माझे मित्र म्हणतात की तुझा संसार सुखाचा आहे.असेल,कदाचित तसेही असेल.कारण मी "संसार देवाची" रोज पुजा करतो.माझे लग्न झाल्यावर, माझ्या वडीलांनीच मला हे व्रत करायला सांगीतले.मी तर सुखी झालो (मित्र खोटे बोलत नाहीत, हे मी आधीच पु.वि.धा.क्र.२ मध्ये स्पष्ट केले आहेच.... http://www.misalpav.com/node/24546 )
नमनाला इतके तेल खूप झाले. तर आता कहाणीला सुरुवात करतो.
---------------------------------------------------------------------------------
एक आटपाट नगर होते.त्यात एक गरीब माणूस रहात होता.त्याचा संसार काही चांगला होत नसे.त्याची बायको इतर बायाकांसारखीच होती.त्यामुळे घरात रोज भांडणे असायची.एकदा तो असाच दुखी-कष्टी होवून बसला होता…सुदैवाने त्याची आणी आमची गाठ पडली.त्याने त्याची सर्व कहाणी मला सांगितली.मग मी त्याला संसार देवीची आराधना करायला सांगितली.त्याने ते व्रत केले आणि त्याचा संसार सुखाचा झाला.
सकाळी लवकर उठावे आणि खालील गोष्टी रोज कराव्यात.
१. आजन्म बायकोची खोटी स्तुती करणे. (तू सुंदर दिसतेस,कामसू आहेस इ. ह्याला थापा म्हणत नाहीत. असे खोटे बोलले तरी पाप लागत नाही)
२.सासरच्या मंडळींची निंदा न करणे.(तुझा भाव्वू किती हुशार.तिसरी नापास १० वेळा झाला तरी....शिक्षक फालतू आहेत असे म्हणावे.सासरे किती बोल-घेवढे आहेत असे म्हणावे.भांडकुदळ आहेत, असे स्पष्ट म्हणू नये मेव्हणीची स्तुती करू नये.ती (म्हणजे मेहुणी) रंभा आणि बायको टूनटून असली तरी,मेहुणीकडे बघू नये,मेहूणीबरोबर गप्पा तर अजिबात मारू नयेत.नाहीतर संशय-पिशाच्य मागे लागते,आणि ह्या संशय-पिशाच्यावर उपाय नाही.
३. तिच्या स्वैपाकाला नावे न ठेवणे (हॉटेल्स असतातच जवळ,नसेल तर हॉटेल जवळ जागा घ्या.पण मुलं झाली की अशा हॉटेलजवळच्या जागा सोडा.मुले झाली की बायकांचा स्वैपाक सुधारतो.आता ही जादू कशी होते ते फक्त ब्रम्ह देवालाच माहित)
४. कचेरीतून रोज उशिरा घरी जा.थोडे दिवसांनी होईल सवय.
५. शक्यतो तो रोज एखादी बरी गजरेवाली बघून गजरा विकत घ्या.सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय.साडीचा खर्च वाचतो.
६. सुट्टीच्या दिवशी लवकर उठून चहा करून द्या (म्हणजे बायको माहेरी गेली तरी बिघडत नाही...सवय राहते)
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
७. शांत रहा.(देव प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने आई व साहेब प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने “बायको” निर्माण केली आहे.
तर वत्सा असा हा साधा सरळ व सोप्पा बिन खर्चिक मार्ग आहे.जो कोणी हा वसा आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होई पर्यंत (आपल्या मुलांचे लग्न झाले की बायकोचे सासूत रुपांतर होते आणि मग ती "जावयाच्या किंवा सुनेच्या घरांत प्रवेश करते") करेल त्याचे सदरे (म्हणजे मराठीत शर्ट).सुखी माणसा सारखे होतील.
प्रतिक्रिया
31 Aug 2013 - 3:02 am | राजेश घासकडवी
मस्त व्रत आहे. मी थोडी भर घालतो.
१. तुमच्या एका चांगल्या मित्राबरोबर संगनमत करा. तुमच्या बायकोचा एखादा विशिष्ट पदार्थ चांगला (किंवा त्यातल्या त्यात बरा) बनत असेल ते आठवून बघा - समजा पुलाव. मग त्या मित्राला पढवून ठेवा. तो तिला सांगेल 'वैनी, तुमचा पुलाव फारच मस्त बनतो. आमच्या हिला काही तसा जमत नाही. मला जरा तुमची रेसिपी द्याल का? आणि प्लीज आमच्या हिला सांगू नका... ' आपण कोणालातरी त्या माणसाच्या बायकोपेक्षा बऱ्या वाटतो हे खूप सुखावणारं असतं. तुमच्या मित्राच्या घरी हेच नाटक तुम्ही वठवलं की झाली फिट्टंफाट. तुम्ही चौघे जण सुखी.
