मुन्नी आणि शीलाच्या आधीच्या काळात, म्हणलं तर सरळसाधे आणि तरी देखील भारदस्त वाटावी अशी अभिनेत्री म्हणजे सुचित्रा सेन. फक्त स्वतःच्या अभिनय, दिसणे, आणि सुदैवाने मिळालेली सुरेल गाणि - चित्रपट यांच्यामुळे लक्षात राहील्या...वास्तवीक त्यांचे हिंदी चित्रपट हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील पण त्यातून खरेच "तूम आगये हो नूर आगया है" असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल. म्हणूनच कुठेतरी आज त्यांच्या निधनाची बातमी वाचून चुकचुकल्या सारखे झाले.
ऑंधी हा त्यांचा १९७५ साली आलेला शेवटचा हिंदी चित्रपट. त्यात कुठेतरी तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्याशी आणि त्यांच्या वैवाहीक जीवनाशी साम्य असलेला अभिनय केला तरी ते तितकेच ठेवले आणि १९७८ नंतर त्या ज्या सिनेसृष्टीतून गुप्त झाल्या त्या परत कधी प्रसिद्धी देणार्या कुठल्याच रंगमंचावर आल्या नाहीत. ना राजकारणात ना टिव्हीच्या पडद्यावर अगदी एक्पर्ट म्हणून आल्या नाहीत... त्यांची मुलगी आणि नाती चित्रपटात आल्या तरी त्या स्वतः प्रसिद्धीपासून लांबच राहील्या. केवळ वैवाहीक जीवन आणि रामकृष्ण मिशन या दोनच ठिकाणी त्यांनी उर्वरीत जीवन घालवले. आत्ता वाचताना लक्षात आले की त्यांना २००५ मधे दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार होता, पण त्यासाठी असलेल्या अटी नुसार त्यांना दिल्लीस जाणे गरजेचे होते. ते नाकारल्याने त्यांना तो मिळू शकला नाही.
भारतीय (बंगाली - हिंदी) चित्रपटसृष्टीत योगदान केलेल्या या अभिनेत्रीस श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
17 Jan 2014 - 10:03 pm | आदूबाळ
समयोचित छान लेख. श्रद्धांजली.
17 Jan 2014 - 10:14 pm | मुक्त विहारि
सहमत
18 Jan 2014 - 9:21 am | विकास
जालावर आत्ता लोकसत्तेचा अग्रलेख आला (आता तो उशीरा येतो असे वाटते). याच विषयावरील अग्रलेख आहे पण अर्थातच भरपूर माहिती आणि सुंदर विश्लेषणासहीत. त्याचे शिर्षक आणि त्यातील मतितार्थातले या लेखाजोगातील साधर्म्य हा निव्वळ योगायोग आहे. कृपया गैरसमज नसावा.
18 Jan 2014 - 9:59 am | इन्दुसुता
भारतीय (बंगाली - हिंदी) चित्रपटसृष्टीत योगदान केलेल्या या अभिनेत्रीस श्रद्धांजली.
अगदी हेच.
18 Jan 2014 - 10:46 am | पैसा
हिंदीतील महत्त्वाच्या तीन सिनेमांत सुचित्रांची निवड झाली. ममता, आँधी आणि देवदास. हा योगायोग नव्हे. त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चांगल्या दिग्दर्शकांना जाण होती हे नक्की. पण हिंदीत जास्त काम न करणे हा त्यांचा जाणीवपूर्वक निर्णय होता की त्यांना जेवढे श्रेय आणि दाद मिळायला हवी तेवढी हिंदी व्यावसायिक चित्रपटांकडून दिली गेली नाही हे मात्र माहित नाही.
एका समर्थ अभिनेत्रीला श्रद्धांजली.