पुर्वसुचना

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
20 Aug 2013 - 10:58 pm

आज पहाटे नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या करण्यात आली . अत्यंत निषेधार्ह घटना . समाजाच्या सर्वच स्तरातुन ह्या घटनेचा जोरदार निषेध होत आहे .
पण

ज्या विचारांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत,

हे मुख्यमंत्र्यांचे विधान पाहता आणि सकाळ फेसबुक वगैरे सोशल मीडीया वरील लोकांच्या प्रतिक्रिया पाहता ह्या हत्येची जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत .
ज्याप्रमाणे गांधी हत्येनंतर निशेध करणारे काही मोजके लोक "आपण गांधीवादी अहिंसक आहोत" आणि "हत्याकरणार्‍या माथेफिरुच्या समाजातील प्रत्येक व्यक्ती आतातायी नसतो " हे विसरुन जाळपोळी लुटालुट करत सुटले होते ....त्या प्रकाराची पुनरावृती होण्याची शक्यता आहे . विशेष करुन पश्चिम महाराश्ट्रात आणि सनातन प्रभात ह्या संघटनांवशी निगडीत असलेल्या लोकांवर प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे दिसत आहेत .
तसेच एका विशिष्ट समाजाबद्दल पोलरायझेशन करण्यासाठी ह्या घटनेचा अवलंब केला जात असल्याचे सोशल मीडीयावर दिसत आहे , तेव्हा त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे .

झाली घटना अत्यंत निदास्पद आहे ह्यात शंका नाही . सदर घटनेचे प्रतिसाद उमटणार आहेत ( असे प्रतिसाद उमटणे चांगले की वाईट हा ह्या लेखाचा मुद्दा नाही .) केवळ जे प्रतिसाद उमटणार आहेत त्यासाठी लोकांनी मानसिक पुर्वतयारी करावी ह्या साठी ही पुर्वसुचना .

अवांतर : सोशल मीडीयावरील माहीतीचा वापर करुन भविष्यात घडणार्या गुन्हांचा अंदाज लावणे ह्यात काही गैर नसावे असे मानुन सदर लेखन करीत आहे . शिवाय ज्येष्ट नेत्यांच्या हत्येनंतर प्रतिक्रिया उमटण्याच्या इतिहास आपल्या देशाला नवीन नाही . फेसबुक वरील अनेक "प्रसिध्द" संस्थांच्या पेजेस वरील अपडेट्स वरुन तसेच इ सकाळ वर आलेल्या प्रतिक्रियातुन वरील अंदाज काढण्यात आलेला आहे.

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

20 Aug 2013 - 11:23 pm | मंदार कात्रे

हिन्दुत्व वादी सन्घतना ना दोशी ठरवने चुक आहे

बॅटमॅन's picture

20 Aug 2013 - 11:45 pm | बॅटमॅन

हम्म ही एक रोचक शक्यता आहे खरी.

आशु जोग's picture

21 Aug 2013 - 12:00 am | आशु जोग

२००४ ची निवडणूक जाहीर झाली आणि पुण्यात भांडारकरवर हल्ला झाला,

चेतनकुलकर्णी_85's picture

21 Aug 2013 - 12:15 am | चेतनकुलकर्णी_85

अगदी मनातील विचार मांडलेत ………

मान्यवर राजकारणी लोकांच्या व कुमार केतकर सारख्या काही संपादकाच्या मुलाखती वरून आता हे स्पष्ट झाले आहे कि ह्याचा रोख आता कथे वळणार आहे ते….

बाकी कै. नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही अत्यंत दुखद गोष्ट आहे. परंतु हि हत्या राजकीय हेतूने झाली असावी असे जास्त वाटते. (पवारांनी लगेच प्रतिक्रिया द्यावी हे विशेषच !!)

१. शिवाय त्यांच्या ह्या बहुचर्चित जादू टोण्या विरुद्ध कायद्या बद्दल जास्त माहिती मिळेल का?
२. हा कायदा फक्त हिंदू धर्म साठीच लागू होणार होता का? (किंवा होणार आहे का?) कारण हिदुन्त्व वाद्यानीच खून केला आहे असा आरोप आहे.
३. नथुराम गोडसेंच्या नावाचा उद्धार का चालू आहे?

अनिरुद्ध प's picture

22 Aug 2013 - 7:34 pm | अनिरुद्ध प

राजकारण आहे,म्हणुनच आज लगेच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमन्त्र्यानी राजकारण्यान्ची पाठराखण केली आहे.

प्रसाद गोडबोले's picture

25 Aug 2022 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले

जुने लेखन चाळताना हे लेखन सापडले अन बेक्कार हसु आले. तब्बल ९ वर्षे होऊन गेली, तरी न्याय अजुन झालेला नाही. ही ह्या महान देशाची क्रिमिनल जस्टीस सिस्टीम =))))

दाभोळकरांचं ब्रह्मसमंध अजुनही ओंकारेश्वराच्या पुलावर भटकत विचार करत असेल की " ह्या देशात न्याय हीच अंधश्रध्दा आहे , आधी तिचे निर्मुलन करायला हवे होते."

=))))