वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
9 Aug 2013 - 9:43 pm

सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच..
निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते..

कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले...
आणखी काय लागते..!

गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता..
यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली..

टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला..
अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते !

ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली..
पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..
डोळ्यात काहीतरी तरळले आणि तिच्याही नकळत दोन अश्रू कोसळले..

तिची अन तिच्या पोरांच्या, आजच्या जेवणाची सोय झाली होती !

- तुमचा अभिषेक

कथालेख

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

9 Aug 2013 - 9:43 pm | तुमचा अभिषेक

पहिल्या शतशब्दकथेला मिळालेला प्रतिसाद दुसरी लिहिण्याचा हुरुप देण्यास पुरेसा होता..
आता हिच्यावर मिळणारे प्रामाणिक प्रतिसाद सल्ले अन सूचना तिसरीच्या वेळी नक्कीच कामाला येतील.. :)

विटेकर's picture

9 Aug 2013 - 10:40 pm | विटेकर

टर्न आहे शेवटल्या १० शब्दात ! झक्कास ! असे लिहित राहीलात तर या तंत्राचे गुरु व्हाल.
उत्तम आणि पुलेशु..

आदूबाळ's picture

9 Aug 2013 - 11:04 pm | आदूबाळ

मस्तच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2013 - 1:03 am | डॉ सुहास म्हात्रे

शेवट मस्त जमलाय... शतशब्दकथेची भट्टी नीट जमू लागलीय !

असेच म्हणतो. शेवट विशेष आवडला.

प्रसाद गोडबोले's picture

10 Aug 2013 - 1:16 am | प्रसाद गोडबोले

बरेच दिवसांनी कही नवीन फॉर्मॅट वाचाअयला मिळाला . छान आहे कथा.

पहाटवारा's picture

10 Aug 2013 - 2:36 am | पहाटवारा

तुम्हि आतिवास यांच्या चिमुरडिच्या शतशब्द्कथा वाचल्या नाहि का इथे मिपा वर ? बटाटा भाजी, फुस्स..., वाट ( हि मला वाटते पहिली होती )..

अर्धवटराव's picture

10 Aug 2013 - 4:31 am | अर्धवटराव

शेवटच्या वाक्यात काय टर्न घेते कथा राव. जबरी.

अर्धवटराव

पैसा's picture

10 Aug 2013 - 9:41 am | पैसा

मस्त लिहिलंस!

तिमा's picture

10 Aug 2013 - 11:04 am | तिमा

पहिल्या प्रयत्नापेक्षा ही कथा भिडली. लवकरच आतिवास यांना हेल्दी काँपिटिशन!

- तिमा

आतिवास's picture

10 Aug 2013 - 12:39 pm | आतिवास

लवकरच आतिवास यांना हेल्दी काँपिटिशन!
!!
"काँपिटिशन" कशाला?
अजून लोकांनी लिहावं.. त्यातून शतशब्दकथा अधिक भक्कम होईल - ते महत्त्वाचं :-)

तिमा's picture

10 Aug 2013 - 2:21 pm | तिमा

काँपिटिशन नाही. मिपा समृद्ध होण्याची वाटचाल सुरु, असं म्हणतो.

- तिरशिंगराव माणुसघाणे

तुमचा अभिषेक's picture

10 Aug 2013 - 7:24 pm | तुमचा अभिषेक

सहमत तिमा .. आपण जे म्हणालात त्यातील हेल्दी शब्द महत्वाचा.. मग ती स्पर्धा ईतरांशी नाही तर स्वताशी असते, आणि ईंतरांच्या पुढे जाण्यासाठी नाही तर ईतरांना पुढे नेण्यासाठी असते :)

प्रभाकर पेठकर's picture

10 Aug 2013 - 11:16 am | प्रभाकर पेठकर

सुंदर आशयगर्भ शतशब्दकथा.

दोन भिन्न दिशांचे लेखनप्रकार मिपावरच वाचावयास मिळतात. एकीकडे अशी आशयगर्भ शतशब्दकथा तर दूसरीकडे आशयविहीन लक्षशब्द लेख.

किणकिनाट's picture

10 Aug 2013 - 12:09 pm | किणकिनाट

काका, तुमचा प्रतिसाद वाचून एकदम धडधडून हसायला आलं.

आणि अर्थातच १००% सहमत. सुंदर आशयगर्भ शतशब्दकथा.

लगे रहो, तु.अभि.

किणकिनाट.

जेपी's picture

10 Aug 2013 - 2:19 pm | जेपी

****

तुमचा अभिषेक's picture

10 Aug 2013 - 7:20 pm | तुमचा अभिषेक

तिसरीसाठी हुरुप वाढावा इतपत अपेक्षा होती, इथे अगदी दडपण यावे ईतके चांगले प्रतिसाद आलेत.. मनापासून धन्यवाद सर्वांचे :)

सुधीर's picture

10 Aug 2013 - 7:59 pm | सुधीर

तिसर्‍याची, चौथ्याची... पण वाट पाहतो. :)

अभ्या..'s picture

11 Aug 2013 - 2:40 pm | अभ्या..

तुम्ही नका हो दडपण घेउ.
आणि प्रतिसाद पण किती सुरेख देता तुम्ही.
आम्ही असं काही लिहील गोग्गोड की, लोकांना मानभावी वाटतं. ;-)

तुमचा अभिषेक's picture

12 Aug 2013 - 12:10 pm | तुमचा अभिषेक

"पण" या शब्दासाठी विशेष धन्यवाद :)

सस्नेह's picture

11 Aug 2013 - 1:48 pm | सस्नेह

आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2013 - 6:55 pm | अत्रुप्त आत्मा

झक्कास...! शेवट तर अप्रतिम...!

झुळूक's picture

12 Aug 2013 - 10:17 am | झुळूक

सुंदर....:)

चिगो's picture

16 Aug 2013 - 6:02 pm | चिगो

आतिवास ह्यांच्या कथा जरा मिष्कील, निरागसपणाकडे झुकणार्‍या.. तर तुमचारावांच्या कथा धक्कातंत्र, कलाटणीबाज.. झक्कास ! मिपा आणि शतशब्दकथाप्रकार समृद्ध होत आहे.. :-)

अनिल तापकीर's picture

16 Aug 2013 - 6:16 pm | अनिल तापकीर

मस्तच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2013 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनाचा फॉर्मेट आवडलाच आहे. अजून येऊ दे....!!!

-दिलीप बिरुटे

तुमचा अभिषेक's picture

17 Aug 2013 - 7:07 pm | तुमचा अभिषेक

सर्वच प्रतिसादांचे :)