काल दि ०२ मार्च रोजी डोंबिवली ( मध्यवर्ती ठिकाण -मुवि ) येथे हॉटेल नंदी पैलेस या ठिकाणी मिपा कट्टा संपन्न झाला. मुळात मला घारापुरी कट्ट्याला येता न आल्याची खंत होतिच म्हणून हा कट्टा करायचाच हे मी ठरवले होते. माझ्या मुलाची बारावीची परीक्षा असल्याने मला थोडासा उशीर झाला.( मी त्याचा अजून अभ्यास घेतो हे मला आनंदाने नमूद करावेसे वाटते). मुवि आणि बाकी सर्व जण साडे सात वाजता तेथे पोहोचले आणि जागा राखून ठेवलेली होती. त्यामुळे मी पोहोचे पर्यंत समारंभाला सुरुवात झालेली होती. आजचे आपले पाहुणे श्री दीपक कुवेत ते पण पोहोचलेले होते. माझी कल्पना अशी होती के हे कोणीतरी मध्यम वयीन सद्गृहस्थ असावेत. कारण एवढ्या सुंदर पाककृती करण्यासाठी आणि त्याचे फोटो टाकण्यासाठी माणूस साधारण असा परिपक्व असावा. पण त्यांना बघून मला आश्चर्याचा धक्का बसला कारण ते व्यवस्थित तरुण आहेत आणि व्यवसायाने सुद्धा शेफ नाहीत( वाणिज्य शाखेचा माणूस असतील अशी मुळीच शक्यता वाटत नव्हती.
असो भटक्या खेडकर , शैलेंद्र , भाते, मुवि, विनोद १८, मी आणि उत्सवमूर्ती श्री दीपक कुवेत असे सर्व जण छान मोकळ्या हवेत आकाशाच्या छपराखाली बसलो होतो. समोर एक गायक पेटी आणि तबला साथीला, हवेत सुखद असा गारवा आणि पिणेकरांनी उंच ग्लासात बियर घेतलेली होती. फक्त शैलेंद्र हे आपली निष्ठा बदलत नाहीत म्हणून त्यांनी म्हातारा संन्यासी (ओल्ड मोन्क) घेतलेली होती. खायला प्यायला रेलचेल होतीच. म्हणजे पहाडी कबाब, चिकन मानच्युरियन, सीख कबाब असे गरमागरम पदार्थ होते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. यात भटक्या खेडवाला यांनी एक असभ्य मराठी म्हणी आणि वाक्प्रचार असे पुस्तक उपलब्ध आहे असे सांगितल्यावर लोकांनी विविध असभ्य म्हणी साहित्य कसे समृद्ध करतात याची थोडी थोडी झलक दाखविली. उदा. कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली
किंवा सतरा साडे तरी भागाबाईचे कुले उघडे
अशा म्हणीतून आपला मुद्दा कसा ठासून सांगितलं जातो हे जाणवले.
भटक्या खेडवाला यांनी अंबरनाथला घर घेतले त्यावर मुंबई पुण्यात आणि इतर महाराष्ट्रात आकाशाला भिडणाऱ्या जागांचे भाव यावर साधक बाधक चर्चा झाली. यात श्री शैलेंद्र यांनी सांगितले कि घर विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेणे हे खरं तर फायदेशीर ठरते. पण माझ्या मते मानसिक दृष्ट्या आपले घर असणे हे विशषतः गृहिणीला फार महत्त्वाचे वाटते.तुम्ही तुमच्या पत्नीला भाड्याने अगदी हिर्याचे शरीरभर दागिने आणून दिलेत तरी तिला स्वतःचा जरी फक्त एक दागिना असेल तरी त्याचे मोल जास्तच वाटेल. यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. भटक्या खेडवाला यांचे खेद येथे स्वतःचे घर आहे आणि मागे बाग आहे यावर तेथे एक दोन दिवस जाऊन राहायचे यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. श्री दीपक कुवेत यांचे कुवेतला कसे जाणे झाले यावर एक चर्चा झाली. कुवेत हा एक समृद्ध देश आहे आणि भारतीयांना तेथे चांगला वाव आहे असे मतही त्यांनी मांडले.
थोडा वेळ वारुणीचे विविध प्रकार आणी त्याचा उपभोग कसा घ्यायचा आणि दुरुपयोग कसा टाळायचा यावर एक साधक बाधक चर्चा झाली. समोरिल गायकाने गझल गायला सुरुवात केली त्यात गुलाम अली/ जगजीत सिंह यांनी गायलेले काळ चौदहवी की रात थी, इश्क कीजे फिर सम्झीये जिंदगी क्या चीज है. अशी गाणी बरी गायली. यावर श्री भाते यांचे असे मत पडले कि ते काही तितकेसे चांगले नव्हते. अर्थात सर्वाचे असे मत पडले कि त्यःची गायकी जर तितकी चांगली असती तर तो हॉटेलात का गायला असता? निदान त्यांचे गायन पेटी आणि तबला यामुळे वातावरण निर्मिती होत होती यात शंका नव्हती. शैलेंद्र यांना सायकल वर कोकण दौरा करण्याची इच्छा आहे तरी त्यात कोणी सहभाग घेणार असेल तर त्यांना व्यनि करावा.
