझन

तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल.
पण मला त्यामूळे भंग पावणारी शांतता , या कारणामुळे याचा राग योतो. मग तो गणेशोत्सव असो किंवा लग्नाची वरात. माझी शांतता कोणी कर्णकर्कश्य आवाजात भजन लाऊन जरी भंग केली तर त्याचा मला रागच येतो.
बाकी लोक गणपतीच्या नावाखाली काही ऊद्योग करोत मला वैयक्तिक काही फरक पडत नाही. फक्त मला त्रास नको. आणि म्हसोबाच्या जत्रेत दारू पिऊन नाचगाणे तमाशे चालतातच की ? मग खास गणेशोत्स्वाचं काय एवढ वाटाव. धिंगाणा तो धिंगाणाच !

(स्वगत : एखाद्या दिवशी मला पण धिंगाण्यात सामिल होऊन नाचावे वाट्ट, क्राऊड मधे मिसळावे वाट्टे. ती मजा पब मधे नाहीच)
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

फटू's picture

27 Jul 2008 - 11:19 pm | फटू

माझी शांतता कोणी कर्णकर्कश्य आवाजात भजन लाऊन जरी भंग केली तर त्याचा मला रागच येतो

मी सुद्धा याच मताचा आहे...

आणि तसंही देव भावाचा भुकेला आहे. कर्णकर्कश्य आवाजात वाजणार्‍या संगीताचा नाही. मग ती भजनं का असेनात...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विकास's picture

28 Jul 2008 - 5:19 am | विकास

कोण म्हणतेय की आज सार्वजनीक गणेशोत्सव हे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणे मुळे होतात?

या वर्षी एक गंमत करून पहा खालील प्रश्न वर्गणी विचारायला येणार्‍या व्यक्तीस विचारा आणि पहा १००% बरोबर उत्तरे मिळतात का ते...

  • गणेशोत्सव कोणी सुरू केला?
  • कधी सुरू केला?
  • का सुरू केला?
  • तुम्ही (सार्वजनीक) गणेशोत्सव करता त्याची कारणे काय?
मराठी_माणूस's picture

28 Jul 2008 - 9:14 am | मराठी_माणूस

आमच्या इथले एक मंडळ , सकाळ पासुन रात्रि पर्यंत प्रचंड मोठ्या आवाजात गाणि लावतात. ह्या लोकाना, अभ्यास करणारे विद्यार्थि, वॄध्द , आजारि कोणा कोणा ची पर्वा नसते.
दारे खिडक्या लावुन घेतल्या, कानात बोळे घातले तरि तो आवज येतच असतो.
एरवि लोड शेडिंग नको वाटते पण ह्या १० दिवसात त्याचा खुप आधार वाटतो , कारण तेव्हड्या वेळ तरि ह्या जांचा पासुन सुटका होते.

मनिष's picture

28 Jul 2008 - 4:19 pm | मनिष

माझी शांतता कोणी कर्णकर्कश्य आवाजात भजन लाऊन जरी भंग केली तर त्याचा मला रागच येतो

हे खरे आहे, पण ह्यांना पटवणार कोण?
विकासची प्रश्नावली भन्नाट! विचारून पहायला हवे...खरे तर ह्या प्रश्नाचे मंडळाने जाहिर उत्तर द्यावे असे बंधन हवे! :)

तुम्ही (सार्वजनीक) गणेशोत्सव करता त्याची कारणे काय?

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 5:46 pm | विसोबा खेचर

अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना!

हम्म! खरं आहे. प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे. गणपती मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, धिंगाणा करणे योग्य नाही.

आपला,
(लालबागच्या राजाचा भक्त) तात्या.

ऐका दाजीबा's picture

28 Jul 2008 - 6:35 pm | ऐका दाजीबा

बाकी लोक गणपतीच्या नावाखाली काही ऊद्योग करोत मला वैयक्तिक काही फरक पडत नाही.

