२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मिपावर प्रकल्प

क्लिंटन's picture
क्लिंटन in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 8:28 pm

नमस्कार मंडळी,

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीची "सेमीफायनल" समजल्या जाणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आणि निकालही जवळपास पूर्ण जाहिर झाले आहेत.आता लवकरच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागतील.या निवडणुकांसाठी मिपावर पुढील दोन प्रकल्प चालवायचा माझा इरादा आहे.

१. प्रश्नमंजुषा: लोकसभा निवडणुकांवर मी बऱ्यापैकी काठिण्यपातळीचे एकूण २० प्रश्न तयार केले आहेत. जमल्यास अजूनही प्रश्न तयार करायचा प्रयत्न असेल.साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत (निवडणुका १५ मे च्या आसपास पूर्ण होतील असे गृहित धरून) दर ५-६ दिवसांनी एक अशाप्रकारे ते प्रश्न मिपावर प्रसिध्द केले जातील.इच्छुकांनी त्या प्रश्नांची उत्तरे व्य.नि वरच पाठवावीत ही विनंती.पुढचा प्रश्न प्रसिध्द करण्यापूर्वी आधीच्या प्रश्नाचे उत्तर जाहिर केले जाईल.

२. पडघम-२०१४ ही लेखमाला: पूर्वीच्या निवडणुकांच्या आकडेवारीचे विश्लेषण करून त्या आधारावर २०१४ मध्ये काय होऊ शकेल याचा ढोबळ अंदाज बांधणे असे या लेखमालेचे स्वरूप असेल.नक्की किती लेख होतील हे आताच सांगता येणार नाही.पण साधारणपणे पुढील प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळतील अशी अपेक्षा आहे:

* राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या मतदानामध्ये फरक असतो का?असल्यास कसा?
* ज्याला प्रस्थापित-विरोधी मत (Anti-incumbency) म्हणतात ते नक्की आकड्यात कोणत्या स्वरूपात दिसते?
* अनेकदा मते जास्त पण जागा कमी अशी परिस्थिती असते.त्याचे नक्की कारण काय?
* तिरंगी आणि चौरंगी लढतीमध्ये बऱ्यापैकी जागा मिळवायला (क्रिटिकल मास) नक्की किती मते मिळाली पाहिजेत?
* विविध बॅटलग्राऊंड राज्ये आणि तिथली परिस्थिती

या व्यतिरिक्त कोणत्या प्रश्नाचे उत्तर विश्लेषणातून मिळणार असेल आणि ते प्रश्न माझ्या लक्षात आले नसतील तर ते जरूर विचारावेत ही विनंती.

या दोन्ही प्रकल्पांमध्ये इच्छुक मिपाकरांचे सहकार्य मिळाले तर हे प्रकल्प अधिक दर्जेदारपणे सादर करता येतील. यासाठी मला खाली लिहिल्याप्रमाणे सहकार्याची अपेक्षा आहे.

१. प्रश्नमंजुषेसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक धागा लिहिणार आहे.त्यात माझे प्रश्न असतीलच.त्याचबरोबर आपलेही काही प्रश्न काढल्यास ते जरूर पोस्ट करावेत.

