राज्य करणारे करतात निषेध…
पण सैनिक मात्र ,जीवानिशी जतो …
शहीद होणं , हुतात्मा होणं म्हणजे नेमक काय ?
शेवटी मृत्यूच तो ….
नाही का ?
मग आपण सजवतो त्यांची प्रेतं …
गुंडाळतो आपल्या तिरंग्यात ….
आणि जमलंच, तर थोडा संताप व्यक्त करत
जोडतो आपले हात …
आदरा खातर …
मरताना खरंच ,त्याला वेदना झाल्या असतील का हो?
आपला गाव,आई-बाप ,मित्राची हाक,बायकोचं हसू छकुलीचं रुसू …
यातलं काही आठवलं असेल ?
खरं खरं सांगा …
कि सांगून टाकू , हसत हसत शहीद झाला तो … ?
ऐका माझं ,आपण असंच करु.…
तिरंग्यात गुंडाळून आणु ….
प्रेताला पार्थिव वगेरे म्हणू …
आणि त्याला सरणावर जाळताना 'अमर रहे'च्या घोषणा दिल्या
कि सगळंच सोप्पं होईल …
तो आपल्यासाठी मेलाय हे विसरण्यासाठी …
.
.
आपल्याला सगळं कसं, साधं सोपं पाहिजे …
प्रतिक्रिया
24 Jan 2014 - 7:55 pm | चिन्मय खंडागळे
मग आपण सजवतो शब्दांची प्रेतं …
गुंडाळतो आपल्या काव्यात ….
आणि जमलंच, तर 'वा वा', नि:शब्द झालो', 'सुन्न झालो' म्हणून
चार प्रतिसाद टाकतो …
रीतीखातर …
त्याच्या बायकोचं आयुष्य सावरलं असेल का हो?
पोरांच्या शिक्षणाचं काय? …
की लागली असतील हॉटेलात टेबलं पुसायला?
यातलं काही आठवलं असेल ?
खरं खरं सांगा …
आपल्यालाही सगळं कसं, साधं सोपं पाहिजे …
(कृपया ह. घेणे...)
5 Feb 2014 - 12:10 pm | घन निल
तुमचा प्रतिसाद आवडला ."(कृपया ह. घेणे...)" हे का लिहिले कळाले नाही