पण मला पडतो. एक गणेशभक्त म्हणून मला याचा त्रास होतो.

प्राजु's picture

28 Jul 2008 - 6:54 pm | प्राजु

विसर्जन झाल्यानंतर, नदीच्या काठी किंवा समुद्राच्या काठी.. चिखलात रूतून बसलेल्या, भग्न झालेल्या, दुखावल्या गेलेल्या गणेशमूर्ती पाहून खूप त्रास होतो. ज्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा ... मनोभावे, अगदी स्वतःच्या प्राणांपासून करायची त्याची अशी विटंबन!.... दरवर्षी अशी दृष्य बघून मी रडलेली आठवते मला. एकतर ती अशा ठिकाणी विसर्जन करावी जिथून ती पाण्याबाहेर येणार नाही , नाहीतर तिचा आकार असा आसावा की कमी पातळीच्या पाण्यामध्ये सुद्धा ती मूर्ती विरघळून जाईल... बस्स!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऐका दाजीबा's picture

22 Aug 2008 - 2:14 am | ऐका दाजीबा

हीच गोष्ट गोपाळकाल्याची आणि कोजागिरीची!

मला आठवते माझी लहानपणाची कोजागिरी. आम्ही सर्व कुटुंबीय रात्री घराच्या गच्चीवर जमायचो. छान गप्पा चालायच्या. शांत वातावरण आणि शीतल चांदणं. आईनं तयार केलेलं गरमागरम केशरी दूध त्यात चंद्र पाहून प्यायचो. त्या निमित्तानं खूप चांगल्या विषयांवर चर्चा व्हायची.

आणि आता.... कोजागिरी साजरी करावीशीच वाटत नाही. कारण गच्चीवर गेलो तर तेच शीतल चांदणं असतं, पण ते शांत वातावरण मात्र नसतं. त्याची जागा घेतलेली असते कर्णकठोर पाश्चिमात्य गाण्यांनी. असं म्हणतात की लक्ष्मी या रात्री सर्वत्र फिरत असते आणि विचारत असते "को जागर्ति?" ( कोण जागा आहे?) [सहजच विषय निघाला म्हणून: असं म्हणतात की शिवाजी महाराजांना या रात्री असा आवाज आला होता. त्यांचं संस्कृत अर्थातच चांगलं होतं. त्यांनी "अहं जागर्मि" (मी जागा आहे) असं प्रत्युत्तरही दिलं होतं!]. असं विचारत असते, आणि जो जागा असतो (ईश्वरचिंतन करीत!) त्याला ती संपत्ती देते.

मला वाटतं आता अशा वातावरणात लक्ष्मीलाही फिरावंसं वाटत नसणार!

गोपाळकाल्याचंही काय हो? काय वातावरण असायचं पूर्वी! या जोरात गाणी (तीही पाश्चात्य संस्कृतीची) वाजवण्याच्या पद्धतीमुळं सगळा आनंदच मावळला आहे असं म्हणावसं वाटतं.

रेवती's picture

22 Aug 2008 - 5:36 am | रेवती

करणं चूकच आहे. आता गाणी लावताय ना तर भजनं तरी लावा. त्याच्याही पुढे जावून ही मंडळे सिनेमातले तारे जमिनीवर म्हणजे मंडळांमध्ये पूजेसाठी बोलवतात. त्यांना पहायला तूफान गर्दी होते. एकदा एका मंडळाने हेमामालिनी ला आरती करण्यासाठी बोलावले. त्यावेळच्या भाषणात एका पुढार्‍याने हेमामालिनीची ओळख(?) करून देताना म्हटले की आज आपल्या येथे सुप्रसिद्ध्................(हे सर्व बोलून झाल्यावर तो म्हणाला)आता आपण सर्व हेमामालिनीचा लाभ घेऊया! (आम्ही सर्वजण घरात बसून ऐकत होतो व ह. ह. पु. वा.) त्याला म्हणायचे होते की दर्शनाचा लाभ घेऊया.

रेवती