२. पडघम-२०१४ ही लेखमाला म्हणजे बऱ्यापैकी मोठा प्रकल्प असणार आहे.त्यासाठी जुन्या निवडणुकांची आकडेवारी एक्सेल शीटमध्ये आणणे गरजेचे आहे.मी १९९१ पासून २००९ पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकांची (१९९९,२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमधील विधानसभा मतदारसंघनिहाय) आकडेवारी एकत्र केली आहे.तसेच २००१ ते २०१२ पर्यंतच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीची (उत्तर-पूर्वेतील लहान राज्ये वगळता) आकडेवारी एकत्र केली आहे. २००० सालच्या ओरिसा विधानसभा निवडणुकीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. खरोखर चांगले विश्लेषण करायचे असेल तर जमल्यास १९७७ पासूनच्या लोकसभा आणि १९८५/१९९० पासूनच्या विधानसभा निवडणुकांची आकडेवारी एक्सेलमध्ये आल्यास ते चांगले होईल.मी ते काम करतच आहे.पण माझ्या एकट्याकडून हे काम पूर्ण होईल असे वाटत नाही.तेव्हा या कॉपी-पेस्ट कामात कोणा मिपाकराचे सहकार्य मिळाले तर ते खूप चांगले होईल.हे काम बऱ्यापैकी वेळखाऊ आहे आणि मी बरेच तास यासाठी खर्च केले आहेत.त्यामुळे इतर मिपाकरांकडून काही राज्यांची आकडेवारी मिळाल्यासच मी माझ्याकडील आकडेवारी त्यांच्याबरोबर शेअर करू शकेन.एका निवडणुकीची आकडेवारी एकत्र करून दिल्यास मी २ किंवा ३ निवडणुकांची आकडेवारी देऊ शकेन आणि तेवढे काम करायला लागणारा वेळ द्यायची कोणाची तयारी असेल तर माझ्याकडील सगळी आकडेवारी द्यायलाही माझी ना नाही.पण त्यासाठी बऱ्यापैकी योगदान दिले गेले पाहिजे ही अपेक्षा. सध्या महाराष्ट्र १९९९ आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुका, बिहार १९९५, आंध्र प्रदेश १९९९, पश्चिम बंगाल १९९६ आणि १९९१ विधानसभा अशा प्रकारच्या आकडेवारीची सध्या कमी आहे. या कामात कोणा मिपाकराचे योगदान द्यायची तयारी असल्यास व्य.नि वर जरूर कळवावे ही विनंती. लेखमाला साधारणत: २६ जानेवारीच्या आसपास सुरू करायची आहे. तोपर्यंत जितकी आकडेवारी जमेल तितक्या आकड्यांचे विश्लेषण करून लेखमाला सुरू करायचा इरादा आहे.

धन्यवाद

हे ठिकाणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

8 Dec 2013 - 9:04 pm | यशोधरा

वाचते आहे...

मैत्र's picture

8 Dec 2013 - 9:13 pm | मैत्र

मस्त कल्पना -- उत्तम प्रकल्प
मला यात सामील व्हायला आवडेल. थोडी माहिती शोधणे आणि एक्सेल झिंदाबाद कामात नक्कीच..

आनन्दिता's picture

8 Dec 2013 - 10:18 pm | आनन्दिता

नक्कीच चांगली कल्पना!

संग्राम's picture

8 Dec 2013 - 10:27 pm | संग्राम

+ १

विकास's picture

8 Dec 2013 - 10:51 pm | विकास

शुभेच्छा! जमेल ती मदत अवश्य करेन!

अनिरुद्ध प's picture

9 Dec 2013 - 2:55 pm | अनिरुद्ध प

+१

अर्धवटराव's picture

9 Dec 2013 - 1:18 am | अर्धवटराव

चर्चेत सहभाग घेईलच... जमेल तशी मदत देखील अवश्य करेन.

पैसा's picture

9 Dec 2013 - 9:02 am | पैसा

उत्तम प्रकल्प! काय मदत पाहिजे सांग. एक्सेलमधे बरेच दिवसात काम केलं नाहीये. मजा येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2013 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

9 Dec 2013 - 9:24 am | नाखु

आम्ही यथामती चर्चेत सहभागी होऊ.प्रकल्पातून सकस आणि विश्लेषण पूर्ण माहीती मिळणार याची खात्री आहेच.

स्पा's picture

9 Dec 2013 - 9:33 am | स्पा

क्लिंटन जनता पक्ष
आगे बढो, हम तुम्हारे साथ हे ;-)

मस्त उपक्रम :-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2013 - 9:52 am | ज्ञानोबाचे पैजार

क्लिंटन दादा,
आम्हाला पण तुमच्या या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.
तुमच्या साठी एक्सेल मधे वाटेल तेवढे तोडफोडीचे काम करायला अतिशय आनंद होईल
इतरही काही हमालीचे काम असले तरी जरुर कळवा.
( नाहितरी हापिसात तुंबड्या लावतच बसलेला असतो )

हुप्प्या's picture

9 Dec 2013 - 12:01 pm | हुप्प्या

आपल्या आवडीचा पक्ष निवडून येत नसेल तर आकड्यांच्या जंजाळात आपले दु:ख बुडवायचे, दु:ख विसरायचे.
हा का ना का!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2013 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर अभ्यासपूर्ण अणि उपयोगी प्रकल्प आहे. शुभेच्छा !