भटक्या यांनी आताशा हरिश्चंद्र गड आणि तत्सम ट्रेक ची ठिकाणे कशी व्यापारीकरणाने बरबाद होत आहेत यावर दुक्ख व्यक्त केले यावर लोकांनी चिंता व्यक्त केली.अशी चर्चा बराच काळ चालू होती. शेवटी स्टार्टर खाऊन बहुतेकांचे पोट भरले असल्याने समारोपासाठी फक्त फ्राईड राइस आणि दाल तडका मागवली. अशारितीने सर्व जन तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने रात्री साडेअकरा वाजता तेथून उठले आणि हॉटेलच्या बाहेर परत पंधरा मिनिटे गप्पा मारीत कोण कुठे कसा जाणार आणि पुढचा कट्टा श्री रामदास यांच्या घरी आहे तेंव्हा भेटायचे असे ठरवून निघाले.शेवटी एकच वाईट गोष्ट झाली कि श्री दीपक कुवेत यांनी बिल भरले. म्हणजे उत्सवमूर्तीने च पाहुणचार करायचा हे जर अति होते असे माझे वैयक्तिक मत आहे.
श्री मुवि आणि श्री विनोद हे टेबलाच्या दुसर्या टोकाला असल्याने त्या बाजूला झालेल्या अधिक चर्चेसाठी त्यांनी या वृत्तान्ताला हातभार लावावा .
फोटो श्री विनोद यांनी काढले आहेत तेंव्हा फोटो टाकण्याची मी त्यांना विनंती करीत आहे.
प्रतिक्रिया
3 Mar 2014 - 1:33 pm | नितीन पाठक
खरे साहेब, डोबिंवली येथील हॉटेल नंदी पैलेस येथील "साग्रसंगीत" कट्टयाचे "साग्रसंगीत" वर्णन वाचावयास मिळाले. एवढी मातबर मंडळी जमल्यावर आणि सगळ्या "गोष्टी" मनासारख्या मिळाल्या कट्टा एकदम रंगला असेलच.
बाकी खरे साहेब, एवढे 'साग्रसंगीत' वर्णन ऐकल्यावर (वाचल्यावर) आमच्यासारख्यांच्या (जे सदस्य मुंबईच्या बाहेरचे आहेत) त्यांच्या किती पोटात 'जळजळ' होत असेल, पोटात कळ येत असेल याची कल्पना आहे का ? असो.
वृत्तांत वाचून मजा आली. कट्टयामध्ये सामिल न होता आले त्याबद्दल खेद वाटतो.
सर्व कट्टेकरी सदस्यांचे त्यांच्या यशस्वी कटट्याबद्दल अभिनंदन !
3 Mar 2014 - 1:59 pm | भाते
बघितलात आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत कट्टा झाल्याचा परिणाम! काल रात्री कट्टा झाला आणि आज सकाळी कट्टा वृत्तांत आला देखील!
आधीच्या कट्टयाचा वृतांत अजुन येतो आहे. :)
3 Mar 2014 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा
ह्हूं :D जेव्हढा वेळ कट्टा व्हायला लागतो, "तेव्हढाच" वेळ वृत्तांत-यायलाही लागतो!!! :p
ह.घ्या. =))
आणि हा वृतांतही घ्या! =))
http://misalpav.com/node/27208
3 Mar 2014 - 3:34 pm | भाते
या धाग्यावर मी प्रतिसाद दिल्यावर लगेच आधीच्या कट्टयाचा वृत्तांत आला.
अ. आ.,
ह.घ्या. :)
घारापुरी कट्टयाला यायला न जमल्याने ती हौस कट्टयाचा सचित्र वृत्तांत वाचुन अनुभवायची होती.
धाग्यापद्धल धन्यु.
3 Mar 2014 - 6:44 pm | प्रचेतस
मस्त वृत्तांत.
फोटो लवकर येऊ द्यात.
3 Mar 2014 - 6:51 pm | रेवती
अरेच्च्या! सध्या दे दणादण कट्टे चालू आहेत असे दिसते. ईनो तरी किती घ्यायचा! बहुतेक नंदी कट्ट्यासाठी मुवि आधीच्या कट्ट्यातून लवकर बाहेर पडले.
