सावल्या ___ शतशब्दकथा

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
7 Aug 2013 - 12:44 pm

ते एक सुकलेले शेत होते एवढंच काय त्याला गाडीच्या बाहेर फेकले जाताना जाणवले..
चांदण्यांच्या प्रकाशात लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत..
त्यात दिसणार्‍या, अंगावर झेपावणार्‍या...
जंगली श्वापदासारख्या उघड्या देहावर तुटून पडणार्‍या...
काळ्याकुट्ट सावल्या..!

त्यांचा स्पर्श, अंगाचा दर्प.. बीभत्स अन किळसवाणा..
त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही काही न करू शकणे.. एक असहाय्यता.. एक अगतिकता.....

क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली अन धापा टाकतच तो उठला..
उर नुसता धपापत होता.. हाताने अंग नुसते झाडत होता..
मात्र अनुभवलेली झोंबाझोंबीची शिरसिरी शरीराची साथ सोडायला तयार नव्हती..
स्वप्न होते समजूनही त्याला स्विकारायला मन धजावत नव्हतं...

आज त्याला कळलं, तिने काय भोगलं !

- तुमचा अभिषेक

कथाप्रकटनलेख

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

7 Aug 2013 - 12:45 pm | तुमचा अभिषेक

मराठी संकेतस्थळांवरच पाहिलेला १०० शब्दांत कथा लिहायचा एक प्रकार अन त्यातला माझा एक प्रयत्न !

पैसा's picture

7 Aug 2013 - 3:07 pm | पैसा

भयंकर घटना थोडक्यात शब्दबद्ध केली आहे. छान! आणखी वेगळ्या विषयांवर प्रयोग करा!

तिमा's picture

7 Aug 2013 - 5:06 pm | तिमा

'नटरंग' मधल्या प्रसंगाची आठवण झाली.

सुधीर's picture

7 Aug 2013 - 5:13 pm | सुधीर

शहारा आला. पैसा ताईंसारखंच म्हणेन, आणखी वेगळ्या विषयांवर प्रयोग कर.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2013 - 6:12 pm | अत्रुप्त आत्मा

सादर नमन!

तुमचा अभिषेक's picture

8 Aug 2013 - 6:34 pm | तुमचा अभिषेक

धन्यवाद सर्व प्रतिसादांचे... जमल्यास नक्की करेनच आणखी एखादा तरी प्रयोग..

विजुभाऊ's picture

8 Aug 2013 - 6:36 pm | विजुभाऊ

अस्वस्थ झालो......
शतशब्द कथा.अंतोन चेकॉव च्या कथा आठवल्या

सौंदाळा's picture

8 Aug 2013 - 6:51 pm | सौंदाळा

प्रयोग आवडला.
केवळ शंभर शब्दात अपेक्षित परीणाम साधलाय.

मोजक्या शब्दात बरंच काही लिहीलंत.

आतिवास's picture

8 Aug 2013 - 7:28 pm | आतिवास

परिणामकारक!

चिगो's picture

16 Aug 2013 - 6:04 pm | चिगो

हा कथाप्रकार जमतोय तुम्हाला, अभि..

प्रभाकर पेठकर's picture

9 Aug 2013 - 1:14 pm | प्रभाकर पेठकर

फक्त शंभर शब्द आणि अत्यंत प्रभावी आशय.
अंतर्मुख करायला लावणारी शतशब्द कथा.
अभिनंदन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2013 - 1:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

पहिलाच प्रयत्न असला तरी खूप परिणामकारक आहे... शेवटची ओळ एकदम प्रभावी. अजून नक्की लिहा.

बॅटमॅन's picture

9 Aug 2013 - 2:12 pm | बॅटमॅन

जमलंय!!!!!! जब्री आवडेश.

तुमचा अभिषेक's picture

9 Aug 2013 - 9:25 pm | तुमचा अभिषेक

धन्यवाद सर्वांचेच.. हुरुप वाढवलात .. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2013 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रयोग आवडला. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

अनिल तापकीर's picture

16 Aug 2013 - 6:11 pm | अनिल तापकीर

अप्रतिम, नेहमीप्रमाणे आवडली आणि विशेष म्हणजे शतशब्दात इतकी परिणाम्कारक मस्तच