२. ऑफिसमधून रोज नुसतं उशीरा घरी जा एवढंच नाही, तर घरी परतताना महाभयंकर दमलेलो आहोत असे भाव ठेवा. आल्या आल्या डोळे मिटून पडून रहा. ती विचारपूस करेल तेव्हा 'काही नाही गं, काही विशेष नाही' असं ओढून ताणून म्हणा. मग तिच्याशी गप्पा मारता मारता हळूहळू ताजेतवाने व्हा. आणि नंतर सहजच म्हणा, 'तुझ्याशी बोलायला लागल्यावर सगळा थकवा निघून गेला बघ!' मग तिला तुमच्याबद्दल 'किती बिचाऱ्याला काम करावं लागतं.' अशी सहानुभूतीही वाढायला लागेल. ती हळूहळू तुम्हाला चहा वगैरे हातात आणून देईल, कधी डोकं चेपून देईल. असं काही केल्यावर हमखास उल्हसित व्हा. आणि तिचं कौतुक करा. अशा चांगल्या सवयी रीइन्फोर्स कराव्यात.
31 Aug 2013 - 8:40 pm | अत्रन्गि पाउस
हा काही गुन्हा थोडीच आहे...
आल इज वेल...
4 Sep 2013 - 4:11 pm | पैसा
ट्रेड सिक्रेट्स सांगितल्याबद्दल धन्यवाद! तुमची बायको मिपावर येईल याची व्यवस्था लवकरात लवकर करते!
4 Sep 2013 - 4:17 pm | भावना कल्लोळ
ज्यो ताई, मनातले बोललीस, इथे बायकाहि हा लेख वाचत आहेत.हे विसरले वाटते हि लोक.
4 Sep 2013 - 4:28 pm | मदनबाण
इथे बायकाहि हा लेख वाचत आहेत.हे विसरले वाटते हि लोक
परुष विभाग बंदिस्त नाही हे विसरले ते ! ;)
बाकी आपली ट्रेड सिक्रेट्स अशी ओपन करु नये ! समोरच्या पक्षाला नको ती माहिती पुरवली जाते ! ;)
{ट्रेड सिक्रेट मास्टर} ;)
4 Sep 2013 - 4:33 pm | अनिरुद्ध प
+१११ सहमत.
4 Sep 2013 - 4:52 pm | बॅटमॅन
पुरुष विभाग बंदिस्त नसल्याने कै फरक पडत नै ओ...शूर आम्ही खेळाडू आम्हाला, काय ट्रेड शिक्रेटाची भीती....
4 Sep 2013 - 4:34 pm | ब़जरबट्टू
रोज एखादी बरी गजरेवाली बघून
बरी गजरेवाली ??? आणि तरी फक्त गजराच घ्यायचा म्हणत्ताय ? ;)
4 Sep 2013 - 6:40 pm | arunjoshi123
या धाग्याएव्हढा उपयुक्त धागा झाला, होणे नाही.
4 Sep 2013 - 7:05 pm | सुबोध खरे
आपली रेषा मोठी करता येत नसेल तर बाजूला लहान रेषा आखा या न्यायाने
आपल्या माहितीतील डांबरट बायकोला त्रास देणाऱ्या पुरुषांची मधून मधून बायकोला कथा सांगत जावे म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने आपले जीवन सुखकर होते.
4 Sep 2013 - 7:45 pm | अनिरुद्ध प
सहमत
4 Sep 2013 - 8:00 pm | सूड
>>मेहुणीकडे बघू नये,मेहूणीबरोबर गप्पा तर अजिबात मारू नयेत.नाहीतर संशय-पिशाच्य मागे लागते,आणि ह्या संशय-पिशाच्यावर उपाय नाही
मी काय म्हणतो, जिला बहीण नाही अशीच कोणीतरी शोधली तर प्रश्नच मिटेल नाय का?? एकुलती एक मिळाली तर त्याहून बरं. ;)
4 Sep 2013 - 8:35 pm | सुबोध खरे
यात एक मोठा धोका आहे. जर काही झाले तर बायको सासूकडे किंवा सासू बायकोकडे (म्हणजे तुमच्याकडे) येत राहते. शिवाय एकुलत्या एका मुलीचे लग्न झाल्यावर सासूला दुसरे काही काम नसल्याने मुलीच्या संसारावर बारीक देखरेख ठेवायला वेळच वेळ असतो.
6 Sep 2013 - 7:33 pm | अनिरुद्ध प
एक असली तरी तिला आते,मामे,मावस बहिणी असतिल ना (चुलत राहिली) या सुद्धा नात्याने मेहुण्याच असतात्,चु भु दे घे),आणि अगदिच कोणी नसेल तर मैत्रीणी तर असतीलच.
7 Sep 2013 - 10:29 am | देशपांडे विनायक
'' कारण मी "संसार देवाची" रोज पुजा करतो.माझे लग्न झाल्यावर, माझ्या वडीलांनीच मला हे व्रत करायला सांगीतले.''
'' मग मी त्याला संसार देवीची आराधना करायला सांगितली.त्याने ते व्रत केले आणि त्याचा संसार सुखाचा झाला.''
तुमचा मुक्त विहार दिसतोय बर ! वडिल तुम्हाला देवाची पूजा करण्यास सांगतात आणि तुम्ही देवीची आराधना करण्याचे व्रत मित्रांना सांगताय
मुक्त नसलेले देव आणि देवित फरक करतात हो