पुर्वसुचना
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज पहाटे नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या करण्यात आली . अत्यंत निषेधार्ह घटना . समाजाच्या सर्वच स्तरातुन ह्या घटनेचा जोरदार निषेध होत आहे .
पण
ज्या विचारांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत,हे मुख्यमंत्र्यांचे विधान पाहता आणि सकाळ फेसबुक वगैरे सोशल मीडीया वरील लोकांच्या प्रतिक्रिया पाहता ह्या हत्येची जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत . ज्याप्रमाणे गांधी हत्येनंतर निशेध करणारे काही मोजके लोक "आपण गांधीवादी अहिंसक आहोत" आणि "हत्याकरणार्या माथेफिरुच्या समाजातील प्रत्येक व्यक्ती आतातायी नसतो " हे विसरुन जाळपोळी लुटालुट करत सुटले होते ....त्या प्रकाराची पुनरावृती होण्याची शक्यता आहे . विशेष करुन पश्चिम महाराश्ट्रात आणि सनातन प्रभात ह्या संघटनांवशी निगडीत असलेल्या लोकांवर प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे दिसत आहेत . तसेच एका विशिष्ट समाजाबद्दल पोलरायझेशन करण्यासाठी ह्या घटनेचा अवलंब केला जात असल्याचे सोशल मीडीयावर दिसत आहे , तेव्हा त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे . झाली घटना अत्यंत निदास्पद आहे ह्यात शंका नाही . सदर घटनेचे प्रतिसाद उमटणार आहेत ( असे प्रतिसाद उमटणे चांगले की वाईट हा ह्या लेखाचा मुद्दा नाही .) केवळ जे प्रतिसाद उमटणार आहेत त्यासाठी लोकांनी मानसिक पुर्वतयारी करावी ह्या साठी ही पुर्वसुचना . अवांतर : सोशल मीडीयावरील माहीतीचा वापर करुन भविष्यात घडणार्या गुन्हांचा अंदाज लावणे ह्यात काही गैर नसावे असे मानुन सदर लेखन करीत आहे . शिवाय ज्येष्ट नेत्यांच्या हत्येनंतर प्रतिक्रिया उमटण्याच्या इतिहास आपल्या देशाला नवीन नाही . फेसबुक वरील अनेक "प्रसिध्द" संस्थांच्या पेजेस वरील अपडेट्स वरुन तसेच इ सकाळ वर आलेल्या प्रतिक्रियातुन वरील अंदाज काढण्यात आलेला आहे.
प्रतिक्रिया
हे चुकिचे आहे
हम्म ही एक रोचक शक्यता आहे
.
अगदी मनातील विचार मांडलेत ………
यात नक्किच
जुने लेखन चाळताना हे लेखन