अमोल केळकर's picture

9 Dec 2013 - 12:30 pm | अमोल केळकर

लेखमाला वाचायला नक्की आवडेल :)

अमोल केळकर

कलंत्री's picture

9 Dec 2013 - 1:08 pm | कलंत्री

आकडेवारी आणि त्यावरील भाष्य हे वाचण्याचा आंनद वेगळाच असेल याबद्दल दुमत नसावे. क्लिंटन यांचा आवाका बघता भूतकाळ आणि भविष्यकाळाचा आढावाही यातून मिळेळ याची मला खात्री वाटते.

शुभेच्छा.

सुहास..'s picture

9 Dec 2013 - 1:10 pm | सुहास..

आम्ही आहोतच रे !!

पण तुझ काय ? असशील का मोकळा ;)

चौकटराजा's picture

9 Dec 2013 - 2:28 pm | चौकटराजा

माझ्या लहानपणी एक मोठा पक्ष , त्यानंतर जनसंघ त्यानंतर समाजवाद्यांचे खंडीभर पक्ष असे स्वरूप होते. काँग्रस ला
पर्यायच नव्हता, त्यात शेषनचा उदय झालेला नव्हता सबब सत्तेसाठी सत्तेचा सरळ सरळ वापर हे त्यांचे सूत्र होते.
या मोठ्या राष्ट्रीय पक्षाने अकारण दलित व मुस्लीम अनुनय करून हिंदुत्व नावाची अभद्र संकल्पना राजकारणात आणली.
त्याने भाजप मोठा होत गेला. पण राजकारण हे विकासावरच करावे लागते हे त्या पक्षालाही आता कळू लागले आहे. भारतात एक दुसरा अभद्र शब्द म्हणजे सेक्युलर फोर्सेस ! अगदी राजकीय तज्ञ सुद्धा प्रादेशिक पक्षाना सरसकट सेक्युलर म्हणतात. भाजपचा जसा दक्षिंणेत चेहरा नाही तसा तो फारसा कॉग्रेसचा ही नाही. हे सत्य आहे.आंध प्रदेश हाच काय तो त्यांचा आधार आहे. गोवा व कर्नाटक प्रमाणे आंध्रातही भाजप पसरू लागला आहे. पण भाजपला खूप पल्ला गाठायचा आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2013 - 2:31 pm | श्रीगुरुजी

चांगला उपक्रम. फार वेळ देता येणार नाही. पण चर्चेत सहभागी होईन व जमेल तिथे खारीचा वाटा उचलेन.

एक्सेलमधे काहीही काम करायला अतिशय आनंद होईल.

नाहीतरी आमच्या बँकेच्या संपूर्ण कार्यालयात एक्सेलमधे असणारे कोणतेही काम जलद आणि अचूक करण्यात आमच्याहून पटाईत कोणी नाही. हाहाहा !!!

क्लिंटन's picture

9 Dec 2013 - 9:15 pm | क्लिंटन

सर्वांना धन्यवाद.व्य.नि वर नक्की प्रोसेस आताच कळवली आहे.

मध्यंतरी मी स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय आणि निवडणुकविषयक इतिहासावर फेसबुकवर १५ भाग लिहिले होते.त्याचे मराठीत भाषांतर करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते सुध्दा इथे लिहायचा इरादा आहे.तेव्हा जानेवारीपासून मिपावर निवडणुकविषयक वातावरण निर्माण करायचे काम माझे :)

मी ग्राफिकल टायटल स्ट्रीप तयार करुन देईन :)
चालेल?