3 Mar 2014 - 7:24 pm | कंजूस
मीपण येणार होतो परंतू मी आल्यास काही गोष्टीँना मुरड घालावी लागेल या विचाराने येण्याचे रहीत केले . भटक्या खेडवाला यांच्याशी ओळख झाली असती .भटकणे हा आवडीचा विषय आहे .बाकी तुम्हा सर्वाँना ओळखतो .कालच दिपकशी ओळख झाली .पेठकर काका आणि त्याची रेसपिवर चर्चा चालू होती पण त्यात ढवळाढवळ केली नाही .मी भाकरी पिठले खिचडी करण्याच्या पलीकडे अजून गेलेलो नाही .
चर्चेचे विषय मजेदार वाटले .आम्ही शाळेत असतांना आठवीत वाचनालयातले संदर्भ ग्रंथ बघायला मिळू लागले .माझा मित्र मला वाचनालयात घेउन गेला .(एकट्याला देत नव्हते) .वाचनालयाच्या बाईंकडे ज्ञानकोशाच्या एका खंडाची मागणी केल्यावर नाव लिहून घेतांना बाईंनी आमच्याकडे कौतुकमिश्रीत आदराने पाहिलं .पुढील दोन तासांत त्यांनी आम्हाला वाचतांना पाहीलं असतं तर ?सर्व चावट म्हणींची सविस्तर माहीती वाचून ज्ञानात भर घालत होतो .
असो .
एका ऐसपैस जागेच्या (कट्टयासाठी ५० +लोक महिला मुले यांना चालेल अशी)शोधात जात आहोत .लवकरच सांगू
3 Mar 2014 - 7:30 pm | मुक्त विहारि
कट्ट्याला जमलेले अगदी सुरुवातीला आलेले कट्टेकरी,
डावीकडून....भटक्या खेडवाला, दिपक कुवैत्,मुवि आणि भाते.
डावीकडून ...... दिपक कुवैत्,विनोद १८,मुवि. विनोद ह्यांनी शैलेंद्र ह्यांना बोलवायचा प्रस्ताव मांडला.मी सकाळ पासून त्यांना काँटॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो.पण विनोद ह्यांच्या आग्रहास्तव परत एकदा ट्राय केला.आमच्या सुदैवाने तो लागला आणि शैलेंद्र यांनी लगेच यायचे कबूल केले.
आमच्या अशा ह्याला बोलावले का?त्याला बोलावले का? अशा गप्पा टप्पा चालू असतांनाच डॉ.खरे आले.ते आल्यामुळे थोडी मरगळलेली मैफील परत जोरदार सुरु झाली.
डावीकडून मुवि,भाते आणि शैलेंद्र.मी घारापुरी लेण्यांचा आस्वाद कसा घेतला आणि "वल्लीं"ना भेटायचा प्रत्येक मिपाकराने प्रयत्न करायलाच हवा, ह्याची कारण मीमांसा करत होतो.
प्रत्येक कट्ट्याला सुबोध खरे हे हवेतच.संवाद कौशल्याचे उत्तम उदाहरण.आपले हे मिपाकर डॉ.लोक आपल्या सारख्या सामान्य माणसांचे ऐकतात.
अजून काही फोटो.....
दिपक कुवैत ह्यांनी स्वतः बिल भरायची तयारी दाखवली.खरे तर मी त्यांना भरू नका, असे सांगीतले.म्हटले फारच वाटत असेल तर निम्मे तुम्ही भरा, असेही सांगीतले.
पण त्यांनी मला परत विनंती केली, की कुवैतला हे असे क्षण मिळत नाहीत.तुम्ही सगळे एकत्र जमलांत आणि मुद्दम मला भेटायला, वेळ काढलात, ह्याची जाणीव आहे.त्यामुळे क्रुपया मीच बिल भरतो.
शेवटी , मी पण त्यांचे दू:ख समजू शकलो.गल्फ मध्ये पैसा मिळतो पण मैफील जमतेच असे नाही.विशेषतः कुवैत आणि सौदी मध्ये.त्यामुळे त्यांच्या भावना समजूनच मी त्यांना बिल भरायची संमती दिली.आमचे मिपाकर थोडे नाराज झाले,पण होमसिक झालेल्या मनुष्याच्या भावना , दुसरा होमसिक मनूष्यच समजू शकतो.
3 Mar 2014 - 8:37 pm | जेपी
लातुर कट्टा होईपर्यंत माझा ' डिनायल मोड ऑन '
3 Mar 2014 - 8:49 pm | मुक्त विहारि
अगदीच काही नाही तरी... निदान लातूर स्टेशनवर चहा पिवून कट्टा साजरा करू.
