धाडस ___ शतशब्दकथा

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
14 Aug 2013 - 9:24 pm

लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता..
मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते..
त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू..
खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती..

इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला..
काही काळासाठी सार्‍यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला..
वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!!

थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती..
इतक्यात कोणीतरी अ‍ॅम्ब्युलन्स आली म्हणून आवाज दिला..
गर्दीला मागे सारत पांढर्‍याशुभ्र कपड्यातील कर्मचारी पुढे झाले.. अन त्या तरुणाला सोबत घेऊन गेले..

सुदैवाने एक फरार वेडा चोवीस तासांच्या आत सापडला होता !

- तुमचा अभिषेक

कथाआस्वादलेख

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

14 Aug 2013 - 9:25 pm | तुमचा अभिषेक

तिसरी कथा लिहायचे धाडस करतोय.. :)

जॅक डनियल्स's picture

14 Aug 2013 - 9:47 pm | जॅक डनियल्स

वेडे लोकंच धाडस करण्याचा वेडेपणा करतात. हा वेडेपणा अति-उत्कृष्टपणे जमला आहे. !

आनन्दिता's picture

14 Aug 2013 - 10:18 pm | आनन्दिता

सुंदर!!!

राघवेंद्र's picture

14 Aug 2013 - 10:59 pm | राघवेंद्र

एकदम मस्त व छान कथा. तुमच्या सगळ्या शतशब्दकथा मस्त आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Aug 2013 - 10:39 pm | अत्रुप्त आत्मा

@तुमच्या सगळ्या शतशब्दकथा मस्त आहेत.>>> +++१११ यहिचा बोल्ता है। एकदम खटक्यावर बोट देऊन चाल्लय! असच चालू र्‍हांऊंद्या! :)

प्रसाद गोडबोले's picture

14 Aug 2013 - 11:07 pm | प्रसाद गोडबोले

छानच लिहिता आहात ...

( आणि हा फॉर्मॅट लईच आवडला बुवा आपल्याला ...)

पैसा's picture

14 Aug 2013 - 11:44 pm | पैसा

असलं धाडस वेडेच करणार! तुमच्या कथांचा कलाटणीचा साचा मस्त जमतोय पण तोही एकदा बदलून बघा!

तुमचा अभिषेक's picture

15 Aug 2013 - 7:27 pm | तुमचा अभिषेक

नक्कीच... पुढेमागे या फॉर्ममध्ये लिखाण झाले तर नक्कीच... जेव्हा सारे कलाटणी अपेक्षित धरतील तेव्हाच ती टाळण्यात खरी मजा :)

अर्धवटराव's picture

15 Aug 2013 - 12:00 am | अर्धवटराव

तुफान जमलय तुला हे शतशब्द कथन.

अर्धवटराव

कवितानागेश's picture

15 Aug 2013 - 12:44 am | कवितानागेश

मस्तच लिहिलय.

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2013 - 1:26 am | प्रभाकर पेठकर

सुंदर.
कमीत कमी शब्दांचं धावतं कथानक, वाढती उत्कंठा आणि अनपेक्षित शेवट.
अप्रतिम.

लहानपणी चांदोबा मासिकात एक पानाची एक कथा असायची आणि त्याच्या शेवटी त्यातून घ्यायचा बोध दिलेला असायचा. खूप आवडायच्या त्या कथा. त्याच्या सुबक आकारामुळे, रंजकतेमुळे, कथेच्या अव्याहतपणे वाहात जाऊन शेवटास पोहोचण्याच्या पद्धतीमुळे.

१०० शतशब्दकथा लिहून त्याचे एक पुस्तक छापा. लोकांना आवडेल.

तुमचा अभिषेक's picture

15 Aug 2013 - 7:30 pm | तुमचा अभिषेक

१०० कथा म्हणजे आठवड्याला एक प्रमाणे देखील २ वर्षे जातील.. अर्थात हे गणित असेच केले.. सध्या तर डोक्यात चौथी काय लिहिणार आहे हे देखील नाही.. :)
आयुष्यात पुढेमागे कुठल्याही प्रकारचे पुस्तक छापायला आवडेलच, तुर्तास हे लेखन इथे तुम्हाला आवडतेय यातच समाधान :)

यसवायजी's picture

15 Aug 2013 - 2:09 am | यसवायजी

मस्त..

स्पंदना's picture

15 Aug 2013 - 7:33 am | स्पंदना

मस्त!

जेपी's picture

15 Aug 2013 - 10:10 am | जेपी

*****

तुमचा अभिषेक's picture

15 Aug 2013 - 7:30 pm | तुमचा अभिषेक

सर्व प्रतिसादांचे धन्यवाद :)

भटक्य आणि उनाड's picture

15 Aug 2013 - 10:19 pm | भटक्य आणि उनाड

मस्त लिहिलंयस !! आवड्ले बुवा...

दिप्स's picture

16 Aug 2013 - 4:22 pm | दिप्स

लई भारी राव

विटेकर's picture

16 Aug 2013 - 4:43 pm | विटेकर

ही पण आवडली ....
फक्त लकडी पूलाचा आणि पूराच्या पाण्याचा संबंध संपून काही शतके ( हो, पुण्यात मोजमापाची अशीच पद्धत आहे ) लोटली . हल्ली लकडीपूलाखालून फक्त गटार वाहाते.

तुमचा अभिषेक's picture

16 Aug 2013 - 10:06 pm | तुमचा अभिषेक

तसे आमच्या मुंबईतून लाकडी चाळी देखील गायब होऊन आता शतके उलटलीत .. बाकी ते लाकडी पूल एखाददुसर्‍या शब्दांत डोळ्यांसमोर घटनास्थळाचे चित्र उभारण्यास मदत करेल याच अपेक्षेने होते :)

चिगो's picture

16 Aug 2013 - 4:52 pm | चिगो

जमलीय कथा.. कलाटणीपण मस्तच. आवडली..

भावना कल्लोळ's picture

16 Aug 2013 - 4:55 pm | भावना कल्लोळ

छानच … कहाणी मधला ट्विस्ट आवडला ….

मी-सौरभ's picture

16 Aug 2013 - 7:19 pm | मी-सौरभ

आवडेश
पु.क्.प्र.

सोत्रि's picture

17 Aug 2013 - 8:41 am | सोत्रि

झक्कास!

- (धाडसी) सोकाजी

दत्ता काळे's picture

17 Aug 2013 - 10:32 am | दत्ता काळे

.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती.. ... ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Aug 2013 - 11:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वॉव...! कथेची कलाटणी आवडली.

-दिलीप बिरुटे

अविनाशकुलकर्णी's picture

17 Aug 2013 - 11:06 am | अविनाशकुलकर्णी

+७८६

sanjivanik१'s picture

17 Aug 2013 - 3:17 pm | sanjivanik१

इतक्या कमी शब्दात इतकी उत्कंठा वाढवणारी कथा!!!!शेवट पण तितकाच मनाला भिडणारा

जुन्या कथांचे धागे दिले तर उपयोगी ठरेल

तुमचा अभिषेक's picture

17 Aug 2013 - 7:09 pm | तुमचा अभिषेक

संजीवनीजी, या प्रकारात हि तिसरीच, तरी आधीच्या दोघांच्या लिंका माझ्या खात्यात किंवा इथे पहिल्या पानावरच सापडतील.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)