कट्टा = खाणे पिणे, गप्पा टप्पा आणि एकत्र भेटणे.
इथे काय खाल्ले आणि किती खर्च केला? हे महत्वाचे नसून किती आनंद मिळवलात? हे महत्वाचे.
त्यामुळे "तुम्ही तुमचा डिनायल मोड ऑफच करावा." अशी विनंती आहे.
3 Mar 2014 - 9:36 pm | जेपी
मुवि साठी' डिनायल मोड ऑफ '
3 Mar 2014 - 9:05 pm | सुहास झेले
भारीच... कट्टेकरी एकदम फॉर्मात :)
3 Mar 2014 - 10:23 pm | भ ट क्या खे ड वा ला
मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि संकेत.
संपादक -अभ्यासक अ. द. मराठे.
ग्रंथाली प्रकाशन .
या पुस्तकावर चर्चा झाली आणि दुसरे एक पुस्तक "Making the Cut " लेखक. मोहम्मद खाद्रा
या वर हि चर्चा झाली. ४ मार्च ला राष्ट्रीय सुरक्षा दिवस असतो त्या निमित्ताने लहान मुले आणि घरातील सुरक्षा या वरही उपयुक्त चर्चा झाली. मुवि नी गरम कुकर आणि लहान मुलांना असलेले त्याचे आकर्षण यावर एक छान किस्सा सांगितला. भाते नंतर नंतर फक्त ऐकत होते. शैलेंद्र यांनी सायकलिंग चे काही अनुभव सांगितले. गुलाम अली, जग्जीत सिंग. मेहदी हसन आणि शायर अहमद फराज हे विषय सुद्धा चर्चेला आले. दीपक कुवेत यांना ते सुट्टीवर येतील तेव्हा एका ट्रेक ला न्यायचे ठरल आहे. खेड ची सहल, कट्टा , ट्रेक असे एकदम करायचे सुद्धा ठरले आहे. तारीख मुवि जाहीर करतील, शक्यतो सप्टेंबर महिना असेल.विनोद १८ यांनी छाया चित्रण केले , दीपक कुवेत यांनी चलनातला फरक समजाऊन सांगितला.
एकंदर कट्टा फारच रंगला. मजा उडाली.
5 Mar 2014 - 12:15 pm | बॅटमॅन
त्या पुस्तकाच्या लेखकास फोन करून मुद्दाम त्याचे आभार मानले होते ;)
लहानपणचा डोक्यात असलेले प्रोजेक्ट अगोदरच केल्याबद्दल ;)
3 Mar 2014 - 10:39 pm | पैसा
करा कट्टे! करा मज्जा!! मुविंच्या घरी तर हल्ली रोज जेवताना पण मिपा कट्टा भरतो, हाकानाका!
3 Mar 2014 - 11:01 pm | खटपट्या
मस्त वृत्तांत आणि फोटो
3 Mar 2014 - 11:24 pm | अजया
भारी झालेली दिसते वारी तीर्थक्षेत्राची ;)
4 Mar 2014 - 9:00 am | प्रमोद देर्देकर
सुप्रभात
खुप छान कट्टा फोटो आणि वृतांत मंडळी .
!! इये मराठिचिये नगरी ! मु.वि. झाले कट्टेकरी !!
4 Mar 2014 - 10:37 am | स्पंदना
करा बाबांनो करा.
मुवी एका दिवसात दोन दोन कट्टे करा.
आम्ही आपले फोटो पहातो आणि छान म्हणतो.
4 Mar 2014 - 10:56 am | मुक्त विहारि
त्या २ दिवसांत (१ मार्च आणि २ मार्च)
३ कट्टे केले.
पैकी १ तर एकदम स्पेशल होता.
त्या स्पेशल कट्ट्याचा व्रुत्तांत , लवकरच....
4 Mar 2014 - 3:01 pm | आत्मशून्य
4 Mar 2014 - 4:11 pm | मदनबाण
आज घरी जाउन पहिले इनो चे पाकिट शोधतो ! ;)
4 Mar 2014 - 4:24 pm | पिंगू
कशाला रे. कट्ट्याला आला असतास तर त्याची गरजच पडली नसती..
4 Mar 2014 - 4:36 pm | मदनबाण
कशाला रे. कट्ट्याला आला असतास तर त्याची गरजच पडली नसती..
हॅहॅहॅ... इथे येणे जमत आहे हीच सध्या मोठी सोय आहे माझ्यासाठी.
4 Mar 2014 - 7:50 pm | पिंगू
हम्म्म... म्हणजे सध्या माझाच जुना मोड तुझ्या वाट्याला आला आहे तर..
5 Mar 2014 - 12:58 pm | अनन्न्या
आणि वृत्तांतही!